स्वातंत्र्य - भाग 3 Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वातंत्र्य - भाग 3

स्वातंत्र्य भाग तीन 

         शिवरामले खंत वाटतच होती. त्याले वाटत होतं का आपली जात हे उच्च जात नाई. त्यातच आपल्यावर त्या लोकाईनं अत्याचार केलेत. परंतु आता आपण स्वतंत्र हाओत. आपल्याले बाबासाहेबाईनं स्वतंत्र्य केलं, आपल्या हाडाची काडं करुन. ते बाबासाहेबाईचेच उपकार हायेत आपल्यावर. परंतु आपण स्वतंत्र्य झालो असलो तरी ते स्वतंत्र्य होणं येथल्या उच्चवर्णीय लोकाईले खपत नाई. म्हणूनच भांडण होतेत. परंतु याचा अर्थ आपण भांडण करावं असा होत नाई. आपण काल भांडलो इंग्रजाईशीन. कारण आपल्याले त्या काळात नेत्याईनं सांगतलं होतं का आपल्यावर इंग्रज लोकं अत्याचार करतेत. परंतु ते अत्याचार करत नोयते तं ते सुधारणा करत होते. तो एक नवा बदल होता. जो आपल्या अंगवळणी पडला नोयता व आपल्याले तो स्विकारावासाबी वाटत नोयता. आतंबी लोकं म्हणतेत का इंग्रजाईनं आपल्यावर अत्याचार केले. त्यातले बरेच अत्याचार बदलाच्याच अनुषंगानं झालेले हायेत. 
         लोकं म्हणतेत का आपण इंग्रजाईच्या गुलामीत होतो. दिडशे वर्ष इंग्रजाईनं राज्य केलं. त्याईनं आपल्यावर अनन्वीत अत्याचार केलेत. जे शोषणं कठीण होतं. तसं पायल्यास त्याईचं म्हणणं खरंबी हाये. कारण इंग्रजाईनं आपल्यावर अत्याचारच केलेत. परंतु कायसाठी केलेत? आपण स्वातंत्र्य मागत होतो म्हणून. जे त्याईले द्यायचंच नोयतं. त्याईले आपल्यावर राज्य करायचं होतं, म्हणूनच ते अत्याचार करत होते.
          अत्याचार? तेबी इंग्रजाईचे? ते कसे काय? ते समजणे गरजेचे हाये. ते अत्याचार होते, स्वातंत्र्य मागतलं असता जाणूनबुजून गोळ्या झाडणे. जसा जालियनवाला बागेतला हत्याकांड. 
         स्वातंत्र्यासाठी त्याईच्या गोळ्या झाडण्याच्या कार्यवाह्या. त्या कार्यवाह्या आपल्याले पसंत आल्या नाईत. म्हणूनच आपण स्वातंत्र्यासाठी मोठी लढाई उभारली होती. परंतु हे आपण लढाई का उभारु शकलो? याचा कोणीच ईचार करत नाईत. 
         आपण इंग्रजाईविरुद्ध स्वातंत्र्याची लढाई का उभारली? त्याचं कारण समजून घेतांनी थोडासा इतिहासबी समजून घ्यावा लागन. जो आपल्या भारताचा इतिहास हाये.
           भारत एकसंघ राज्य बनण्यापुर्वी हा देश अखंड होता व येथं तुकड्या तुकड्यात राज्य अस्तित्वात होते. ज्याले हिंदुस्थान म्हणत व त्या हिंदुस्थानात प्रजा राहात होती. त्या प्रजेचा धर्म होता हिंदू. परंतु त्याले ते नाव अद्याप देण्यात आलं नोयतं. त्यामुळंच तो धर्म वैदिक धर्म म्हणून प्रचलीत होता. मात्र त्या धर्मात कुप्रथा अस्तित्वात होत्या. 
          हिंदुस्थानात इंग्रज आले. हे सर्वांईलेच माईत हाये. तसं त्यापुर्वीबी असे अनेक आक्रमणकारी आले. हेबी आपल्याले माईत हाये. जसं इंग्रजाईनं दिडशे वर्ष राज्य केलं. हे आपल्याले माईत हाये. तसंच राज्य इतराईनंबी केलं. हेबी आपल्याले माईत हाये. हिंदुस्थानात आर्य, अरब, मुघल आले. डच, फ्रेंच, पोर्तुगीज आले. त्याईनंबी या देशावर राज्य केलं. आपल्यावर अत्याचार केले. आपले धर्म बदलवले. त्याईनं आपल्या राजाईनं बांधलेल्या वास्तू पाडल्या. आपल्या आईबहिणीवर अत्याचार केले. ज्यात बलात्काराचाबी समावेश होता. परंतु ते आपल्याले दिसलंच नाई. दिसले फक्त इंग्रज. तेबी दोनचार लोकाईले. ज्याईले या देशातले सर्वसामान्य लोकं शिक्षीत होणं आवडत नव्हतं. ज्याईले या देशातली संपुर्ण जनता अशिक्षीतच असणं आवश्यक वाटत होतं. ज्याईले नव्या सुधारणा हव्या नोयत्या. ज्याईले बालविवाह आवडत होता. कारण एखाद्या कन्येचा एखाद्या म्हाताऱ्याशीन ईवाह झाल्यावर तो म्हातारा मरुन गेल्यास ते बालिका ईधवा होत असे व ते बालिका तिच्या जीवनभर तिच्या घरच्या सर्वांलेच बलात्कार कराले मिळत असे वा त्यातून त्याईच्या वासनांध मनाची तृप्तता होत असे. त्याईले केशवपण आवडायचं. कारण अशा विवाहितेचा पती मरण पावला तं तिले विद्रूप केलं जाई. ज्यातून तिच्याकडे कोणाची नजर जाणार नाई. नजर जाईन ते तिच्या परीवाराचीच. त्याईले सतीप्रथा आवडत होती. कारण जी स्री इतर घरच्या कोणाचं ऐकत नसन वा तिच्या खडतर बोलण्यानं ते नकोसी वाटायची. तिले जबरदस्तीनं जाणूनबुजून तिचा पती मरण पावल्यास तिच्यावर लांच्छन लावून सती जाले भाग पाडलं जाई. त्याईले येथली देवदासी प्रथा आवडायची. कारण देवदासी प्रथेत देवाच्या नावानं पहिली मंदिरात वायलेली कन्या मंदिरातल्या पुजाऱ्याईले फुकटच वासनांध मन तृप्त करण्यासाठी भेटत असे. त्याईले नगरवधू आवडायची. कारण नगरवधू राजा अन् संबंधीत सर्व मंत्रीगणाईले त्याईची वासना तृप्त करायसाठी भेटायची. नगरवधू तेच बनवली जात असे. जे सौंदर्यवती असायची पुर्ण नगरातली. शिवाय जे व्यक्ती इथल्याच तथाकथीत लोकाईच्या रस्त्यातले काटे असायचे. त्याईच्यासाठी या देशात आणखी काई प्रथा अस्तित्वात होत्या. ज्यात रथयात्रा, कावडयात्रा, चरकपुजा, गंगाप्रवाह, कन्यावध, महाप्रस्थान, तृषानल, हरीबोल, भृगृपन्न, धरना या प्रथाईचा समावेश होता. तसा शिक्षणाचा अभाव होताच. त्यामुळं कोणालेच येथच्या कुप्रथा दिसल्या नाईत. 
           हिंदुस्थानात अनेक ईदेशी आक्रमणकारी आले. ते इथं स्थिरावलेबी. त्याईनं इथं बरंच वर्ष राज्य केलं. परंतु त्या कुप्रथामंधी काईच बदल केला नाई. त्या प्रथा जशाच्या तशाच ठेवल्या. कारण तशाच स्वरुपाच्या काई कुप्रथा त्याईच्यातबी होत्या. ते काय ज्ञान देणार होते. त्यातच त्याईनं येथली देवळं जरी पाडली असली. स्तूप जरी पाडली असली. आपल्या आईबहिणीवर अत्याचार जरी केले असले तरी ते आपल्याले दिसलं नाई. त्याचं कारण होतं आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा न बदलवणं. मंग त्या कितीबी वाईट प्रथा का असेना. सतीप्रथेत तं अख्खा जीवच जात होता महिलेचा. तिची इच्छा असो वा नसो. या सर्व प्रथा कालानुकाल कितीतरी वर्षापासून चालत आल्या होत्या. लोकं त्या प्रथाईले आपली रुढी व परंपरा समजत. जरी कोणाचा जीव जात असन तरी, त्या गोष्टीचं लोकाईले घेणंदेणं नोयतं. एखाद्यावेळेस एखाद्यानं एखाद्या प्रथेच्या पालनाचा ईरोध केलाच तं त्याले लोकं सोता होवून मारुन टाकत अख्ख्या परीवारासकट. हे अमानवीयताच होती व हे अमानवीयताच प्रत्येक समाजात चालत आलेली होती व चालत होती.
         इंग्रजाईनं सतीप्रथा बंद केली होती. त्याईनं बऱ्याच कुप्रथा बंद केल्या होत्या. तसं पायल्यास आर्य भारतात आले हे कुप्रथा घेवूनच. हेच शिवऱ्याले समजत होतं. त्याची खंत शिवऱ्याले वाटत होती. त्याले वाटत होतं का आर्य भारतात येण्यापुर्वी हिंदुस्थानात तशा कुप्रथा मुळातच नोयत्या. जवा माणूस झाडावरुन खाली आला. तवाबी त्या प्रथा नोयत्या. हं, काई लोकाईच्या डोक्यात नक्कीच खुळ असन का असल्या कुप्रथाईले खतपाणी मिळालं. तवा इतर सर्वसामान्य लोकाईने कुप्रथा म्हणजे काय, हे लोकाईले समजतबी नसनच. कालांतरानं त्यानं जवा कामं निर्माण केली. त्या कामावर देखरेख करण्यासाठी एक व्यक्ती नियुक्त केला. त्या माणसाईच्या डोक्यात खुळ शिरलं असेल का आपण अशा कुप्रथा निर्माण कराव्यात का त्या प्रथाईमुळं आपल्याले तमाम लोकाईवर राज्य करता येईन. त्यायेळेस प्रथा तो सुरुच करणारच असन. तेवढ्यात आर्य आले. उदाहण द्यायचं झाल्यास सरकारचं देता येईन. सरकार कोणाचंबी बसो. नियोजन आधीच तयार असतं का देशातील जनतेले काय द्यायचं हाये. तेच घडलं त्यायेळेसबी. आर्य भारतात आल्यानंतर येथल्याच काई लोकाईनं आर्याईलेबी मदत केली असन. ज्यातून अशा प्रकारच्या कुप्रथा अस्तित्वात आल्या व त्याईची अंमलबजावणी केल्या गेली व तद्नंतरच्या काळात लोकं त्या प्रथा वाईट हायेत का चांगल्या हायेत, हे न पायता स्वखुशीनं पाळू लागले व स्वखुशीनंच आत्महत्याही करु लागले. त्यानंतर कुशाण, हून, ग्रीक, अरब आले. मुघल आले. इतरबी बरेच ईदेशी आक्रमणकारी आले. त्याईनंबी कुप्रथाईवर ईरोध केला नाई. त्या तशाच सुरु ठेवल्या. अरब वा मुघल जवा आले. तवा त्याईनबी त्या प्रथा तशाच ठेवल्या. कारण त्याईच्यातच बुरखापद्धती होती. ते काय हिंदुस्थानातील कुप्रथा बंद करतीन? त्या प्रथा तशाच सुरु रायल्या. त्यामुळं जरी त्याईनं देवळं पाडली असली, स्तूपं पाडली असली. आपल्या आईबहिणीवर अत्याचार केले असले. बलात्कार केले असले. जाणूनबुजून जबरदस्तीनं आपले धर्मांतरण केले असले. त्यासाठी आपल्या हत्या केल्या असल्या तरी आपण त्याईले काईच म्हणलं नाई. ईरोध केला नाई सत्तेचा, प्रथेचा वा त्याईच्या अत्याचाराचा. परंतु त्या ईरोधानं आपला काईच फायदा झाला नाई. अन् आपण फायदा करुनबी घेतला नाई. त्यानंतर डच, फ्रेंच, पोर्तुगीज आले. त्याईलेबी येथल्या या सर्व कुप्रथा दिसल्या. त्याईनंबी त्या कुप्रथांवर उपाय काढला नाई. त्यामुळंच त्याईचाबी आपल्याले अत्याचार दिसला नाई. पोर्तुगीजांच्या अत्याचाराचं एक उदाहरण. पोर्तुगीजाईनं धर्मांतरण करत असतांनी कित्येक आपल्याच देशात रायणाऱ्या हिंदूंची हत्या केलेली हाये. गोव्यात असलेला हातकातरी खांब आजबी त्याचं साक्षात उदाहरण हाये. त्यानंतर इंग्रज आले. त्याईले येथल्या प्रथा दिसल्या. त्या प्रथा त्याईले कुप्रथा वाटल्या. अन् कोणालेबी वाटणारच होत्या. त्याईनं कुप्रथा ठरवून त्या प्रथा त्याईनं ताबडतोब बंदच केल्या. कारण तमाम सर्वसामान्य लोकाईचे धर्माच्या नावावर नाहकच स्वखुशीनं बळी जात होते. त्या आत्महत्याच होत्या. परंतु त्या त्या सर्वसामान्य लोकाईले समजतच नोयत्या. त्याईनं बैलाले पऱ्हाणी टोचण्याची प्रथाबी बंद केली होती. त्यातच भेदभाव अन् अस्पृश्यताबी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. जे ईतर स्पृश्य लोकाईच्या मनात खुपलं. 
         इंग्रज लोकाईले वाईट वाटत होते. आवडत नोयते. परंतु शिवऱ्याले इंग्रज आवडायचे. त्याले वाटत होतं का ते जर आले नसते हिंदुस्थानात तं माह्या समाज कधीच सुधरला नसता. तो आजबी कालसारखा भीकच मांगत रायला असता. आज माह्या समाजातले दोनचार जरी सुधरले असतीन तं पहिली कृपा त्या इंग्रजाईचीच हाये. ज्याईच्यामुळं माह्या समाज सुधरला होता अन् दुसरी कृपा बाबासाहेबांची हाये. परंतु शिवऱ्याचा समाज आजबी बाबासाहेबाईले मानत नोयता. त्याचीबी खंत शिवऱ्याच्या मनात होतीच. त्याले वाटत होतं का इंग्रज हे सुधारणावादी होते. त्याईनं प्रथा तं बंद केल्याच. व्यतिरीक्त त्याईनं येथल्या लोकाईले शिक्षीत केलं व चांगलं वाईट ओळखण्याची सवय लावली. हेच खुपलं येथल्या तथाकथीत लोकाईच्या मनात. ज्याईले या कुप्रथा बंद होवू द्यायच्या नोयत्या. ज्याईले अशा कुप्रथा देशात सुरु असतांनी मजा येत होती. ज्यात जाणाऱ्याईचा जीव जात होता. अन् मजा त्या लोकाईले येत होती, ज्याईले या प्रथा हव्या वाटत होत्या. हा एक प्रकारचा असुरीच आनंद होता. त्यामुळंच त्या प्रथा इंग्रजाईनं बंद करताच, इंग्रजाईच्याच कृपेनं सुशिक्षीत झालेल्या या देशातील तमाम लोकाईले ते दिसलं. त्यातच त्याईच्या असुरी भावना भडकल्या. त्यानंतर ईरोध होवू लागला. ते म्हणाले लागले का इंग्रज चांगले नाईत. त्यातच ते लोकाईले भडकवू लागले व तद्नंतर त्याईनं स्वातंत्र्याचे रणशिंगच फुंकले. हे सत्य बाब हाये का समजा इंग्रज जर आले नसते तं ना त्या कुप्रथा बंद झाल्या असत्या ना देशातली जनता शिकली असती ना सुधारणा झाल्या असत्या. आज आपण स्वतंत्र हाओत व स्वतंत्र विचार करु शकतो. का चांगलं काय अन् वाईट काय? हे समजू शकतो. इंग्रजाईनं अत्याचार नक्कीच केला. परंतु कोणाची देवळं पाडली नाईत. कोणाच्या मशिदीले धक्का देला नाई. कोणाची स्तूपं पाडली नाईत. हं, सुधारणा नक्कीच केल्या. 
         इंग्रजाईच्या याच सुधारणावादी तत्वामुळं पुळं बाबासाहेबाईले वाटलं का स्वातंत्र्य आपल्याच लोकांपासून का इतर लोकांपासून? हा त्याईले एक निर्वाणीचा प्रश्न वाटला. जो प्रश्न कालबी अस्तित्वात होता. अन् आजबी अस्तित्वात हाये. जवा आपण इंग्रजाईचे गुलाम होतो. हा प्रश्न बाबासाहेबाईले पडला होता. त्याचं कारण होतं या देशातील लोकाईले याच देशातले लोकं देत असलेला त्रास. तो अत्याचारच होता एक प्रकारचा. कारण येथल्या लोकाईनं काई नियम बनवले होते, ज्या कुप्रथाच होत्या. लोकं त्या कुप्रथेवर चालत. त्या कुप्रथा पाळाले लावत. ज्याईनं नाई पाळल्या. त्याईच्यावर अनन्वीत अत्याचार करत. त्यातच स्पृश्य अस्पृश्य भेदभाव निर्माण झाला होता. आत्महत्याबी झाल्या होत्या. 
          शिवऱ्यालेबी तेच वाटत होतं. त्यालेबी वाटत होतं का आज देशाले स्वातंत्र्य मिळालं हाये. एवळे वर्ष झाले हायेत. तरीबी लोकं सुधारले का? तं त्याचं उत्तर नाई असंच येते. लोकं हे आजबी देशातल्या सरकारी नीतीशीन भांडत नाईत. ज्या असल्या तुच्छ प्रथा सुरु ठेवतेत. ते भांडतेत आपल्याच माणसांशीन. जे माणसं आपलेच दात असतेत व आपलेच ओठंबी. ज्याईच्याशी भांडून उपयोग नसतेच. 
          ईशेष म्हणजे भांडायचंच असन तं ईदेश नीतीशीन भांडावं. ज्या ईदेशनीतीनं देशात बलात्काराचे सत्र सुरु हायेत. भांडायचंच असन तं कुप्रथा बंद करण्यासाठी भांडावं. ज्या कुप्रथा आजबी अस्तित्वात हायेत. अन् भांडायचंच असन तं राजकिय अस्तित्वासाठी अन् सत्तेसाठी भांडावं. ज्यातून या कुप्रथाच नाई तं साऱ्या गोष्टी साध्य करता येतीन. असं भांडण करण्याऐवजी जर राष्ट्रहितासाठी, समाजहितासाठी भांडलो तं कदाचीत राष्ट्रहित, समाजहित साध्य करता येईन. ज्यातून राष्ट्र घडवता येईन अन् समाजबी. हे तेवढंच खरं. असं शिवरामले वाटत होतं. 
          शिवऱ्यासारखाच राम्या होता. त्यालेबी स्वातंत्र्याबद्दल काळजी होतीच. कारण स्वातंत्र्य तं भेटलं होतं. परंतु ते स्वातंत्र्य जणू सगळ्याईले जरी भेटलं असलं तरी त्याचा उपभोग फक्त ईशिष्ट वर्गच घेवू लागला होता. त्या स्वातंत्र्याचा उपभोग त्याच्या समाजाले घेता येत नोयता. त्याचा समाज हा पुळं जाणाऱ्या आपल्याच बांधवाईचे पाय खेचत होता. तो बाबासाहेबाले मानत नोयता. मात्र सोता आपल्या मनात एवळा आव आणत होता का जणू तो बाबासाहेबाईले देवच मानत हाये. परंतु ते त्याईचं नाटक होतं. कारण त्याच्या समाजातल्या कित्येक लोकाईच्या घरात पुजेमंधी आर्यानच वसवलेल्या मुर्त्या होत्या. ज्याईची पुजाअर्चना ते लोकं करत होते. अन् बायेर तेच लोकं जगाले बुद्ध सांगत असत. राम्याले त्याच गोष्टीचा राग येत असे. त्याले वाटत असे का पयलं लोकाईनं बुद्ध धम्माचं आचरण करावं. गौतम बुद्धानं पंचशील तत्वात जे मांडलं ते त्याईनं तंतोतंत पाळावं. मंगच ज्ञान पाजळावं. कारण असा बुद्ध सांगणारे लोकं दोन्ही तोंडाचे होते. जे राम्याले पसंत नोयते. अशी मंडळी आपल्याच समाजाची दिशा भटकवण्याचे काम करत असत. फक्त स्वार्थासाठी अन् सोताच्या फायद्यासाठी केवळ बुद्ध तत्व मानत. परंतु ते तत्व पाळत नसत. त्यामुळंच राम्याले वाटत होतं का स्वातंत्र्य उच्च वर्णियांपासून नाई तं आपल्याच लोकाईपासून पायजे. कारण त्या लोकाईपेक्षा आपलाच समाज राम्याले सोताले गुलाम बनवत हाये.
           राम्याचं ते बरोबरबी होतं एका अर्थानं. कारण बाबासाहेबाईनं दैवतीकरणाचा ईरोधच केला होता. त्याईले मुर्तीपुजा वज्र होती. कारण त्याईले वाटत होतं का मुर्तीपुजा हे शस्र आर्याईनं अस्पृश्याईले गुलाम करण्यासाठी वापरलेलं शस्र हाये. म्हणून बाबासाहेबाईनं मुर्तीपुजेले ईरोधच केला. मंग ते त्याईच्या पुतळ्याईची पुजा का असेना. परंतु समाज त्याईच्याच पुतळ्याईची पुजा करुन दैवतीकरणाले व आर्याच्या गुलामीच्या प्रथेले चालना देत होते. 

         ************************************************

           आज आपण पायतो का प्रत्येकच समाजात तसंच जातीजातीत दोन गट हायेत. ज्यात एक गट दुसऱ्या गटाले निम्न समजते. त्याईच्या भावभावनांची खिल्ली उडवत, त्याईले निरक्षर समजते. शिवाय त्याईचे तुटपुंजे ईचार आयकून घेत नाईत व सांगतेत अन् मिरवतेत का आपण मोठे. पैशानं अन् अकलेनबी. जे अकलेचे कांदेच असतेत. तीच मंडळी आपल्या ईचारानं इतर समाजातल्या लोकाईचे गुलाम समजून वागत असतेत नव्हे तं आपल्याबी समाजाले दिशा न देता गुलामीसारखे वागवत असतेत. त्याईच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा न पोहोचवता त्याईनं लहानशेच व्यवसाय करावेत म्हणून त्याईले बाध्य करतेत. खरं तं अशा संधीसाधू लोकाईपासून आपण सावधान राहाले पायजे. आपला ईकास कराले हवा. उच्च शिक्षण शिकाले पायजे. उच्च पदावर जाले पायजे नव्हे तं आपल्या समाजालेबी उच्च पदावर न्याले पायजे. स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्याईले समजावून सांगाले पायजे. स्वातंत्र्य याईच्यापासूनच पायजे का जे आपल्याच समाजातल्या बांधवाईले वाघ न बनवता शेळ्याच ठेवू पायतेत.
             शिवऱ्याले वाटत होतं का स्वातंत्र्य आपल्याच लोकाईपासून का इतर लोकाईपासून. असा प्रश्न आपल्या मनाले ईचारल्यावर नक्कीच उत्तर मिळते का स्वातंत्र्य हे आपल्याच माणसाईपासून मिळावं. इतराईपासून स्वातंत्र्य मिळविण्याची गरज नाईच. त्याचं कारण हाये. इतर माणसाईचं आक्रमण. ते माणसं सरासरी आपल्यावर हल्ले करत नाईत. आपलाच एखादा ईश्वासाचा व्यक्ती असते का जो आपला ईश्वासघात करते. म्हणूनच आपण फसतोबी व त्या फसणातून निंगू शकत नाई. उदाहरण द्यायचं झाल्यास बिभीषणाचं देता येईन. रावण सरासरी मरु शकत नोयता जर त्याचा सख्खा भाऊ बिभीषण रामाच्या बाजूले गेला नसता तं. मृत्युशय्येवर असतांनी रामानं रावणाले एक प्रश्न विचारला. 
           "आपण प्रकांडपंडीत हात. प्रजेले काय उपदेश देवू शकान?"
           त्यावर रावण म्हणाला,
           "नात्यातल्या माणसांपासून जरा जपून राहावं."
          त्यावर राम म्हणाला, 
          "मले काईच समजलं नाई. जरा खुलवून सांगता काय?"
          त्यावर रावण म्हणाला, 
          "हे बघ, मी प्रकांड पंडीत जरी होतो. अन् शस्रामंधी पुर्णतः निपुण जरी होतो, तरी माह्या भाऊ माह्यासोबत नोयता. म्हणूनच माह्या ईनाश झाला.
           रावणाचंबी बरोबर होतं. कारण बिभीषण हा रावणाचा भाऊ होता व त्यालेच रावणाच्या मृत्यूचे कारण माईत होते. जे त्यानं रामाले सांगतलं. ज्यामुळंच रामाले, रावणाले मारता आलं.. 
           अलिकडील काळात राम रावण हा भागच मानत नाईत. ते महाभारतबी मानत नाईत. ते थोतांड वाटते. म्हणलं जाते का राम झाला नाई, अयोध्याबी झाली नाई. ते असे फक्त म्हणतेत. परंतु रावणाला मानतेत. मग रावण कोठून आलाय? तसं पायल्यास चौदाव्या शतकापर्यंत म्हणजे बादशाहा अकबराच्या काळापर्यंत राम व रावण कोणाले माईतबी नोयता. त्या काळानंतर रावण व राम हे पात्र लोकाईले माईत झालं. कारण रामलीलेची कार्यक्रमं गावागावात सुरु झाली होती अकबर बादशाहा सहिष्णू असल्यानं. त्यापूर्वीच्या शासकाईनं कित्येक वैदिक धर्मियाईले चिरडून, चिरडून काढले होते व कित्येक वैदिक धर्मीय मुघलांचे ईरोधक बनले होते. अकबरानं ओळखलं का आपण त्याच बादशाहासारखे वागलो तं आपल्याले आपला साम्राज्यविस्तार करता येणार नाई. म्हणूनच त्यानं सहिष्णू धोरण अवलंबलं व त्या धोरणानं त्यानं साम्राज्यविस्तारबी केला. 
           शिवऱ्या ईचार करत होता. ईचारांती त्याले हे सगळं समजत होतं. त्याचा तो ईचार. घरातली, नात्यातली वा जातीतली माणसं हे आपलीच माणसं असतेत. हे आपलीच माणसं आपल्याले धोकादायक असतेत. हे शिवरायाईनं ओळखलं होतं. ते गुप्तहेरांईले कडक शासन करत. त्याचं कारण इतिहास. तो मंग राम रावणाचा इतिहास का असेना, राजा दाहिरचा इतिहास का असेना, पृथ्वीराज चव्हाणचा इतिहास का असेना. राजा दाहिरले आपल्याच देशातल्या एका किल्लेदारानं मोहम्मद बिन कासीमशीन हातमिळवणी करुन पकडून देलं व हत्या करवली. कारण त्याले गादीवर बसाचं होतं. तसंच पृथ्वीराज चव्हाणलेबी नातेवाईक व भाऊच असलेल्या जयचंदानं पकडून देलं अन् हत्या करवली. कारण त्यालेबी राजगादीवर बसाचं होतं. परंतु दोन्ही प्रकरणात दोघांलेबी राजगादीवर बसवलं गेलं नाई तं त्याईचीबी पुळं हत्याच केली गेली. 
           सध्याच्या काळातबी तसंच घडत हाये. उद्देश रायतो भलतीकडेच. केवळ स्वार्थासाठी लोकं आपले ईचार पेरत असलेले दिसतेत. ते सत्य असत्य काय हाये? हे तपासूनच पाहात नाईत. ज्या गोष्टी सत्य असतेत. त्याले चूक म्हणतेत व ज्या गोष्टी असत्य असतेत. त्याले बरोबर म्हणतेत. अलिकडील काळात येत असलेल्या काई माहित्याईचं तुष्टीकरण करतेत.
            सर्वच धर्मात कमीजास्तपणा हा असतेच. जसं हिंदूत स्पृश्य अस्पृश्य, मुस्लीममंधी शिया व सुन्नी, आता नवीनच एक पंथ तयार झाला. तो पंथ म्हणजे काफिर. बौद्ध धम्मातबी महायान व हिनयान, जैन धर्मातबी श्वेतांबर व दिगंबर. त्यानुसार प्रत्येकाईचं रहनसहन येगयेगळं हायेच. तेवळाच भेदभावबी अन् अंधश्रद्धा व काई अनैतिक प्रथाबी.
           शिवऱ्याले वाटत होतं का समाजात असेच दोन येगयेगळे घटक असतेत. ते एकमेकाईवर अत्याचार करत असतेतच. हा इतिहास हाये. इतिहासात एक वाघ हाये तं दुसरा शेळी हाये. हे समजून घ्याले पायजे व आपसातले ईचारांचे मतभेद ईसरुन एकत्र राहाले पायजे. कधी झुंडीनं रायणाऱ्या शेळ्यांचीबी ताकद एका वाघावर भारी पडू शकते. परंतु आपण शेळीसारखे वागत असू व एकत्र राहातबी नसू तं वाघरुपी इतर लोकं आपल्याले समाप्त करतीन. ना आपला धर्म वाचन ना आपली जात. जर आपण वाचू तं आपल्याले माह्यी जात अमूक अमूक हाये असं सांगता तरी येईन. माह्या धर्मबी अमूक अमूक हाये असंबी सांगता येईन. कारण सिर सलामत तो पगडी हजार. मग धर्म कोणताबी वा जात कोणतीबी का असेना. आजपर्यंत असंच होत आलं हाये. हे चांभार जात कालची वाघच. परंतु स्पृश्याईनं त्यायेळेस त्या शेळ्या असतांनीबी केवळ बुद्धी लावून चांभाराईनची शिकार केली. आज ते वाघ बनले व चांभाराईलेच शेळी बनवलं. हे आपण ओळखाले हवं. आपल्याबी समाजाचं तेच झालं. आपली ताकद आपण ओळखाले हवी व त्यानुसार आपण वागाले हवं. जेणेकरुन आपल्याले आपल्यातील शेळीचा वाघ बनता येईन व आपल्याले आपले हक्क मागता येतीन व ते अबाधीत ठेवता येतीन हे तेवढंच खरं. आपल्याले गौतम बुद्धाच्या तत्वावर चालाले हवं. बाबासाहेबाईच्या उपदेशाचं पालन कराले हवं. परंतु समाजात अशीबी काई माणसं हायेत का जे सोताबी वाघ बनत नाईत. इतराईलेबी वाघ बनूच देत नाईत. ते त्याईचे पाय खेचतेत. अशाईनंच समाज मागे रायते यात शंका नाई. 
          आज देश जरी स्वतंत्र्य असला तरी देशातल्या अंतर्गत भागात स्वातंत्र्य नाई. आपल्याच जातीतले वा बिरादरीतले लोकं आपल्याच माणसाईसोबत भांडतांनी दिसतेत. कधी जातीवर तं कधी धर्मावर. कधी ईचारांवर तं कधी स्वार्थावर. कधी मालमत्तेसाठी तं कधी आपल्या अस्मितेसाठी. हेच पायतेत ईदेशी लोकं अन् सरळ सरळ आपल्यातल्या काई लोकाईकडून कुरघोडी करवून घेतेत व आपल्यातल्या एखाद्याले एकटं पाडून त्याईची शेळीसारखी हत्या करवून घेतेत. हे सत्य बाब हाये. जे मनाले कधीच पटत नाई.
            शिवऱ्याचा एक मित्र होता. त्याचं नाव होतं तिमा. लोकं त्याले तिम्याच म्हणत असत. त्याचा धंदा होता मासेमारी करणं. तो भोई समाजाचा होता. तोबी काई जास्त शिकला नोयता. तशी शिवऱ्याची व त्याची भेट होत असे व तो त्याले म्हणत असे का मासेमारी हाच आपला व्यवसाय, असं म्हणून चालन काय. तू शिक अन् आपल्या समाजालेबी शिकव. परंतु तो त्याचं आयकतच नोयता. म्हणूनच त्यानं त्याचा नाद सोडून देला होता. 
         शिवऱ्यानं त्याले म्हणलं होतं का मासेमारी सोड. त्याचं कारण होतं, त्यानं पायलेली त्याच्या जातीचीबी परिस्थिती. त्याले वाटत होतं का जर त्यानं वा कोणत्याबी माणसाईनं आपले पिढीजात धंदे सोडले नाई तं जातीप्रथा बंद होणार नाई. त्याच अनुषंगानं त्यानं तिम्याले तसा सल्ला देला होता. 
           झाडावरुन माकड रुपातला माणूस जवा खाली उतरला. तवा त्या माणसानं जीवन जगत असतांनी कामाची वाटणी केली. ज्यात बलुतेदार व अनुतेदार पद्धती आणली. बलुतेदार अर्थात मुख्य काम करणारे तं अनुतेदार अर्थात त्याईच्या त्याईच्या व्यवसायाशीन संबंधीत व्यवसाय करणारे. त्यावरुन बारा बलुतेदार व सत्तावीस अनुतेदार निर्माण करण्यात आले. ज्यातील एक जात होती भोई. 
         सुरुवातीले कामाच्या वाटणीवरुन जरी जाती निर्माण झाल्या असल्या तरी प्रत्येक घटकाईचा ईशिष्ट असा धंदा नोयता. त्याले कोणताबी धंदा करावाच लागत असे. परंतु कालांतरानं धंद्यात कसब वाढतं म्हणून एकच एकच धंदा करण्याची पद्धत आली. ज्यातून भोई जात निर्माण केली गेली, ज्याचा अर्थ असन, असं शिवऱ्याले वाटत होतं. भोई अर्थात भुई, जमीनीशी संबंधीत असलेली कामे करणारी जात. पुळं या जातीच्या नावाचा अपभ्रंश होवून भोई करण्यात आलं. त्याचं कारण होतं का ते मंडळी शेतीची कामं करतेत असं तथाकथीत पुढील पिढीच्या लक्षात येवू नये. 
           भोई समाजाचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी जरी असला तरी सुरुवातीले माणूस मासेमारी करत नोयता. तो जवा झाडावरुन जमीनीवर आला. तवा त्यानं सुरुवातीले शिकार करणं सुरु केलं. त्यातच कंदमुळंबी खाण्याचं काम तो करत असे. कारण पोट जगवणं आवश्यक होतं. परंतु ते शिकार तो जमीनीवर करु लागला होता. त्यानंतर तो जवा नदी किवा समुद्राच्या संपर्कात आला. तवा त्यानं दुसरा व्यवसाय शेती सुरु केला. अशी शेती करत असतांनी जो घटक सोता शेती करायचा. त्याच घटकाले मदत करण्याचं कार्य भोई समाज करायचा. कालांतरानं भोई समाज जमीनीच्या मालकीचे वंशज बनले होते. परंतु कालांतरानं ही बाब तथाकथीत समाजाच्या लक्षात आली. जो समाज अति हुशार होता व त्या समाजानं भोई समाजाची मक्तेदारी असलेली शेती हिसकावून घेतली. मंग त्या समाजाकडे पोट भरण्यासाठी साधन नोयतं व नाईलाजानं त्या समाजाले पोटासाठी दुसरा उपाय नाई म्हणून ज्या भागात शेती होत असे. त्याच भागात मासेमारीचा व्यवसाय हातात घ्यावा लागला. 
         भोई जातबी सुरुवातीपासून हुशार होती. या जातीचे उल्लेख हे रामायण व महाभारतात मिळतेत. रामायणात रामाले नदी पार करुन देणारा नावाडी केवट. ज्याले निषादराज म्हणलं जातं, तो एक भोईच होता. शिवाय महाभारतात गंगापुत्र भिष्माले भिष्मप्रतिज्ञा कराले लावणारा समाज हा एक भोईच होता. या समाजाची महिला सत्यवती हिनं भिष्माचे वडील शांतनूशीन ईवाह करतांनी त्यानं आपला वंश जन्मास घालू नये, तरच ते शांतनूशी ईवाहबद्ध होईन यासाठी प्रतिज्ञा कराले लावली होती. तिले भिष्मप्रतिज्ञा म्हणतेत. पुढं सत्यवती व शांतनुपासून वारस निर्माण झाले. परंतु तेच वारस पुढं वंशाले दिवे देण्यास समर्थ नसल्यानं नाईलाजानं सत्यवतीले आपला दुसरा पुत्र वेद व्यासाले बोलवावं लागलं. ज्याच्या सहवासातून धृतराष्ट्र, पंडू व विदूर जन्माले आले. 
          भोई हे जात राजवंशाच्या इतिहासातील महान अन् महत्वपुर्ण जात हाये असं शिवऱ्याले वाटत होतं. त्यानं तिम्याले म्हणलं होतं,
           "हे जात कालच्या काळात संपुर्ण भारतवर्षावर राज्य करणारी जात हाये. या समाजानं पंडूच नाई तं पुळं धृतराष्ट्र व त्यापुढं युधिष्ठिर व त्यानंतर परीक्षीतपर्यंत कित्येक वर्ष राज्य केलं. हा इतिहास हाये व याचे दाखले ऐतिहासिक पुस्तकात हायेत. जे सहजासहजी लक्षात येत नाईत व कोणताबी व्यक्ती त्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करत नाई. रामायणातबी निषादराज नावाच्या राजाचं राज्यच दाखवलं हाये. असं असतांनी या समाजाले आजच्या काळात जीर्ण जगणं का जगावं लागतं? काल सत्तेवर असलेला तुमचा राजेशाही समाज, आज का बरं या समाजाची जातीच्या आधारावर हेटाळणी होत असलेली दिसते? याचं कारण हाये तुमच्या समाजाची पुर्वीच्या काळात असलेली सत्ता. तथाकथीत समाजानं तुमच्या राजसत्तेचा द्वेष करुन ईदेशी आक्रमणकर्त्या लोकाईजवळ तुमच्याच जातीच्या राजवंशांच्या राजाच्या ईरोधात कुरघोडी केली. ते कुरघोडी सोता सत्तेवर बसण्यासाठी नाई तं तुमच्या हातातून द्वेषानं राजसत्ता काढून घेण्यासाठी. त्यानंतर त्याच ईदेशी आक्रमणकारी लोकाईनं तुम्हाले सत्तेतून निष्काषीत केलं व आपलं गुलाम केलं. त्यानंतर तुमच्या जातीले तुम्ही चामड्याशीच संबंधीत काम करता. म्हणून अस्पृश्य जातीत टाकलं. ज्यामुळं काई भागात तुमचीच जात अस्पृश्य जात म्हणून गणल्या जाते तं काई भागात हेच जात आदिवासी जात म्हणून मानली जाते. काई ठिकाणी या जातीले उच्चवर्णीय जात म्हणूनबी दर्जा मिळत हाये. काई ठिकाणी आजबी हे जात क्षत्रीयच समजली जाते. 
         मुळच्या अनुतेदारामंधी भोई नावानं समाविष्ट असलेली हे जात अलिकडील काळात भोई, कोळी, ढिवर या येगयेगळ्या पोटजातीत हे जात आज वावरत हाये. काई ठिकाणची जात अति श्रीमंत हाये तं काई ठिकाणच्या जाती अति गरीब हायेत. या जातीचा आता शेतीशीन संबंधीत पुर्णच धंदा आता गोठलेला असून हे जात आता फक्त मासेमारीच करत हाये. हे जात समुद्रकिनारी मोठी मासेमारी करत असल्यानं या जातीले कितीतरी प्रमाणात जास्त पैसा मिळते व त्या समुद्रालगत असलेली हे जात अति श्रीमंत हाये. काई लोकं जहाजबांधणीचीबी कामं करतेत. त्यामानानं नदी किवा तलावात मासेमारी करणारी मंडळी कमी श्रीमंत हायेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर राहात असलेली व अरबी समुद्रात असलेली जात हे कोळी म्हणून संबोधली जाते. जी जात अति श्रीमंत हाये. त्यामानानं ईदर्भात असलेली याच जातीची पोटजात असलेली भोई जात तेवळी श्रीमंत नाई. तशीच भंडारा, गोंदियाच्या भागात असलेली याच जातीची पोटजात असलेली ढिवर जातबी तेवळी श्रीमंत नाई. 
          मुळची राजेशाही राजसत्ता भोगलेली हे जात, ज्या भारतवर्षावर याच जातीची हस्तीनापुरात क्षत्रीय म्हणून अप्रत्यक्षरित्या सत्ता होती. त्याच जातीले आज एससी, एसटी व एनटी मध्ये टाकणे हे एक चुकीची गोष्ट. परंतु ती चूक जरी असली तरी ती चूक स्विकार करुन हे जात चूप बसलेली हाये. तसं पायल्यास या जातीचा भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वी जो ईकास झाला नोयता. तोच ईकास आज भारत स्वतंत्र्य झाल्यावर होत हाये. त्याले कायद्याचं पाठबळ व डॉ. बाबासाहेबांनी संविधानीक आखून देलेल्या तरतुदी मदत करतेत. आज तुमच्याच समाजातले काई मंडळी बाबासाहेबाईले संविधानीक रुपानं मानाले लागलेले असून तुम्हाले असलेल्या ईशेष आरक्षणाचा लाभबी घेवू लागलेले हायेत. ते बाबासाहेबाईनं शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हे सांगतल्यानं शिकू लागले हायेत. आज तुमचाच समाज आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्याबी करु लागलेला असून काल राजेशाही संपल्यानंतर अधोगतीस गेलेला हा समाज आज हाच समाज उच्च कोटीच्या श्रेणीत जावून पोहोचलेला हाये. त्याचं कारण हाये बाबासाहेबांच्या शिका संघटीत व्हा व संघर्ष करा या धोरणाचा अवलंब करणं. आजच्या काळात तुमच्या समाजानं त्याच गोष्टीचा पुरेपूर अवलंब केलेला हाये. म्हणूनच ईकास व सामर्थ्य वाढलेले हाये तुमच्या समाजाचे. मात्र काई लोकं आजबी शिकत नाईत. ते मासेमारीलाच प्राधान्य देतेत. ते शिकत नाईत. तेच मागे हायेत. त्याचं कारण हाये मासे न मिळणं व मासेमारीले पर्याप्त वातावरण न मिळणं. आज मासेमारीबाबत ईचार केल्यास असं आढळून येते का झाडं कमी झालेली हायेत. पाऊस कमी पडते. त्यामुळं पाणी साठवणूक क्षमता कमी झालेली हाये. ज्यामुळं मासोळ्यांचं उत्पादन घेता येत नाई. ज्यातून उपजीविका भागवणं कठीण जाते. शिवाय शेतजमीनी या लोकाईच्या मालकीच्या नसल्यानं ते कुत्रीम तलावबी निर्माण करुन मासे पकडू शकत नाईत. त्यातच काई इतर समाजानं तुमचा धंदा हिसकला असून ज्याईच्या शेतजमिनी हायेत. त्याईनं आपआपल्या शेतात कुत्रीम तलाव निर्माण केलेले हायेत. तेच मासेमारीबी करतेत. शिवाय एखाद्या नदीत मासेमारी करतो म्हणल्यास त्यावरबी ठेकेदारी असते व हे ठेके तुमच्या समाजाचेच नाई तं इतरबी समाजाचे लोकं घेतांनी दिसतेत हे वास्तविकता हाये. 
         एकंदरीत सांगायचं झाल्यास कालच्या काळात राजपद उपभोगलेल्या या समाजावर आज उपासमारीची अवखळा आलेली हाये. जे लोकं शिकत नाईत. ती मंडळी मासे सापडत नसल्यानं मुरमुरे, पापड, पिंगर ईकण्याचेबी कामं करतेत. ते कितीतरी किमी अंतरापर्यंत डोक्यावर मुरमुऱ्याचं पोतं घेवून फिरतेत. काई ठिकाणी शिंगाडे ईकून आपला उदरनिर्वाह करतेत. त्यातच कशीबशी ते गुजराण करतेत. शहराचे थोडेसे चित्र निराळे हाये. परंतु ग्रामीण भागात पावसाळ्याचे चार महिने जर सोडले तं इतर बाकीच्या महिन्यात त्याईच्या पोटाची मारामारच असते. त्यातबी पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यानं जवापर्यंत समुद्रात नारळी पौर्णिमेले नारळ अर्पण केल्या जात नाई. तवापर्यंत मासेमारी सुरु होत नाई. ते एक समुद्रातील मासेमारी करणाऱ्याईनं आपल्या सोताच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली प्रथा असली तरी तेच प्रथा इतर भागातील लोकंबी पाळतेत. जी एक अंधश्रद्धा हाये. समुद्रातली मासेमारी न करणं ठीक हाये. कारण तो खवळलेला असते. परंतु इतर भागात पुरसदृश स्थिती नसतांनी मासेमारी करता येते.
          ईशेष सांगायचं म्हणजे आज तुमचा हा समाज शिकू लागला हाये. संघटीतबी होवू लागला हाये अन् संघर्षबी करु लागला हाये. संघर्ष हा तुम्हाले तुमचे हक्कं मिळविण्यासाठीच हाये. परंतु तरीबी तुमच्या समाजात भरपूर अंधश्रद्धा हायेत. तुम्ही सर्व एकविरा देवीले मानता. त्याशिवाय तुमचा समाज कडेश्वरी देवी, वेताळ देव, कुर्स देव, खंडोबा मैलार, वरसुबाई, तुळजाभवानी या सर्वांईले मानतो. त्याशिवाय तुमचा समाज पाषाणाले देव मानून त्याले नवश कबूल करते. नवसात कोंबड्या बकऱ्याईचा बळी देण्याची परंपरा हाये. त्यानंतर कावळा फांदीवर बसल्यागत एखादी गोष्ट घडलीच तं नवश पुर्ण झाला असे मानून तुमचा समाज त्याच पाषाणावर नवश म्हणून कबूल झालेला कोंबडा बकरा कापतो. जरी तो पाषाणातला देव काईबी खात नाई हे माईत असलं तरी. 
         महत्वपुर्ण बाब हे का आजतरी तुमच्या समाजानं सुधरावं. मुळ रुपात उदयास असलेल्या अंधश्रद्धा सोडाव्या. आपल्या लेकराईले भरपूर शिकवावं. त्यासाठी आरक्षणाचा व सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. जेणेकरुन तुमच्या समाजात असलेली तळागाळातील मुलं पुळं जातीन. ते देशाचा ईकास करतीन. केवळ अन् केवळ मासेमारीच आपला व्यवसाय हाये. त्यासाठी शाळा शिकण्याची गरज नाई. असे म्हणून चालणार नाई व भागणारबी नाई." 
           शिवऱ्यानं तिम्याले समजावून सांगतलं होतं. परंतु तिम्यानं ते काई मनावर घेतलं नाई व त्यानं स्वातंत्र्याच्या समरात जातीभेद दूर करण्याच्या कामात मदत केली नाई.
           शिवऱ्याप्रमाणेच राम्या होता. तोबी ईचार करत होता, ईशेष म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय? हे आपण समजून घ्याले पायजे. स्वातंत्र्य ईदेशी लोकाईपासून हवे नाई तं आपल्याच माणसाईपासून हवे हाये. जी माणसं आपल्याच जातीतल्या इतर आपल्याच जातीतल्या लोकाईले गुलाम समजतेत. त्याईले स्वतंत्र्यपणे बोलू देत नाई. वावरु देत नाई. त्याईले निरक्षर समजून त्याईची अवहेलना करतेत. त्याईच्यासाठी टपऱ्या मांगतेत. शिक्षण शिकण्यापासून वंचीत करतेत अन् मी समाजासाठी फार मोठं कार्य करीत हाओ असा कांगावा करतेत. महत्वपुर्ण बाब हे का करायचंच हाये तं त्याईच्या मुलाईले शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. त्याईले उच्च शिक्षण कसं मिळन यासाठी प्रोत्साहन द्यावं. त्याईले समाजातून एखादा फंड आर्थिक रुपात देवून शिक्षण शिकता यावं यासाठी मदत करावी. पायजे तं त्याईले दत्तक घ्यावं. व्यतिरीक्त इतर जातीनं जर कोणावर अत्याचार केल्यास एकजुटीनं तुटून पडावं. जेणेकरुन इतर समाजाची आपल्या समाजाकडे ब्र म्हणायचं सोडा, साधं वाकडं पाहायचीबी हिंमत होणार नाई. तवाच समाज सुरक्षीतता अनुभवेल. तसंच समाजाले खऱ्या रुपानं स्वातंत्र्य मिळाल्याचं समाधान वाटन. यात शंका नाई.
          राम्याचं वाटणं. त्याचा अनुभव पुष्कळ दांडगाच होता. त्याले इतर समाजाचा त्रास दिसत असला तरी त्याले आपलाच समाज आपल्यालेच छळत हाये असं वाटत होतं. त्याले आपल्याच समाजाचा लयच राग येत असे. त्याचं कारण होतं त्याईच्यातील दोगलेपण. मनात एक व कर्तृत्वात एक असं त्याईचं वागणं. 
           राम्याची तशी सोच. त्यातच त्याचा समाज हा थोडासा प्रगत होता व तो बाबासाहेबाईले थोडा मानत तरी होता. परंतु शिवऱ्याचा समाज? तो बाबासाहेबाईले अजिबात मानत नोयता. 

       ************************************************

           संप्या हा पुर्णच स्वरुपात बाबासाहेबाईचा अनुयायी बनला होता. तो महार होता व त्याच्या जातीतले संपुर्ण लोकं हे सुधरले होते. ते आता पुजापाठ करत नोयते. ते बाबासाहेबाईले मानत होते. परंतु तसे बाबासाहेबाईले त्याईच्याच समाजात न मानणारेबी भरपूर होते. त्यामुळंच त्याले ईचार येत होता का आज स्वातंत्र्य भेटलं. संबंध देश सुधरला. त्याचबरोबर सुधरला महार समाज. तसा महार समाज जास्तच सुधरला. परंतु महाराईचीबी संपुर्ण बिरादरी सुधरली नाई. त्यातले काईच सुधरले. काई मात्र तसेच रायले. जुन्या परंपरा व रुढी, प्रथा पाळत. तो शंभर प्रतिशत शुद्ध झाला नाई. तो जत्रा करते अन् उपवासबी करते. समोरच्या खोलीत बाबासाहेबाईचा व बुद्धांचा एक एक फोटो लावून ठेवते. आतमंधी भला मोठा देव्हारा असते. ज्या देव्हाऱ्यात पुर्वीच्याच काळातल्या आर्याचे देव रायतेत. बरेचसे महार आज जागरण गोंधळ घालते, गणपती बसवते, फक्त लग्न बुद्ध पद्धतीनं. लग्न झालं का दुसऱ्या दिवशी गाडी भाड्यानं करुन तो फिरायसाठी बुद्धगयेले जात नाई तं जाते गणपतीपुळेले. म्हणते का नवश केला होता. म्हणते आमच अमुक अमुक कुलदैवत हाये. लग्न झाल्यावर जागरण, गोंधळ घालते. त्याशिवाय नव्या आयुष्याची सुरुवातच करत नाई. बौद्ध समाज सोताले बाबासाहेबाईचे अनुयायी म्हणते अन् बाबासाहेबाईच्या ईचाराले हरताळ फासण्याचं काम करतेत. 
            बौद्ध समाज हा इतर समाजाचा मार्गदाता हाये. कारण तोच समाज असा एकमेव समाज हाये का तो एकच समाज बाबासाहेबाईचे तत्व पाळते. बाकीचे समाज असे तत्व पाळत नाईत. त्याईनं तं इतर समाजाले शिकवाले पायजे. परंतु त्या समाजातले काई जे किडे हायेत. तांदळात असतेत तसे. ते आधी आपल्या घरात काय शिजते, ते पाहात नाई. अन् शहाणपण सांगत असतेत. राजकारणाईच्या नांदी लागून समाजाची ते दिशाभूल करतेत. मंग इतर समाजाले तेच दिसते. मग इतर समाजबी कसा काय बाबासाहेबाईचे ईचार पालन करतीन. 
            संप्याले वाटत होतं का त्याच्या संपुर्ण समाजानं सुधरावं अन् आपल्याच समाजासारखं इतर समाजालेबी दिशा दाखवावी. त्या जातीनं नंतर मांग, चांभार अन् इतर जातीले शिकवावं. त्याईलेबी सुधरवावं. त्याईले बुद्ध धम्म आचरणात आणाले लावावा. कारण आपण मुळात बौद्ध धम्माचे अनुयायी हाओत. आजचा बौद्ध समाज हिंदू धर्मासोबत बाबासाहेबाईच्या ईचाराचा थोड्याफार प्रमाणात आचरण करत हाये म्हणून इतर मागास जातीपरस बौद्ध समाज नोकरीत व शिक्षणात त्याईच्या दोन पाऊल पुळं हाये. काई प्रमाणात आत्ताचा बौद्ध समाज पुरोगामी ईचाराचा व वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक वृत्तीचा झालेला हाये. तो इतर मागास समाजापरस ईचाराने प्रगल्भ झालेला हाये.
          आत्ताच्या बौद्ध समाजाने हिंदू धर्माच्या जुन्या रूढी परंपरेचा त्याग केला हाये. हा समाज सर्व समाजापरस अधिक प्रगती करत हाये व आपला उत्कर्ष करुन घेत हाये. मात्र बौद्ध समाजामंधी काई लोकं अजूनबी उपास, नवश यामध्ये अडकून पडलेले हायेत. आजबी बरेच बौद्ध आषाढी एकादशी, महाशिवरात्र, चतुर्थी, एकादशी, उपवास करतेत. महिलावर्गबी नवनवे व्रत उद्यापन करते. तसंच त्या समाजातले बरेच तरुणबी त्याच मार्गाने वाटचाल करत हायेत.
         संप्याले जशी आपल्या समाजातल्या लोकाईबद्दल कळकळ वाटत होती. तशीच कळकळ त्याले इतरबी समाजाईषयी वाटत होती. मांग समाज हिंदू धर्मात आपलं अस्तित्व मान सन्मान उत्कर्ष भरभराट शोधत होता. त्याले बुद्ध धम्म मान्य नोयता. त्यातच संप्याले वाटत होतं का या हिंदू धर्मानं मांग समाजाले काय देलं? हिंदुत्ववाद्याईनं जाणीव पूर्वक मांग समाजाले उपेक्षित करुन ठेवलं हाये. सनातनी धर्मानं मांग समाजाले भिक्षेकरी व आपल्या हातचं बाहुलं बनवलं हाये. त्याईच्या समाजाले वाटते का मांग समाज जर आत्मनिर्भर झाला तं आपलं हिंदुत्वाच गाजर घेऊन कोण हिंडन? आपल्याले हिंदू धर्माच्या रूढी परंपरेने गुलाम करून ठेवल हाये याची जाणीव मांग समाजाले नाई. शिवाय यातून त्याईलेबी सोताची सुटका करुन घ्याची इच्छा नाई. ते मांगाईले हिंदुत्वाकडे आकर्षित करण्यासाठी येळोयेळी त्याईच्या मनात बाबासाहेबाबांबद्दल व बौद्ध धम्माबाबत आकस पसरवतेत. सनातनी हिंदू धर्म मांग समाजाचा निरोधाप्रमाणे उपयोग करत हाये. हिंदू हिंदू म्हणत आपण मुळचे हिंदूच हाओ म्हणत ते आपले उद्दिष्ट बौद्ध मातंगवाद लावून साध्य करत हायेत. त्याईले मांग समाज आपला शागीर्द गुलाम करुन ठेवाचा हाये. हे त्याईची गरज हाये. जाणीवपूर्वक मांगाले बाबासाहेब व बुद्ध कळू देला जात नाई. अन् मांगालेबी बाबासाहेब समजून घ्यायचे नाईत. त्यामुळं मागांलेबी आम्ही इतर मागास वर्गाईपरस श्रेष्ठ हाओत असं वाटते. शिवाय हे चेटूक त्याईच्या डोक्यात सनातनी धर्मानंच शिरवलं हाये. अन् मांग लोकं ईसरले हायेत. त्या उच्चवर्णीयाईनं गतकाळात त्याईच्यावरच अस्पृश्य समजून केलेला अत्याचार. 
             मांग समाज सत्य स्विकाराले तयार नाई. नरक स्वर्गाच्या भंपक कल्पनामंधी मांग समाजाले गुंतवून ठेवण्यात आतापर्यंत सनातनी हिंदुत्ववाद्याईले यश आलेलं हाये. मांगाईच्या मनात बुद्ध व बाबासाहेबांबद्दल द्वेष, रोष , आकस हाये. बुद्धम् शरणम् गच्छामी म्हणलं का हे लोकं बौद्ध धम्माची टिंगल टवाळी करतेत. शिवाय ज्या बाबासाहेबांईनं याईले बायेर काढलं, ईटाळाच्या अन् भेदभावाच्या चौकटीतून. त्या बाबासाहेबांईलेच पाठीमागे शिव्या देतेत हे लोक. हेच वास्तविकता हाये. चौदा एप्रिल आलं म्हणजे तुमचा सण आला, बाबासाहेब तुमचा देव हाये. असं उपहासात्मक बोलतेत हेच लोक. मांग समाजामंधी अजूनबी पोतराज हाये. जोगणी हाये. दर मंगळवारी शुक्रवारी घरोघर परडी घेऊन जोगवा मागतला जाते. केस वाढवून देवीले देवाले पोतराज भिक्षा मांगण्यासाठी सोडला जाते. या उलट बौद्ध समाजाचा उत्कर्ष का झाला हे वेगळं सांगाले नोको. बौद्ध समाजातल्या बऱ्याच लोकाईनं आर्याच्या प्राचीन परंपरा व तत्वाले नाकारलं. म्हणूनच हा समाज पुळं गेला. मांग व इतर कोणताबी समाज बाबासाहेबाले स्विकारत नाई. कारण त्याईले लाज वाटते तसं करतांनी. जरी बाबासाहेबानं त्याबी समाजाले बायेर काढलं तरी. अपवाद काई बोटावर मोजण्यासारखे व्यक्ती हायेत का त्याईनं आजबी बाबासाहेब आपल्या ह्रदयात जपून ठेवला. त्याईले बाबासाहेब कळाले. बाबासाहेबांनं देलेल्या सवलती व संविधानानं देलेल्या आरक्षणाचा फायदा घेत संपूर्ण मागासवर्गीय समाज व इतर समाज आपली सामाजिक आर्थिक स्थिती सुधारत हायेत. परंतु त्याईले बाबासाहेबांचे उपकार आभार मानायचे नाईत. उलट ते उपहासात्मक रितीनं बाबासाहेबाईचा अपमानच करतेत. एक महार समाज जर सोडला तं बाकी सर्व समाज बाबासाहेबाईले कृतघ्न व बेईमान झाले हायेत. फक्त त्याईनं तयार केलेल्या संविधानाचाच त्याईले फायदा घ्यावासा वाटते. तसा ते घेत हायेत. तसं पायल्यास प्रत्येकाले आपापल्या जातीतला नायक हवा हाये. मांगाईले त्याईचा नायक शोधून देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना महत्त्वाची भूमिका पार पाडत हाये. बाबासाहेबाईची बरोबरी करण्यासाठी आता हे लोकं बाबासाहेबाईले न मानता अण्णाभाऊ साठे व लहूजी साळवे याईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतेत. तसाच हा समाज आत्ताबी आम्ही हिंदूच असल्याचा निर्वाळा देत हायेत. (वरील लेख हा अमोल घाटविसावे. अहमदनगर यांचा असून मी संदर्भ म्हणून घेतलेला आहे. त्याबद्दल माफी असावी.)
        संप्याचं ते सोचणं अगदी बरोबरच होतं. कारण आजच्या काळात देश जरी स्वतंत्र्य झाला असला तरी त्याच्याच समाजातले बरेचसे लोकं देवादिकांच्या कल्पनेत घुसले होते. देश स्वतंत्र झाला असला व देशातल्या बऱ्याचशा प्रथाबी बंद झाल्या असल्या तरी ते लोकं सोता अनैतिक प्रथा पालन करत होतेच. त्याचबरोबर इतर समाजबी. इतर समाज तं बाबासाहेबाले मानतच नोयता तं ज्या समाजानं आजपर्यंत त्याईच्यावर अत्याचार केला. त्याच समाजाचे गोडवे गात आजबी जगत होता. त्यातच दैवतीकरणाले चालना देत होता. ते पाहून संप्याले वाटत होतं का इंग्रज या देशात काही दिवस असते तं अगदी बरं झालं असतं. निदान ह्या अंधश्रद्धा, प्रथा, परंपरा अन् दैवतीकरण बंद झालं असतं. जे बाबासाहेबाले अभिप्रेत होतं. तसाच समाज तयार झाला असता. शिवाय बाबासाहेब एकच नेते असे तयार झालेत का ज्याईनं इंग्रजाईच्या मांगं मांगं लागू लागू समाज सुधारणा करवून घेतल्या. मात्र आजचे नेते सुधारणा तं करतच नाई. परंतु सुधारणाईच्या नावाखाली दैवतीकरण करतेत. वरवर दाखवतेत का आम्ही बाबासाहेब मानतो अन् अंदरुन ते बाबासाहेबाईले शिव्याच हासडतेत. ते नेतेच आपल्या स्वार्थासाठी आपल्यावर ईश्वास करणाऱ्या व आशेचं किरण म्हणून पायणाऱ्या लोकाईच्या डोळ्यात कुसर घालतेत. 
            काश! इंग्रज या देशात काई दिवस असते तर? संप्याच्या मनातला प्रश्न. तसं त्याचं सोचणं वाईट नोयतंच. कारण धर्म व धर्मातली भांडण. अमूक धर्म चांगला व अमूक धर्म वाईट. यावरुन भांडण, वादविवाद. ईटाळ...... ईटाळाची भांडणं. काई ठिकाणी अस्पृश्याईनं नवीन कपडे परीधान केले म्हणून भाडणं. काई ठिकाणी अस्पृश्य शेतात गेले म्हणून भांडणं. काई ठिकाणी अंधश्रद्धेवरुन भांडणं तं काई ठिकाणी सुधारणेतून भांडणं. यातूनच बलात्कार व गुन्हेगारीले वाव मिळत असते.
         भांडणं नेयमीच होत असतेत. कारण सर्वाईले आपआपल्या गोष्टी प्रिय असतेत. धर्मबी प्रियच असते. शिवाय धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाते. प्रत्येकाले त्याईचा त्याईचा धर्म आवडते म्हणून. एका व्हाट्सअप ग्रुपवर असंच भांडण. दोघाईचं भांडण सुरु होतं. एक म्हणत होता, अमूक धर्म चांगला व अमूक धर्म वाईट. त्यावर दुसरा वेगळीच प्रतिक्रिया देत होता. भांडण चांगलंच रंगात आलं होतं. त्याचं त्याले म्हणणं. 
           "तुम्ही मनुवादी हात."     
           त्यावर उत्तरात म्हणलं गेलं,      
           "मी मनुवादी नाई. परंतु हिंदू हाये. मले हिंदू धर्म आवडते. कारण माह्या बिरादरीतल्या कित्येक लोकाईले, या धर्मानं हिंदू म्हणून का असेना, आजपर्यंत टिकवून ठेवलं. म्हणूनच मी आज जीवंत हाये व बोलू शकत हाये. नाई तं आपल्या सर्व बिरादरीतल्या लोकाईचे जबरदस्तीनं धर्मांतरण करणारे व हत्या करणारे या जगात होतेच."
           पुढील व्यक्ती हा कदाचीत बुद्धीष्ट असन व त्यानं बुद्ध धम्म स्विकारलाबी असन. तसा तो म्हणाला, 
           "अहो, बोलाले संविधानानं शिकविलं. तशी मुभा देली. नाई तं आपल्याले कुठं गतकाळात बोलता येत होतं."
           पलीकडील उत्तर देणाऱ्याईचं संभाषण सुरुच होतं. तसा दुसरा व्यक्ती उत्तरादाखल म्हणत होता. 
          "बादशाहा बाबरपासून तं औरंगजेबांपर्यंत आपल्यालेबी बिरादरीतल्या लोकाईसह कित्येकाईले मुस्लीम बनवलं गेलं जबरदस्तीनं. म्हणूनच तं खुद्द बाबासाहेबाईनं मुस्लीम धर्म नाकारला होता. हे त्याईनं त्याईच्या शेवटच्या काळात लिहून ठेवलंय. शेवटचा बाबासाहेबाईच्या हातचा ग्रंथ. परंतु त्याईनं हिंदू धर्मबी नाकारला होता. त्याचं कारण होतं, हिंदू धर्मातल्या काई लोकाईचं वागणं. ते वागणं तांदळाच्या खड्यासारखे होतं. तांदळात दोनचार खडे असले का सगळा तांदूळ खराब होते तसं."
           ते त्याचं उत्तर. त्यावर तो म्हणाला, 
           "आपण बिनडोक हात. आपल्याले अक्कलच नाई. म्हणूनच आपण त्या धर्मात हात. नाई तं कवाचाच आपण आपला धर्म बदलवला असता. माईतहाये, जवा मुगलाईचं शासन होतं, तवा तरी तुम्हाले मनमोकळेपणाने बोलता येत होतं का?" 
            ते त्याचं बोलणं. ती काढलेली अक्कलच. ते पाहून उत्तर देणारा व्यक्ती म्हणाला, 
            "मी तं बिनडोकंच हाये. परंतु आपल्याले जर डोकं हाये तं हा वादविवाद नाई हे लक्षात घ्या आधी. हे एक चर्चा हाये. आपण माह्याच डोक्यात आपले ईचार टाकू शकत नाई. काय आपण इतर आपल्याच समाजाच्या लोकाईच्या मनात आपले ईचार पेरु शकान? बोलणं सोपं असते. करणं अवघड. मी भांडत नाई हाये, चर्चा करीत हाये. माह्ये ईचार त्यावरच अवलंबून असतेत. आता कोणाले राग येत असन त्यात मी काय करु? मले त्याचा फायदाच होते. मले माह्ये ईचार प्रगल्भ करण्यासाठी ईषय सापडतेत. आधी आपण सोता त्या धर्मातले संपुर्ण नियम पाळून दाखवा. मंगच अक्कल सांगा."
          धर्म....... धर्म कोणतेबी असोत. प्रत्येकाईले त्याईचा त्याईचा धर्म आवडतेच. जरी धर्मात बरेच नियम असले तरी व ते नियम पाळणं गरजेचं असलं तरी. ते नियम समजा नाई पाळले तं त्या व्यक्तीले निष्काषीत केलं जातं तरीबी. 
         पुर्वीबी असंच व्हायचं. ते नियम न पाळल्यास वाळीत टाकण्याचा समाजाचा नियम होता. अन् मंदिरातल्या स्पृश्याईचे नियम पाळले नाईत तं आपलीच माणसं आपल्यालेच वाळीत टाकत असत. ज्यात सायंकाळी स्पृश्य वस्तीत जाणे. कधी त्याईच्या ईहिरीले हात लावणे इत्यादी. स्पृश्याईशी त्या काळात काम पडाचं. म्हणूनच कोणी त्याईच्या ईरोधात जात नसत. शिवाय त्या काळातले राजेबी न्याय करतांनी अस्पृश्याईच्या बाजूनं न्याय करत नसत. जरी स्पृश्थाईचं चुकलं तरीबी. ते स्पृश्याईच्याच बाजूनं न्याय करत असत. ईंग्रजाईच्या काळात अस्पृश्याईले डोकं बायेर काढता आलं. त्याचं कारण होतं, इंग्रजाईकडून त्याईले बोलासाठी मिळालेलं अभय. इंग्रज हे स्पृश्याले जेवढे बोलाचं स्थान देत होते. तेवढंच स्थान ते अस्पृश्याईलेबी बोलासाठी देत असत. त्यामुळंच अस्पृश्याईलेबी आपलं पुनरुत्थान करता आलं होतं. 
          भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वी येथला अस्पृश्य समाज हा ईटाळाच्या ईळख्यात होता. तसाच धर्माच्याबी. त्याईले मानाचं स्थान नोयतं. त्याईले भेदभावानं गुरफटलं होतं. तसं पायल्यास इंग्रज सुधारणाबी करीत होते. त्याईनं बऱ्याच सुधारणा केल्या. त्या सुधारणा आवडत नसलेला समाज स्वातंत्र्य मागत होता. तसे बाबासाहेबबी स्वातंत्र्याच्या ईरोधात नोयतेच. परंतु बाबासाहेबाईले वाटत होतं का जर या देशातून इंग्रज निघून गेले तं सुधारणा होणार नाई. अस्पृश्याईले वर उठता येणार नाई. हा समाज स्वातंत्र्यानंतर त्याईले वर उठू देणार नाई. म्हणूनच बाबासाहेब म्हणत होते का आम्हाले आधी सुधारणा हव्यात. त्यानंतर स्वातंत्र्य. कारण स्वातंत्र्यानंतर सुधारणा घडूनच येणार नाई. देशातल्या लोकाईले सुधारणा हव्या नाईत हे त्याईले माईत होतं. त्याईले अस्पृश्य स्पृश्य याईच्यात भेदभावच हवा होता. त्याचं कारणबी होतं, ते म्हणजे आजपर्यंत लोकाईनं तसंच ईदेशी शासकाईनं सुधारणा केल्या नोयत्या. इंग्रज सुधारणा करु पाहात होते. त्या सुधारणा इंग्रजाईले करु द्यायच्या नोयत्या. अन् तसंच झालं. स्वातंत्र्य मिळालं. संविधान आलं. तरीबी येथील भेदभाव गेला नाई. येथील काई वाईट प्रथाबी गेल्या नाईत. त्या अजुनही सुरु हायेत. तेच खुपतं येथील काई लोकाईच्या मनात. अन् खुपणंबी साहजीकच हाये. कारण त्याईले समाजात बदल हवा नाई, नव्या स्वरुपाचा. त्याईले अंधश्रद्धा हव्या हायेत आजबी, अन् अंधश्रद्धा पाळणारा धर्मबी हवा हाये. म्हणूनच धर्मावरून भांडणं होत असतेत. 
         आजचा काळ पायल्यास इंग्रज गेले देशाले स्वातंत्र्य देवून. तरी आजबी भेदभाव गेलेला नाई. काई ठिकाणी अस्पृश्याईले नवीन कपडे घालणंबी स्पृश्याईले आवडत नाई. त्याईचे घरंदारं बांधणंबी त्याईले आवडत नाई. व्यतिरीक्त त्याईले पंगतीत जेवन चारणंबी आवडत नाई. काई ठिकाणी आजबी लग्न समारंभात अस्पृश्याईले न बोलवता त्याईच्या घरी त्याईनच स्वयंपाक बनवावा म्हणून दोन आलू व थोडेसे तांदूळ त्याईले देण्याची प्रथा हाये. काई ठिकाणी आपल्या घरची अलाबला वा पीडा निंघावी म्हणून अस्पृश्याईले कपडे व सुग्रास अन्न, तेबी दरवाजात बसवून देण्याची प्रथा हाये. तसंच अस्पृश्याईनं असंच वागावं. तसंच वागावं. असं वागू नये. तसं वागू नये. हे सारी बंधनं हायेत. भारत स्वतंत्र्य झाला असला तरी. तसंच सुधारणेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काल ज्या इंग्रजाईनं सुधारणा केल्या, त्या बरे झाले. नाई तं आजबी त्या अस्तित्वातच रायल्या असत्या, जरी इंग्रज देश सोडून निघून गेले असले तरी. आजबी देशात देव्या आंगात आणणे. मुर्तीसमोर कोंबड्या बकऱ्यांचा बळी देणे, गळ्यात गंडेदोरे बांधणे, मांजर आडवी गेल्यास वा घुबड ओरडल्यास अंधश्रद्धा मानणे, मांत्रीक पाळणे व मंत्रविद्येवर विश्वास ठेवणे. कोणी मरण पावल्यास ईटाळ मानणे, टक्कल करुन चेहरे विद्रूप करणे, एवढंच नाई तं रजस्वाचा ईटाळ मानणे, होमहवन करणे, मुर्तीपुजा करणे. या अंधश्रद्धा हायेत व या अंधश्रद्धा अजूनबी सुरुच हायेत. काई ठिकाणी बालईवाहबी हायेत अन् काई ठिकाणी ईधवाईचं पांढरी साडी परीधान करणं. बांगड्या फोडणं वैगेरे सर्व काई. तसं पायल्यास आजबी लाखो रुपये खर्च करुन मुर्त्या बनवल्या जातेत व त्या पुर्णतः पाण्यात बुडवल्या जातेत. असं करण्याऐवजी तोच पैसा गरीबाईले दान देला तं? बिचाऱ्याईची मुलं तरी शिकू शकतीन. उच्च शिक्षण घेवू शकतीन. परंतु तसं होत नाई. त्यांचं मूल शिकालेच नोको. हे आपली भावना. सर्व रस्सीखेच. त्यामुळं आज असं वाटू लागते का इंग्रज बरे होते. हळूहळू सुधारणा तं होत होत्या. ते काई दिवस भारतात थांबले असते तं नक्कीच भारतात एक नवा बदल दिसला असता. स्पृश्य अस्पृश्य भेदभाव कायमचा संपला असता. अंधश्रद्धा पुर्णच संपल्या असत्या. ना कोणाच्या आंगात देव्या आल्या असत्या. ना रजस्वाचा ईटाळ रायला असता. बालईवाह पुर्णच संपला असता. शिवाय बलात्कारावर व गुन्ह्यावर कडक कायदे बनले असते व बलात्कार तसेच गुन्हेबी घडले नसते. ते संपले असते कायमचेच. अन् संपले असते धर्मातले भांडणंबी. या भारतात हिंदूच नाई तं इतर सर्वच धर्म अगदी गुण्यागोविंदानं नांदत रायले असते यात शंका नाई.
          संप्या नेयमीच म्हणत असे लोकाईले का भांडण धार्मिक मुद्द्यांवरुन करु नोका. भांडण करायचंच असन तं जातीवरुनबी करु नोका. कारण धर्म अन् जात या आपण आपली गरज भागविण्यासाठी निर्माण केल्यात. म्हटलं जातं का माणूस कोणाच्या गर्भातून, नाकातून, तोंडातून, हातातून, पायातून, पोटातून जन्माले आला. ते सारं खोटं हाये. जसे सारे प्राणी हे नर अन् मादीपासून जन्माले आले. तसंच माणसाईचं झालं. माणूसबी नर अन् मादीपासून जन्माले आला. परंतु त्या काळात खुंखार असलेला माणूस आपल्याले पेलला पायजे असं मानवाले वाटलं. त्यामुळंच माणसाईचा जन्मबी पोटातून, पायातून दाखवला हाये. त्यावर कोणीबी ईश्वास करु नोका. 
          संप्या शिकला होता. तो महार होता व जसे बाबासाहेब शिकले होते. त्याच गोष्टीचा संप्यावर प्रभावबी पडला होता. त्यामुळंच तोबी शिकला होता व जे कार्य बाबासाहेबाईचं अधुरं रायलं होतं. ते कार्य तो करु पाहात होता. परंतु लोकं त्याचं आयकन तवा ना. लोकं त्याचं आयकतच नोयते तं ते आपल्याच मनाची लावत होते. याचं अतीव दुःख त्याले होत असे. कधीकधी तो लोकाईले मार्गदर्शनबी करत असे त्यावर. जे त्याचे ईचार बाबासाहेबाच्या ईचाराले धरुन होते. 
          समाजात भांडणं व्हायची. त्यातच काई भांडणं ही स्वार्थासाठी असायची. त्या भांडणात नंतर धार्मिक रंगबी भरला जायचा. धार्मिक तसाच जातीशीन संबंधीत गोष्टी व त्यावर चर्चा करणे. वादविवाद व त्या संबंधीत भांडणं. या गोष्टी कधीच समाप्त होणाऱ्या नाईत. जर त्यावर चर्चा केली तं वादविवाद उत्पन्न होवू शकतेत. ते वादविवाद शिगेले जावू शकतेत व त्याईची परियंती न्यायालयातले प्रकरणं वा गुन्हेगारीची प्रकरणं उभी करण्यात होते. कधीकधी त्याचा परिणाम म्हणून जातीजातीतल्या माणसाईची हत्याबी होते. 
           संप्या लोकाईले सांगतानी म्हणत असे. 
           "धर्माबाबत सांगायचं झाल्यास धर्म हा प्रत्येकाईच्या आवडीनिवडीचा ईषय हाये. तसाच धर्म हवाबी हाये. कारण धर्म जर नसन तं माणसं स्वैराचारी बनू शकतेत. तसे सर्वच धर्म हे पवित्र हायेत व सर्वच धर्मात कमीजास्तपणा हा हायेच. शिवाय जो धर्माचा ईषय पेरते. तो मतलबी असते. त्याले काईतरी आपला स्वार्थी हेतू साध्य करायचा असते नव्हे तं तो धार्मिक भांडणं लावते. ज्यातून त्याले आनंद मिळत असते. जो असूरी आनंद असते. त्यामुळं अशा धर्माचं ईषय पसरविणाऱ्या माणसाईवर अति ईश्वास ठेवणे बरोबर नाई. तसा ईश्वास ठेवल्यास आपलाच ईश्वासघात होत असते. शिवाय आपणच त्यामुळं संकटात पडत असतो. ईशेष म्हणजे आपण माह्या धर्म माह्या धर्म म्हणण्याऐवजी ईश्वाचा एकच धर्म, तोबी मानवधर्म समजावा. त्याच धर्माचं पालन करावं. मानवधर्म हाच सर्वात श्रेष्ठ धर्म हाये. त्याचा अर्थ असा का सर्व माणसाले माणसासारखं समजणं. त्याची हत्या न होवू देणं. त्याच्यावर कोणताच अत्याचार होवू न देणं. त्याले कोणत्याच कुप्रथाईचा बळी होवू न देणं. प्राणीमात्रावर दया करणं. त्याईची हत्या न करणं. झाडं न कापणं. कोणाले असं न बोलणं का त्याचं मन दुखावन. चोरी न करणं. शिव्या न देणं. राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर न करणं. हा मानवधर्म होय. तसंच प्रत्येक माणसाईबद्दल आदर बाळगणं. इतराईच्या धर्माबाबत आदर बाळगणं. जातीबाबत मनात कोणतीबी हिनता न ठेवणं. प्रत्येकाईच्या धर्म व जातीले समान लेखणं. एवढंच नाई तं प्रत्येक माणसाईले समान लेखणं. ज्यात महिला व मुलाईचाबी समावेश असावा. अशा गोष्टीचे पालन केले तं त्यामुळं धर्माधर्मात तेढ निर्माण होणार नाई. सर्व लोकं आनंदी रायतीन, राहू शकतीन. परंतु ह्या बाबी लक्षातच कोण घेते. ह्या बाबी लक्षात न घेता आपण सोताले श्रेय देत सोताले श्रेष्ठ समजत लढत असतो सोतासाठी. सोताचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी. ज्यातून वादविवाद होत असतेत. 
           काय पाळावं काय नोको हे आपण ठरवावं. धर्माले दोष देवू नये. आम्ही आमची मानसिकता बदलाले हवी. स्वतंत्र व्हाले हवं आम्हीबी. आमच्या मनातले कुविचार काढून टाकाले हवेत. आमच्या मनात सुविचार भराले हवेत. परंतु असं आम्ही करत नाई. म्हणूनच भांडणं होत असतेत. 
