बाहेर रात्रीचं काळाभोर चांदणं पडलय. माझ्या डोळ्यांसमोर मात्र लख्ख उजेड. माझ्या नशिबाचे टाके....एकामागून एक निखळून पडतायत. आणि मी? मी नुसती उघड्या डोळ्यांनी तो खेळ पाहतेय. बाजूला रत्नाकर. माझा नवरा. कसा शांत, निवांतपणे झोपलात. त्याचा श्वास कसा लयीत येतोय. त्याची पाठ वर-खाली होतेय... तो आपला त्याच्याच जगात आहे. तिकडे पाळण्यात तो छोटा आयुत. त्याचं ते इवलंसं अस्तित्व. ते सुद्धा झोपलय.
दूधाचा थेंब - 1 - वादळ
निवेदक: मीरा-बाहेर रात्रीचं काळाभोर चांदणं पडलय. माझ्या डोळ्यांसमोर मात्र लख्ख उजेड.माझ्या नशिबाचे टाके....एकामागून एक निखळून पडतायत. आणि मी? मी उघड्या डोळ्यांनी तो खेळ पाहतेय.बाजूला रत्नाकर. माझा नवरा. कसा शांत, निवांतपणे झोपलात. त्याचा श्वास कसा लयीत येतोय. त्याची पाठ वर-खाली होतेय... तो आपला त्याच्याच जगात आहे. तिकडे पाळण्यात तो छोटा आयुत. त्याचं ते इवलंसं अस्तित्व. ते सुद्धा झोपलय.आणि मी? मी त्याच्या विचारांत सगळं विसरून चाललेय.कोणाच्या? श्रीयुतच्या.नुसतं नाव घेतलं तरी काळजात कसं लख्ख होतं. मी आई आहे, कुणाची तरी बायको आहे—हे सगळं खरं. मग हे मन इतकं बेताल का व्हावं? किती नेटाने संसार केला मी इतके दिवस, पदर परकारात घट्ट खेचून, ...अजून वाचा
दूधाचा थेंब - 2 - खिडकी
निवेदक: श्रीयुतमुंबईची ही भर दुपार. सूर्य माथ्यावर तळपतोय. प्रकाशाच्या धारा अंगावर कोसळतायत जसा की पाऊसच. हा अंगावरचा शर्ट? भिजलाय भिजून अंगाला चिटकलाय.आणि मी? मी या उकाड्यात जिद्दीने उठबशा काढतोय. रोजसारख्या.व्यायाम करता करता माझे हात अचानक थांबले. नजर खिळली ती समोर. घराच्या एका काचेच्या चौकटीवर. सहा महिने झाले होते मला इथे येऊन. पण त्या खिडकीपलीकडे, त्या चौकटीतल्या 'फ्रेम'मध्ये कोण राहतय हे डोकावून पाहण्याची तसदी मी घेतली नव्हती.पण आज ती खिडकी नेहमीसारखी रिकामी नव्हती.का? कोण होतं तिथे?मीरा. होय, खिडकीच्या त्या चौकटीत आज मीरा उभी होती. अंगात पिवळा सुती मऊ ड्रेस घालून. त्या ड्रेसच्या कडा तिच्या गोलाकार शरीरावर ताणल्या होत्या. दुपारचं ते ...अजून वाचा