" नाम श्रेष्ठ.. नाम श्रेष्ठ "       या मृत्यू लोकी प्रपंच्यात गुरफटलेल्या जीवाची रात्रंदिवस सुख मिळविण्यासाठी धडपड चाललेली असते. शेवटी सुख म्हणजे तरी काय ? आपल्या मनातला दुःखाचा, द्वैत संकल्पनांचा संपूर्ण काळोख नष्ट होणे म्हणजे सुखाची पहाट होणे. त्यासाठी अंतःकरणात भगवंताचं अधिष्ठान हवं. सूर्याला जवळ केल्याशिवाय अंधार कसा नष्ट होणार? सूर्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा उदय झाला की, काळोख नष्ट होतो. ज्ञानमार्गाने भक्तीचा कळस जवळ केला की, सुखाची बरसात व्हायला वेळ लागत नाही.पापांच्या राशींच्या राशीं जाळण्याची ताकद नाम भक्तीत आहे.त्यासाठी सर्वस्वाने भगवंताच्या चरणी निष्ठा प्रेमपूर्वक अर्पण तर करायला हवी. देहाची

1

संतांची अमृत वाणी - नाम श्रेष्ठ..

"नाम श्रेष्ठ.. नाम श्रेष्ठ " या मृत्यू लोकी प्रपंच्यात गुरफटलेल्या जीवाची रात्रंदिवस सुख मिळविण्यासाठी धडपड चाललेली शेवटी सुख म्हणजे तरी काय ? आपल्या मनातला दुःखाचा, द्वैत संकल्पनांचा संपूर्ण काळोख नष्ट होणे म्हणजे सुखाची पहाट होणे. त्यासाठी अंतःकरणात भगवंताचं अधिष्ठान हवं. सूर्याला जवळ केल्याशिवाय अंधार कसा नष्ट होणार? सूर्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा उदय झाला की, काळोख नष्ट होतो. ज्ञानमार्गाने भक्तीचा कळस जवळ केला की, सुखाची बरसात व्हायला वेळ लागत नाही.पापांच्या राशींच्या राशीं जाळण्याची ताकद नाम भक्तीत आहे.त्यासाठी सर्वस्वाने भगवंताच्या चरणी निष्ठा प्रेमपूर्वक अर्पण तर करायला हवी. देहाची ...अजून वाचा

2

संतांची अमृत वाणी - 2

"वितंडवाद्याची कहाणी" जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही, की मनुष्याला त्याचे अवगुण लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखररूपाने दिसू लागतात, आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. 'हे परमेश्वरा ! इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना, तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू ? एवढया पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का ?' असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी, रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही; किंबहूना, तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे ...अजून वाचा

3

संतांची अमृत वाणी - 3

" नामस्मरणास योग्य वेळ " संत महात्म्यानी श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, सख्य आणि आत्मनिवेदन असे नऊ प्रकार सा. सांगितले आहेत. यालाच ' नववीधा भक्ती ' असे म्हणतात. सर्वसाधारण माणसं स्मरण भक्ती या मार्गाचा अवलंब करतात. स्मरण भक्ती म्हणजे नामस्मरण किंवा नामजप भक्ती होय. पहाटेच्या वेळच्या नीरव शांततेत आपलं लक्ष परमेश्वरीं अस्तित्वाकडे केंद्रित करावे. पहाटेच्या वेळी आपलं मन फुलासारखं ताज असतं. सुगंधित असतं. मनात जर त्या परमेश्वराच्या नामस्मरणाची साखळी रुणझुणायला लागली तर आपल्या मनात परमेश्वराच्या चिंतनाच्या मंद घंटा वाजू ...अजून वाचा

4

संतांची अमृत वाणी - 4

" समर्थांची शिकवण " साठच्या (1960) दशकात शालेय पाठय क्रमात "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" होता. प्राचीन काळी हिंदुस्थानात आर्य व अनार्य अशा दोनच जमाती होत्या. आर्य हे वैदिक धर्माचे पालणकर्ते व उपासक होते. आ पली वैदिक संस्कृती खूप जुनी आहे. त्या पुरातन वैदिक संस्कृतीत यज्ञ, दान आणि तप यांना अनन्य साधारण महत्त्व होतं. त्या काळात मोठमोठे यज्ञ व्हायचे. ईश्वरप्राप्तीच्या मार्गतले हे टप्पे होते. परंतु यज्ञ करायचा म्हणजे खूप धन द्रव्य हवं. त्या यज्ञात दानाची ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय