पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग २ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग २

प्रिय  सोना

बाजारातून किराणा आणताना सुद्धा ठरलेल्या पेक्षा थोडा जास्त आणायचा म्हणजे कधी काही कारणाने बाजार करायला उशीर झाला तर अडचण येऊ नये..To be at safer side....असे तुझे calculation असे

कोरोना काळात तू एवढे घरगुती वापराचे सामान घेऊन ठेवले होतेस की ते आपल्या दोघांसाठी चार एक वर्ष पुरले 😊

जेवण अथवा खाणे काहीही झाले तरी त्यानंतर दहा मिनिटे शतपावली करायची तुझी सवय होती

आपण कुठेही ट्रिपला गेलो तरी ही शतपावली आणि सकाळचे फिरणे असायचेच...त्यात खंड पडत नसे

सकाळचे चाळीस पंचेचाळीस मिनिटे फिरणे आणि वीस मिनिटे शरीराला स्ट्रेचिंग देणारे काही exercise हे तू रोज न चुकता करीत असे आणि तुझ्या सोबत मीही करीत असे

मी फिरायला तुझ्या सोबत कायम असे पण exercise थोडा कंटाळा करीत असे

नंतर मात्र मीही हळूहळू न चुकता करू लागले संध्याकाळी आपल्या परिसरात थोडे फिरणे.. निमित्त काही कामे करणे .. जसे इस्त्रीला कपडे टाकणं, औषध आणणे, फळे आणणे...ही सुद्धा एक छान सवय होती

आणखी एक तुझी सवय म्हणजे Emergency फंड ठेवणे आणि मेन्टेन करणे दर महिन्याला आपल्या कमाई मधून तू थोडे थोडे पैसे बाजूला काढून दहा हजार रुपये पाकिटात वेगळ्या कप्प्यात ठेवत होतासहे वेगळे ठेवलेले पैसे तू कोऱ्या नोटांच्या स्वरूपात ठेवत होतास हे पैसे कधी रात्री अपरात्री अडचण आली तर उपयोगी पडतील यासाठी तुझी ही सिस्टीम होती आपल्या उमेदीच्या काळात ऑनलाईन पैसे देणे घेणे ही सोय नव्हतीत्यामुळे या रोख रकमेचा उपयोग करावा लागत असे तुझा emergency फंड आपल्याला कित्येक वेळेस कामी आला आहे मलाही तू नंतर असेच पाच दहा हजार रुपये साठवून वेगळे ठेवत जा असे सांगून सवय लावलीस

पूर्वी पाच दहा हजार असणारा हा फंड आपली परिस्थिती सुधारली तसा जास्त वाढलामग माझ्या emergency फंडात बघ आता वीस हजार झालेत असे मला कौतुकाने दाखवत होतास

कधीतरी बघू तुझा   emergency फंड असे म्हणायचा मग मी माझी पर्स उघडून बघायचे तर नेमके मी माझ्या फंडातले पैसे खर्चले असायचे व तो कमी असायचाकधीकधी ते कुठे खर्च झाले  हेही माझ्या लक्षात नसायचेअशा वेळी तू माझ्यावर रागवायचा.. असे     emergency   फंडातले पैसे इकडे तिकडे नको खर्च करू असे म्हणत असे

अगदी शेवटी सुद्धा तू गेल्यावर तुझ्या पाकिटातल्या चोर कप्प्यातून मला तू ठेवलेला दहा हजार रुपये emergency फंड सापडला

तुला हिशोब लिहून ठेवण्याची एक सवय होती जी तू नंतर बंद करीत आणलीस ...मी म्हणायचे कशाला हवे हिशोब लिहिणे जे आलेत ते जमा जे गेलेत ते खर्च हे ऐकून ऐकून तू ते सोडून दिलेस पण अगदी बहिणीच्या लग्नाचा हिशोब, आपल्या लग्नाचा हिशोब आपल्या वास्तुशांतीचा हिशोब अगदी रकाने आखून लिहिलेल्या अशा तुझ्या अक्षरातल्या डायऱ्या अजून आहेत

एकमेकांची प्रायव्हसी जपणे ही तुझी उत्तम सवय होतीतू कधीही माझ्या पर्सला हात लावत नव्हता चुकून कधी काही पैसे लागले आणि तुला माझ्या पर्स मधले घे म्हणता तुला ते रुचायचे नाही शेवटी ते पैसे मीच काढून द्यायला लागत

पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा आपण डायरी लिहायचो तू डायरीत हिशोब लिहायचामी माझ्या डायरीत आजच्या दिवसात काय घडले हे रात्री लिहायचे डायरी टेबल वर असली तरी वाचन तर दूरच......तू कधीच तिला हात पण लावला नाही

माझ्या लग्ना पूर्वीच्या वैयक्तिक आयुष्य विषयी कधी कोणते प्रश्न तुझ्या मनात नव्हते नंतर सुद्धा माझ्या नोकरीत माझा अनेक पुरुषा सोबत संपर्क यायचा तू कधी तू कोणा सोबत बोलली किंवा गेलीस असे प्रश्न कधीच विचारले नाही मी सुद्धा तुला सगळे मोकळे पणाने सांगायचे पण तुझ्या मनात कधीच कुठला संशय डोकावला नाही मोबाईल आपल्या आयुष्यात नंतर आले ...तरी सुद्धा  माझ्या मोबाईलला तू कधीच हात सुद्धा लावत नव्हता ना तू कधी त्याचा pasword विचारला कधी कोणाचा फोन आला आणि मी दूर असले तर जरा फोन घ्या कोणाचा आहे बघा असे म्हणले तरी तुच बघ नंतर असे तू म्हणायचा मी कुठ जाते कोणाशी बोलते माझा पगार किती मला कुणाचे वॉट्स अप MSG येतातअसले फालतू प्रश्न कधीच तुझ्या मनात आले नाहित एक पूर्ण डिसेंट माणूस होतास तु...

थोडक्यात कोणत्याही प्रकारची नवरेशाही तू कधीच दाखवली नाहीस ही एक चांगली सवय होती

तू स्वतः हून कधीच कोणत्या स्त्रीशी पाल्हाळ बोलला नाहीस अगदी माझ्या मैत्रिणींची बहिणींची गोष्ट सोड...घरी माझ्या आईशी मोकळे बोलायला सुद्धा तुला कित्येक वर्षे लागली

एक मर्यादा पुरुषोत्तम असणे आणि मर्यादेत राहणे ही तुझी कौतुकास्पद सवय होतीमी सुद्धा तशीच तुझीही प्रायवसी जपलीहोती बाकी इतर वेळी सुद्धा आलतु फालतू बोलणं तुझी सवय नव्हती

कायमच आदबशीर वागणे हीच तुझी सवय होती