साकेतच्या कुटुंबात मुलगा झाला ही आनंदाची बातमी आहे. त्याला फोनवरून कळले की त्याच्या सासरच्या घरात मुलगा झाला आहे, आणि त्याच्यावर आनंदाचा ठसा आहे. साकेत आणि त्याची पत्नी जयश्री यांना तीन मुली झाल्यानंतर मुलगा मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. त्यांच्या मुलींचे नाव आनंदी, सोम्या, आणि सरिता आहे. त्यांना मुलगा होण्याची खूप इच्छा होती, पण तीन मुलींच्या जन्मानंतर घरात दुःखाचे वातावरण होते. जयश्री आणि साकेत यांच्या कुटुंबाला मुलगा होण्याची खूप अपेक्षा होती, आणि त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्यात आनंदी ही थोडी समजूतदार झाली होती, पण जयश्रीला मुलींच्या संगोपनातून सुटका हवी होती. साकेतच्या मनात अनेक विचार आहेत, आणि त्याला आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील स्थितीची चिंता आहे.
भाऊ झाला आहे! भाऊ!!
Manish Vasantrao Vasekar द्वारा मराठी महिला विशेष
2k Downloads
7.7k Views
वर्णन
आनंदी, सोम्या आणि सरिता अशा ओळींनी तीन मुलींच्या नंतर साकेतला ही पुत्र प्राप्ती झाली होती. खूप सारे नवस वृतवैकल्य करून झाले होते. मुलासाठी साकेत आणि जयश्री नि खूप उपास तापास करून खूप खस्ता खाल्या होत्या. साकेत आणि जयश्री मागील काही वर्षांपासून काहिश्या तणावा खाली होते. मागच्या काही वर्षात ते खूप बदलले होते आणि त्यानी हे जग बदलताना पाहिलं होत. आनंदीचा जन्म झाला तेव्हा साकेत ला बाप झाल्याचा खूप आनंद झाला होता. आणि म्हणून त्यानी तीच नावही आनंदी ठेवल. सुरवातीचे दोन वर्ष आनंदी चे खूप लाड झाले. तिच्या पहिल्या वाढदिवसाला मोठ गाव जेवण ठेवल होत. दोन वर्षांनी पुन्हा जयश्री कडून साकेत आणि त्याच्या घरचांच्या अपेक्षा सुरु झाल्या. जयश्रीच्या नंदांनी तर तगादा लावला वहिनी या वेळी मुलगा झाला पाहिजे . सासूबाई आणि जयश्रीच्या भावात तर मुलाच्या नावासाठी वाद सुरु झाले. सगळं परिवार मुलासाठी आतुर झालं होत. पण सोम्या चा जन्म झाला आणि घराला सुतक लागल्या सारख सगळं घर दुःखात बुडाल. आणि वर्षभरातच सरिता चा जन्म झाला आणि साकेत आपल्या टीम ची हॅट्रिक विकेट पडावी तशा हताश झाला. सरिताच्या जन्माची बातमी कुणी ओळखीच्यांनी विचारल्यावरच कळवण्यात आली. काहीतरी गंभीर झाल्या सारखा साकेत हि त्यांना सांगत असे आणि लोक पण अरे अरे ... चूक चूक... असं काही तरी पुटपुटयाचे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा