मुंबईत सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता... रात्रीचे अडीच वाजले होते...साऊथ मुंबईच्या एका जुन्या , ओसाड गोदामाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत होते आणि लाल-निळे दिवे पावसाच्या पाण्यात चमचमत होते... "मॅडम , प्लीज सांभाळून... आत खूप चिखल आणि रक्त सांडलंय..," कॉन्स्टेबलने पिवळी गुन्हेगारी तपासणीची पट्टी वर करत म्हटले... चोवीस वर्षांची काव्या सावंत आपल्या अंगावरचा लाँग रेनकोट नीट करत आत शिरली...
Full Novel
रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1
भाग १: रक्ताचे ठसे आणि तोमुंबईत सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता...रात्रीचे अडीच वाजले होते...साऊथ मुंबईच्या एका जुन्या ओसाड गोदामाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत होते आणि लाल-निळे दिवे पावसाच्या पाण्यात चमचमत होते..."मॅडम , प्लीज सांभाळून... आत खूप चिखल आणि रक्त सांडलंय..," कॉन्स्टेबलने पिवळी गुन्हेगारी तपासणीची पट्टी वर करत म्हटले...चोवीस वर्षांची काव्या सावंत आपल्या अंगावरचा लाँग रेनकोट नीट करत आत शिरली... काव्या मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमची सगळ्यात तरुण आणि हुशार अधिका ...अजून वाचा
रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 2
काळ्या एसयूव्हीच्या मागच्या सीटवर कमालीची शांतता पसरली होती... बाहेर मुसळधार पाऊस गाडीच्या काचांवर आदळत होता , जणू निसर्गही बाहेर वादळाची साक्ष देत होता... पण गाडीच्या आतलं वातावरण त्या वादळापेक्षाही जास्त भयानक आणि गुदमरवून टाकणारं होतं... गाडी वेगाने धावत होती , आणि काव्याच्या हातातील फॉरेन्सिक किट थरथरत होती..लवकर कर... माझ्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही,..रुद्रचा आवाज पुन्हा एकदा त्या बंद गाडीत घुमला... त्याचा आवाज इतका थंड होता की काव्याच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली...काव्याने स्वतःचे थरथरणारे हात एकत्र जोडले आणि दीर्घ श्वास घेतला.. ती एक फॉरेन्सिक सायंटिस्ट होती.. तिने आजवर अनेक मृतदेह पाहिले होते , रक्ताचे पाट पाहिले होते , ...अजून वाचा
रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 3
त्या अंधाऱ्या खोलीत वेळ जणू गोठून गेला होता... खिडकीच्या लोखंडी गजांमधून बाहेर पडणाऱ्या पावसाचा एकसारखा येणारा आवाज आणि अधूनमधून विजेचा कडकडाट , एवढंच काय ते त्या शांततेचा भंग करत होतं... काव्या जमिनीवर तशीच गुंडाळी करून बसून होती.. थंडीने तिचं शरीर गारठलं होतं , पण त्याहून अधिक तिच्या मनातील भीती तिला पोखरत होती.. ती सतत तिच्या काकांचा—इन्स्पेक्टर सावंत यांचा विचार करत होती...रुद्रने दिलेल्या धमकीने तिचे अवसान गळाले होते... हा माणूस जे बोलतो , ते करू शकतो , याची तिला पूर्ण खात्री पटली होती...तिने अंधारातच चाचपडत स्वतःला सावरले आणि ती उभी राहिली... एक फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तिला संकटात डोकं शांत ठेवण्याची ...अजून वाचा