मी एक नवीन विनोदी कथा मालिका लिहित आहे ज्यात प्रत्येक भाग पूर्णपणे वेगळा आणि नवीन असेल. फक्त वाचून थांबू नका. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की कळवा! तुमच्या मजेशीर आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मला अजून धमाल कथा लिहिण्यात मदत करतील. चला, हसण्याची आणि मजा करण्याची तयारी करा!
फजिती एक्सप्रेस - भाग 1
"यातले पहिल्या कथेचे काही भाग 18+, ठसठशीत नॉनव्हेज विनोदांनी आणि भरपूर फजितीने भरलेला आहे, त्यामुळे हसून हसून पोट दुखेल!" मी नवीन विनोदी कथा मालिका लिहित आहे ज्यात प्रत्येक भाग पूर्णपणे वेगळा आणि नवीन असेल. फक्त वाचून थांबू नका. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की कळवा! तुमच्या मजेशीर आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मला अजून धमाल कथा लिहिण्यात मदत करतील. चला, हसण्याची आणि मजा करण्याची तयारी करा!© 2025 अक्षय वरक. फजिती एक्सप्रेस ही कथा मालमत्ता माझी आहे. कोणत्याही प्रकारे पुनर्प्रकाशन किंवा व्यावसायिक वापरासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.___________________________________कथा क्र.०१"भुतांचा Reels आणि नंदूच्या Deals"ही विन ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 2
कथा क्र. १: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग २ : नथुचा भूतमय फॅन मिटपुण्यात परत आल्यावर सकाळची माझी दिनचर्या बदलून गेली होती. आधी मी डोळे उघडताच चहा किंवा कॉफीचा विचार करायचो, पण आता पहिलं काम म्हणजे फोन हाती घेऊन @Konkan_ghosts_with_jokes ची नोटिफिकेशन्स तपासणं. मोबाईल हातात घेताच टिंग-टिंग-टिंग! असा आवाज यायचा, आणि स्क्रीनवर एकाहून एक भन्नाट कमेंट्स चमकायला लागायच्या. कुणी लिहिलंय – “भाई, तुमच्या डोळ्यांचा स्पार्क इतका भयानक आहे की लाइट बिल वाचेल!”, तर दुसरा म्हणायचा – “भूत असूनही तुमचा sense of humour भन्नाट आहे! Alive असताना इतका कधी हसलो नव्हतो!” काही तर अगदी वेगळेच प्रश्न विचारायचे – “भाई, तुम्ही ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 3
कथा क्र.१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग ३: भुतांचा live लफडा ●सूचना आणि संदेशही कथा 18+ स्वरूपाची आहे. यात काही ठिकाणी शब्द किंवा प्रसंग जरा जास्त झाले असतील तर आधीच माफ करा. उद्देश फक्त आणि फक्त विनोद हाच आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही.ही आहे फजिती एक्सप्रेस मालिकेतील पहिली विनोदी कथा."भुतांच्या reels आणि नंदूच्या deals".हा भाग ३ आहे पण कथा लांबवली गेली आहे त्यामुळे भाग ३ दोन टप्प्यांत तुमच्यासमोर ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 4
कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deels"भाग ३: भुतांचा live लफडा (०२) ◆"हा भाग सुद्धा 18+, ठसठशीत नॉनव्हेज विनोदांनी आणि भरपूर फजितीने भरलेला आहे, त्यामुळे हसून हसून पोट दुखेल!"__________________________________भाग ३ सुरू झाला. ‘Confession Booth’स्टेजच्या एका कोपऱ्यात काळा, जाडसर पडदा टाकलेला होता. वर मोठ्या पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं. "Confession Booth – आत्म्याचं मन मोकळं करा… आणि अजून गचपच करा!"पडद्यामागे फक्त एक माईक आणि छोटा गोल स्टूल ठेवलेला, ज्यावर भुतं ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 5
कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग ४ नथु पिशाच्चचा आणि लुसिंडा व नागीण भूतनीचा हनिमून कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला, पण हात इतके थरथरत होते की झूमच्या जागी मी ISO बदललं.आजचा LIVE साधा नव्हता. नथू पिशाच्चचा हनिमून लुसिंडा आणि नागीण-भुतणीसोबत होता.स्टेजवर धूर पसरलेला, लाल-जांभळ्या लाईट्सचा मिक्स, आणि बेडच्या मागे मोठा बोर्ड लावला होता;“Haunted Honeymoon – Death Till Orgasm”LIVE चॅटमध्ये लगेच वादळ आलं —“हे नाव ठेवणारा माणूसच भूत असणार!”“नथू भावा, ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 6
कथा क्र.०१:"भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"अंतिम भाग ५: नथुचा शोध... काल रात्री नथू हवस राक्षसाच्या हाती लागला आणि माझं डोकंच फिरलं.रात्रीपासून मेंदू असा सुतकाच्या मिरवणुकीतल्या ढोलासारखा वाजत होता. झोप लागत नव्हती. डोळे मिटले की नथू धुक्यात ओढला जाताना दिसायचा आणि हवस राक्षस मागून हसत “आमचं पॅकेज फॅमिली फ्रेंडली नाही” म्हणायचा.पहाटे कोंबड्यानं आरवलं, आणि मी उठलो तो काय… गोधडी फेकून अंगावरचं अंगरखं अर्धवट लटकलेलं, डोक्यावर केस झुपकेदार, जणू गावच्या बायकांच्या ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 7
कथा क्र.०२ : बायकोचा वाढदिवस"केकवर 'SORRY', पण टॅगवर STORY!" **नमस्कार मंडळी,मी रमेश सखाराम पाटील – नवरा नं. ११७५४५८९.आम्हा नवऱ्यांचा एक गुप्त गट आहे.आमचं सगळ्यात मोठं आयुष्याचं संकट असतं – 'बायकोच्या अपेक्षा' आणि त्यातलं सगळ्यात खतरनाक संकट – वाढदिवस विसरणं!आणि हो...मी… त्या दिवशी… तोच गुन्हा केला.* ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 8
कथा क्र.०३: दोन मित्रांची धमालशेंदूरवाडी हे गाव तसं खूपच शांत, साधं आणि सर्वसामान्य गाव. इथले लोक आपापल्या कामात गुंतलेले, काही फार घडतही नसे. पण गावात दोन मात्र असे जीव होते, ज्यांनी ही शांतता गढूळ करायची शपथ घेतली होती. त्यांची नावं होती – गप्या आणि बंड्या.गप्या म्हणजे एकदम लटपटीया. अंगाने बारीक, पण डोकं मात्र भन्नाट चालायचं. गावातल्या कुठल्याही माणसाचा आवाज, चलनवलन तो हुबेहूब नक्कल करून दाखवायचा. तर बंड्या होता थोडा धीट, थोडा गबाळा, आणि कायम ‘काय वेगळं करता येईल’ या विचारात गुरफटलेला.या दोघांची मैत्री म्हणजे गावातल्या बाकीच्यांसाठी एक प्रकारचा धसका होता. एकत्र आले की त्यांचं डोकं फारच भन्नाट योजनेत घुसायचं, ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 9
कथा क्र.०४: तुझ्यात जीव रंगला-परत दे माझा मला कॉपीराइट सूचना:"फजिती एक्सप्रेस" या विनोदी कथा मालिकेचे सर्व हक्क लेखक अक्षय यांच्याकडे राखीव आहेत.ही कथामालिका, त्यातील संकल्पना, पात्रं, प्रसंग किंवा कोणताही भाग लेखकाच्या स्पष्ट परवानगीशिवाय प्रत, रूपांतरण, अनुवाद किंवा इतर कोणत्याही स्वरूपात वापरणे, प्रकाशित करणे, किंवा कुठेही शेअर करणे कायदेशीर गुन्हा ठरेल.कृपया लेखकाचा सन्मान करा.______________________________फेसबुक रिक्वेस्टपासून सुरू झालेलं प्रेम, कविता साळुंखेंच्या साखरपुड्यावर येऊन संपतं – आणि मग उरतो फक्त कटिंग चहा आणि प्रेमाचे शिकलेले धडे!___________________________________माझं नाव प्रणव. माझ्याच प्रेमाचा खराटलेला अनुभव.मी साधासुधा पुणेकर – एकदम बेक्कार इमोशनल.फक्त ‘हाय’ म्हटलं तरी प्रेमात पडतो, आणि ‘बाय’ म्हटलं की डायरेक्ट Sad Songs Playlist ON ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 10
कथा क्र.०५: बायकोचा मेकअपमाझं नाव गोट्या सावळे. गावात मला कुणी नावानं नाही हाक मारत, सगळे “गोट्या फजित्या” म्हणूनच ओरडतात. माझं आयुष्य म्हणजे रोजचा नवा तमाशा, आणि त्यातली मुख्य नायिका म्हणजे माझी बायको. माझ्या घरातली कायमची नाटक कंपनी.आता ही बाई नेहमी एकच गप्पा मारते —“मी अजूनही कॉलेज मुलगी दिसते हो!”मी लगेच उडवतो —“अगं, कॉलेजचं नाही, तू आता गावच्या शाळेचं playground दिसतेस."ते ऐकताच ती डोळे वटारते, कमरेवर हात ठेवते आणि full heroइन मोडमध्ये म्हणते —“तुला काय कळतं? शिल्पा शेट्टी बघ, दोन मुलं असूनही धडधाकट झकास दिसते!”मी हळू आवाजात पुटपुटलो —“हो गं, पण तिचा नवरा राज कुंद्रा आहे…आणि माझा प्रकार राज कुंडकर ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 11
कथा क्र.०६: मैत्रीचा कॉन्ट्रॅक्टगावातल्या त्या चहा टपरीवर पांड्या आणि भिक्या रोज हजेरी लावायचे. टपरीवाल्याने त्यांच्यासाठी खास बाकडी राखून ठेवली गावकऱ्यांना माहीत होतं,सकाळी पहिल्या “किटलीच्या शिट्टी”सोबतच हे दोघं येणार, आणि मग सुरू होणार गावभरातली पहिली आणि शेवटची “लोकसभा”.दोघांची मैत्री एवढी घट्ट होती की गावातल्या बायकाही थट्टा करत म्हणायच्या –“देवा, यांचं लग्न झालं असतं तर आज गावातल्या सगळ्या भांड्यांचा वाटा झाला असता!”एखादी चतुर बाई त्यावर ऑडिशन करायची –“आणि घटस्फोट झाला असता तर कोर्टातली वकिलीही बंद पडली असती, रोजचा गोंधळ बघून न्यायाधीशानेही निवृत्ती मागितली असती!”अशी ही गोड-तिखट जोडी त्या दिवशी मात्र भांडणावर आली. कारण?गावचे पाटील त्यांच्या लग्नात मोठ्ठं जेवण होतं. भात-भाजी, आमटी, ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 12
कथा क्र.०७: पोटशुद्धी खाणावळगावाच्या चौकात रोजचं दृश्य म्हणजे भाजीवाल्याभोवती गप्पांची मैफल. कोणत्या वांगीला किडे पडले, कोणता टोमॅटो लाल झाला, कोणाच्या घरातल्या बायकोने परवा किती तिखट घातलं, हे सगळं तिथंच ठरत असे. पण त्या सकाळी मात्र चौकात वेगळंच चित्र होतं. भाजीवाल्याच्या टोपल्या रिकाम्या पडल्या होत्या, लोकांनी त्याच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. सगळा जमाव जमला होता एका नवीन फलकासमोर.तो फलक अगदी डोळ्यात भरणारा,जाडजूड अक्षरं,आणि चमचमतं रंगकाम केलेला होता. त्यावर लिहिलं होतं – “पोटशुद्धी खानावळ – जेवल्यावर पश्चात्ताप हमखास!” (संस्थापक: भोंद्या कडूळकर – पोटाचा उद्धारकर्ता)हे वाचून लोकं अक्षरशः पोट धरून लोळू लागले. कुणी म्हणालं, “हे खानावळ आहे की दवाखाना? नाव तर अगदी औषधाच्या ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 13
कथा क्र.०८: गावठी स्पायडरमॅन-फटफट्या जंगलेगडबडपूर गावाचं काय वर्णन करावं! इथं रोज काही ना काही भलतंच घडत असायचं. जत्रेला बैल ठेवले की तेच धावत सुटून उसाच्या रसाच्या गाडीत शिरायचे. लग्नात वाजेवाल्यांना “मंगलाष्टक” वाजवायला सांगितलं की ते उलट “झिंगाट” लावून वरातीला नाचायला लावायचे. आणि शाळेत मास्टर गणित शिकवत बसले की स्वतःचं उत्तर चुकवून पोरांनाच विचारायचे –“ए रे, दोन दोन चौकटीत किती होतं? मला नीट दिसत नाही!”चौकातल्या पाटीवर गावाचं बोधवाक्यसुद्धा लिहिलं होतं – “गडबड हाच आमचा बाणा!”अशा या गोंधळमय वातावरणात गावातला सगळ्यात मोठा गोंधळ मात्र एकच – फटफट्या जंगले.हा असा प्रकारचा माणूस होता की पाय आपटून चालला तरी घरं हलायची, आणि कुठे ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 14
