घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरून शेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..
पुनर्मिलन - भाग 1
घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकलीआणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरूनशेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..नयनाच्या हातात पुस्तक होते ,ते घेऊनच ती खुर्चीवर बसली .पुस्तकात बघत बघत ती खात होती .“नयन काय ग हे तुझे वागणे ?किती वेळा सांगितले जेवताना वाचत ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 2
ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने ऊमाच्या दुकानातल्या पदार्थांना लोकांची पसंती असेतिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई होतीअर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच त्यात …बसची घंटा वाजली आणि ऊमा चटकन भानावर आली .तिचा स्टॉप आला होता .ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली.दुकानाजवळ पोचताच तिने कुलूप काढून दुकानाचे शटर उघडले .तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या त्या दुकानातील नोकर राजू आला.झाडू घेऊन झाडणाऱ्या ऊमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे झाला .“मावशी इकडे आण तो झाडू ..मी झाडतो .असे म्हणत त्याने ऊमाच्या हातुन झाडू काढुन घेतला आणि तो स्वतः झाडू लागला .झाडताना त्याने विचारले ,मावशी आज सुजाता ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 3
दुकानातून निघून जाताना राजू दुकानातला कचरा आणि दुधाच्या वापरलेल्या पिशव्या कचऱ्यात टाकायला घेऊन गेला .आता लाडू ,वड्या, चिवडा असे कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते .पण खरी मोठी ऑर्डर आता एक वाजता असायची .रोज एक वाजता जवळच्या एका शाळेतले सात आठ शिक्षक लोक गरम थालीपीठ खायला येत असत ,सोबत काही लाडू ,वडी सुद्धा खात .नंतर चहा तर असेच...ठरलेला रोजचाच नेम होता त्यांचा तो .आता बारापर्यंत सुजाता येणारच होती .तत्पूर्वी हळूहळू किरकोळ कामे ऊमा आटोपत राहिली .कांदा कोथिंबीर चिरणे वगैरे थालीपीठाची तयारी करीत राहिली .थोड्याच वेळात सुजाता आली ..आणि परत दोघी मिळुन कामात गर्क होऊन गेल्यायानंतर सहा कधी ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 4
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ऊमाला नेहेमीप्रमाणे जाग आली .शेजारी नयना गाढ झोपली होती झोपेत तिच्या अंगावरचे पांधरूण सरकले .ते हाताने सारखे करीत ऊमा हळूच उठली .आणि आतल्या खोलीत जाऊन तिने मधले दार बंद करून घेतले .आज तिला बेसन लाडू आणि चिवडा करायचा होता .जसे जसे दुकानातले पदार्थ संपतील तसे ती थोड्या प्रमाणात आणि ताजेच तयार करीत असे .त्यामुळे पदार्थांची चव टिकून रहात असे .तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि त्यानंतर आंघोळीला गेली .आंघोळ झाल्यावर तिने एकीकडे चिवड्याची तयारी करीतलाडूसाठी मोठ्या पातेल्यात बेसन भाजायला घेतले .बेसन भाजून झाल्यावर ते एका मोठ्या परातीत गार करीत ठेवलेआणि दुसरीकडे दुसऱ्या एका मोठ्या ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 5
नयनाला मात्र काही कमी पडू नये इकडे तिचा कटाक्ष असे .मनातले विचार बाजूला ठेवून ऊमाने नाश्त्यासाठी पोहे करायला घेतले डिशमध्ये तिने नयनाला एक लाडू पण वाढला .“आई तु पण घे न एक लाडू ,कसला मस्त झालाय असे नयनाने म्हणल्यावर“नको ग सारखे ते पदार्थ करून माझी तर खायची इच्छाच मरते बघ.असे म्हणून ऊमाने पोहे खायला सुरवात केली .खाऊन झाल्यावर नयना बाहेरच्या खोलीत गेली .तिच्या मैत्रिणीचा फोन होता त्यावर तिचे बोलणे चालू होते .ऊमाने पण सगळा आतला पसारा आवरला .थंड झालेला लाडू चिवडा डब्यातून भरून ठेवला .आणि बाहेर येऊन पेपर चाळत बसली .थोड्या वेळाने “आज जेवायला काय करू ग नयन ?असे ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 6
सतीश अनाथ आश्रमातच लहानपणापासुन वाढला होता .त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते .त्यानंतर एकदोन प्रयत्नात सरकारी नोकरी पण मिळाली .पगार चांगला होता .त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर..थोडे पैसे शिल्लक टाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते .त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते.म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती .आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता .त्याने गावातच ऊमाला कधीतरी पाहिले होते .तिच्या लग्नाचे चालू आहे असेही ऐकले होते .साधीसुधी पण आकर्षक दिसणारी ऊमा त्याला आवडली होती .म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो आपलेच स्थळ घेऊन आला होता .त्या दिवशी संध्याकाळी ऊमा घरी आल्यावर काकांनी ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 7
पुढचा आठवडा खूप गडबडीत गेला .सतीशने काकूंना साडी आणि काकांना कपडे घेतले .ऊमाला चार साड्या ,एक छोटे मंगळसूत्र आणि बांगड्या घेतल्या .सध्या हे लहान मंगळसूत्र चालवून घे ,हळूहळू तुला आणखी दागिने करीन .असेही त्याने ऊमाला सांगितले .ऊमा खुष होती ,सतीशच्या अशा बोलण्याने ती आणखीन आनंदी झाली .अखेर हे लग्न पार पडले .सतीशचा ऑफिसमधला मित्र मोहन, रमाच्या वाड्यातील चार पाच माणसे इतकेच लोक उपस्थित होते लग्नाला .लग्नानंतर सतीशचे दोन खोल्याचे चांगले सजवलेले घर पाहून ऊमाला खुपच आनंद झाला.सतीशला थोडीच रजा मंजूर झाली होती म्हणूनलगेच दुसऱ्या दिवशी ऊमा आणि सतीश हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले .चार दिवस चांगल्या हॉटेलमध्ये त्याने बुकिंग केले होते ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 8
तुला माहित आहे मी खरे म्हणजे मी कधी हॉटेलमध्ये जात नाहीपण तुझ्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये नक्की येणार बर का....!!”तिच्याकडे बघून मिचकावत बोलणाऱ्या ऊमाकडे बघताच ..नयनाने खूष होऊन आईचा गालगुच्चा घेतला.“आणि नयन मोह्नमामाला पण फोन कर बर का आधीच ..तो तर येतोच दर वर्षी तुझ्या वाढदिवसाला ,त्याला आमंत्रण देऊन ठेव .”..आईचे बोलणे ऐकताच नयन हसली ..“आमचे फोन तर आधीच झालेत आई ..येणार आहे तो नेहेमीप्रमाणेचमला गिफ्ट काय हवे हे सुद्धा त्याने विचारून ठेवलेय मला ..”असे म्हणून खुष होऊन कपडे बदलायला आत गेली .गेली दहा वर्षे मोहन नियमित नयनाच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन येत असे .कित्येक वर्षाचे त्या दोघींच्या सोबत असलेले ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 9
ऊमाच्यापुनर्मिलन भाग ९ऊमाच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्यावर काका स्वतः घरी येऊन तिला घेऊन गेले .ऊमाच्या अशा अवघडल्या अवस्थेत तिला गरज आहे .तिला स्वतःच्या घरी कामाच्या व्यापामुळे आणि नोकरीमुळे तिला आराम मिळणार नाही .अशा विचाराने काकूने स्वतः काकांना पाठवले होते ऊमाला घेऊन यायलात्यावेळेस मात्र सतीशने सज्जनपणाचा“बुरखा” घेतला होता .आणि अगदी नाईलाजाने तिला माहेरी जायला परवानगी देत आहे ..त्याला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही असे दाखवले .काकांची खरेतर ऊमाच्या बाळंतपणाचा खर्च करायची ऐपत नव्हतीपण ऊमाचे पहिले बाळंतपण आपल्याकडे करायची त्या दोघांना हौस मात्र होती.काकांच्या सोबत ऊमा आपले जुजबी सामान घेऊन काकांच्या घरी राहायला गेली .तिथूनच ती नोकरीला जायला लागली .सतीश दिवसाआड तिची ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 10
त्यातल्या त्यात एक गोष्ट ऊमाला बरी वाटायचीती म्हणजे त्यांच्या घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारासतीशचा आरडाओरडा आणि कुणाला कळायचा प्रश्न नव्हता .आता ऊमाने ठरवले ऑफिसला जायला सुरवात करायचीकाकूने पण तिच्या ऑफिसच्या वेळात नयनाला संभाळायची जबाबदारी घेतलीआणि ऊमाचे ऑफिस रुटीन सुरु झालेअजुन तरी ऊमाने काका काकुना याची काहीच कल्पना दिली नव्हतीसतीश कधी घरी यायचा कधी नाहीहे घडणारे सगळे कमी पडले म्हणून की काय...एक दिवस एक वृध्द गृहस्थ संध्याकाळी दारात उभे राहिलेले दिसले .ऊमा नुकतीच ऑफिसमधून आली होती .येताना काकूकडून नयनाला घेऊन आल्यामुळेकडेवर नयना आणि हातात पिशवी आणि पर्स होती .नयनाला आधी खाली उतरवूनतिने पर्समधून किल्ली काढून घराचे कुलूप ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 11
त्या रात्री सतीश परतलाच नाहीआता परत तो दारू ढोसून येतो आहे की काय असे ऊमाला वाटलेत्या रात्री ऊमा न सतीशची वाट पहात राहिली होती ..पण सतीश आलाच नाही.सकाळी उठल्यावर तिने आधी स्वतःचे आणि नयनाचे आवरून घेतले .तिचे डोळे खरेतर सतीशच्या येण्याकडे लागले होते .पण तिची निराशा झाली ..अखेर ती घराला कुलुप लावून नयनाला घेऊन बाहेर पडलीनयनाला नेहेमीसारखे काकुकडे सोडले .बहुतेक वेळेस नयनाला काकुकडे सतीश सोडत असे .त्यामुळे काकूने विचारले सतीश कसा आला नाही असे ..ऊमाने काहीतरी थातूर मातुर सांगून वेळ भागवली आणि ती तेथून बाहेर पडली .काका काकूंना सतीशबद्दल हे काही सांगण्यात काहीच अर्थ नव्हता .मग तिने तिच्या ऑफिसमध्ये ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 12
जवळची शिल्लक तर सगळीच संपली होती .पुढे काय करायचे हे ठरवायला तिने ऑफिसमध्ये अर्ज देवून रजा वाढवून घेतली .तिचा व्हायला अजुन पंधरा दिवस होते .आता या आकस्मिक खर्चासाठी तिला मैत्रिणीकडून थोडे पैसे उसने घ्यायला लागले .पैशाची अडचण आता कशी भागवायची असा विचार करताना .तिच्या लक्षात आले आपल्या हातात चार बांगड्या आहेतत्या गहाण ठेवून थोडे पैसे उभे करता येतील .संध्याकाळी ती काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पडली आणि सोनाराकडे गेली .हातातल्या बांगड्या गहाण ठेवण्यासाठी तिने सोनाराला दाखवल्या .त्या हातात घेताक्षणी सोनाराने स्पष्ट सांगितले की ह्या खोट्या आहेत .हे ऐकुन ती थक्कच झाली ,शंका आल्यामुळे तिने मंगळसूत्र पण दाखवुन घेतले .तिच्या ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 13
मोहनने असे विचारल्यावर ऊमा म्हणाली“मोहन मी सतीशला शोधायला ऑफिसमध्ये येत होते ,पण तुम्ही सगळे घरी का आला आहात ?असे मोहनला विचारल्यावरमोहन म्हणाला,”वहिनी ऑफिसमधले काही व्यवहारांचे पैसे काल साहेबांनी सतीशकडे दिले होते .साहेबांनी ते पैसे ताबडतोब त्याला बँकेत भरायला सांगितले होते .मात्र काल ते पैसे बँकेत जमा झालेलेच नव्हते आणिसतीश पण जो काल बाहेर गेला पैसे भरायला तो परत ऑफिसला आलाच नाहीत्याचा फोनही बंद येत होताम्हणून आम्ही त्याला शोधायला घरी आलो होतो .ही रक्कम थोडीथोडकी नव्हती ,दोन लाखाच्या आसपास होती.हे ऐकून ऊमाला काय बोलावेसतीश बेपत्ता होता आणि ऊमाला पण तो कुठे गेलाय हेच माहित नव्हते .त्यामुळे सतीश परत आला की ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 14
स्वतःला दोष देताना....काकांना ह्या स्थळाची नीट चौकशी न केल्याबद्दल अतिशय वाईट वाटत होते .ऊमाच्या आईवडीलांच्या माघारी तिचे कल्याण करण्याऐवजीत्यांच्या तिच्या आयुष्याचे नुकसान घडले होते.काय उत्तर देणार होते ते तिच्या स्वर्गीय मातापित्यांना ..?असे ते सारखे सारखे बोलू लागले .आता तर काकुंसोबत काकांच्या पण डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .ऊमाने कसेतरी दोघांना शांत केले .ती म्हणाली ,“काका यात तुमची काहीच चुक नाही..दोष असेल तर हा माझ्या नशिबाचा आहे .तुम्ही तर नेहेमी माझ्या भल्याचाच विचार केला आहे .मला आपल्या मुलीसारखे वाढवले आहे ..असो... आता जे झाले ते झाले ...आता आपल्याला पुढला विचार करायला हवा.मग तिने काकांना मोहनने सुचवलेला पर्याय सांगितला .त्या पर्यायानुसार ती ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 15
मोहनच्या बोलण्याने आलेले डोळ्यातले पाणी पुसूनऊमाने त्या पैशातील दोन लाख रुपये मोहनच्या ताब्यात देऊनती रक्कम त्याने ऑफिस मध्ये भरावी सुचवले .पण मोहन म्हणाला,“ वहिनी मी सांगतो ते आता नीट ऐका ..हे बघा हे पैसे तुम्ही उद्या ऑफिसमध्ये येऊनस्वतःच साहेबांच्याकडे द्या आणि त्यांना सांगा कीघरीच हे मोहनने ठेवले होते .पैसे बँकेत भरण्यासाठी आणले असणारआणि नंतर कदाचित तो विसरला असावा .कपाटातले हे पैसे मी ताबडतोब ऑफिसमध्ये घेऊन आले आहे .असे जर सांगितले तर ते जास्त सयुक्तिक ठरेल.आणि सतीशचा हेतू चांगला होता याची ऑफिसमध्ये खात्री होईल .पुढच्या सर्वच दृष्टीने हे योग्य ठरेल “मोहनच्या बोलण्यात दूरदर्शीपणा होता तो ऊमाला पटला .प्लानप्रमाणे मोहन आधी ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 16
तिला असे वाटणे पण ही तर एक फक्त शंकाच होती .आणि ती माणसे कोणत्या गावची होती तेही तिला माहित .कदाचित ते गाव कोणते आहे हे तेव्हा समजले असतेतर सतीश तिकडे गेला आहे का हे तरी बघता आले असते .पण मुळात सतीश जुगारात पैसे हरल्याचीआणि त्याला धमकी द्यायला गुंड आले होते ही गोष्टतर फक्त तिलाच माहित होती.दिवस अतिशय कठीण झाले होते .असाच आणखी एक महिना कसातरी गेला .आता एकूण दोन महिने झाले होते सतीशला बेपत्ता होऊन .तरीही काहीच पत्ता लागत नव्हता .एके दिवशी संध्याकाळी ऊमा ऑफिसमधूननयनासोबत घरी परत येताच ते वृद्ध गृहस्थम्हणजे त्यांच्या घराचे मालक भाडे मागायला दारात आले .त्या ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 17
बोलता बोलता तिने विषय काढला“काका किती दिवस झाले सतीशचा काहीच पत्ता लागत नाहीय ..काय करावे समजेना झालेय “काय करावे समजत नाही असे ऊमा म्हणताच काका म्हणाले ,”होय तु त्याची बायको म्हणून तुला त्याची काळजी वाटणे साहजिक आहेपण पोरी पोलीस शोधात आहेतच की त्याच्याशोध लागला की सांगतील ना..... तु कशाला काळजी करतेस?तसे म्हटले तर बराच काळ उलटला आहे त्याला बेपत्ता होऊन .पण देवावर विश्वास ठेव ग यातून काहीतरी चांगलेच निघेल .नक्की पत्ता लागेल सतीशचा ,नको काळजी करूसआम्ही आहोतच की, आमचे घर म्हणजेतुझे माहेरच आहे हेइथे तुम्ही दोघी सुरक्षितच आहात.तसाच काही एकटेपण वाटत असेलतर नयनाला घेऊन थोडे दिवस इथे राहायला ये ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 18
व्याजाच्या पैशात कसेतरी भागत होतेतसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होतेकाकांच्या खात्यावरथोडे ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे पण होते ..काकांच्या आणि इतर सगळे पैसे त्यांच्या मृत्युनंतरऊमाने क्लेम करून मिळवले आणि काकुच्या हातात दिले होते .मला आता हे काय करायचे आहेत असे म्हणूनकाकूने ते परत ऊमाच्या ताब्यात दिले होते .या सर्व घडामोडीत मोहन भावासारखा तिच्या पाठीशी होता .सतीशचा पत्ता अजूनही लागला नव्हताच .हळूहळू पोलिसांनी ती केस बंद करून टाकलीआणि ऊमाला सतीशच्या परतीची एक आशा होतीतीही जवळ जवळ सुटून गेली.एक दीड वर्ष कसेतरी पार पडलेआणि अचानक काकुला कर्करोगाचे निदान झाले .बिचारीच्या नशिबाचे भोग अजून संपले नव्हते .तिच्या बऱ्याच तपासण्या झाल्या .नंतर केमोथेरपीचे ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 19
काकुच्या त्या संसारातले .. भांडीकुंडी आणि डबे आटोपशीर होतेते मात्र उपयोगी येतील म्हणून तिने बरोबर नेण्यासाठी बांधून ठेवलेकाकुच्या दोन साड्या आणि काकांचे दोन पायजमा शर्टस्वतःजवळ आठवण म्हणून उमाने ठेवले आणिबाकीचे त्या दोघांचे कपडे तिने वृद्धाश्रमात देऊन टाकले .उरलेले त्यांचे सर्व सामान वृद्धाश्रमात दिल्यावर ..दुपारपर्यंत ऊमाने वाड्यातील सर्वांचा निरोप घेतला .त्तीचाही लग्नापूर्वी वाड्यातील लोकांशी ऋणानुबंध होताच .त्यांना आता कायमचेच सोडून जायला लागणार होते .त्या सर्वांना सुद्धा ऊमाला निरोप देताना जड जात होते .पुढील चांगल्या आयुष्याची स्वप्ने सोबत घेऊनच ऊमा हे घर सोडत होती .त्यामुळे सर्वानीच तिला शुभेच्छा दिल्या .जन्मापासून काकुच्याच घरात वाढली असल्याने ..वाड्यात नयनाने खुप दोस्त मंडळी जोडली होती ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 20
मोहनचे बोलणे ऊमा ऐकत होतीहे खाजगी बोलणे आहे ..ते फक्त मला तुम्हालाच सांगायचे आहे “आता ऊमाला नवल वाटले ..अशी गोष्ट आहे जी इतकी खाजगी आहे ?“हो मोहन सांगा जे तुम्हाला सांगायचे आहे तेऊमा म्हणाली ,इथे माझ्याजवळ कोणीही नाहीत्यामुळे आपले संभाषण कोणालाच समजणार नाहीअगदी मोकळेपणाने बोला जे काही तुम्हाला बोलायचे आहे ते .मी ऐकते आहे लक्ष देऊन ..ऊमा ऐकते आहे म्हणल्यावर मोहनने बोलायला सुरवात केली.“वहिनी काल मला सतीशचा फोन आला होता ..”“काय ...?ऊमाच्या कानावर विश्वास बसेना ..काय सांगताय मोहन ...?सतीशचा फोन ..खरे की काय ?ऊमाने अधिरतेने विचारले ..”ऊमाला नवल वाटणे साहजिकच होते ..गोष्टच अशी घडली होती ना ...मोहन पुढे म्हणाला..“वहिनी ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 21
मोहनच्या या बोलण्यावर सतीश म्हणाला .तु मला ऊमाचा नंबर देऊन ठेवपण खरे सांगू का ..मला आता तिच्यासोबत इतक्यात नाही कबुल आहे मी तिचा दोषी आहेपण ती मला माफ करेल का हे माहित नाही मला ..त्याच्या बोलण्यावर मी त्याला म्हणालो ,मग मला सांग आता तु काय करायचे ठरवले आहेसतुला खरेतर ऊमाची माफी मागायला हवीतु मला फोन कशासाठी केला आहेस ?आणि मला भेटून तू काय करणार आहेस ?यावर सतीश म्हणाला कोणताही माणूस कितीही अपराधी असोत्याला पुन्हा सुधारायची एक तरी संधी दिली जाते .हे तर तुला माहित आहेच ..“ठीक आहे समजले मलाप्रत्येकाला संधी मिळायला हवीकाय ठरवले आहेस तु पुढे आताअसे विचारताच सतीश ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 22
मोहन म्हणालामला माहित आहे नयना माझ्या फोनची वाट पाहत असणारउद्या मी नयनाला फोन करणार आहेचतिच्या वाढदिवसाला मी नक्की येणार असे सांगायलाआणि शिवाय तिला गिफ्ट काय हवे आहेते सुद्धा विचारायच आहे मला ..तेव्हा मी तिला सांगेनमी तुझ्यासाठी आणखी एक खास गिफ्ट आणणार आहेते तुला खूप खूप आवडेल असे ..आणि मग ऐनवेळीमी माझ्यासोबत सतीशला घेऊन आल्यावरतिची आणि तिच्या बाबाची भेट होईलवाढदिवसाला ती खूप आनंदात असणारअशावेळी बाबाची भेट झाल्यावरतिला नक्कीच आनंद होईल .निदान त्या दिवशी तरीतिची नाराजी जरी असेलतरी दाखवू शकणार नाही .सतीशला पण मी त्या दिवशीफोनवर सांगितले आहेकी तु सुद्धा अगदीचांगल्या इस्त्रीच्या कपड्यात ये ..म्हणजे नयनाही आनंदानेतुझा स्वीकार करेल ..मी त्याला ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 23
हे ऐकून ऊमा म्हणालीहो ..तिच्या मनाची तयारी झालेहे मला समजले आहे .आता सगळे एकदा व्यवस्थितजुळून आले म्हणजे बरे होईलउद्या नऊ वाजतासतीशला यायला सांगितले आहे चौकाततो भेटला की येतोय आम्ही साडेदहा अकरा पर्यंत “हो मोहन ..ऊमा म्हणालीसांगितले सगळे नयनाने मलाफार खुश होती बघा ..या तुम्ही उद्याआणि मी सांगितले आहे तसेमला वेळोवेळी मेसेज करीत रहा बर का “ऊमाला होकार देऊनमोहनने फोन ठेवला .ऊमा परत बाहेरच्या खोलीत आलीआणि नयनाशेजारी झोपून तिच्या अंगावर हलकेच हात टाकला.उद्या काय काय होईल ..कसा असेल सतीश ...?बाबाचे नाव घेणे सोडलेल्या नयनालाआवडेल का परत बाबाला भेटायलाकाय होईल तिची प्रतिक्रिया ?एक ना दोन ..शंभर प्रश्न मनात येत होते तिच्यालेक ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 24
ऊमाचे आता स्वयंपाकाचे काहीच काम शिल्लक नव्हतेफक्त मोहन आल्यावरजेवायला बसताना पुरी आणि ताजे वडे तळायचे होते .संध्याकाळच्या बटाटेवड्याची पण झाली होतीतिच्याकडे आता वाट बघणे इतकेच शिल्लक होते .शांतपणे बाहेरच्या खोलीत टीव्ही लाऊन ती बसली .काय लागले होते टीव्ही वर याकडे तिचे लक्षच नव्हतेमनात विचार विचार आणि समोर नुसतीच चित्रे फिरत होती .काही वेळातच नयना धावत धावत आली .घड्याळ पाहून म्हणाली ,“आई मोहनमामा कसा नाही आला अजून ?मला फार भूक लागलीय ..त्याला फोन कर नाकुठे पोचला आहे बघ तरी ..”नयनाचे अजून काही प्रश्न यायच्या आत ऊमा म्हणाली ,“हे बघ नयन ..मोहनमामाचा फोन आला होता आत्ताच ..त्याची गाडी रस्त्यात बंद पडली ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 25
ऊमाने मोहनला आणि त्याच्या मित्राला परत परत आग्रहाने वाढले .सर्वांचे खाऊन झाल्यावरऊमाने नयनाला सर्वांच्या पाया पडायला लावलेआणि सर्वांनी तिला आशीर्वाद दिले .मोहनमामाला आणि त्याच्या मित्राला नयनाने नमस्कार केला .मोहनने नयनाला जवळ घेतले आणि त्याच्या मित्रानेनयनाला भातुकलीचा खेळ भेट दिला .तेव्हढ्यात नयनाला आठवले ,“मामा अरे तुझे सरप्राईज गिफ्ट कुठे आहे ?”नयनाचा हा प्रश्न ऐकल्यावर ऊमा पण थोडी बिचकली ..नयनाच्या डोक्यात एकदा एखादी गोष्ट शिरली कीत्याचे निराकरण झाल्याशिवाय गप्प बसत नसे .आता काय करणार मोहन ?अशा प्रश्नार्थक नजरेने तिने मोहनकडे बघितले .मोहन नयनाकडे बघून म्हणाला ..अरेच्या विसरलोच ...थांब गाडीतून घेऊन येतोअसे म्हणून तो बाहेर पडला .नयनाच्या मित्र मैत्रिणी सगळेआता खाणे झाल्यावर ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 26
या नवीन आयुष्यात ऊमाला मोहनचा फार आधार होता .मोहन वर्षातून तीन चार वेळा त्या दोघींना भेटून जात असे .नयनाच्या वाढदिवसाला मोहन न चुकता येतच असे .त्या त्या वेळी हटकूनऊमा आणि मोहनला सतीशची आठवण सतावत असे .होता होता अशीच दहा वर्षे पार पडली .ऊमा आता तिच्या या आयुष्यात चांगलीच स्थिरावली होती .या वाड्यात आल्यानंतर तिचे खूपच भले झाले होते .वाड्यातील सगळेच लोक खूपच चांगले होते .त्यांनी कधीही ऊमाला तिच्या भूतकाळाविषयी विचारले नव्हतेना कधी तिला तिच्या भूतकाळाची आठवण होऊ दिली .नयना आता हायस्कूलमध्ये शिकत होती.ती अत्यंत हुशार असल्याने प्रत्येक वर्षी पहिला नंबर काढत होती .शाळेतली एक गुणी विद्यार्थिनी म्हणून तिचे नाव ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 27
वाढदिवसाच्या कार्यक्रमात नयनाकडे बघतानाशकयतो मनातली घालमेल बाहेर दिसू नयेयाचा ऊमा प्रयत्न करीत होती .मोहनला तिच्या या अवस्थेची कल्पना होतीच बोलता फक्त नजरेने तो तिला धीर देत होता .पार्टी बऱ्याच उशिरपर्यंत चालू होती .नयनाच्या सर्व मैत्रिणी मनापसून एन्जोय करीत होत्या .पार्टी संपायच्या आधी थोडा वेळमोहन दोघींचा निरोप घेऊन बाहेर पडला .त्याला लगेचच त्याच्या गावी परतायचे होते .जाताना पुन्हा एकदा सतीश विषयी काहीही समजलेतर कळवेनअसे ऊमाला सांगुन गेला .नयनाच्या सगळ्या मैत्रिणीनी जाताना ऊमालापार्टी खुप छान झाली असे सांगितले .ऊमाला पण अगदी समाधान वाटले ..लेकीने आयुष्यात प्रथमच काहीतरी मागितले होतेआणि ते पूर्ण करता आले .सगळ्यांना निरोप देऊन दोघी घरी परत आल्या .कपडे ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 28
"नुसते फोनवरच बोलत ठेवणार आहेस मला ..?की मला भेटायची इच्छाच नाहीय तुझी .?आणि माझा इतक्या वर्षाचा यातनामय प्रवासमी फोनवर दहा पंधरा मिनिटात सांगूअसे तुझे म्हणणे आहे का ..?सतीश इतके बोलेपर्यंतअचानक फोन कट झाला .ऊमाने फोनकडे पाहिले ..आणि परत तो फोन नंबर रीकॉल केला .पण तो लागेना ..थोडा वेळ वाट पाहून परत लावलाआता आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज ..असा मेसेज येत होता .ऊमाला वाटले..तरी एक मात्र बरे झालेआत्ता सुजाता नुकतीच निघून गेली होती .नाहीतर हे फोनवरचे बोलणेतिला समजल्यावाचून राहिले नसते .ऊमा शांतपणे परत सतीशचा फोन येईलअशी वाट पाहत राहिली .विचारांची आवर्तने तर मनात चालूच होती...सतीशला भेटायची,त्याची खरेच काय अवस्था आहे हेजाणून ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 29
यामध्ये मुख्य प्रश्न नयनाचा होता ..तिला काय आणि कसे सांगायचे .?हा मामला ऊमाला एकटीला हाताळता येणे केवळ अशक्य होते मोहनला सांगण्यासाठीती वारंवार मोहनला फोन लावत होतीपण मोहनचा फोनकाही केल्या लागतच नव्हता .घरी पोचायच्या आतत्याचा फोन लागणे आवश्यक होते .आणि हे सगळे तत्काळ बोलायला लागणार होते .कारण घरी गेल्यावर नयनासमोरत्याला फोन करता येणे अशक्य होते .मुळात आज घरी गेल्यावर तिलाचनयनाच्या सतरा प्रश्नांनाउत्तरे द्यायला लागणार होती .कारण जसजशी नयना मोठी होत गेली होतीतसतसा तिचा स्वभावअतिशय चिकित्सक होत गेला होता .कोणत्याही गोष्टीच्यामुळापर्यंत जाऊन त्याविषयी अनेक प्रश्नविचारायची तिला सवयच होती .तिच्या या प्रश्नांच्या भडिमारात कधीकधीतिची मैत्रीण रितू सुद्धा सापडत असे ..आणि एकदा तिचे ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 30
नयनाच्या विचारण्यावर“ अग खूप सज्जन आहत तेकॉलेज मधले एक प्रोफेसर आहेत जुन्या ओळखीतलेपूर्वी एकदा आर्थिक अडचण होती त्यांचीम्हणून त्यांनी पार्टीचे पैसे त्यांनी उधार ठेवले होते .तेच परत करायला ते येणार होते.“अशी सध्या सारवासारव करूनआता नवीन प्रश्न नको म्हणून विषय बदल करीतऊमा म्हणाली ..,”वा खिचडीचा आणि पापडाचा खमंग वास तर मस्त सुटलाय ,चल बाई जेवायला बसुयाफार भूक लागली आहे मला कधीची “एरवी आठ पर्यंत जेवणे उरकत असत .आज दहा वाजायला आले होते ..हो चल बसुया.तुला उशीर होणार म्हणलीस पणइतका उशीर होईलअसे वाटले नव्हते ..मग मीच मगाशी खिचडी टाकलीआणि पापड पण तळून ठेवले .नयना ताटे घेत म्हणाली ..दोघींसाठी टेबलावर पाणी ठेऊनगरम ...अजून वाचा
पुनर्मिलन - भाग 31
ऊमाच्या मनात आले बरे झाले ही आत्ता क्लासला गेली .सतीश आला तर निदान आपल्याला त्याच्याशीथोडेसे बोलायला तरी वेळ मिळेल त्याच्या आणि नयनाच्या भेटीची वेळ पुढे जाईल ...काय आणि कसे हे विचार करीत ती तशीच बसून राहिली .पोह्याचा घास तिच्या घशाखाली काही केल्या उतरत नव्हता .पोहे, चहा थंडगार झाले तरी तिचे लक्षच नव्हते.तसेच चमच्याने पोहे चिवडत ती बसली होती .अचानक ती भानावर आलीआणि तिने उठून गार चहा आणि पोहेतसेच कट्ट्यावर ठेवून दिले .बाहेर येऊन ती बेडवर बसून राहिली .तिचे डोके पण बारीक दुखू लागले होते .तिने घड्याळ बघितले तर दहा वाजायला आले होते .अजूनही सतीशचा मात्र पत्ता नव्हता ना निरोप ...अजून वाचा