चित्राचा अपघात. सकाळचे ११ वाजले असतील. शरद च्या ऑफिस मध्ये कामाला सुरवात होऊन आता फूल swing मध्ये चालू होतं. शरद परचेस ऑफिसर होता आणि रोजच्या रिपोर्टिंगची सकाळच्या मीटिंगची तयारी सुरू होती. अशातच त्याचा मोबाइल वाजला. सकाळच्या घाईच्या वेळेला कोण फोन करतय म्हणून कापाळाला आठ्या घालत फोन उचलला. फोन वर “ चित्रा ” अस लिहून आलं होतं. आत्ता हिला काय झालं सकाळी सकाळी? बायको नावाच्या प्राण्यांचं काही खरं नाही. अस पुटपुटतच फोन उचलला. “काय ग? मी जाम बिझी आहे. काय आहे ते पटकन सांग. पाल्हाळ लावू नकोस.” – शरद. “साहेब मी पोलिस कॉनस्टेबल शीतोळे बोलतोय. या बाईंना अपघात झाला आहे आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो आहोत. तुमचं यांच्याशी काय नातं आहे?” – पोलिस “माझी बायको आहे.” – शरद. “मग ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचा. मॅटर सिरियस आहे.” – पोलिस.
Full Novel
बायको झाली पारी भाग १
भाग १ चित्राचा अपघात. सकाळचे ११ वाजले असतील. शरद च्या ऑफिस मध्ये कामाला सुरवात होऊन आता फूल swing मध्ये होतं. शरद परचेस ऑफिसर होता आणि रोजच्या रिपोर्टिंगची सकाळच्या मीटिंगची तयारी सुरू होती. अशातच त्याचा मोबाइल वाजला. सकाळच्या घाईच्या वेळेला कोण फोन करतय म्हणून कापाळाला आठ्या घालत फोन उचलला. फोन वर “ चित्रा ” अस लिहून आलं होतं. आत्ता हिला काय झालं सकाळी सकाळी? बायको नावाच्या प्राण्यांचं काही खरं नाही. अस पुटपुटतच फोन उचलला. “काय ग? मी जाम बिझी आहे. काय आहे ते पटकन सांग. पाल्हाळ लावू नकोस.” – शरद. “साहेब मी पोलिस कॉनस्टेबल शीतोळे बोलतोय. या बाईंना अपघात ...अजून वाचा
बायको झाली परी भाग २
भाग २ बायको झाली परी. शरदनी डोळे उघडले आणि चित्राला बघितलं आणि पुन्हा भूत भूत करत बेशुद्ध झाला. पांच डोळे उघडले पुन्हा चित्रा समोर. त्याला कळेना की हे काय चाललंय, आज पर्यन्त तो भूता खेता च्या नुसत्या गोष्टीच ऐकत होता, पण आता प्रत्यक्ष चित्राचं भूतच समोर बसलेलं. काय करांव? “अरे, मी चित्रा आहे, तुझी बायको, भूत भूत काय करतो आहेस?” – चित्रा आता मात्र शरद सॉलिड गोंधळला. त्याला समजेना की गेले काही दिवस जे चाललं होतं ते स्वप्न की आता घडतंय ते स्वप्न? जर हे स्वप्न नसेल तर चित्राचा मृत्यू झालाच नाही. या विचाराने एकदम त्यांचा चेहरा फुलला आणि ...अजून वाचा
बायको झाली परी भाग ३
भाग ३ शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं. आता घरी वाट पाहणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे घरी जाण्याचा काही प्रश्न नव्हता. शरदने कामात स्वत:ला झोकून दिलं. शरदने व्हेंडर डेव्हलपमेंट मध्ये इतका रिसर्च केला आणि त्यानुसार नवीन व्हेंडर शोधले. कंपनीचा त्यामुळे भरपूर पैसा वाचला. त्याच्या कामावर खुश होऊन त्याला नाशिक च्या फॅक्टरी मध्ये परचेस मॅनेजर असं प्रमोशन देऊन नाशिकला पाठवलं. शरदची नाशिकला ट्रान्सफर होऊन आता चार महीने झाले होते. इतकी वर्ष त्याला मुंबईला ऑफिस मधे कामाची सवय होती पण आता तो फॅक्टरी मधे परचेस मॅनेजर होता. फॅक्टरीची संस्कृति जरा वेगळी असते. पण आता चार महिन्यात तो सरावला ...अजून वाचा
बायको झाली परी भाग ४
भाग ४ योगायोग अचानक भेटींचा. “तुमच्या बरोबर बाइक वरुन? पाऊस किती पडतो आहे बघितलं का? बाइक वर भिजणार नाही का?” – क्षिप्रा. शरद हिरमुसला झाला. एक चान्स वाया गेला. पावसाला सुद्धा आत्ताच पडायचं होतं. “हां हे माझ्या लक्षातच आलं नाही. ओके तुम्ही बसने जाणंच बरोबर आहे. ओके देन बाय.” आणि त्याने बाइक चालू केली. – शरद. “एक मिनिट, तुम्ही रेन कोट वापरत नाही का? पार भिजून गेला आहात. बायको चीड चीड करणार घरी गेल्यावर.” – क्षिप्रा. “ती असती तर नक्कीच चिडली असती. पण आता ती या जगात नाहीये. त्यामुळे त्या आघाडीवर शांतता आहे.” – शरद. क्षिप्राचा चेहरा ...अजून वाचा
बायको झाली परी भाग ५ (अंतिम भाग)
भाग ५ मिशन कंप्लीट लोकांनी शरदला उठवलं.पॅन्ट एका पायावर फाटली होती, आणि शर्ट बाही वर फाटला होता. पायाला आणि चांगलंच खरचटलं होतं आणि थोडं थोडं रक्त वाहत होतं. लोकांनी त्याला चालवत बसस्टॉप वर नेऊन बसवलं. एकाने त्यांची बाइक रस्त्याच्या कडेला लावली. “अरे बापरे, तुम्हाला तर बरंच लागलं आहे. लगेच डॉक्टर कडे जायला पाहिजे.” – क्षिप्रा. शरदने पायाची आणि हाताची जखम पाहिली, आणि म्हणाला, “नाही काही खास नाहीये. थोडं खरचटलं आहे इतकंच. गाडी हळू होती म्हणून जास्त लागलं नाही. तुम्ही काळजी करू नका.” – शरद. इतक्यात बस आली आणि शरदला फारसं लागलेलं नाही हे बघून, बाकी सर्व लोकं बस मधून ...अजून वाचा