कथेत एक गावात शंकराचे स्वयंभू देऊळ आहे, जिथे गावाचा राजा रोज पूजा करतो. राजा देवाला सोन्याचा मुखवटा अर्पण करतो आणि त्याची पूजा भव्यपणे होते. गावाजवळ एक संन्यासी राहतो, जो देवाच्या प्रदक्षिणा घालतो आणि साध्या जीवनात रमतो. एक परगावचा मनुष्य संन्यासाकडे येतो आणि विचारतो की देवाचा खरा भक्त कोण आहे. संन्यासी सांगतो की एक गुराखी रोज येतो आणि तो खरा भक्त आहे, जरी त्याला पूजा करण्याची साधने नसतील. मनुष्य संन्यासाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून संन्यासी त्याला पुढील दिवशी प्रचीती दाखवण्याचे आश्वासन देतो. दुसऱ्या दिवशी राजा पूजा करतो, आणि अचानक देऊळ हलू लागते, ज्यामुळे भक्तीच्या वास्तवतेचा अनुभव घेता येतो.
सोनसाखळी - 4
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
5k Downloads
13.6k Views
वर्णन
एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. पाहि मां पाहि मां म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा