युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले होते .युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते .लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते .तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे .मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे ..एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता .लंडनला गेल्यागेल्या तिथल्या शिस्तबद्ध जीवनाचा लगेचच अनुभव आला .
युरोपियन हायलाईट - भाग 1
युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले .युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते .लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते .तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे .मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे ..एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता .लंडनला ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 2
पॅरिसपॅरिस हिंदी आणि इंग्रजी सिनेमातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं.एमिली मिडनाईट इन पॅरीस ,आणि काही आंतरराष्ट्रीय सिनेमातून दर्शन होतेचित्रकार , चित्रे याविषयी वाचता लिहिताना पॅरीसचा उल्लेख सतत येतंच असतोशम्मीचा एन इव्हिनिंग इन पॅरिस तर हा तर अनेक वेळा पाहिलेला आणि मनावर मोहिनी पडलेला चित्रपट .त्यामुळे उत्सुकता होतीच ..लंडनच्या सेंट पँक्रा स्टेशनवर सोपस्कार पार पाडून युरोस्टारची वाट बघत बसलो.इथलं वायफाय खुप छान आहे त्यामुळे वाट पाहताना बरेच लोक मोबाईल मध्येच गर्क होते.आमच्या बरोबरच्या दोन मैत्रीणी नुकत्याच घेतलेल्या मोबाईल सेटिंग मध्ये गुंतलेल्या होत्याहे स्टेशन तर सुंदर आहेच पण बसण्याची व्यवस्था बऱ्याच खुर्च्या असुन सुद्धा सततच्या गर्दीमुळे अत्यंत अपुरी वाटते ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 3
चॉकलेटचे शहर बेल्जियम ..पॅरिस मधुन बाहेर पडल्यावर आमचे पुढचे ठिकाण होते बेल्जियम.बेल्जियम हा फेमस चित्रकार रेने माग्रिटेचा देश.येथेच हुशार टिनटिन होऊन गेला.इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या सर्वापेक्षा बेल्जियम लहान आहे बेल्जियमची जागा मध्यवर्ती असल्याने सगळे लोकं भांडायला मध्यवर्ती पडते म्हणून इथं येत असतBattlefield of Europe म्हणून बेल्जियमची ओळख आहेनेपोलिअन जिथे लढाई हरला ते वाटर्लु इथलंच.अनेक वर्षानंतर बेल्जियम आता प्रगती करतेय .ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी.ब्रुसेल्स फार छान टुमदार शहर आहे. गजबजलेल्या फॅशनेबल पॅरिसमधून या ब्रुसेल्स गावात आल्यावर फार छान आणि शांत वाटतेआमच्या जेवणाच्या हॉटेलच्या आसपास सुंदर रेसिडेन्शिअल बंगलो असलेली कॉलनी होती.वीकएंड असल्याने सुट्टीचा दिवस होता आणि लखलखीत सुर्य असल्याने लोकं ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 4
नेदरलँडबेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रुसेल्सचा शेजारी असणारा हा देश खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतातट्युलिपचा देश चा देश .सायकलचा देश ...!!नेदरलँड आणि सायकल म्हणजे एकअजोड’ साथ आहे .अगदी फेविकॉल जोड सारखी तशी सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे .प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात .सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत.चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात .कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात .प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं .महापौर पण सायकलने ऑफिसात जातात.रस्तेही तसेच चकाचक आणि मुलायम आहेत !!नेदरलँड मधली “सायकल फिरवण्यात मग्न पब्लिक ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 5
जर्मनीअमस्टरडॅमचा निरोप घेऊन जर्मनीत कलोन गावात गेलो.हे ऱ्हाईन नदीच्या तीरावरील सर्वात मोठे गाव आहे .अनेकांचे आवडते परफ्यूम यू डी याचा उगम इथलाच आहेकलोन याचा अर्थ पवित्र पाणी असा होतो .कोलोन हे बर्लिन , हॅम्बुर्ग आणि म्युनिक नंतर जर्मनीतील चौथे सर्वात मोठे शहर आहे .कोलोन हे शहर ऱ्हाईन नदीच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे . शहरातील प्रसिद्ध कोलोन कॅथेड्रल हे कोलोनच्या कॅथोलिक आर्चबिशपचे आसन आहे. कोलोन विद्यापीठ हे युरोपमधील सर्वात जुन्या आणि मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे, जिथे सुमारे 50000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत.दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या विमानांच्या बॉम्बस्फोटासाठी कॅथेड्रलचे जुळे शिखर हे सहज ओळखता येणारे नेव्हिगेशनल लँडमार्क होते. युद्धादरम्यान कॅथेड्रलला ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 6
स्वित्झर्लंडस्वित्झर्लंडमधे प्रवेश केल्यावर प्रथम भेट दिली ती झुरीच मधील ऱ्हाईन फॉललाहा ऱ्हाईन नदीवरील एक लहानसा फॉल आहेया ऱ्हाईन नदीत फिरायला मजा येते कारण बोट फॉलजवळ नेताना अंगावर पाण्याचे जोरदार फवारे उडतात .तिथल्या बोटचालकाचे वैशिष्ट्य असे की फॉलच्या अगदी जवळ बोट नेऊन पुन्हा सुखरूप आणी कौशल्याने ही बोट तो बाहेर काढत असे .व असे तो ही कृती परत परत करीत असेबोट फॉल च्या जवळ गेल्यावर थरारक वाटत असे .पाण्यात गेल्यावर कडाक्याची थंडी होती त्यामुळे बाहेर आल्यावर तेथील एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये गरम गरम वडापाव आणि मसाला चहा मिळाल्यावर आमचा आनंद द्विगुणीत झाला .(कारण युरोप मध्ये एकतर तुम्हाला चहा अजिबात ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 7
इटली ..इटलीत आम्ही प्रथम व्हेनिसला गेलो .व्हेनिस ही दक्षिण इटलीतील व्हेनेटो प्रांताची राजधानी आहे .हे शहर सांस्कृतिक कला आणि एक केंद्र आहे .इथे १०० पेक्षा जास्त बेटे आहेत .“कालव्यांचे शहर “म्हणून व्हेनिस ओळखले जाते .संपूर्ण शहर कालव्यांच्या आसपास वसल्याने इथले वाहतुकीचे मध्यम फक्त बोटी आहेत .लांबलचक बोटीतून शहराचा सर्व व्यवहार आणि इकडे तिकडे येणेजाणे चालते .या बोटींना “गंडोला” असे संबोधले जाते .गंडोला राईड मधुन पर्यटकांना सर्व शहरभर फिरवले जाते .व्हेनिस म्हणले की सर्वप्रथम आठवते ते THE GREAT GAMBLAR चित्रपटातील झीनत आणि अमिताभ वर चित्रित केलेले ..दो लब्जो की है दिल की कहानीहे गाणे ..गंडोला राईड करताना त्यामध्ये हेच गाणे ...अजून वाचा
युरोपियन हायलाईट - भाग 8
समालोचनआता थोडेसे युरोप विषयी अनुभवातून मिळालेल्या व इतरांना उपयोगी पडतील अशा टिप्स आणि निरीक्षणे ..युरोपात चहा अगदी वर्ज्य आहे चहाचं व्यसन इंग्लिश लोकांनी लावले पण इंग्लंड वगळता तर युरोपमधे चहा नाही .युरोप म्हणजे सगळीकडे कॉफीचे राज्य आहे. बिन दुधाची आणि बिनसाखरेचीआपल्याला ती सवय नसल्याने पांचट वाटते अशा वेळीकेपेचीनो कॉफी घेणे हा उत्तम पर्याय ठरतोइथे नाश्ता म्हणजे ब्रेडचे अनेक प्रकार असतात त्यातले बरेचसे आपल्याला फारसे आवडत नाहीतअशा वेळी नाश्त्यामध्ये फळे ,फ्रुट जुस, कॉर्न फ्लेक्स ,योगर्ट घेणे हे चांगलेजेवताना भात सॅलड सूप वर भर द्यायचाम्हणजे फिरण्यासाठी भरपूर चालायची ताकद टिकवता येते.इथे कुठेही सामान उचलायला हमाल मिळत नाहीआपले बॅगेज आपण उचलायचे असते ...अजून वाचा