"शबरी" कथा आर्यांच्या विजय आणि विस्ताराच्या काळात सेट केलेली आहे. आर्य लोक प्रथम पंजाबात आले, आणि गंगा व यमुना नद्यांच्या समृद्ध प्रदेशात स्थायिक झाले. येथे धर्म, तत्त्वज्ञान, आणि कला यांचा विकास झाला. कथा पुढे सांगते की, काही धाडसी आर्य लंका बेटावर गेले, जिथे मोत्यांची आणि सोन्याची खाणी होती. लंकाधीश रावण उत्तरेकडे विजयासाठी निघाला, तर संस्कृतिप्रसार करणारे ऋषी दक्षिणेकडे आले. अगस्ती ऋषी विंध्यपर्वत ओलांडून दक्षिणेत आले आणि इतिहासात त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. त्याने अनेक प्रवास केले आणि सात समुद्र ओलांडले, हे त्याच्या साहसाचे प्रतीक आहे. ही कथा आर्यांच्या संस्कृतीच्या प्रसार आणि इतिहासाच्या निर्मितीबद्दल माहिती देते. शबरी Sane Guruji द्वारा मराठी सामाजिक कथा 2.6k 4.6k Downloads 18.5k Views Writen by Sane Guruji Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तो काळ आर्यांच्या विजयाचा व विस्ताराचा होता. आर्य प्रथम पंजाबात आले, तेथे नीट पाय रोवून ते आणखी पुढे सरकले. गंगा व यमुना या सुंदर विशाल नद्यांच्या गहिऱ्या पाण्याने समृद्ध व सुपीक झालेल्या रमणीय प्रदेशांत आर्य राजे करुन राहू लागले. सृष्टिसुंदरीने वरदहस्त ठेवलेल्या याच प्रदेशात, जनकासारखे राजर्षी जन्मले. धर्म, तत्त्वज्ञान, कला यांचा विकास येथेच प्रथम झाला व संस्कृतिसूर्याचे हे येथील किरण हळूहळू अखिल भारतवर्षावर पसरु लागले. उत्तर हिंदुस्थानात आर्यांच्या वसाहती सर्वत्र होण्यापूर्वीच ओढ्या प्रांतातून समुद्रकिनार्यापर्यंत येऊन तेथे गलबतात बसून काही धाडसी आर्य खाली सिलोन ऊर्फ लंका बेटात गेले. या बेटाजवळ मोत्यांच्या खाणी होत्या. सोन्याच्या खाणी होत्या. हे राज्य समृद्ध झाले. लंकाधीश रावणासारखा महत्त्वाकांक्षी राजा उत्तरेकडे दिग्विजय करण्यास निघाला व नाशिकपर्यंत आला. तेथे त्याने आपले अधिकारी ठेवले. रावणासारखे राजे दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होते, तर दुसरे संस्कृतिप्रसार करणारे धाडसी ऋषी विंध्यपर्वत ओलांडून खाली दक्षिणेकडे येत होते. More Likes This उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा