भाऊ झाला आहे! भाऊ!! Manish Vasantrao Vasekar द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

भाऊ झाला आहे! भाऊ!!

भाऊ झाला आहे! भाऊ!!

“ट्रिंग ट्रिंग .... ट्रिंग ट्रिंग”

साकेतच्या काळजाचा ठोका चुकला. चेहऱ्यवरचा घाम पुसत पुसत त्यानी रिसिव्हर उचलला. आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसल. त्याला हि कळलं नाही कि आपण आनंदाने वेडे का झालो नाही, आनंद साजरा का करू शकलो नाही. तीन पोरीच्या पाठीवर त्याला कुलदीपक म्हणतात तो झाला होता. फोन त्याच्या सासरहून होता, सासरे बुआ ओरडत होते "जावईबापू मुलगा झाला ! मुलगा !!...."

आनंदी, सोम्या आणि सरिता अशा ओळींनी तीन मुलींच्या नंतर साकेतला ही पुत्र प्राप्ती झाली होती. खूप सारे नवस वृतवैकल्य करून झाले होते. मुलासाठी साकेत आणि जयश्री नि खूप उपास तापास करून खूप खस्ता खाल्या होत्या. साकेत आणि जयश्री मागील काही वर्षांपासून काहिश्या तणावा खाली होते. मागच्या काही वर्षात ते खूप बदलले होते आणि त्यानी हे जग बदलताना पाहिलं होत. आनंदीचा जन्म झाला तेव्हा साकेत ला बाप झाल्याचा खूप आनंद झाला होता. आणि म्हणून त्यानी तीच नावही "आनंदी" ठेवल. सुरवातीचे दोन वर्ष आनंदी चे खूप लाड झाले. तिच्या पहिल्या वाढदिवसाला मोठ गाव जेवण ठेवल होत. दोन वर्षांनी पुन्हा जयश्री कडून साकेत आणि त्याच्या घरचांच्या अपेक्षा सुरु झाल्या. जयश्रीच्या नंदांनी तर तगादा लावला "वहिनी या वेळी मुलगा झाला पाहिजे". सासूबाई आणि जयश्रीच्या भावात तर मुलाच्या नावासाठी वाद सुरु झाले. सगळं परिवार मुलासाठी आतुर झालं होत. पण सोम्या चा जन्म झाला आणि घराला सुतक लागल्या सारख सगळं घर दुःखात बुडाल.

आणि वर्षभरातच सरिता चा जन्म झाला आणि साकेत आपल्या टीम ची हॅट्रिक विकेट पडावी तशा हताश झाला. सरिताच्या जन्माची बातमी कुणी ओळखीच्यांनी विचारल्यावरच कळवण्यात आली. काहीतरी गंभीर झाल्या सारखा साकेत हि त्यांना सांगत असे आणि लोक पण "अरे अरे ... चूक चूक..." असं काही तरी पुटपुटयाचे.

पुन्हा जयश्रीला दिवस गेले, ह्या वेळी खूप सल्लामसलत करून आणि सर्व देवा ना स्मरून योग्य योग जुळवून आणला होता. फक्त जोडीलाच नाही तर दोघांकडच्या परिवाराला खूप अपेक्षा होत्या. पण या सगळ्यात आनंदी सोम्या आणि सरिता याना कुठेही जागा नव्हती. आनंदी तशी थोडी समजुतीसार झाली होती. ती यंदा चौथी च्या वर्गात जाणार होती. जयश्रीला दिवस गेल्या पासून मुद्दामून तिने तिच्या मुलींना आपल्या पासून दूर ठेवला होत. कारण सासू बाई मागच्यावेळी बोलल्या होत्या कि दोन्ही मुलींची सावली पोटावर पडली आणि तिसरी पण मुलगी झाली. जयश्रीलाहि हे पटत नव्हत. तिला ही सरिता ला नीट बघायचं होत तिचे ही खूप लाड करायचे होते. पण सततच्या बाळंतपणातून तिलाही सुटका हवी होती. एकदा का मुलगा झाली कि तिची सुटका होणार हाती. तिला जवळ आणि दूरच्या सगळयांचे टोमणे ऐकून ऐकून फार वैताग यायचा. दिवस गेल्या पासूनच जयश्री माहेरी गेली होती. साकेत त्यांच्या तिन्ही मुली सोबत राहत होता. पण त्याचा सगळा जीव त्या होऊ घातलेल्या बाळात होता. तो त्यांच्या मुलीकडे जाणतेपणाने दिर्लक्ष करायाच.

मागच्या नऊ महिण्यापासून तर त्यांनी सरिता ला हात ही लावला नव्हता. सरिता आणि सोम्या ला सारखी आईची आठवण येत होती. त्या दोघी सारख्या साकेत कडे आई बदल विचारपूस करायच्या पण साकेत त्याना धड उत्तर द्याचा नाही, मुळात तो त्यांच्या व्देष करायचा. आनंदीला हे बाबा च वागणं बिलकुल निराळ वाटत होत कारण सुरवातीचे काही वर्ष साकेत तिचे आणि सोम्याचे सुद्धा खूप लाड करायचा. सरिता चा जन्म झाल्या पासून साकेत ने त्यांच्या तिन्ही मुलीचा व्देष करण चालू केल होत.

आता साकेत ला फार वाट बघायची गरज नव्हती. डॉक्टर उद्या जयश्रीची डिलेव्हरी करणार होते. साकेत ला टेन्शन आले होते खरे पण या वेळी त्यांनी खूप देव देव केले होते. या वेळी मुदामून तो जयश्री सोबत नव्हता, मागच्या दोन्ही वेळेस तो हजर असताना त्यांना सोम्या आणि सरिता ह्या झाल्या होत्या. कामात लक्ष लागत नव्हत म्हणून तो आज ऑफिस मधून लवकर आला आणि आपल्या खोलीत जाऊन बसला. हॉल मध्ये त्याच्या तीनही मुली अभ्यास करत बसल्या होत्या, आनंदी ने विचारल "बाबा बरे नाही का, आज लवकर आलात ऑफिस मधून, पाणी देऊ का ...." साकेत नेहमी प्रमाणे तिघींकडे दुर्लक्ष करीत तडक त्याच्या बेडरूम मध्ये गेला. आनंदी ला राग नाही आला, तिला हे रोजचे होत. तिघीनी आपला अभ्यास संपून मग जेवून उरकून घेतल.

रात्रीचे अकरा वाजले होते, साकेत ला काही कुजबुजल्या सारख जाणवलं. तो मुलींच्या रूम जवळ गेला, अत्ता त्याला स्पष्ट ऐकू येत होत.

सरिता बोलली " ताई, अत्ता आपल्याला भाऊ होणार ना"

आनंदी "हो ग सरिता अत्ता आपला भाऊ आलाच पाहिजे, नाही तर आई बाबा खूप दुखी होतील"

आनंदी बोलत होती " आईला सरिताच्या वेळेसच खूप त्रास झाला होता. तीच पोट खूप दुखायचं, ती सारखी रडायची, माझा आणि सोम्या चा खूप राग राग करायची"

सोम्या रडत रडत म्हणाली "आई मला खूप मारायची आणि माझा लाड पण करायची नाही आणि अत्ता पण करत नाही"

आनंदी "देवा आम्हाला वर्गात पहिला नंबर नको , परीक्षेत मार्क नकोत, काही काही नको. आम्हाला फक्त भाऊ पाहिजे. आणि हो आई-बाबा चे लाड हवेत. मला आई बाबा खूप आवडतात"

सोम्या "देवबाप्पा, मला खाऊ नको, आणि बेबीडॉल नको. मला पण भाऊ पाहिजे"

लगेच सरिता बोलली "मला पण आई-बाबा, ताई आणि दादा पाहिजे. आणि हो खेळणी पण पाहिजे"

आनंदी दुखी होऊन सांगत होती "खूप दिवस झाले मी आई च्या हात चे पोहे नाही खाल्लेलं, आई ची अन्ने म्हणून हाक हि नाही ऐकली, खूप दिवस झाले तिचा मार हि खाला नाही. मला शाळेत हि जावंस वाटत नाही. मला आता बाबाची भीती वाटते कधी हि ते आम्हाला घरा बाहेर काढू शकतात. बाबा ला राग येऊ नई म्हणून मी आता त्यांना काही हि मागत नाही. जास्त खर्च नको म्हणून मी शिकवणी ला जायचं पण बंद केलय. मी आता जास्त जेवण पण करत नाही, भूक असेल तरी. आजी सारखी म्हणत असते किती खातात ह्या पोरी, आम्हाला भार झाल्या आहेत. सरिता ला जास्त दूध पाहिजे असत पण आजी तिला पण जास्त दूध देत नाही म्हणू आता आम्ही दोघीनी आमचं दूध न पिता तसच ठेवतो आणि दुपारी नाहीतर संध्याकाळी तिला लागेल तस पाजवतो.

बाबाला कस सांगू सोम्या चा युनिफॉर्म फाटला आहे आणि तो पण नको तिथे. शाळेत तिला तिच्या मिस रागावतात कि बाबा नवीन युनिफॉम घायाला सांग. मला कळत नाही आम्हाला भाऊ होत नाही ह्यात आमची काय चुकी आहे. आई बाबा आम्हाला का रागवतात”

आनंदी ला रडू येत होत, तिने सोम्या आणि सरिताचा पाप्पा घेतला आणि झोपण्याचा प्रयत्न केला.

साकेत ला हे सर्व ऐकून स्वतःची लाज वाटली. ह्या तिन्ही मुली पण शेवटी त्याच्या हाड मासाच्या च तर होत्या. खरंच ह्यात या तिघींची काय चूक आणि आपण ह्यांचा किती राग राग केला. तिघींचा किती जीव आहे आपल्यावर. आणि आम्ही त्यांना काय दिलं. आनंदी तर किती समजूतदार झाली आहे. अशा गोड मुलींच्या नशिबात आपण हे काय विष पेरतो आहेत. साकेत ला स्वतः चीच खूप लाज वाटत होती. त्याला त्या रात्री झोप आली नाही.

सकाळी सकाळीच फोन खणखणला आणि मुलगा झाल्याची बातमी साकेत ला कळाली. पण त्याच वेळी रात्रीचे आनंदीचे बोल त्याच्या मनाला दुखी करून गेले. तो तडक मुलींच्या रूम मध्ये गेला. आनंदी जागी होती तिला बाबा आता रागावणार असे वाटले. तिला रडू येत होत. पण साकेत त्यांच्या जवळ गेला तिघींना जवळ घेत त्यांचा लाड करायला लागला . तो त्यांची मनोमन माफी पण मागत होता. तो म्हणाला "आनंदी तुझ्या भावाचं नाव काय ठेवायचं ते सांग. तुम्हाला भाऊ झाला आहे! भाऊ !!"

मनिष वसंतराव वसेकर,

परभणी