गणपती बाप्पा मोरया

(9)
  • 95.7k
  • 4
  • 41.3k

गणपती बाप्पा मोरया....!!! आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खुप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भारतातुन गणपतीच्या मुर्ती विदेशात पाठवल्या जातात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पुजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा

Full Novel

1

गणपती बाप्पा मोरया - भाग-१

गणपती बाप्पा मोरया....!!! आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खुप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भारतातुन गणपतीच्या मुर्ती विदेशात पाठवल्या जातात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पुजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा ...अजून वाचा

2

गणपती बाप्पा मोरया - भाग-२

भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो. गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा संबंध जोडला जातो . पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ' विघ्नहर्ता ' गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी असते व या पूजेनंतर त्यानंतर पावसाचे आगमन होते . विनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंद्राकडे नसून गणेशाकडेच आहे. परंतु गणेश व चंद्र यांचाही अन्योन्य संबंध आहे .ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते. गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक कहाणी या प्रकारे आहे: एकदा इंद्रसभेत ...अजून वाचा

3

गणपती बाप्पा मोरया - भाग-३

पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मुर्ती असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो. इथल्या मोरया गोसावी साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले होते. मोरया गोसावीची भक्ती इतकी होती की मंदिराबाहेर बसलेल्या मोरया गोसावीना भेटायला गणपती मंदिर सोडुन बाहेर आला असे म्हणतात . ' मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन असा गणपतीने त्याला “वर” दिला. त्याप्रमाणे मोरया गोसावी व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून , खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील ...अजून वाचा

4

गणपती बाप्पा मोरया - भाग ४

गणपतीची मूर्ती घरी नेताना वस्त्र पांघरून, अनवाणी पायांनी डोक्यावर टोपी घालून नेली जाते. औक्षण करून मूर्ती घरात घेतली जाते. गणपती बसविला जातो. व फुले पत्री घालून पूजा केली जाते .त्यानंतर पाच दिवस दररोज सकाळी, संध्याकाळी सहकुटुंब, शेजारी यांच्यासह सामुदायिक आरती, काही ठिकाणी अथर्वशीर्ष पठण होते. प्रसादवाटप होते. सकाळ संध्याकाळ वेगवेगळा प्रसाद वाटला जातो .दैनंदिन ताणतणावातून थोडी सुटका मिळत असल्याने कौटुंबिक, सामाजिक वातावरण चैतन्यमय वाटते. जीवनात काही काळ शुद्ध भावना, शांत, प्रसन्न प्रेरणादायी वातावरण यांची निर्मिती होते. गणपतीच्या रूपातून काय शिकायला मिळते ? त्याचे छोटे डोळे नाव, "पिंगाक्ष", मोठे डोके अर्थात मेंदू नाव "गजानन" हे सांगतात की छोट्या डोळ्यांनी आजूबाजूला चालले ...अजून वाचा

5

गणपती बाप्पा मोरया - भाग ५

सार्वजनिक गणेश उत्सवात भजन ,पुजन ,कीर्तन हे सामाजिक कार्यक्रम केले जातात .पूर्वी या काळात रस्त्यावर सिनेमे दाखवले जात असत करमणुकीचे कार्यक्रम केले जातात .एक दिवस सत्यनारायण पूजा ही ठेवली जाते .सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन हे अनंत चतुर्दशीलाच केले जाते .मोठ मोठ्या मिरवणुकी काढुन ताल वाद्यांच्या गजरात हे गणपती शहरातील तळी अथवा नदीत विसर्जन केले जातात .घरगुती गणपती विसर्जन प्रत्येक घराच्या प्रथे नुसार केले जात असते काही घरात अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते व गणेश विसर्जन त्या दिवशीच केले जाते.अनंत चतुर्दशीचे व्रत भाद्रपद शुध्द चतुर्दशीला केले जाते .अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि ...अजून वाचा

6

गणपती बाप्पा मोरया - भाग ६

यानंतर कौंडीण्य परतल्यावर सुशीला आणि कौंडीण्य परत रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान एक नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. "स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात! या नगराचे ,राज्य तुमचेच आहे." असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले. अनंतपूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते हे सुशिलेच्या लक्षात आले . एके दिवशी कौंडीण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, "हे हातावर तू काय बांधले आहेस?" सुशीला म्हणाली, "हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय