त्या दिवशी रविवार होता. चांगला मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि आता रिमझिम चालू होती. बायको माहेरी गेली होती त्यामुळे आता काय करांव याच विचारात होतो. अश्या वेळी बायको असती तर तिला भजी आणि कॉफी करायला सांगितली असती आणि गॅलरीत बसून छान आस्वाद घेतला असता. शेवटी ठरवल की आपणच करावी. मग तयारीला लागलो. प्रथम कांदा आणि बटाटा चिरणे आले. चला भजी हवी असेल तर पर्याय नाही. किचन कडे मोर्चा. दारावरची घंटी वाजली. दार उघडल तर माझा जिवलग मित्र प्रकाश उभा, चेहरा गंभीर.
Full Novel
नियती भाग १
नियती भाग १ त्या दिवशी रविवार होता. चांगला मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि आता रिमझिम चालू होती. बायको गेली होती त्यामुळे आता काय करांव याच विचारात होतो. अश्या वेळी बायको असती तर तिला भजी आणि कॉफी करायला सांगितली असती आणि गॅलरीत बसून छान आस्वाद घेतला असता. शेवटी ठरवल की आपणच करावी. मग तयारीला लागलो. प्रथम कांदा आणि बटाटा चिरणे आले. चला भजी हवी असेल तर पर्याय नाही. किचन कडे मोर्चा. दारावरची घंटी वाजली. दार उघडल तर माझा जिवलग मित्र प्रकाश उभा, चेहरा गंभीर. “कायरे काय झाल ? ये ये. आतच चल मी मस्त भजी करतोय भजी खाऊ, कॉफी ...अजून वाचा
नियती भाग २
नियती भाग २ भाग 1 वरून पुढे .. तुम्ही अगदी नी:संकोच बोला.” - एक अधिकारी. हे ऐकल्यावर आता चेहऱ्यावर तरतरी आली. आम्ही पण जरा relax झालो. प्रकाशनीच बोलायला सुरवात केली “माहिती as such काहीच नाही. पालिकेच पत्र आल्यावरच कळल. हे पहा.” प्रकाश ने पत्र दिल. त्यांच्या पैकीच एक जण बोलला “ते सर्व आम्हाला माहीत आहे. पण मला सांगा की तुमचं घर जवळ जवळ 100 वर्ष जुनं आहे, तुमचे वडील, आजोबा कोणीतरी तर काहीतरी बोललं असेल जरा प्रयत्न करा, आठवून बघा.” “आजोबा काय आणि वडील काय कोणी या बाबतीत बोललं नाही. हां पण आजोबा एकदा गोष्ट सांगत असतांना घराण्या ...अजून वाचा
नियती भाग ३ (अंतिम)
नियती भाग ३ भाग ३ भाग २ वरून पुढे .. साइट वरून वापस येतांना मी प्रकाशला म्हणालो की त्यांचं काम झाल्यावर तुझा प्लॉट तुला वापस मिळेल मग काळजी कशाला करतोयस. माझ्या मते तू आता एखादी जास्त पगाराची नोकरी मिळतेय का ते बघ. म्हणजे सर्व कटकटी संपतील.” “हो रे बाबा आता उद्या पासूनच सुरवात करतो. अर्धा पाऊण पगार तर कर्जाचे हप्ते भरण्यातच जातोय. अजून अंगावर जबाबदारी नाहीये म्हणून बरय.” – प्रकाश. प्रकाशची फरफट तशीच चालू होती. तो नवी नोकरी शोधतच होता पण मिळत नव्हती. तशातच त्याची मुंबईला बदली झाली. दुष्काळात तेरावा महिना. आर्थिक परिस्थिति अजून खड्ड्यात. वैतागून असाच एकदा ...अजून वाचा