पत्रसुमने..तुझ्या सवयी

(0)
  • 15
  • 0
  • 1.5k

प्रिय सोना तुझ्या सवयी बद्दल बोलायचे तर तुला सगळ्या चांगल्या आणि आदर्श सवयी होत्या कुठ खोड काढावी असे कधी तुझ्याकडून घडलेच नाही खरोखर "आदर्श माणूस" होतास तू मुख्य म्हणजे तुला कसलेही व्यसन नव्हते ना पान, ना तंबाखू ,ना सिगरेट , ना दारू कसलेही व्यसन न करणे ही तुझी एक अतिशय चांगली सवय होती तुला व्यसन एकच होत ते म्हणजे माझ्यावर प्रेम करणे सतत माझी काळजी घेणे आणि मला आनंदात ठेवणे सकाळी उठल्या उठल्या तुझी पहिली सवय म्हणजे फ्रीज उघडून आधी दुधाची पिशवी बाहेर काढायची किचन टॉवेलवर पिशवी थोडी थोडी आपटून त्यातली पिशवीच्या कडेला लागलेली साय सुटी करून घ्यायची

1

पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १

प्रिय सोनातुझ्या सवयी बद्दल बोलायचे तर तुला सगळ्या चांगल्या आणि आदर्श सवयी होत्याकुठ खोड काढावी असे कधी तुझ्याकडून घडलेच "आदर्श माणूस" होतास तूमुख्य म्हणजे तुला कसलेही व्यसन नव्हते ना पान, ना तंबाखू ,ना सिगरेट , ना दारूकसलेही व्यसन न करणे ही तुझी एक अतिशय चांगली सवय होतीतुला व्यसन एकच होत ते म्हणजे माझ्यावर प्रेम करणे सतत माझी काळजी घेणे आणि मला आनंदात ठेवणेसकाळी उठल्या उठल्या तुझी पहिली सवय म्हणजे फ्रीज उघडून आधी दुधाची पिशवी बाहेर काढायचीकिचन टॉवेलवर पिशवी थोडी थोडी आपटून त्यातली पिशवीच्या कडेला लागलेली साय सुटी करून घ्यायचीमग तोंड धुवून ब्रश करायचेब्रश झाला की जीभ घासायचीजीभ कायम स्वच्छ ...अजून वाचा

2

पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग २

प्रिय सोना बाजारातून किराणा आणताना सुद्धा ठरलेल्या पेक्षा थोडा जास्त आणायचा म्हणजे कधी काही कारणाने बाजार करायला उशीर झाला अडचण येऊ नये..To be at safer side....असे तुझे calculation असेकोरोना काळात तू एवढे घरगुती वापराचे सामान घेऊन ठेवले होतेस की ते आपल्या दोघांसाठी चार एक वर्ष पुरले जेवण अथवा खाणे काहीही झाले तरी त्यानंतर दहा मिनिटे शतपावली करायची तुझी सवय होतीआपण कुठेही ट्रिपला गेलो तरी ही शतपावली आणि सकाळचे फिरणे असायचेच...त्यात खंड पडत नसेसकाळचे चाळीस पंचेचाळीस मिनिटे फिरणे आणि वीस मिनिटे शरीराला स्ट्रेचिंग देणारे काही exercise हे तू रोज न चुकता करीत असे आणि तुझ्या सोबत मीही करीत असेमी फिरायला ...अजून वाचा

3

पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग ३

प्रिय सोनातू नेहमी up-to-date रहात होतास इस्त्रीचे कपडे इन केलेला पॅन्ट शर्ट त्यावर पट्टा प्रवासाला जाताना वेगवेगळे टी शर्ट मॅच पँट चार खिशांची प्रवासी भारतीय पॅन्टnखुप महागाचे लेदर चे पट्टे तू विकत घेत असे पायात कायम बूट मोजे ब्रँडेड वेगवेगळ्या कंपन्यांचे बूट थंडीत गरम राहणारे आणि उन्हाळ्यात सुती मोजे दर सहा महिन्यांनी बूट बदलणे कधीही मोजे घालताना सुद्धा पाय पुसून मोज्याने झटकून मोजे घालणं ही तुझी सवय होती आधी तू टी शर्ट अजिबात वापरत नव्हता मात्र नंतर तुझा डॉक्टरी पेशा थोडा कमी केल्यावर प्रवासाला, फिरायला तू टी शर्ट वापरू लागला तरीही तुझे टी शर्ट कायम उच्च प्रतीचे आणि सुंदर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय