"जन्मभूमीचा त्याग" ही कथा सायगाव नावाच्या एका सुखी आणि समृद्ध गावाची आहे, जिथे लोक एकत्रितपणे नांदतात आणि अपराध केल्यास देवासमोर जाऊन त्याची चौकशी केली जाते. गावात दोन मित्र, विनू आणि मनू, आहेत. मनू एकटा आहे, त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि त्याची लहान बहीण देखील देवाघरी गेली आहे, ज्यामुळे त्याला मोठा दु:ख झाला आहे. विनू, जो मनूच्या साथीशिवाय जगू शकत नाही, एक दिवस गावात आलेल्या श्रीमंताच्या खूनाचा विचार करतो आणि त्याला लुटतो. विनूने रक्ताने माखलेला सुरा मनूच्या उशाशी ठेवतो आणि नंतर आपल्या घरी जातो. सकाळी, त्या श्रीमंताचा मृतदेह सापडतो, ज्यामुळे मनूला गुन्ह्यात अडकण्याचा धोका निर्माण होतो. कथा गुन्हा, मित्रत्व आणि नैतिकतेच्या प्रश्नांना स्पर्श करते. जन्मभूमीचा त्याग Sane Guruji द्वारा मराठी सामाजिक कथा 1.3k 3.8k Downloads 13k Views Writen by Sane Guruji Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता. गाव मोठा सुखी व समृद्ध होता. गावात नाना प्रकारचे धंदे चालत. शेतकरी, विणकरी, रंगारी, पिंजारी, सोनार, सुतार, लोहार, कुंभार- सर्व प्रकारचे लोक होते. गावात भांडण बहुधा होत नसे. मारामारी होत नसे कोणी कोणाचा हेवादावा करीत नसे. सारे गुण्यागोविंदाने नांदत. सायगावची एक विशिष्ट परंपरा होती. त्या गावचे लोक कधी राजाकडे न्याय मागायला जात नसत. ‘पाप करणारा असेल त्याला देव शिक्षा करीलच’ असे ते म्हणत. ‘पाप करणार्याचे मन त्याला खातच असते, आणखी त्याला शिक्षा कशाला?’ असेही कोणी म्हणत. जर गावात अपराध झालाच, तर सारे लोक देवळात जमत. कोणी अपराध केला त्याची चौकशी होई. अपराध करणार्याचे नाव देवासमोर सांगण्यात येई. त्याला दुसरी शिक्षा नसे. गावातील सर्व लहान-थोरांना अपराध करणार्याचे नाव कळे. त्याच्याकडे सारे लोक ‘हा तो अपराधी’ अशा दृष्टीने बघत. हीच शिक्षा. More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा