ही गोष्ट एका राजा हद्दीची आहे, जो लहान मुलांना नमस्कार करतो परंतु म्हाताऱ्या लोकांना नाही. त्यामुळे लोक राजाला वेडा समजतात. प्रधान राजा सोबत चर्चा करतो आणि त्याला सांगतो की लोक राजाच्या या वर्तनाबद्दल गोंधळात आहेत. राजा आपल्या वर्तनाचे स्पष्टीकरण करतो, तो म्हणतो की लहान मुलांमध्ये भविष्याची संभावना आहे, कारण त्यांच्यात अदृश्य सामर्थ्य आहे. म्हणूनच तो त्यांना वंदन करतो. राजा त्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवतो, जसे की फुलबागा आणि क्रीडांगणे तयार करणे. यामुळे प्रधान राजाच्या दृष्टीकोनाचे समर्थन करतो आणि मानतो की राजा खूप दूरदर्शी आहे.
सोनसाखळी - 5
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
4.4k Downloads
13k Views
वर्णन
एक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले. गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, आज इतक्या लवकर काय काम आहे? प्रधान म्हणाला, महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे. राजा म्हणाला, विचारा. संकोच करु नका. प्रधान म्हणाला, महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात. राजा म्हणाला, का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात? प्रधान म्हणाला, महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा