एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच मुलगी खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली. “ मी मिस ऋता रिसवडकर ” पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,
Full Novel
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 1
रिव्हॉल्व्हर प्रकरण १एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली.“ मी मिस ऋता रिसवडकर ”पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,“ तुम्ही सौंम्याला ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 2
प्रकरण २आद्रिका अभिषेकी उंचपुरी सडपातळ बांध्याची आणि ‘ चिकणी ’ असं जिचं वर्णन करता येईल, अशी मुलगी होती. आपल्या टेबलवर बसली होती.तिच्या आधीच्या सेक्रेटरीने ज्या ठिकाणी टेबल ठेवलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला तिने ते हलवलं होतं.दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला आणि त्याच वेळी आद्रिकाला फोन आला. पाणिनीला तिने हसून अभिवादन केलं आणि अगदी बारीक आवाजात ती फोन वर बोलत बसली. “ सॉरी, मला नाही सांगता येणार ते कधी परत येतील.बाहेरगावी आहेत ते. त्यांना काही निरोप आहे? बरं, बरं ” ती म्हणाली आणि फोन बंद करून पाणिनी कडे वळली.“ मी पाणिनी पटवर्धन.” पाणिनी म्हणाला.“ ओह ! प्रसिद्ध वकील ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3
प्रकरण ३दहाच्या ठोक्याला ऋता पाणिनीच्या ऑफिसात हजर झाली.“ कार्तिक कामत ची खबरबात समजल्ये.” पाणिनी म्हणाला.“ कुठे आहेत ते?” ऋता त्याचा मला देवनारहून फोन आला होता.मी त्याच वकीलपत्र घ्यावं असं त्याचं म्हणणं आहे.या क्ष ला मी भेटावं आणि एकंदरित त्याचा अंदाज घ्यावा, परिस्थितीचाही आढावा घ्यावा असं त्याचं म्हणणं आहे.हे मी केल्याशिवाय तो त्याच्या शेअरची किंमत नक्की करणार नाही.ठीक आहे ना हे तुझ्या दृष्टीने? ”“ माझ्या मनात जे होतं त्यानुसार हे नाहीये पण कामत सरांना जे योग्य वाटत असेल त्याला माझी ना नाही.” ऋता म्हणाली.“ आता ही क्ष व्यक्ती कोण आहे आणि कुठे भेटेल मला हे तू सांगू शकशील का?” पाणिनीने ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 4
प्रकरण ४थोड्याच वेळात त्रिकुट ऋता च्या घरी हजर झालं.कामत येणार याची कल्पना नसल्याने तिला एकदम आश्चर्य वाटलं.“ सर, अभिनंदन सून मुख पाहिलंत की नाही?”“ नाही मी कामासाठी बाहेर गेलो होतो.आणि त्याचा स्वभाव तुला माहितीच आहे, त्याने बाहेर गावी जाऊनच रजिस्टर लग्न केलं.” थोड्याशा विषादाने कामत म्हणाला.“ बरं बसा तुम्ही, मी मस्त पैकी कॉफी करून आणते.” ऋता म्हणाली.“ नको.आपण इथे कामासाठी जमलोय आणि तेच करू.मी थेट विषयावर येतो. तुझ्या वडिलांबद्दल बोलूया.मी देवनारला होतो आणि तिथे माझे काही माहितीचे स्त्रोत आहेत, त्या आधारेच मी तुला सांगतोय पण पोलिसांना लागतील ते पुरावे अजून माझ्या कडे आले नाहीयेत , पण सत्य हे आहे ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 5
प्रकरण ५“ वा,वा, पाणिनी ! पहाटे पहाटे लौकर उठून हे दोन पंछी कुठेले किडे पकडायला बाहेर पडले होते?” सौंम्याआणि आळीपाळीने बघत तो म्हणाला.“ आम्ही याला पहाट म्हणत नाही.” पाणिनी म्हणाला.“ म्हणा काहीही पण तुम्ही भटकंती मात्र खूप करता.” तारकर म्हणाला, “ चला वर जाऊ म्हणजे जरा आपल्याला बोलता येईल निवांतपणे.”—तारकर“ कशावर बोलायचंय तुला एवढ?” पाणिनीने विचारलं.“ खुना बद्दल.” तारकर म्हणाला आणि त्याने बोलता बोलता त्यांना बरोबर यायला भाग पाडून ऑफिस पर्यंत नेलंच.“ बोल, तारकर.” पाणिनी म्हणाला.“ गंधर्व चांडक.” तारकर त्रोटकपणे उद्गारला.“ त्याचं काय?”“ मेला तो.”—तारकर.“ कसा काय?” पाणिनीने विचारलं.“ अडतीस कॅलीबर ची गोळी लागून.”“कधी?” पाणिनीने विचारलं.“ काल रात्री केव्हातरी.”“ ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 6
प्रकरण ६पाणिनी कुमार कामतच्या सेकण्ड हँड कार विक्रीच्या शो रूम मधे आला.लगेच त्याच्या मागे तिथले सेल्स मन लागले.“ मला खरेदी किंवा विक्री करायची नाहीये.कामतला भेटायला मी आलोय.” पाणिनी म्हणाला. तरीसुद्धा त्या लोकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.त्यांना भीक न घालता कामत च्या केबिन मधे पाणिनी आला. “ मला तुझ्याशी महत्वाचं आणि तातडीने बोलायचंय. जिथे आपल्यात कोणीच व्यत्यय आणणार नाही.तुझ्या या सेल्स मेन नी मला वैताग दिलाय.त्यांना कटवायचा काही मार्ग नाही का? ” पाणिनीने विचारलं.“ एकच उपाय आहे.तुझी कार विकायची.” कामत म्हणाला. त्याने पाणिनी बरोबर आलेल्या सेल्समन ला सांगितलं की या पाणिनी पटवर्धन ची गाडी बाहेर घेऊन जा चालवून बघा.आणि आपण ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 7
प्रकरण ७पाणिनीचा फोन वाजला.मृण्मयी भगली लाईन वर होती.“ बोल मृण्मयी, झाली का पोलिसांची तपासणी? काय घेतलं का त्यांनी?” पाणिनीने त्यांनी बरीच उलथ पालथ केली तिथे,पण त्यांना अपेक्षित असलेलं काही मिळालं नाही.जाम वैतागले होते ते.नाराज होवूनच निघून गेले.”-मृण्मयी म्हणाली.“ तो त्यांचा सापळा असू शकतो.तुला बेसावध ठेवण्यासाठी. बर ते असो, ऑफिस मार्गी लावायला घेतलंस का?”“ सगळा सावळा गोंधळ झालाय ऑफिसात.काहीही कुठेही ठेवलंय. शिस्त हा प्रकारच नाहीये.पत्रव्यवहार चुकीच्या जागी फाईल केलाय.कित्येक फायली डुप्लीकेट झाल्यात. जी देणी द्यायची आहेत त्याची शहानिशा केली गेली नाहीये.”-मृण्मयी म्हणाली.“ उदाहरणार्थ?” पाणिनीने विचारलं.“ म्हणजे बघा की नुकतंच जे नवीन घर साहेबांनी घेतलं, त्यात इलेक्ट्रिक वायरिंग आणि तत्सम कामाची ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 8
प्रकरण ८दुपारीच कार्तिक कामत चा पाणिनीला फोन आला.“ छान काम केलंस पाणिनी.”“ कशाबद्दल बोलतोयस तू?” पाणिनीने विचारलं.“ तुला माहित्ये.” कामत“ तू आहेस कुठे अत्ता?” पाणिनीने विचारलं.“ देवनार”“ तुला कल्पना नाहीये कार्तिक, इथे खूप लफडी झाल्येत.....” पाणिनी म्हणाला.“ मला सर्व कल्पना आहे.माझ्या तिथल्या माणसांनी मला सर्व माहिती दिल्ये.म्हणूनच फोन केलाय. ”—कार्तिक“ तुझ्या कुमारला आणि सुनेला पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतलंय माहित्ये का? मी तुझ्या कुमारकडून घेतलेल्या रिव्हॉल्व्हर मधून माझ्या कडून अचानक.....”“ माहित्ये मला ते पण.” पाणिनीचं बोलणं अर्धवट तोडत कामत म्हणाला. “ हे बघ पाणिनी, तुझं काम ऋताला वाचवणं हे आहे.”“ मुलगा आणि सुनेचं काय?”“ तुला जेवढं करता येईल ते करच ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9
प्रकरण ९दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता सौंम्या पाणिनीला घाई घाईत सांगत आली, “ बाहेर कामत आलाय.”“ वडील?”“ मुलगा.”—सौंम्या म्हणाली.“कसा ? म्हणजे देहबोलीवरून काय वाटतंय?” पाणिनीने विचारलं.“ मला तेच सांगायचं होतं. खूप भडकलाय. तुम्ही एकतर त्याला अत्ता भेटू नका किंवा कनक ला बोलावून घ्या तुमच्या मदतीला.” सौंम्या म्हणाली आणि पाणिनीने मानेनेच ठाम पणे नकार दिला.“ तो खूप आडदांड आहे, तुम्हाला माहितीच आहे त्यात तो.....” सौंम्या ने समजावण्याचा प्रयात केला पण पाणिनी ठाम होता.“ तू विसरल्येस सौंम्या बहुतेक, आपण ज्या कॉलेज ला शिकलोय त्या कॉलेजचा मी बॉक्सिंग चँपियन होतो. तशीच वेळ आली तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो पण ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 10
प्रकरण १०पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसात बसला असतांना त्याला कार्तिक कामत ची जुनी सेक्रेटरी मृण्मयी भगली चा फोन आला. कार्तिकच्या काहीतरी गंभीर गोष्टी घडल्याचं लक्षात आलं होतं तिच्या. पाणिनीने नेमके काय झालाय असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की वेगवेगळ्या दुरुस्त्या करणासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी एखाद्या कंपनीला चेक ने पेमेंट केल्याचं दिसतंय पण नेमकं काय काम दिलं होतं किंवा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या होत्या त्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिलेलीच नव्हती.खर्चाच्या तपशिलाची चलने पण बरोबर नाहीत म्हणजे चलनावर तपशील भरताना मोघम भरला गेलाय. पाणिनने तिला सांगितलं की यात फार गंभीर असेल काही वाटत नाही.मृण्मयीने संबंधित कंपनीला फोन लावावा आणि त्यांनी कोणत्या ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 11
प्रकरण ११“तेव्हा अकरा वाजले होते?” पाणिनीने विचारलं.“कदाचित पाच दहा मिनिटं पुढे मागे” कार्तिक कामत म्हणाला.“ठीक आहे काय झालं पुढे?”“ सांगितल्याप्रमाणे मी चांडकच्या घराचा दरवाजा वाजवला काही उत्तर आलं नाही. मी दरवाजा थोडा ढकलून पाहिला तर तो उघडाच होता त्यामुळे मला सहज आत जाता आलं आणि मी गेलो. मी गेलो तेव्हा चांडक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता . मी आजूबाजूला बघितलं, कुठल्यातरी स्त्रीच्या पायाचा हाय हिल्स चा ठसा रक्ताच्या थारोळ्यात बुडून शेजारच्या फरशीवर उमटला होता. तो ठसा बघून माझी खात्री झाली की तो ऋता रिसवडकरच्या बुटांचा असणार पण मला खात्री करून घ्यायची होती म्हणून मी चांडकच्या घरातून दरवाजा तसाच उघडा ठेवून ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 12
प्रकरण १२.पाणिनी समोरच्या आरामशीर सोफ्यावर हात ठेवायच्या जागी आपले पाय ठेवून आणि हात ठेवायच्या दुसऱ्या जागी आपली पाठ टिकवून ओजस सिगरेट शीलगावत बसला होता.“इकडे आड तिकडे विहीर अशी तुझी अवस्था झाल्ये पाणिनी.” तो म्हणाला“कार्तिक कामत ला जामीन मिळालाय आणि पुढच्या दोन तासातच तो बाहेर येईल. दुसरीकडे ऋता रिसवडकर ला खुनाच्या आरोपात दोषी धरण्यात आलंय. तिला जामीन मंजूर झालेला नाही. सरकारी वकील खटला तातडीने सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा अनुभव असा आहे की बचाव पक्ष खटला जेवढा उशिरा सुरू होईल याच प्रयत्नात असतो. त्यामुळे तुझ्यावर दबाव टाकण्यासाठी ते केस तातडीने सुरु करताहेत.” कनक म्हणाला“निशांगी जयस्वाल बद्दल मी तुला माहिती काढायला ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 13
प्रकरण १३न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यानी नावाप्रमाणेच एक सक्षम वकील म्हणून प्रक्टिस सुरु केली होती. आणि वीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. कोर्टात खटला चालू झाला. अॅडव्होकेट खांडेकर आपलं प्रास्ताविक करायला उभे राहिले.“या प्रकरणात मी वस्तुस्थितीदर्शक आणि संक्षिप्त अशी भूमिका घेणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांप्रमाणे कुठलीही नाट्यमयता आम्ही त्यात आणणार नाही. आमचं सादरीकरण हे गणितानुसार खात्री देणार आणि त्यातून नि:संदिग्धपणे अनुमान काढता येईल, अर्थ काढता येईल असं असणार आहे.” खांडेकर पुढे बोलू लागले.....“यावर्षीच्या सात ऑक्टोबरला चांडक चा मृत्यू झाला. वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आम्ही दाखवून देऊ की रिव्हॉल्व्हर चांडकच्या अंगाला हृदयाच्या थोडंसं खाली, डाव्या बाजूला रोखलं गेलं होतं. ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 14
प्रकरण १४या नंतर पियुष कर्नावट, ठसेतज्ज्ञ याला पाचारण करण्यात आले.“आरोपी ज्या घरात राहत होती त्या घराची ठसे मिळवण्याच्या दृष्टीने करण्या चा प्रसंग तुझ्यावर आला होता का?”-खांडेकर.“ हो.”“कधी?”“९ ऑक्टोबरला”“तुला आरोपीच्या घरात कपड्यावर रक्ताचे डाग पडलेले कपडे, कापड किंवा इतर कुठलीही वस्तू आढळली का?”“हो सर” पियुष म्हणाला.“कुठल्या वस्तूवर असे डाग आढळले?”-खांडेकर“ बुटाच्या जोडी पैकी डाव्या बुटाच्या तळव्यावर आणि टाचावर ”“हे डाग मानवी रक्ताचेच आहेत हे ठरवण्यासाठी आवश्यक असलेलं पुरेसं रक्त तुला तपासणीसाठी मिळालं का या बुटावरून? ”“ नाही सर ते बूट खूपच काळजीपूर्वक आणि खसखसून घासून धुतले होते. पण त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यावर असलेले डाग हे रक्ताचेच आहेत हे शोधून ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 15
प्रकरण १५दुसऱ्या दिवसासाठी खांडेकरांनी आपला खास राखून ठेवलेला साक्षीदार तपासणीसाठी बोलावला“ कार्तिक कामत च्या कुमारला, कुमार कामतला बोलवा.” ते कामत हजर झाला.त्याचा चेहेरा गंभीर, कणखर आणि निश्चयी होता. त्याने शपथ घेतली आणि आपला परिचय दिला.“ मी तुला आधीच एक महत्वाची सूचना देतोय की तुला विचारले जाणारे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक ऐक आणि नंतरच उत्तर दे.कोणतीही जास्तीची माहिती स्वत:हून देऊ नको.” खांडेकर म्हणाले.साक्षीदाराने मान डोलावली.“ तुझ्या बाबांनी अगदी एक सारख्या दिसणाऱ्या आणि एकाच प्रकारच्या तीन रिव्हॉल्व्हर खरीदल्या होत्या हे आता समोर आलंच आहे.ओळखण्यासाठी आपण त्याचं वर्णन असं करू, जी त्यांनी तुला दिली त्याला रिव्हॉल्व्हर क्र. १- कुमारची रिव्हॉल्व्हर म्हणू. जी बाबा ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 16
प्रकरण १६“ साक्ष देऊन बाहेर पडताना तू मला उद्देशून काही बोललास.काय ते या कोर्टाला सांगशील का?” पाणिनीने विचारलंकामतचा राग उतरला नव्हता. “ मी म्हणालो की मी तुला ठार मारीन पटवर्धन.” कामतम्हणाला, “ आणि देवा शप्पथ मी मारीन तुला.”“ तुम्ही भर कोर्टात काय बोलताय समजतंय का तुम्हाला? अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनना मारायची धमकी देताय तुम्ही. याचा परिणाम काय होईल माहित्ये?” न्यायाधीश बहुव्रीही यांनी आश्चर्य आणि रागाने विचारलं.“ न्यायमूर्ती महाराज, साक्षीदाराला ज्या पद्धतीने पाणिनी पटवर्धन यांनी प्रश्न विचारले, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढळली....” खांडेकर मदतीला येत म्हणाले.“ यांना २४ तासांसाठी कस्टडीत टाका.” खांडेकरांकडे पूर्ण दुर्लक्ष करत न्यायाधीशांनी बेलीफ ला आदेश दिला.बेलीफने कुमार ...अजून वाचा
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 17 (शेवटचे प्रकरण)
प्रकरण १७कोर्टाने जेवणाची सुट्टी जाहीर केली त्यावेळेला कनक ओजस , सौम्या सोहोनी आणि पाणिनी कोर्टाजवळच्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये गेले. त्यांचे जेवण चालू असतानाच त्यांच्या ऑफिस मधील रिसेप्शनिस्ट गती तिथे पळत पळत आली आणि त्यांच्या टेबलावर येऊन तिने एक मोठा गौप्य स्फोट केला. तिने सांगितलं की कोर्टाची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मी कोर्टातून आपल्या ऑफिसमध्ये गेले होते तर तिथे मृण्मयी भगली म्हणजे कामतची पूर्वीची सेक्रेटरी, जी आता पुन्हा कामत कडे कामाला लागली होती, ती आपलं काम करत असताना तिला एका जुन्या फायलीची आवश्यकता लागली म्हणून रॅक मधील एक वरच्या बाजूची फाईल काढत असताना तिला रक्ताचे डाग पडलेला एक टॉवेल तिथे ...अजून वाचा