एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच मुलगी खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली. “ मी मिस ऋता रिसवडकर ” पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,

1

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 1

रिव्हॉल्व्हर प्रकरण १एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली.“ मी मिस ऋता रिसवडकर ”पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,“ तुम्ही सौंम्याला ...अजून वाचा

2

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 2

प्रकरण २आद्रिका अभिषेकी उंचपुरी सडपातळ बांध्याची आणि ‘ चिकणी ’ असं जिचं वर्णन करता येईल, अशी मुलगी होती. आपल्या टेबलवर बसली होती.तिच्या आधीच्या सेक्रेटरीने ज्या ठिकाणी टेबल ठेवलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला तिने ते हलवलं होतं.दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला आणि त्याच वेळी आद्रिकाला फोन आला. पाणिनीला तिने हसून अभिवादन केलं आणि अगदी बारीक आवाजात ती फोन वर बोलत बसली. “ सॉरी, मला नाही सांगता येणार ते कधी परत येतील.बाहेरगावी आहेत ते. त्यांना काही निरोप आहे? बरं, बरं ” ती म्हणाली आणि फोन बंद करून पाणिनी कडे वळली.“ मी पाणिनी पटवर्धन.” पाणिनी म्हणाला.“ ओह ! प्रसिद्ध वकील ...अजून वाचा

3

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3

प्रकरण ३दहाच्या ठोक्याला ऋता पाणिनीच्या ऑफिसात हजर झाली.“ कार्तिक कामत ची खबरबात समजल्ये.” पाणिनी म्हणाला.“ कुठे आहेत ते?” ऋता त्याचा मला देवनारहून फोन आला होता.मी त्याच वकीलपत्र घ्यावं असं त्याचं म्हणणं आहे.या क्ष ला मी भेटावं आणि एकंदरित त्याचा अंदाज घ्यावा, परिस्थितीचाही आढावा घ्यावा असं त्याचं म्हणणं आहे.हे मी केल्याशिवाय तो त्याच्या शेअरची किंमत नक्की करणार नाही.ठीक आहे ना हे तुझ्या दृष्टीने? ”“ माझ्या मनात जे होतं त्यानुसार हे नाहीये पण कामत सरांना जे योग्य वाटत असेल त्याला माझी ना नाही.” ऋता म्हणाली.“ आता ही क्ष व्यक्ती कोण आहे आणि कुठे भेटेल मला हे तू सांगू शकशील का?” पाणिनीने ...अजून वाचा

4

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 4

प्रकरण ४थोड्याच वेळात त्रिकुट ऋता च्या घरी हजर झालं.कामत येणार याची कल्पना नसल्याने तिला एकदम आश्चर्य वाटलं.“ सर, अभिनंदन सून मुख पाहिलंत की नाही?”“ नाही मी कामासाठी बाहेर गेलो होतो.आणि त्याचा स्वभाव तुला माहितीच आहे, त्याने बाहेर गावी जाऊनच रजिस्टर लग्न केलं.” थोड्याशा विषादाने कामत म्हणाला.“ बरं बसा तुम्ही, मी मस्त पैकी कॉफी करून आणते.” ऋता म्हणाली.“ नको.आपण इथे कामासाठी जमलोय आणि तेच करू.मी थेट विषयावर येतो. तुझ्या वडिलांबद्दल बोलूया.मी देवनारला होतो आणि तिथे माझे काही माहितीचे स्त्रोत आहेत, त्या आधारेच मी तुला सांगतोय पण पोलिसांना लागतील ते पुरावे अजून माझ्या कडे आले नाहीयेत , पण सत्य हे आहे ...अजून वाचा

5

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 5

प्रकरण ५“ वा,वा, पाणिनी ! पहाटे पहाटे लौकर उठून हे दोन पंछी कुठेले किडे पकडायला बाहेर पडले होते?” सौंम्याआणि आळीपाळीने बघत तो म्हणाला.“ आम्ही याला पहाट म्हणत नाही.” पाणिनी म्हणाला.“ म्हणा काहीही पण तुम्ही भटकंती मात्र खूप करता.” तारकर म्हणाला, “ चला वर जाऊ म्हणजे जरा आपल्याला बोलता येईल निवांतपणे.”—तारकर“ कशावर बोलायचंय तुला एवढ?” पाणिनीने विचारलं.“ खुना बद्दल.” तारकर म्हणाला आणि त्याने बोलता बोलता त्यांना बरोबर यायला भाग पाडून ऑफिस पर्यंत नेलंच.“ बोल, तारकर.” पाणिनी म्हणाला.“ गंधर्व चांडक.” तारकर त्रोटकपणे उद्गारला.“ त्याचं काय?”“ मेला तो.”—तारकर.“ कसा काय?” पाणिनीने विचारलं.“ अडतीस कॅलीबर ची गोळी लागून.”“कधी?” पाणिनीने विचारलं.“ काल रात्री केव्हातरी.”“ ...अजून वाचा

6

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 6

प्रकरण ६पाणिनी कुमार कामतच्या सेकण्ड हँड कार विक्रीच्या शो रूम मधे आला.लगेच त्याच्या मागे तिथले सेल्स मन लागले.“ मला खरेदी किंवा विक्री करायची नाहीये.कामतला भेटायला मी आलोय.” पाणिनी म्हणाला. तरीसुद्धा त्या लोकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.त्यांना भीक न घालता कामत च्या केबिन मधे पाणिनी आला. “ मला तुझ्याशी महत्वाचं आणि तातडीने बोलायचंय. जिथे आपल्यात कोणीच व्यत्यय आणणार नाही.तुझ्या या सेल्स मेन नी मला वैताग दिलाय.त्यांना कटवायचा काही मार्ग नाही का? ” पाणिनीने विचारलं.“ एकच उपाय आहे.तुझी कार विकायची.” कामत म्हणाला. त्याने पाणिनी बरोबर आलेल्या सेल्समन ला सांगितलं की या पाणिनी पटवर्धन ची गाडी बाहेर घेऊन जा चालवून बघा.आणि आपण ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय