पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण करणंच भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर रान शेणीचा कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची मशेरी लावीत बायजा मागिलदारी गेली. दोणीजवळची पितळी दीडशेरी घेवून ती खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या.
वायंगीभूत - भाग 1
पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर रान शेणीचा कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची मशेरी लावीत बायजा मागिलदारी गेली. दोणीजवळची पितळी दीडशेरी घेवून ती खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या. ...अजून वाचा
वायंगीभूत - भाग 2
" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. खंडी खंडाचा भात येता...... दुपिकी मळो...... हाल्लीच शंभर कलमांची बाग उटवली. पण चार बाजून येवडा उत्पान असोन आज मितीक पन्नास रुपाये म्हणशा तर गाटीक नाय आमच्या. येरे दिवसा नी भर रे पोटा अशी कुडवाळ तऱ्हा ..... आमच्या काय उतवाक् धूर लागना नाय. लय थळा सोदून झाली. पण एकाचो म्हणशा तर गुन नाय......" आलेली किरकोळ गिऱ्हायकं मार्गी लागल्यावर जिक्रियाने बाबुला आत न्हेला. भिंतीवर हाजी मलंगाचा फोटो लावून त्यासमोर चटई टाकून डोक्याला गलप बांधून म्हमद पालथा पडला ...अजून वाचा
वायंगीभूत - भाग 3
दणदणा तोडगा घेवून आला नी दुसऱ्या दिवशी तो शिपणं करायला गेला. चाळीसेक लाटा मारल्यावर लाट थांबवून दुसऱ्या ओळीत पाणी तो गेला नी बघतोतर सगळ्या ओळीत पाणी तुडुंब भरलेलं होतं. आश्चर्याचा भर ओसरल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा त्या वायंग्याच्या चेड्याचा प्रताप होता. बागेत फिरून फिरून पडलेल्या सुपाऱ्या, नारळ पुंजावतानाही हाच चमत्कार व्हायचा. ओंजळ्भर सुपाऱ्या ठेवून बाबु पुन्हा पडीच्या सुपाऱ्या पुंजावून आणी पर्यंत मूळ जागी चौपट नग वाढलेले असत. कणगीतून भात उसपताना दोन चार मापटी उसपून पोत्यात ओती पर्यंत पोतं तोंडोतोंड भरत असे नी कणगीतून उसपल्यावरही कणगीतला ...अजून वाचा
वायंगीभूत - भाग 4
पहाटे रोजच्याप्रमाणे जाग आल्यावर तो शिपणं करायला गेला. नेहेमी प्रमाणे ठराविक लाटा मारल्यावर आगरातल्या सहाही रांगा भरलेल्या असणार या तो लाट थांबवून बघायला गेला. पण आज जेमेतेम पहिली सरी भरलेली होती. त्याच्या काळजात चर्रर्र झालं...... त्याच्या लक्षात आलं की आज कनवटीला तोडगा नव्हता त्यामुळे वांगीभुताचा चेडा मदतीला आलेला नाही. माडाच्या पातीत बांधलेला तावीज कायम जवळ ठेवायचा ही अट म्हंमदने बजावून बजावून सांगितलेली होती. पात सुकण्यापुर्वी पिशवी शोधून काढणे गरजेचे होते. अगर म्हंमदची भेट घेवून पिशवी हरवल्याची गोष्ट त्याला सांगून त्यावर काहीतरी तोडगा शोधायला हवा होता. उजाडण्याची वाट न बघता बाबु तडक मणच्याला म्हंमदची भेट घ्यायला निघाला. तो म्हंमदच्या घरी ...अजून वाचा
वायंगीभूत - भाग 5
मध्यान् रात्री जोरात लघवीला लागली नी बाबुला जाग आली. उठून बसत त्याने अंदाज घेतला. अंधारात चेड्याची धूसर आकृती पोवळीबाहेर दिसत होती. तो उठून आत गेला. गर्भागृहाच्या डाव्या उजव्या अंगानी बाहेर पोवळीत जायला दरवाजे होते. चेड्याला पत्ता लागू न देता एका दाराने बाहेर पडून मागिल बाजूच्या प्रवेश द्वाराबाहेर जावून पट्कन लघवी करून यायचा त्याचा बेत होता. चेडा त्याच्या जागेवरून चाळवलेला नव्हता. बाबु खाली बसून एका बाजूच्या दारातून बाहेर पडला. पोवळीच्या भिंतीचा आडोसा असल्याने चेड्याला त्याचा पत्ता लागणेच शक्य नव्हते. बसून पुढे सरकत सरकत तो मागच्या प्रवेश द्वारा बाहेर पडला नी चार पावले बाजुला ...अजून वाचा
वायंगीभूत - भाग 6
दोन तीन वेळा हाका मारल्यावर राखण्यानी बाबुचे शब्द ऐकले. उंच डेळक्यात बसलेल्या शरपंजरी बाबुला त्यातल्या एकाने ओळखले. "अरे ह्यो म्हाजन....... धा पंदरा रोजामागे खंय नायसो झालो म्हणाहुते ल्वॉक....." दोन रुखाडी पोर वर चढले नी त्यानी थावरीत थावरीत बाबुला खाली उतरला. त्याला तहान लागलेली होती . पोरानी त्याला पाणी पाजल्यावर बाबूला जरा हुषारी वाटली. पोरानी भाकरी खावून झाल्यावर त्याला बकोट धरून हळू हळू चालवीत मोंडे वाडीत नेवून सोडला. तिथे भगत मोंड्याच्या ओसरीवर तो टेकला. पाणी पिवून सावध झाल्यावरतो म्हणला, “ दोन देवस झाले...पोटात अन्नचो कण गेलेलो नाय...... माका गोळोभर भात वाडा.” मग घरणीने त्याला पत्रावळीवर बचकाभर ...अजून वाचा