           आम्ही भांडण करतो. कधी धर्मावरुन तं कधी जातीवरुन. परंतु कधी ईचार केला का, आम्ही भांडण करणारे नेमके कोण? आमचा धर्म कोणता होता? तसं पायल्यास आम्हाले कोणताच धर्म नोयता. आम्ही भांडण करणारे ना कोणी बौद्ध हाओत. ना कोणी मुस्लीम हाओत ना कोणी हिंदू ना कोणी इतर धर्मीय. कारण आमची उत्पत्तीच झाडावरच्या माकडाच्या रुपातून झाली हाये. हे डार्वीनचा उत्क्रांतीवाद सांगतोच. शिकवतोबी. आपण झाडावर माकडरुपात राहात होतो. मंग खाली आलो. खाली आल्यावर मानवरुपात रावू लागलो. त्यायेळेस काई काळानं ईदेशी आक्रमणकर्ते आले. त्याईनं आपल्यावर राज्य करण्यासाठी आपला धर्म आपल्याले सांगतला. त्याचे नियम सांगतले. मंग भीती दाखवली का आपण घाबरुन त्याईच्या तत्वाचं नव्हे तं धर्माचं पालन करु. ज्यात ईज कडाडली तं देव धावतो. भुकंप आला तं देव धावतो. अशा कल्पना रुजल्या. त्यानंतर त्याच ईदेशी लोकाईनं आपल्या मनात आस्था फुलवली. अमूक अमूक केल्यानं आपण देवाजवळ जातो. देवाचे लाडके बनतो. ज्यात आपलाच जीव गेला. आपलंच गेलं. त्याईचं काईच गेलं नाई. ते तं जसे आले, तसेच आपल्या देशात निघून गेले. उरलो आपण. आपण त्याईच्यासोबत जावू शकलो नाई. कारण हा देश आपला होता. त्याईचा देश आपला नोयताच. परंतु ज्यायेळेस आपण येथंच राहाले लागलो. त्यायेळेस आपण आपला धर्म बदलवला होता. मानव धर्मात असलेल्या सगळ्याईनच धर्म बदलवला होता. कोणी हिंदू झाले होते. कोणी मुस्लीम झाले होते. कोणी ख्रिश्चन तं कोणी इतर धर्मीय. 
         त्याईनं आपल्याले इथंच ठेवलं, आपल्याले त्याईच्या धर्मात रुपांतरीत करुन. मंग आपण कोण हाओत? आपण हाओत कालच्या त्या एकाच आईची लेकरं. ज्या आईच्या लेकरावर ईदेशातून आलेल्या लोकाईनं अत्याचार केले. आपल्या पुर्वजाईले धाक दाखवला व आपल्याकडून धर्म बदलवून घेतला नव्हे तं रुपांतरीत केलं आपल्याले. कधी जीव घेण्याचा धाक दाखवून. कधी आपल्या आईबहिणीवर बलात्कार करुन, त्याईच्याकडून संतती निर्माण करुन. अन् त्याईनं जीवं घेतलेबी, धर्मासाठी. आपल्याले त्याईच्या धर्मात रुपांतरीत करत असतांनी. उदाहरण द्यायचं झाल्यास नेतोजी पालकरांचं देता येईन. ज्याईले जीव घेण्याची धमकी देत त्याईचा धर्म बदलला गेला व नव नाव देण्यात आलं होतं रहिम कुल्लाखान. दुसरं उदाहरण संभाजी महाराजाईचं देता येईन. धर्मासाठी त्याईची जीभ कापली. मान कापली. हात, बोट, पाय कापले. परंतु त्याईच्यासारखी अशीबी बरीच माणसं होती का ज्याईनं जीव देला. परंतु धर्म बदलवला नाई. अशी कितीतरी उदाहरणं हायेत का आपल्या पूर्वजाईचा धर्म बदलवला गेला. आपण धर्म बदलाले हवा म्हणून गोव्यातील कातरीखांबाले आपले हात व पाय बांधून आपले हात कापणारे पोर्तुगीज. आजबी तेथला हातकातरी खांब त्याची साक्ष हाये.
          महत्वपुर्ण बाब हे का धर्माबाबत नेयमीच वाद होत असतेत. कधी हिंदू मुस्लीम तं कधी बौद्ध हिंदू. तसे वाद पुर्वीबी व्हायचे. पुर्वी ईदेशात तं येशू ख्रिस्ताले सुळावर चढावं लागलं होतं धर्मासाठी. आज तोच धर्म येशूले मानते. तसं धर्माच्या उत्पत्तीबाबत सांगायचं झाल्यास माकड रुपातील माणूस जवा जमीनीवर आला. तवा त्याचा धर्म होता मानवधर्म. तो माणसाशीन माणसासारखाच व्यवहार करत होता. त्यानंतर कालांतरानं आर्य आले व त्याईनं आपला वैदिक धर्म येथं लादला. त्याईनच देव धर्म, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा आपल्यात शिरवल्या. ज्यात हेतू होता, आपल्यावर राज्य करणं. त्यानंतर त्याच आर्याईनं असे असे नियम आपल्यावर लादले का धर्माचे स्तोम माजले. ज्यातून दुःख होत असे. हे स्तोम ईपरीत पद्धतीचे असल्यानं शांतीसाठी बौद्ध व जैन धर्म अस्तित्वात आले. ज्याईचा जन्म हिंदुस्थानात झाला. त्यानंतर हखामनी या पहिल्या अरबी राजानं हिंदुस्थानात प्रवेश केला. परंतु त्यानं धर्म प्रसवला नाई. 
           हिंदुस्थानात मुस्लीम राज्यकर्ते सन सातव्या शतकात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं आले. ज्याईनं येथला राजा दाहिरचा पराभव केला. त्यानंतर इथं सत्ता स्थापन करुन येथल्या बऱ्याच लोकाईले मुस्लीम बनविण्याचा प्रयत्न झाला, तेही जबरन. परंतु त्याची सत्ता टिकलीच नाई. तसा तो फारसा यशस्वीबी झाला नाई व तो परत गेला. त्यानंतर बाप्पा रावलच्या नेतृत्वात येथे पुन्हा वैदिक धर्म सुचारु स्वरुपात नांदू लागला. त्याले गालबोट लागलं अकराव्या शतकात. ज्यायेळेस पृथ्वीराज चव्हाणचं दिल्लीवर शासन असतांनी त्याचा द्वेष करणाऱ्या त्याच्याच भावानं म्हणजे जयचंदानं मोहम्मद घोरीले हिंदुस्थानात बोलावलं. ज्यातून त्यानं पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला व तो त्याईले नजरबंद करुन घेवून गेला. परंतु त्याच्याच कारकिर्दीनंतर हिंदुस्थानात मुस्लीम रुपांतरण निर्माण झालं. त्यानंतरच्या आलेल्या सर्व शासकाईनं हिंदुस्थानाले मुसलमान बनवण्यास सुरुवात केली. ज्यात खिलजी, तुघलक, मुघल या सर्व मुस्लीम शासकाईचा समावेश हाये. त्याईनं केवळ हिंदुस्थानातल्या जनतेवर जोरजबरदस्ती वा तलवारीच्या धाकानं धर्मांतरण केलं नाई तं येथल्याच स्रियांईले भार्या बनवून मुसलमान बनवलं. शिवाय येथली आपल्या बिरादरीची लोकसंख्याबी वाढवली. त्यानंतर व्यापार करण्यासाठी आलेल्या डच, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रज याईनं या देशात आपला ख्रिश्चन धर्म पसरवला. तोबी जोर जबरदस्तीनंच. 
          ईशेष म्हणजे ज्याईनं हिंदुस्थानात धर्म रुपांतरीत केला नव्हे तं पसरविण्याचा प्रयत्न केला. ते सर्व भारतातून निघून गेले. ज्यात मुस्लीम शासक मोहम्मद बिन कासीम असो वा मोहम्मद घोरी असो वा इंग्रज असो वा आर्य असो. फ्रेंच, डच, पोर्तुगीज असो. अन् उरले आपल्याच हिंदुस्थानातील रुपांतरीत झालेले मुळचे झाडावरुन जमीनीवर आलेले व जमीनीवर निवास करत असलेले मानव. ज्याईचा कोणताच धर्म नोयता. आज तीच रुपांतरीत असलेली माणसं, मी अमुक धर्माचा मी तमूक धर्माचा असे म्हणून वाद करत हायेत व ईसरत हायेत का मी रुपांतरीत धर्माचा हाये. हा माह्या मुळ धर्म नाई. त्यातच तो ईसरत हाये त्याईचा मुळ धर्म अन् ईसरत हाये तो त्याईच्या मुळ भाऊबंदांईले अन् त्याईच्या बिरादरीतल्या माणसाईले. ज्यात त्याईची त्याईच्या नात्यातलीच कोणीतरी आई हाये. कोणीतरी बहिण हाये. कोणीतरी वडील हाये अन् भाऊबी हाये. तो त्याच हिंदुस्थानातल्या तमाम लोकाईचा धर्मांतरीत भाऊ हाये. हे सर्व ईसरुन तो रुपांतरीत भाऊ आपल्याच भावाईच्या धर्मावर टिका करुन त्याईच्याशी धर्मावरुन भांडण करते व रक्त सांडवते. कधी धर्मावरुनच हत्याबी. हे बरोबर नाई. 
         ईशेष सांगायचं म्हणजे आपलाच बांधव व आपण त्याच धर्मातील रुपांतरीत झालेले सर्व. आपला मूळ धर्म तो नसतांनाबी आपले धर्मासाठी असे भांडणे, एकमेकांचा हेवादावा करणे. ज्यातून वाद उत्पन्न करुन एकमेकाईच्या जीवांवर उठणे. धार्मिक द्वेष भडकवणे. आपला धर्म श्रेष्ठ समजणे व ज्यातून एकमेकाईची कत्तल करणे. या गोष्टी योग्य नाईत. धर्माच्या नावावर आपल्याच बांधवाईची हत्या करण्याऐवजी वा भांडण्याऐवजी आपण गुण्यागोविंदानं राहावं. ज्यातून शांतता राईन. सुख निर्माण होईन. ज्यातून आपला ईकास करता येईन अन् देशाचाबी ईकास करता येईन यात शंका नाई."
         स्वतंत्र्यता आपली का इतराईची. जसा प्रश्न शिवऱ्या, राम्या अन् त्या तमाम मित्राईले भेडसावत होता. तोच प्रश्न आज संप्यालेबी सतावाले लागला होता. तो प्रश्न त्याले पडला वा त्याच्या मनात आल्यास त्याले अगदी वैतागल्यासारखं वाटायचं. कारण लोकं बैताड होते अन् ते त्यानं कितीबी समजावून सांगतलं तरी बैताडल्यासारखेच वागत होते. संप्या त्यावर ईचार न करता तो आपलं मार्गदर्शनाचं कार्य ईमानीईतबारे करत होता. तो लोकाईले म्हणत असे, 
          "स्वातंत्र्य...... म्हणतेत का भारतानं सन १९४७ ले स्वातंत्र्य मिळविलंय. तेबी इंग्रजाईपासून. भारत दिडशे वर्ष गुलाम होता. कोणी लोकं म्हणतेत का भारत हा आधीपासूनच गुलाम होता. ज्यायेळेस आर्य आले. त्याईनं मुर्तीपुजा सांगतली व आपण त्यावर ईश्वास ठेवून मुर्तीची पुजा करु लागलो. शिवाय आपण आपल्या मनात अंधश्रद्धेचे बिजारोपण केले. विशेष म्हणजे त्या आर्याईनं आपल्या मनाचा ताबा घेतला. त्यासाठी साम दाम दंड आणि भेद हे चारबी तत्व वापरले. त्यानंतर आपण त्याईचे आधीन झालो का ते काहीबी म्हणोत. तीच पुर्वदिशा समजून वागत रायलोत. त्यातच आपण त्याईचे एवढे आधीन झालो का त्याईनं ज्या ज्या कुप्रथा या देशात आणल्या. त्या सर्वांईवर ईश्वास करुन आपण आत्महत्याबी करत रायलो. मंग त्या प्रथा नरमेध असो, चरकपुजा असो, रथयात्रा असो, गंगाप्रवाह असो, सतीप्रथा असो, कन्यावध असो, महाप्रस्थान असो, तृषानल असो, हरीबोल असो, भृगृपन्न असो का धरना असो. आपण ईश्वासच करत गेलो अन् सोताच्याच आत्महत्या करुन आपलेच जीवन संपवत गेलो. कारण त्या सर्व गोष्टीत आपण त्याईचे गुलाम झालो होतो.
          ते त्याईचे ईचार होते. जे आपल्या मनात अगदी लहानपणापासूनच रुजवले गेले होते. जणू त्याईनच आपल्या मनाचा ताबा मिळवला होता नव्हे तं त्याईनं त्याईच्या ईचाराईनं आपल्याले गुलाम केले होते. आपण त्याईच्या ईचारांचे गुलाम होतो.
           ही ईचार करण्यालायक गोष्ट. ईचार करण्यालायक गोष्ट अशी का आपण त्याईच्या ईचारांचे गुलाम होतो का आपल्याच ईचारांचे? त्याचे उत्तर आपणाजवळ नाई. त्यामुळंच आजबी आपण त्याईच्याच ईचारानं चालत असतो व सोताचं नुकसान करत असतो. त्याचं कारण हाये आपल्या मनातली भीती. तीच भीती हाये देव आपल्याले काई करणार तं नाई.
          आपण पाषाणरुपी देव पुजतो. त्यातच आपल्याले वाटते का हा पाषाणरुपी देव नवसाले पावतो. याले कोंबडं, बकरं भाव म्हणून बळी देल्यास तो जास्त पावन. कधीकधी आपण बोलायची येळ व कर्म घडाची येळ जुळून येते व आपला ईश्वास बसते. जे काई झालं, हे सगळं केलं, त्या पाषाणरुपी देवानंच. ते गोष्ट कावळा फांदीवर बसण्यासारखी व फांदी मोडण्यासारखी होते. आतं फांदी काई कावळा मोडू शकत नाई. हे आपल्याले माईत असतांनीबी फांदी मोडली जाते. यात कावळ्याचा चमत्कार नसतोच. परंतु अशाच काई घटनाईनं कावळा आपल्यासाठी देव बनते. यात शंका नाई. 
           खरं तं तेच आर्यांचे ईचार. अमूक अमूक घटना झालीच तं ते घटना जरी नैसर्गिक असली तरी ते देवानंच घडवून आणली. हे आर्याची ईचारसरणी होती. जी त्याईनं आपल्याले सांगतली. ज्यातून आपले मन त्याईच्या ईचाराईचे गुलाम बनत गेले. त्यातच आपण त्याईच्या आजपर्यंत बऱ्याच प्रथा पाळल्या भारत स्वतंत्र्य होईपर्यंत. त्यातल्या काई प्रथा इंग्रज भारतात असतांनीच बंद झाल्या होत्या व त्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं होतं. जे मानसिक होतं. ज्यातून बऱ्याच लोकाईचे जाणारे प्राण वाचले होते. इंग्रज जर भारतात आले नसते तर आजबी त्याच प्रथा सुरु रायल्या असत्या अन् आपले आजबी रोजच प्राण जात गेले असते. 
            इंग्रज जवा भारतात आले. त्यानंतर बऱ्याच प्रथा बंद झाल्या होत्या. त्या प्रथाईपासून आपल्याले स्वातंत्र्य मिळालं होतं. ज्या प्रथा इंग्रजाईनं बंद केल्या होत्या. कारण त्या कुप्रथा होत्या. त्या कुप्रथाईपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. दुसरं स्वातंत्र्य हवं होतं ते इंग्रजाईपासून. तेबी सन १९४७ ले मिळालं होतं. परंतु तरीबी आपण गुलाम होतो, अन् आजबी गुलाम हाओत. काई अनैतिक प्रथाईचे. ज्या प्रथाईनं आपले आजबी जीव जात हायेत. एक कावडप्रथा अन् दुसरी ईस्तवावर चालणे. कावडप्रथेतबी अक्षरशः जीव जात असते अन् ईस्तवावर चालण्यातूनबी शरीरावर येदना होत असतेत. शिवाय एक अशीबी प्रथा हाये. ते गोटमार प्रथा. ज्यात देवाईच्या नावानं गोटमार सुरु असते. हे प्रथा मध्यप्रदेशातील पांढूरणा येथे सुरु हाये आजबी. पोळ्याच्या पाडव्याले हे गोटमार असते. ज्यात आतापर्यंत कितीतरी लोकाईचे जीव गेले हायेत. अशा बऱ्याच प्रथा भारतात हायेत का ज्याईची आपणास कल्पनाबी नाई. काई ठिकाणी देवी नवसाले पावते म्हणून कोंबडं, बकरं कापण्याची प्रथा हाये. कदाचीत त्याबी प्रथा उद्या बंद होतीलबी. परंतु आपण स्वतंत्र होणार का? तं त्याचं उत्तर नाई असंच येईन. कारण स्वतंत्र्यता मिळविण्यासाठी मनातली भीती नष्ट करावी लागते. शिवाय इतरांच्या मनातून नक्कीच आपण ते भीती काढू शकतो. परंतु आपल्या मनातली भीती? ते कोण काढणार? तिले आपणच काढावी लागणार. ते जवापर्यंत निघत नाई. तवापर्यंत आपण स्वतंत्र होणार नाई. 
         महत्वाचं सांगायचं झाल्यास आज आपण इंग्रजाईपासून स्वतंत्र झालो. इतराईपासून स्वतंत्र झालो. कारण आज आपण इतराईचं अजिबात आयकत नाई. परंतु आजबी आपल्या आपल्या सोतापासून स्वतंत्र झालो नाई. आपलं मन कुठंतरी आपल्यालेच खात असते. भीती वाटत असते पदोपदी आपल्याले. अमूक अमूक गोष्ट मी नाई केली तं मले काई समस्या तं येणार नाई. तेच भीती आपल्या मनात असते. ज्यातून आपण स्वतंत्र होवू शकत नाई.
          आजबी आपल्या मनात भीती हाये. एखादी स्री जर रजस्व अवस्थेत असन अन् तिनं जेवन बनवलं तं ते अन्न ईटाळतं. हा आपला समज. आजबी मंदिरात गेल्यावर पुजारी आपल्याले मंदिरातल्या मुर्तीले हात लावू देत नाईत. कारण मंदिरातली मुर्ती ईटाळण्याची भीती असते. जरी ती मुर्ती पाषाणाची असली तरीबी. आजबी चंद्र सुर्याच्या ग्रहणाचा परिणाम अन्न अन् कपड्यावर होत नसतांनाबी तो परिणाम त्याचेवर होतो असं म्हणून ग्रहणानंतर दान करणारे, भीतीनं दान करत असतेत. हीच मानसिकता कदाचीत आपल्याच मनाले गुलाम करत असते नव्हे तं करते. यापासूनच आपल्याले स्वतंत्रता हवी. 
          महत्वपुर्ण बाब हे का स्वतंत्र्यता दुसर्‍यापासून नाई तं आपल्याले आपल्याच मनापासून मिळावी. आपलं मन साफ व्हावं अंधश्रद्धेच्या विळख्यातून. जेणेकरुन आपल्याले स्वतंत्र व मुक्तपणानं ईचार करता येईन. आपण स्वतंत्र निर्णय घेवू शकू व निर्णयक्षम बनू शकू. दुसरा म्हणेल. मंगच आपण निर्णय घेवू असे म्हणणार नाई व तसे मानणारबी नाई. तसंच त्यावर आश्रीतबी रायणार नाई. तवाच खऱ्या अर्थानं आपल्याले स्वतंत्र झाल्यासारखं वाटेल."
         संप्याचं मार्गदर्शन व त्याचा तो ईचार. त्याचा तो ईचार बाबासाहेबाचेच ईचार मांडणारा होता. त्यालेबी वाटत होतं का लोकाईनं ईतराईपासून स्वतंत्र्य होवू नये तं त्याईनं आपल्याच सोताच्या मनापासून स्वतंत्र्य व्हावं. त्याले तसंच वाटत होतं. 

       ************************************************

            शिवरामबी सुधारणावादी तत्वाचा होता. परंतु तो संपल्यासारखे नोयता. तो देव मानणारा होता. परंतु देव देव करत मंदिरात बसून देव संगळं करन. आपण काईच करु नये या भुमीकेचा तो नोयता. संप्या देव, प्रेत मानत नोयता. परंतु शिवऱ्याचा ईचार येगळाच होता. त्याले जे वाटत होतं. त्याबद्दल तो म्हणत असे, 
            "सन्मान...... सन्मान आपल्यालेच नाई तं आपल्या प्रेतालेबी मिळावा. त्या प्रेताचाबी ईशिष्ट पद्धतीनं दाह संस्कार व्हावा. चार पाहूणे गोळा व्हावेत. ते रडावेत. हे तवाच घडू शकते. जवा आपल्या हातून बालपणापर्यंतचे कर्म चांगले घडत असतीन. परंतु आपण बालपणापासूनच कर्म चांगले करत नाई. जसं बालपणात आपण गंमत येते म्हणून फुलपाखरांची हत्या करत असतो. झाडालेबी तोडत असतो. सरड्याईले तंबाखू चारत असतो. मोठे झाल्यावरबी कित्येक माणसाईले त्रास देत असतो. शब्दांचाबी मार देत असतो नव्हे तं हत्याबी करत असतो. आईवडीलाईले वृद्धाश्रमात टाकत असतो. त्यायेळेस ईचार करत नाई का आपल्याले या कर्माचे वाईट भोगमान भोगावच लागन. त्याचे वाईट भोगमान म्हणजे आपली लेकरं चांगली न निपजणे, त्याईले दुर्धर आजार असणे. तसा आपल्या संततीले जर थोडासाबी त्रास असला तं तो त्रास आपल्याले जीवघेणा वाटते. वाटत असतं का असा त्रास आपल्याले झाला तं चालन, संततीले नोको. तसंच आपल्याले म्हातारपण छळणे. म्हातारपणात अतिशय वेदनादायी त्रास होतो. मरावेसे वाटते, पण मृत्यू येत नाई. हे सर्व टाळाचं असन तं जीवन जगत असतांनी जीवनातलं प्रत्येक पाऊल मार्ग फुंकर घालून चालावा. पापकर्म करु नयेत, अगदी बालवस्थेपासून. अन् कोणत्याबी आईनं आपली मुलं बाल्यावस्थेत वाईट कर्म करत असतीन तं त्यावर उत्तम मार्गदर्शन करावं. त्या मुलाकडून बालवयात वाईट कर्म घडू देवू नये. कारण त्याचाबी परिणाम त्या मुलाच्या आयुष्यात होतो. कधी त्याचे आई वा वडील अकाली मरण पावतेत. कधी त्याच्यासमोर ईवाहाचा प्रश्न निर्माण होतो तं कधी त्याईच्यासमोर रोजगाराचा. हे तेवढंच खरं.        
          काई घटना घडत असतेत गुन्हेगारी स्वरुपाच्या, संविधान हाये तरीबी. ज्याले आपण कायदा म्हणतो. परंतु ते राबविणारे घटक बरोबर नसल्यानं संविधानाचा आदर तं कोणी करत नाई. शिवाय त्या संविधानालेबी कोणी घाबरत नाईत. ज्यातून अशा अनैतिक घटना घडत असतेत. 
          माणूस जवा झाडावर राहात होता. त्यानंतर तो जमीनीवर राहाले आला. तवा त्याले जमीनीवर राहात असतांनी त्यानं कसं राहावं. कसं वागावं. यासाठी काई नियम बनवले. त्यानंतर तो त्या नियमानुसार वागतबी असे. परंतु तो जसतसा प्रगत होत गेला व तसतसा तो स्वैर होत गेला. त्याले रोखणे वा थांबविणे कठीण होवू लागले. अशातच देवादिकांच्या कथीत कल्पना आणल्या. कारण त्यापासूनच अशा स्वैर होणाऱ्या बऱ्याच लोकाईले आजतागायत रोखता आलं. ज्याले आज आपण अंधश्रद्धा म्हणतो. आजबी समाज जरी शिकला असन, उच्च पदावर जरी गेला असन, तरी आजबी अशा अंधश्रद्धा समाजात हायेत. ज्या अंधश्रद्धेनं समाज आटोक्यात हाये.
         समाजात आज असलेल्या अंधश्रद्धा कोणत्या, ज्यातून माणसाले स्वैराचारापासून थांबवल्या जावू शकते. त्या सांगणे क्रमप्राप्त ठरन. जसे, मांजर आडवी जाणे हा अपशकून समजून रस्ता पार न करणे, कुत्रा आडवा जाणे, घुबडाचे ओरडणे, कावळ्याचे फांदी पकडल्यावर पावसाचा अंदाज बांधणे, त्याचे ओरडणे, कावळा पिंडाला शिवणे, मुंगूस दिसणे, स्वप्न पडणे, सापाची लाट दिसणे, रजस्वाचा ईटाळ मानणे अन् सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याबी अनुचीत घटनेले दगड रुपी पाषाणाची भीती दाखवून, आपण नियम पाळले नाई म्हणून त्या त्या पाषाणानं केल्या असा बनाव करुन त्या अनुचीत घटनेपासून रोखणे. या अंधश्रद्धाच. या अंधश्रद्धा आजबी येथल्या संस्कृती पाळत असते. जरी लोकं उच्चभ्रू शिकलेले असतीन तरीबी. चांगले चांगले अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर आपल्या घरी सत्यनारायण पारायण करत असतेत. त्याचं कारण हाये, निसर्गचक्राले घाबरणं. भीती हाये का आपण त्या गोष्टी पाळल्या नाईत तं आपलं नुकसान होईन व ते नुकसान देव करते. सर्वात मोठी अंधश्रद्धा हाये देव नावाची. 
          देव हाये किंवा नाई हे काई माईत नाई. परंतु त्या देव या संकल्पनेनं अगदी कालपासून तं आजपर्यंत अन् आजबी लोकाईले स्वैराचार करण्यापासून रोखलं हाये नव्हे तं बांधून ठेवलं हाये. अगदी मोठमोठे अभिनेते अन् अभिनेत्र्या देव या संकल्पनेले घाबरतेत. त्या साधी मांजर आडवी गेल्यास अपशकून मानतेत व शुभ कार्याले जात नाईत. मात्र काई लोकं या देव संकल्पनेपासून परागंदा होत हायेत. ते लोकं देवाचे अस्तित्वच मानत नाईत. अन् जे लोकं देवाचे अस्तित्व मानत नाईत, ते संविधानालेबी घाबरत नाईत व असे लोकं गुन्हे करतेत. कारण त्याईच्या मनातून भीती नावाचा शब्दच कायमचा दूर पळालेला असते. हे असे का झाले? त्याचं कारण हाये आपली प्रगती. याचा अर्थ आपण प्रगती करु नये काय?
          आपली प्रगती. आपण प्रगती केली. काल झाडावर होतो, तवा आपल्याले वन्य हिंस्र प्राण्याईची भीती वाटत होती. काल झाडावरुन खाली आलो व आज झाडावरच्याच नाई तं ज्याईची आपल्याले भीती वाटत होती. त्याईलेबी आपण कैद केलं. आज त्याच प्राण्याईले आपली भीती वाटते. प्रगती हे त्यासाठीच असते का आपल्याले कोणाची कोणत्याही स्वरुपाची भीती वाटू नये. मंग त्या अंधश्रद्धा असो वा देवाईची संकल्पना. त्यालेच स्वातंत्र्य म्हणता येईन. परंतु याचा अर्थ असा नाई का आपण आपल्यातच राक्षसी वृत्ती निर्माण करावी व त्यात वाढ करावी. आज अशाच बऱ्याच घटना घडत हायेत का ज्या राक्षसी हायेत. मांगं एका शयरात अशाच एका पोलीस शिपायावर गंभीर हल्ला झाला. ज्यात तो पोलीस शिपाई मरता मरता वाचला. काल कसाबच्याबी प्रकरणात शिपाई तुकाराम ओबळे मरण पावला. आजबी तेच घडते. कितीतरी संरक्षण करणाऱ्या शिपायाचा जीव जाते, असल्या आपल्या स्वैराचारी वागण्यानं. तसंच आज आपल्या अशाच वागण्यातून कोणाचे जीव जातेत व त्याईचे संसार उध्वस्त होतेत तं कोणावर बलात्कारबी होत असतेत. कारण आपल्याले वाटते का देव नाई अन् संविधान हाये, परंतु ते देव नाई. ज्या संविधानाले आम्ही आमच्या जास्त पैशाच्या ताकदीनं वकीलांमार्फत उखडून फेकू शकतो. परंतु हे संविधान जरी आपण कुचकामी ठरवत असलो तरी एक शक्ती हायेच, आपल्यातल्या निर्माण झालेल्या अशा राक्षसी प्रवृत्तीले नियंत्रीत करणारी. जिले आपण निसर्गशक्ती म्हणतो. या निसर्गशक्तीसमोर आपण कितीबी प्रगती केली ना. तरीबी ते प्रगती कुचकामाची ठरते. तीच निसर्गशक्ती म्हणजेच देव हाये. ती निसर्गशक्ती ना कोणत्या पाषाणात दिसत, ना कोणत्या एखाद्या वस्तूत. परंतु ते सर्वत्र हाये. कल्पना करुन बघा का हवा आपण निर्माण करु शकतो का? आपल्याले माईत हाये का H2O जाळल्यास पाणी निर्माण होते. परंतु आपण अति प्रमाणात पाणी निर्माण करु शकतो का? आपल्याले माईत हाये का दगडावर दगड आपटल्यानं आग तयार होते. परंतु रात्रीले सुर्याच्या उष्णतेएवढा प्रकाश पाडू शकतो का? आपण जमीन निर्माण करु शकतो का? अन् आकाश निर्माण करु शकतो का? ह्या सर्व गोष्टी एक अद्वैत शक्ती निर्माण करत असते. जिले आपण देव म्हणून संबोधतो. हे देव संकल्पना संविधानापेक्षाही मोठी असून तीग असे गुन्हे करणाऱ्याले जशास तसे स्वरुपाची शिक्षा देत असते. जसे आज गुन्हा करतांनी काई वाटत नाई. आपण संविधानाले वा अशा निसर्गशक्तीले न घाबरता गुन्हे तं करुन टाकतो. परंतु जवा तो गुन्हा घडून जातो. त्यानंतर संविधानालेबी कुचकामी ठरवत आपण पैशाच्या बळावर वकीलांमार्फत न्यायालयातून सोताले मोकळं करुन घेतो. कालांतरानं आपला गुन्हा लपतो व समाजात आपण मी नाई त्यातली असे मिरवीत वागतो, वावरतो असं प्रत्येकाईच्या आयुष्यात घडतं. तवा वाटतं का त्यानं गुन्हा केला. तवा त्याचं काय झालं तं आपलं होणार. परंतु त्यात व्यक्तीच्या आयुष्याच्या अंतरंगाचा थोडा जरी अभ्यास केला तं असं आढळून येते का तो व्यक्ती बराच दुःखी असून त्याले मुलंबाळं नसतेत. ते दुःखच असते, दुसरं म्हणजे त्याले मुळबाळ जरी असले तरी ते त्याले छळत असतेत. एखाद्या आजारानं. वृद्धाश्रमात टाकत असतेत. ज्याईची आपल्याले कीव येते. ते त्याच्याच गतकाळातल्या वागण्याची फळं असतेत. त्याले कितीतरी व्याधीनं छळलेलं असते. तो मृत्यूबी मांगत असते. परंतु त्याले मृत्यू येत नाई. शिवाय समाज त्याले ताणे देत असते. कधीकधी वाळीतबी टाकत असते. कधी त्याले परीवार असूनबी भीक मांगाची येळ येते. 
          पर्यायानं सांगायचं म्हणजे तरुणपणात आपणाले तरुणपण असल्यानं आपण स्वैराचारी वागत असतो. पाप करत असतो. गुन्हेबी करत असतो. आपल्याले असं वाटत असते का आपलं कोणीच काई बिघडवू शकणार नाई. आपल्याजवळ पैसे हायेत. पैशाच्या जोरावर आपण काईबी करु शकतो. संविधानाले तं जिंकूच शकतो. तसा पाषाणात तं देव नाईच का जो आपलं वाकडं करन. परंतु हे जरी खरं असलं तरी निसर्गात अशीबी एक शक्ती हाये का जे आपल्याले आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माची शिक्षा देत असते. तसं गरुड पुराण सांगते का मृत्यूनंतर आपल्या चांगल्या वाईट कर्माची शिक्षा मिळते. परंतु ते खोटं हाये. ते शिक्षा आपण जीवंत असतांनीच मिळते व त्याचा प्रत्ययबी आपणास पदोपदी येते. जवा आपल्याले म्हातारपण येते. ते म्हातारपण एवळं आपल्याले असह्य होवून जाते का मरावंसं वाटते. परंतु आपण सोताच्या मर्जीनं मरुबी शकत नाई. ते म्हातारपण तीळतीळ छळत असते. त्यायेळेस आपल्याले आपल्या तरुणपणातल्या कर्माचा पश्चाताप येत असते. ते गतकाळातील कर्म आपल्याले पदोपदी आठवत असतेत. जे इतराईले सांगावंसं वाटते. ते सांगून केलेल्या पश्चातापाचं प्रायश्चित्त करावंसं वाटते. परंतु आपण ते करु शकत नाई. कारण त्या काळात आपलं कोणीच आयकालेबी तयार नसतेतच. 
           ईशेष सांगायचं झाल्यास आपण तरुणपण असो का बालपण. त्या काळात कर्म चांगलेच करावे. वाईट कर्म करु नये. ज्यातून आपल्याले चांगले फळ मिळन. तसंच आपलं मरणापर्यंतचं आयुष्य सुखी समाधानानं जगता येईन. आपल्यालेबी त्या काळात मदत करणारे कोणीतरी असतीन. आपलंबी आयकून घेणारे कोणीतरी असतीन. घरच्याच चार लोकाईच्या नातवंडाईच्या उपस्थितीत आपल्याले अखेरचा श्वास घेता येईन. अन् आपलेच कर्म वाईट असले तं मरतांनी आपल्याले म्हातारपण छळन नव्हे तं अखेरचा श्वास घेतांनीबी आपल्याजवळ कोणी नसन, एखाद्या लावारीश जनावरासारखा आपलाबी मृत्यू होईन. त्यानंतर आपलं प्रेत एखादा कार्पोरेशनवाला व्यक्ती उचलून नेईन व त्या आपल्या प्रेताले सन्मान न देता लावारीश लाश म्हणून फेकून देईन यात शंका नाई."
             शिवरामले वाटत होतं का आपल्याले स्वतंत्र्यता असावी. लोकाईपासून नाई तं आपली आपल्यापासूनच स्वतंत्रता असावी. आपलं मन कोणत्याबी प्रथेचं गुलाम होवू नये. आपलं मन तसल्या अंधश्रद्धा पाळण्यासाठी मजबूर होवू नये. आपलं मनच खऱ्या अर्थानं स्वतंत्र्य व्हावं व त्या मनानं अगदी लहानपणापासूनच स्वतंत्र्यपणे वागावं. जेणेकरुन आपल्या मृत्यूनंतर आपल्यालेच सन्मान भेटन व तसाच तो आपल्या वाणीनं लोकाईले सांगत होता. जे सत्य होतं. कारण आपलं मनच फार मोठं इंद्रीय होतं का ज्याच्यावर आपला तोल सुटत होता. शिवाय ते मन इतराईचं बोलणं आयकून त्याप्रमाणेच वागू पाहात होतं. 
             शंकर, राम्या, शिवऱ्या, सोम्या अन् संप्या आज म्हातारे झाले होते. त्याईले आज काम जमत नोयतं. त्याईचं काम त्याईच्या पोराईनं आगुटलं होतं. संप्यानं जनजागृती केली होती जीवनभर. अन् त्या सर्वाईनं त्याच्या जनजागृती मिशनमंधी त्याले मोलाची मदत केली होती. त्यामुळंच समाजात नवा बदल झाला होता. आज समाज बदलला होता. 

          *******************************************

            संप्या शिकला होता व त्याले माईत होतं का बाबासाहेबाचं कार्य अधुरं हाये. अजूनबी आपला समाज एकत्र झाला नाई. लोकं जरुर सुधरले. परंतु ते आपला फक्त स्वार्थ पाहात हायेत. ते आतंबी देवादिकाईतच रमलेले हायेत. तेच पाहून संप्यानं लोकाईले सुधरवासाठी जे पाऊल उचललं. ते अगदी वाखाणण्याजोगं होतं. त्यासाठी शंकर, राम्या, सोम्या अन् शिवऱ्यानं केलेली मदतबी वाखाणण्याजोगीच होती. 
          संप्याले वाटत होतं का आपल्या समाजाले सुधरवावं. कोणताबी माणूस हा जन्माले आला नरमादीपासूनच. तो ईकसीत झाला आपल्याच मायबापाच्या कृपेनं. 
          संप्या तसा ईचारच करत होता. तोच त्याले आठवला पृथ्वी अन् जीवसृष्टीचा इतिहास. त्या ईतिहासानंच त्याच्या आयुष्याले कलाटणी देली होती. जो इतिहास होता, पृथ्वी जन्माचा. 
          संप्या म्हातारा झाला होता व तो आज एका पारावर बसला होता ईचार करत. तो गतकाळातील ईचार करु लागला. ईचार होता पृथ्वी जन्माचा. हे पृथ्वी जन्मली. परंतु त्यापुर्वी हे एक पोकळी होती. या पोकळीत ना चंद्र होता, ना सुर्य अन् ना कोणतेच ग्रहबी. मंग हे ग्रह कोठून आले असतीन? 
            तो त्याचा प्रश्न. त्यावर तोच उत्तर शोधत होता व त्याच अनुषंगानं ईचारबी करत होता. पृथ्वी जन्माले येण्यापुर्वी पयलं पोकळी निर्माण झाली असन. हे पोकळी म्हणजेच अवकाश असन, ज्याले आज आपण आकाश म्हणतो. आकाश निर्माण झालं असन व त्या आकाशात संपुर्ण वितळलेली अतिगरम वायूरुप हवा असन. जे इकडंतिकडं धुमकेतूसारखी फिरत असन. त्यानंतर कालांतरानं हा वायुरुप पदार्थ थंड झाला असन व त्याचं रुपांतर द्रवरुप पदार्थात झालं असन. त्या द्रवरुप पदार्थालेबी हे हवा फिरवत असन. कालांतरानं हा द्रवरुप पदार्थबी थंड झाला असन व त्याची जमीन बनली असन. तेच ग्रह अन् तारे असन. तसाच याच वायुरुप पदार्थाचा काई भाग द्रवरुपच रायला असन. ते पाणी बनलं असन. पयलं सजीव पाण्यातच निर्माण झाले असन. त्यानंतर जमीनीवर. 
          हे त्याची सोच. त्या सोचण्यानं त्याले लय अक्कल आली होती. प्रथा परंपरा या अंधश्रद्धाच हायेत असाबी प्रकाश त्याच्या डोक्यात पडला होता. शिवाय पाषाणात देव नाई. देव माणसाईतच हाये याचीबी प्रचिती त्याले आली होती. तशीच प्रचीती त्याच्याच मार्गदर्शनानं सोम्या, राम्या अन् शिवरामलेबी आली होती. त्यातच तो समाजाचंबी एकत्रीकरण करु लागला होता. त्यासाठी समाजासमाजात जावून तो व्याख्यानंबी देत असे. त्याचबरोबर तो जनजागृतीबी करत असे. 
          संप्यानं जनजागृती केली होती. तशी संप्यानं केलेली जनजागृती. आज ते जनजागृती फळाले आली होती. कारण लोकाईच्या मनात कितीतरी काळापासून ज्या अंधश्रद्धाच कुटकूट भरल्या होत्या. मात्र थोडा थोडा समाजात बदल होवू लागला होता. जसजसा हळूहळू काळ सरकत गेला. 
         हळूहळू काळ सरकू लागला होता. तसा समाजबी थोडा बदलाले लागला होता. आतं लोकं शिकू लागले होते. उच्च शिक्षण घेवू लागले होते. जातीप्रथा मुळात बंद झाल्या होत्या. आता कोणी कोणत्याच प्राण्याईचा जीव घेत नसत. माणसाईप्रमाणे संपुर्ण प्राणीमात्राईलेबी स्वातंत्र्य भेटलं होतं. आतं लोकाईले कळू लागलं होतं. देव पाषाणात नाई तं देव माणसात हाये. या गोष्टी तत्वाच्या होत्या. तसे समाजाचे दोन गट बनले होते. एक गट होता देव पाषाणात हाये असं मानणारा व दुसरा गट बनला होता. देव पाषाणात नाई असं मानणारा. आज देव पाषाणात नाई असं मानणाऱ्याईची संख्या जास्त होती. तसा भेदभाव, ईटाळ या गोष्टी कायमच्याच संपल्या होत्या. अंधश्रद्धा, प्रथा, परंपरा या सर्व गोष्टी आताचे लोकं मानत नसत. कारण समाज शिक्षीत झाला होता. मात्र जे कार्य पुर्णपणे बाबासाहेबाईले जमलं नाई. ते कार्य त्यालेबी जमलं नोयतं. कारण शंभर प्रतिशत लोकं सुशिक्षीत झाले नोयते. आजबी काई लोकं प्रथा, परंपरा व अंधश्रद्धेतच गुरफटले होते.          
           जाती सुधरल्या होत्या. आज जातीवरुन भेदभाव नोयता. आज अस्पृश्य जातीची लोकं स्पृश्याईच्या घरी जात असत. त्याईच्या घरी त्याईच्याच ताटात एकत्र जेवन करत असत. त्याईच्या ईवाहात जात असत. तेबी आनंदानं अस्पृश्याईच्या घरी येत असत. त्याईच्या ताटात जेवत असत. त्याईच्या सण उत्सवात मिसळत असत. 
         आज लोकाईले संप्या, राम्या, शंकर, सोम्या, शिवऱ्यामुळं समजला होता स्वातंत्र्याचा खरा अर्थ. ज्या स्वातंत्र्यानं लोकाईले नायतं व्यक्तीच्याच सोताच्या मनालेच स्वतंत्र्य करुन टाकलं होतं. ज्या मनाच्या स्वातंत्र्यानं लोकाईच्या मृत्यूनंतरबी त्याईच्या मृत्यूलेबी सन्मान भेटत होता.
             समाज परीवर्तन झालं होतं. आज समाज जसा स्वतंत्र्य झाला होता. तशी इतर माणसंबी स्वतंत्र्य झाली होती. त्याचबरोबर स्वतंत्र्य झाली होती प्राणीजातबी. समाज कोणताबी धंदा करु लागला होता. जातीवरुन कामाचं स्वरूप ठरवता येत नोयतं. आजच्या काळात जसे जातीवरुन कामे बदलली होती. तसाच बदलला होता माणूस. माणसाले कळलं होतं का आपण मांसाहारी नाई. आपण माकडाईचे पुर्वज हाओत. असं कळताच त्यानं बकरे व कोंबडे कापणं बंद केलं होतं. तशीच प्राणी हत्याबी बंद केली होती. सर्व पाळीव प्राणी सुखासमाधानाने वागत होते, राहात होते. त्याईले कोणतंच भय नोयतं. 
         आज साऱ्या अस्पृश्य जाती सुधरल्या होत्या. आज अस्पृश्याईच्या जातीतबी स्वाभिमान निर्माण झाला होता. ते केवळ शिवऱ्या व संप्याच्या पुढाकारानं शक्य झालं होतं. ज्याले त्याच्याच इतर मित्राईनं साथ देली होती. बिचाऱ्या संप्यानं हाडाची काडं करुन समाजसेवा केली होती. त्यानंच समाजातल्या जाती, रुढी, परंपरा व अंधश्रद्धा दूर भगवण्यासाठी जी खरी लढाई लढली होती. तेच खरं स्वातंत्र्य होतं. आता ना पाषाणाचे देवं होते. ना त्यांच्यावर नवशाले बळी म्हणून कोंबडे, बकरे कापले जात होते. ना कोणतेच प्राणी. ते अंधश्रद्धाच समजली जात असे. आता शिवऱ्याच्या जातीतल्या कोणत्याच बाया बाळंतपण कराले ना कोणाच्या घरी जात, ना कोणताच मांग वाजा वाजवाले उच्च वर्णियाईच्या घरी जात असे. ना आता ते कधी मरणाच्या येळी वाजा वाजवत ना कधी बाळंतपणात, बाळ जन्माले येण्याच्या येळेस. कारण प्राणीहत्या बंद झाली होती व वाज्याले लावाले आतं पुरेसं चामडंबी भेटत नोयतं. ना ते आतं झाडू बनवत, ना काई टोपल्या. आतं झाडू अन् टोपल्याबी कारखान्यातच बनवले जात असत. जे प्लास्टिकचे असत. बाळंतपणंबी दवाखान्यात अत्याधुनिक साधन व तंत्रज्ञानाद्वारे होवू लागले होते. आतं तं शिवऱ्याचा समाज स्वाभिमानानं कोणताबी धंदा करु लागला होता. त्याईच्या कामाचे तासबी ठरलेले असायचे. अन् त्याले आता वाजवण्याशिवाय इतरबी धंदा करता येत असे. 
           जातीप्रथाबी बंद झाली होती. जातीपासूनबी समाजालेच नाई तं अस्पृश्य जातीले सुटकारा भेटला होता. तशी जातीप्रथा बंद झाल्यानं मांगालेबी जात नोयतीच. त्यामुळंच ते आतं पुर्वीसारखे कोणासमोर मांगण्यासाठी हात पसरत नसत वा वाजा वाजवत नसत. शिवाय आतं कोणी त्याईच्यावर कामासाठी जोर जबरदस्ती करत नसत. आतं कोणी त्याले मांग म्हणून आवाज देत नसत. ना कोणी 'मांग भलतीच गोष्ट सांग' असं ब्रीदवाक्य म्हणत असत. तेच गत राम्याचीबी होती. त्याईलेबी आतं जात नोयतीच. चपलेसाठी चामडंच भेटत नसल्यानं त्याईचा समाज आतं चपला ईकत नसे. ज्या चपला कारखान्यातून पुर्वी बनून येत असत. ते आतं दुसरंच काम करत असत. ज्यात एक प्रकारचा स्वाभिमानच होता. आतं चपलाबी प्लास्टिक अन् रबराच्याच बनवल्या जात होत्या. संप्याचं मात्र येगळंच होतं. त्याच्या समाजाचा ईशिष्ट असा व्यवसाय नसल्यानं ते सरकारी नोकरी करत. परंतु त्याईच्या कामाचे तास ठरलेले होते. सोम्याच्या जातीचं येगळंच होतं. नवी पिढी आली होती व त्याच्या नव्या पिढीनंबी जीवहत्या बंद झाली असल्यानं बकरे, कोंबडे कापायचा धंदा बंद केला होता. त्याईनबी दुसरेच धंदे लावले होते. एकंदरीत सांगायचं झाल्यास सर्व समाज व सर्वच प्राणीमात्रा गुण्यागोविंदानं जीवन जगत असत, आयुष्यभर. अखंड व अविरतपणानं.
           आज संप्यासह त्याचे कोणतेच मित्र जीवंत नोयते. परंतु त्याईनं केलेलं कार्य जीवंत होतं. ते कार्य होतं, जातीप्रथेचं समुळ उच्चाटन. ते कार्य त्याईनं पार पाडून या पृथ्वीतलावरुन निरोप घेतला होता. सोता तं ते स्वतंत्र्य झाले होते या पृथ्वीतलावरुन. परंतु त्याईनं इतर आपल्याच मानवासह संपुर्ण जीवसृष्टीलेबी स्वतंत्र्य केलं होतं. आता सर्वच स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते. अन् समजला होता सर्वाईले स्वातंत्र्याचा अर्थ, स्वातंत्र्य......... म्हणजे काय?