कथा क्र.०९: गडबडखेडचा व्हायरल व्हिडीओगावाचं नाव होतं गडबडखेड. नावाप्रमाणेच तिथे गडबड नसेल तर लोकांचं जेवणच उतरत नसे.एखाद्या दिवशी बैलगाडीत ऐटीत बसून आराम करत आणि बिचारा मालक गाडी ओढत असे. गावकरी हसत म्हणायचे – “अहो, इथे माणूस बैल झाला आणि बैल माणूस!”शाळेत मास्टर इतका गडबड्या की विद्यार्थ्यांना गणित शिकवताना स्वतःचं नाव चुकीचं लिहायचा. एकदा तर खडूने फळ्यावर मोठ्ठं लिहिलं – “मीच चुकीचा आहे.” त्या दिवशी पोरं टाळ्या वाजवत वर्ग सुटल्यासारखे हसत पळाली.ग्रामसभा तर कायमच विनोदी होती. विषय काहीही असो – पाण्याचा, रस्त्याचा, शेतीचा – शेवटी ग्रामसभेचा शेवट एकाच वाक्यात व्हायचा – “चल, आता भांडण सुरू करूया!”गडबडखेडचा सरपंच होता गबाळू गोटाळकर. ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 15
कथा क्र.१०: रात्रीचा खेळ- भेळवाडीची धमालभेळवाडी गावाचं काय सांगावं! ह्या गावाचं नाव ऐकून तर बाहेरच्या लोकांना वाटतं, “काही शांतसर असेल, कुणाला त्रास नको,” तर त्यांचा मूळ हेतू चांगलाच फेल होतो. कारण इथे दिवसा लोक शेतात घाम गाळत असतात, मिरची पेरतात, गहू उचलतात, म्हणजे साधं आयुष्य. पण रात्री? रात्री गावातील गल्लीबोळं इतके गोंधळलेले असतात की, तुम्ही विचाराल, “हे गाव आहे की कुणी लास वेगास आणि पुण्याचा शनिवारवाडा मिक्स करून बनवलेलं लँडस्केप आहे का?”या सगळ्या कोलाहलाचं राज्याभिषेक होतं राणी काळे या महाशक्तीने. राणी काळे – नावाचं म्हणायला पण लोक थरथर कापतात. दिवसा ती शेतात मिरच्या काढते, पिकांची काळजी घेते, पण रात्री ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 16
कथा क्र.११भाग १ : प्रेमाचा धक्का - बंड्याची फजिती फजिती एक्सप्रेस – प्रेमाचा धक्का ही कथा तीन भागांत सादर केली जाणार आहे. काही भाग 18+, खुसखुशीत, विनोदी आणि मसालेदार आहेत. प्रेम, फजिती, जवळीक आणि हास्याचा धमाका यामध्ये आहे. गावातल्या चौकात ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 17
कथा क्र.११: प्रेमाचा धक्का - बंड्याची फजितीभाग २: ती हो बोलते त्या दिवशी बंड्या सकाळी उठला, आणि त्याच्या चेहऱ्यावर तो “आज काहीतरी धमाका होणार” असा भाव होता. सर्व प्रथम त्याने अंगावर Fog फवारलं – इतकं की जणू चौकातल्या लोकांना लगेच “हाय, आज बंड्याचा वास आलेला आहे” असं वाटावं. काही लोक माकडाच्या ढिगाऱ्यासारखे पळत गेले, पण बंड्याला काही फरक पडत नव्हता.त्यानंतर डोक्यावर जेल लावून केस उभे केले. जणू एखाद्या सुपरहीरोसारखा तयारी करत आहे. ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 18
कथा क्र.११: प्रेमाचा धक्का - बंड्याची फजितीभाग ३: सेक्स आणि फजिती त्या दिवशी बंड्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता "आज सोनालीला मी माझं करूनच सोडणार!"तो विचार इतक्या जोरात त्याच्या डोक्यात बसला होता की गावातल्या देवळाची घंटा वाजली तरी त्याला आवाजच ऐकू येत नव्हता.रात्र झाली. खोलीत मंद दिवा लुकलुकत होता. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येऊन जणू "बंड्या, आज तुझी लॉटरी लागणार" असंच सांगत होता. बेडवर गुलाबी चादर टाकलेली, पण ती चादर बघून बंड्याच्या ...अजून वाचा
फजिती एक्सप्रेस - भाग 19
कथा क्र. १२: नाम्याची मिसळगावात नाम्याचं नाव घेतलं की लोकांच्या तोंडात हसू फुटायचंच. "फजिती" हा शब्दच त्याच्या नावासोबत जोडला होता. जसं कुणी गोडबोले म्हटलं की "गोड बोलतो", तसं कुणी "नाम्या" म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर फजितीचा सिनेमा सुरू व्हायचा. कुठं गेला तरी त्याची काहीतरी गडबड व्हायचीच. पार हे असं होतं की सूर्य पश्चिमेला उगवला तरी चालेल, पण नाम्या कुठंही गेला आणि तिथं काही बिनसलं नाही. असं कधीच होणार नाही.त्यादिवशी सकाळी नाम्याने उठून डोळे चोळले, अंग टाकलं, आणि अचानक विचार केला."आज काहीतरी भारी खायचंय... रोजचं रोज पोहे-उपमा खाऊन जिवाला कंटाळा आलाय. चला, आज मस्त झणझणीत मिसळ खायचीच!"हे जणू त्याच्या मेंदूला वीजेचं ...अजून वाचा