ही कथा पूर्णपणे काल्पनिक असायला हवी होती खरंतर. कारण उगाच दोन जीवांची ताटातूट. त्यातून आलेली उदासीनता... आणि शेवटी अधुरं राहिलेलं एक स्वप्नं जे दोघांनी पाहिलेलं... अनेक उतार आणि चढावांनी भरलेलं आयुष्य.. असं सगळं त्यांच्या नशीबी आलं नसतं. कथा तशी साधी आहे. तुमच्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात अगदी सहजपणे कुणाच्याही बाबतीत ऐकू येणारी. त्यात माझा सहभाग..? एक मित्र म्हणून होता. यात प्रामाणिकपणे जमेल तितकी मदत करण्याचाच माझा मानस होता..पण..
Full Novel
अर्धवट - भाग 1
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असायला हवी होती खरंतर. कारण उगाच दोन जीवांची ताटातूट. त्यातून आलेली उदासीनता... आणि शेवटी अधुरं एक स्वप्नं जे दोघांनी पाहिलेलं... अनेक उतार आणि चढावांनी भरलेलं आयुष्य.. असं सगळं त्यांच्या नशीबी आलं नसतं. कथा तशी साधी आहे. तुमच्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात अगदी सहजपणे कुणाच्याही बाबतीत ऐकू येणारी. त्यात माझा सहभाग..? एक मित्र म्हणून होता. यात प्रामाणिकपणे जमेल तितकी मदत करण्याचाच माझा मानस होता..पण..****पूर्वा तिच्या आईबाबांसोबत तिचं राहण्याचं ठिकाण बघायला आली. तिला या मोठ्या शहरात तिचं गाव सोडून राहायची पहिलीच वेळ होती. त्यामुळे भाड्याची खोली मिळवण्यासाठी तिचे आईवडील तिच्यासोबत आले होते. एका मोठ्या कपंनीमध्ये तिला ट्रेनी म्हणून ...अजून वाचा
अर्धवट - भाग 2
"सर! हे कसं जोडतात? मला माहित नाहीये. तिथे कुणीच नाहीये सांगायला? प्लिज सांगता का?" हातामध्ये ओरिजिनल ड्रॉईंग आणि ब्लु पेपर घेऊन पूर्वा उभी होती.मी रेकॉर्ड रूममध्ये काही ओरिजिनल ड्रॉईंग्स घ्यायला आलो होतो. मी इकडे तिकडे पाहिले. रेकॉर्ड डिपार्टमेंट पूर्णच रिकामं होतं. सगळे चहा घ्यायला गेले असावेत." चल दाखवतो." असं म्हणून तिला अमोनिया प्रिंटिंग मशीनकडे घेऊन आलो. तिचे दोन्ही पेपर घेतले. तिला कुठल्या बाजूने जुळवतात ते दाखवले. नीटपणे ब्लु प्रिंट घेऊन ती फोल्ड कशी करायची ते ही शिकवले. सेपिया प्रिंटिंग तिला माहित नव्हते ते ही करुन दिले. तिचा संपूर्ण सेट रेडी झाला. ती उजळली." सर!! खूप thanks! 3 दिवस झाले ...अजून वाचा
अर्धवट - भाग 3
सुमित जॉईन होऊन महिना झाला. माझं आणि त्याचं छान ट्युनिंग जमलं. आम्ही एकत्र काही ट्रेनिंग्ज अटेंड केले. Projects मध्यें मी त्याला काहीवेळा मदत करू लागलो. तो हुशार होता. भरभर गोष्टी आत्मसात करत त्याने ऑफिस मध्यें एक चांगल मत बनवलं सर्वांच्या मनात. लवकरच तो आमच्या ग्रुपचा पार्ट झाला. त्याच्या रूमवर जाऊन आम्ही पार्ट्याही झोडल्या. त्याला स्वयंपाकाचा आणि व्यायामाचा चांगलाच नाद होता. सुमित एक गुणी व्यक्तिमत्व होता. बऱ्याच गोष्टींवर आमचे एकमत होतं होते. काहीवेळा तो शून्यात हरवलेला दिसतं असे.एकदा त्याच्या रूमवर आम्ही काही मित्र जमा झालेलो. मटणाचा बेत गॅस वर शिजत असताना त्याने त्याच्या ताज्या ताज्या ब्रेक अप ची कहाणी मला ...अजून वाचा
अर्धवट - भाग 4
"विराज!! खूप मोठी चूक झाली रे माझ्याकडून.. मी तिला खूप शिव्या दिल्या.. नाही तसलं बोललो. खूप त्रास होतोय रे तो नशेत बरळत होता. रात्रीचे साडेबारा झालेले.. त्याने मला कॉल केलेला." सुम्या? अरे.. काय?? कुठयस तू? पिलायस की काय? " मी विचारलं."अरे तीन beer फक्त.. पिलो नाय काय... पण.. तू म्हणालेलेला.. ना.. की क्लिअर करुन घे.. ते.. खरं होतं भावा.. तो.. तिला घेऊन... गेला... गेला आणि.." पिल्यामुळे त्याची वाचा लोळत होती"तिला धमकवून रितेशने तुला कॉल करायला लावला. म्हणजे ती तुझ्याकडे येते हे ठाऊक झालं त्याला. हे सुद्धा तिने रितेशपासून लपवून ठेवलेलं. मूर्ख आहे ही पूर्वा. उद्या बघतो तिला. " मी ...अजून वाचा
अर्धवट - भाग 5
" अरे.. सगळा सत्यानाश केला तिने.. वाट लावली.. घाण केली .. अरे तिला मी फक्त समजावं म्हणलं होतं.. तू बोललास तिला माहित नाही. पण बघ काय करुन ठेवलंय तिने... "फोनवर रितेश ओरडत होता. मी फक्त शांतपणे ऐकत होतो.त्याचं तोंड चालू होतं. नाही नाही ते बरळत तो पूर्वाला बोल लावत होता. त्याचं कारण होतं मी तिला सांगितलेली युक्ती.झालं असं होतं.संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पूर्वा शांतपणे रूमवर गेली. तिने आवरलं आणि मी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता ती अनंत सरांच्या घरी गेली. सर आणि काकू घरी होत्या. रितेश ही योगायोगाने घरीच होता. रूम सोडून गेली असली तरी तिने त्यांच्याकडे जाने येणे ठेवले होते. ...अजून वाचा
अर्धवट - भाग 6
सकाळचे सात वाजलेले. लोकं भक्तीगीतानी, भूपाळ्यांनी उठतात. मी फोनच्या रिंगने उठलो. पूर्वा होती." हा बोल पूर्वा. " मी म्हणालो." संपलय सगळं. माती झाली सगळी. " ती रडत रडत म्हणू लागली." काय झालं? अगं तू ठीकेस ना? आहेस कुठे तू? " मी काळजीने विचारू लागलो.तिने मला सांगितलेली हकीकत ती अशी.'रितेश आणि अपर्णाला तिने एका सुट्टी मध्यें त्यांच्या गावी नेले होते. हे मला माहित नव्हतं. तिथे त्याला अजित भेटला होता. जो पूर्वाच्या अत्याचा मुलगा होता. पूर्वा त्याची क्रश होती. त्याला वाटायचं मामाची मुलगी म्हणजे आपलीच बायको. त्याला तसं घरात पण चिडवायचे. पण त्याच करियर वैगरे काही नव्हतं. उनाडक्याचं करायचा तो पण. ...अजून वाचा
अर्धवट - भाग 7
पाहता पाहता 4-5 वर्षांचा काळ लोटला होता. माझंही एका सुस्वभावी परिसोबत जमून उरकलं. मी माझ्या खाजगी आयुष्यात विरघळून गेलो. लग्नानंतर काही महिने ती कॉन्टॅक्ट मध्यें होती. नंतर तिचे डिपार्टमेंट शिफ्ट झाले होते. त्यामुळे आमचं एकमेकांना दिसणं जवळ जवळ बंद झालं आणि नंतर तर ती तिच्या संसारात गुंतली असावी. कॉल्स.. Mails वैगरे सगळंच बंद होत गेलं. माझी सुमितशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. त्याने internal job opportunity घेऊन दुसरीकडे बदली करुन घेतली.आता फक्त अपर्णा दिसायची. तिचही वर्षभरात लग्न झालं. ती मात्र ओळख द्यायची, बोलायची.एकदा तिच्याकडून कळाले की पूर्वाने कम्पनी सोडलीये आणि ती दुसरीकडे निघाली आहे. मग मात्र मला कॉल करावाच लागला. ...अजून वाचा