"संपूर्ण बाळकराम" या कथेत मानवी बुद्धीच्या ज्ञानाच्या दोन अंगांवर चर्चा केली आहे - तात्त्विक (Theoretical) आणि व्यावहारिक (Practical). लेखक यावर प्रकाश टाकतो की कोणत्याही विषयाची खरी समज मिळवण्यासाठी या दोन्ही ज्ञानाची आवश्यकता आहे. उदाहरणादाखल, पुस्तकांमधील ज्ञान असले तरी त्याची व्यावहारिक अंमलबजावणी न केल्यास ते बेकार ठरते. कथेत एक गाडी टोलनाक्यावरून कशी नेली जाईल, यावर गावकऱ्यांच्या विचारांची चर्चा आहे. गाडीच्या जकात टाळण्याचे विविध उपाय शोधले जातात, जसे की गाडी टोलनाक्याच्या पाठीमागून नेणे किंवा नाकेदाराला गोंधळात टाकणे. हे सर्व प्रयत्न सिद्ध करतात की ज्ञान आणि अनुभव यांची मांडणी कशी महत्त्वाची आहे, अन्यथा समस्यांमध्ये योग्य निर्णय घेणे अवघड होते. या कथेत ज्ञानाच्या तात्त्विक आणि व्यावहारिक अंगांमधील संतुलन साधण्यावर जोर देण्यात आला आहे. संपूर्ण बाळकराम - 3 Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा 3 3k Downloads 7.5k Views Writen by Ram Ganesh Gadkari Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आता एकच विचार, कोणी नवरा त्याशी समर्पू म्हणे। मानवी बुध्दीच्या आटोक्यात येणार्या कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची, सामान्यत: तात्त्वि (Theoretical) व व्यावहारिक (Practical) अशी दोन अंगे असतात. यापैकी कोणत्याही एकाचाच परिचय होऊन भागत नाही. त्यापैकी कोणतेही एक दुसर्यावाचून भटकताना दिसले, म्हणजे विरहावस्थेतील प्रणयीजनाप्रमाणे बेवकूब ठरून ते उपहासाला पात्र होते. पहिल्याला 'पुस्तकी विद्या' हे नाव मिळून दुसर्याची आडमुठेपणात जमा होते. 'बारीक तांदूळ तितके चांगले' हे पुस्तकी सूत्र पाठ म्हणणारा पक्वपंडित व्यावहारिक ज्ञानाच्या अभावी, बारकातले बारीक तांदूळ म्हणून कण्याच घेऊन घरी येतो! पोहण्याच्या पुस्तकातील नियम हृदयात साठवून, समोर मोठया मेजावर ठेवलेल्या बशीभर पाण्यातल्या बेडकाबरहुकूम हातपाय पाखडणारा तितीर्षु बारा वर्षे असे अध्ययन करूनही शेवटी स्नान करताना झोक जाऊन बालडीभर पाण्यात बुडून मेल्यास नवल नाही! चोवीस वर्षाच्या एका नवरदेवाऐवजी बारबारा वर्षाचे दोन विचवे चालतील किंवा नाही, ही शंका काढणारे डोकेही केवळ एकांगी ज्ञानानेच एकीकडे कलते झाले असले पाहिजे. Novels संपूर्ण बाळकराम वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येत... More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा