अचानक उद्भवलेल्या आणि यापूर्वी कोणतीच लक्षणे नसलेल्या आजारातून तू बरा होशील म्हणून तुला पुण्यात नेले अगदी शेवट पर्यंत चांगला बोलणारा तू अचानक रात्रीतून ब्रेन स्ट्रोक होऊन गेलास आणि माझ्यावर जणू वीज कोसळली ध्यानी मनी नसताना तुझे जाणे स्वीकारणे मला कठीण झाले माझ तर सगळ आयुष्य उलटे पालटे झाले अनपेक्षित रित्या कोणीतरी उंचावरून जोरात ढकलून दिल्या सारखे झाले रे आत्तापर्यंत वडिलांच्या आणि तुझ्या राज्यात एखाद्या राजकन्येसारखी वाढलेली मी पूर्ण हादरून गेले तुझ्या अवती भवती माझे सगळे आयुष्य फिरत होते रे आपण दोघेही गेली बेचाळीस वर्ष एकमेकात इतके गुंतलो होतो की आपल्याला एकमेका शिवाय आयुष्य नव्हते आपणच एकमेकांचे जग होतो Made for each other पासून सुरू झालेला आपला प्रवास..
प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1
अचानक उद्भवलेल्या आणि यापूर्वी कोणतीच लक्षणे नसलेल्या आजारातून तू बरा होशील म्हणून तुला पुण्यात नेलेअगदी शेवट पर्यंत चांगला बोलणारा अचानक रात्रीतून ब्रेन स्ट्रोक होऊन गेलास आणि माझ्यावर जणू वीज कोसळलीध्यानी मनी नसताना तुझे जाणे स्वीकारणे मला कठीण झालेमाझ तर सगळ आयुष्य उलटे पालटे झालेअनपेक्षित रित्या कोणीतरी उंचावरून जोरात ढकलून दिल्या सारखे झाले रेआत्तापर्यंत वडिलांच्या आणि तुझ्या राज्यात एखाद्या राजकन्येसारखी वाढलेली मी पूर्ण हादरून गेलेतुझ्या अवती भवती माझे सगळे आयुष्य फिरत होते रेआपण दोघेही गेली बेचाळीस वर्ष एकमेकात इतके गुंतलो होतो कीआपल्याला एकमेका शिवाय आयुष्य नव्हतेआपणच एकमेकांचे जग होतोMade for each other पासून सुरू झालेला आपला प्रवास... आतापर्यंत mad for ...अजून वाचा
प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 2
अखेर बरेच दिवस सहन केल्यावर शेवटी माझ्या मनाचा सुद्धा तोल सुटलाआणि मी ठरवले आता आपण आपल्या आपल्या घरी जाऊन राहायला लागलं तरी चालेलआता इथे रहायचा विषय मनातून पूर्ण काढून टाकायचापूर्वी मला एकटे आपल्या मोठ्या घरात राहणे संकट वाटायचे खूप भीती वाटायचीकारण यापूर्वी तुला सोडून एक दिवस सुद्धा मला एकटे घरात रहायची अथवा झोपायची वेळ आली नव्हतीएकटे राहणे यासाठी मला माझ्या त्या बाल मैत्रिणीने धाडस दिलेआपले मित्र आणि एक दोन मैत्रिणीनी सुद्धा तू तिथे येऊन राहणे कसे योग्य आहेआणि आपल्या घरात कसली भीती हे समजावून माझ्या मनातील भिती दूर करायला मदत केलीमाझ्या बाल मैत्रिणीने मला स्वतःची किंमत समजावून दिलीजिथे तुला ...अजून वाचा
प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 3
पण या सर्व व्यापानी जरी जीव थकला तरी काही इलाज नसतोया सगळ्या फ्रंट वर मलाच एकट्यानेच लढायला लागतेकारण तुला माहित आहे मला कुणाचाच आधार नाहीघरची अशी आपल्याला कुणाची साथ नव्हतीच आणि आताही नाहीयफक्त कोरडी चौकशी असते कधीतरी आडून आडूनआता तर मी पूर्णपणे एकाकी आहेतुझी माझ्यावरचे असलेले लक्ष आणि परमेश्वरी आशीर्वाद यावर दिवस काढत आहेमात्र या दोन्ही गोष्टीमुळे माझा रोजचा दिवस आनंदात आणि व्यस्त असा जातोअनेक गोष्टी अचानक समोर आल्यातअनेक गोष्टीत मी गुंतून गेलीयतर अनेक गोष्टींनी मला गुंतवून घेतलेयह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला रिकामे राहू देत नाहीतआपले घर हसते खेळते रहावे अशी माझी आणि तुझी सुद्धा इच्छा होतीती पुरी होतेयकाही ...अजून वाचा
प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 4
तू नेहमी ऋण मुक्तेश्वर बाजारात भाजी आणायला जायचाकधी कधी मात्र आपण दोघे कपिलतीर्थ मार्केट मध्ये जायचो तिथे सगळे विक्रेते ओळखीचे होतेमितभाषी असला तरी तू माणसे राखून होताससगळीकडे तुझ्या व्यक्तिमत्वाची छाप असायचीआता कपिलतीर्थ मार्केट मध्ये जायची माझी ताकद नाहीसगळी जण तुझी चौकशी करतील आणि मग उत्तर देण्याऐवजी माझे डोळे गळायला लागतील आणि मला स्वतःला आवरणे अशक्य याची भीती वाटतेआता भाजी फळे बहुधा ऑनलाईन मागवते..मीकिती लागते एकटीला असे...एवढेच काय आपले नेहेमीचे फिरायचे रस्ते सुद्धा मी बदलून टाकलेततिकडे खूप वर्ष फिरत असल्याने असंख्य ओळखीची लोक आहेतआपण कायमच सगळीकडे जोडीने फिरायचोत्यांनी आता तुझ्या विषयी काही विचारलं तर उत्तर देण्या इतक माझ्यात बळच राहिलेले ...अजून वाचा