धुळे शहरातली एक शांत संध्याकाळ. जुन्या वाड्यांच्या गल्लीबोळांतून वाहणारा मंद वारा, दिव्यांच्या फिकट प्रकाशात चमकणाऱ्या दगडी रस्त्यांवरून झपाझप चालणारे काही लोक, आणि त्या सगळ्या वातावरणाला भेदून जाणारा एक भेसूर आवाज!"आsss.... ! " एका वाड्यातून आलेल्या किंचाळीने आजूबाजूचं संपूर्ण वातावरण हादरलं. लोकांनी हळूहळू त्या दिशेने पाहायला सुरुवात केली. काही जण भीतीपोटी मागे सरकले, तर काही धावत तिकडे गेले. वाड्याच्या दरवाज्यात उभा असलेला गणपत चौधरी, एक प्रतिष्ठित व्यापारी, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या छातीत खोलवर भोसकलेली सुरी अजूनही तशीच रोवलेली होती. पोलिस काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसर बंद केला आणि लोकांना बाजूला हटवलं. ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. या खुनाची बातमी गुप्तहेर चेतनपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही.
ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 1
प्रकरण १ : धुळ्यातील रहस्यमय खून धुळे शहरातली एक शांत संध्याकाळ. जुन्या वाड्यांच्या गल्लीबोळांतून वाहणारा मंद वारा, दिव्यांच्या प्रकाशात चमकणाऱ्या दगडी रस्त्यांवरून झपाझप चालणारे काही लोक, आणि त्या सगळ्या वातावरणाला भेदून जाणारा एक भेसूर आवाज!"आsss.... ! " एका वाड्यातून आलेल्या किंचाळीने आजूबाजूचं संपूर्ण वातावरण हादरलं. लोकांनी हळूहळू त्या दिशेने पाहायला सुरुवात केली. काही जण भीतीपोटी मागे सरकले, तर ...अजून वाचा