×

वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब्द फुटतात, पांढर्‍या सशांना पोरे होतात, मेंढयावरची लोकर कातरतात, कोकिळेला कंठ फुटतो, छत्र्यांवर नवे अभे्र ...अजून वाचा

लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी वर शोधाया जाण्यापूर्वी किती तयारी लागे - बाळकराम कोणत्याही महत्कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्याची आधी किती तरी तयारी करावी लागते, याचे थोडक्यात चटकदार वर्णन शिरोभागी दिलेल्या अर्ध्या साकीत कवीने दिलेलेच आहे! परीक्षेचे कागद तीन तासांत चट्दिशी लिहून काढण्यासाठी आलेला ...अजून वाचा

आता एकच विचार, कोणी नवरा त्याशी समर्पू म्हणे। मानवी बुध्दीच्या आटोक्यात येणार्‍या कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची, सामान्यत: तात्त्वि (Theoretical) व व्यावहारिक (Practical) अशी दोन अंगे असतात. यापैकी कोणत्याही एकाचाच परिचय होऊन भागत नाही. त्यापैकी कोणतेही एक दुसर्‍यावाचून भटकताना दिसले, म्हणजे विरहावस्थेतील ...अजून वाचा

प्रस्तुत लेखाचा मथळा वाचून लगेच लेखकाच्या नावावर नजर टाकताच माझ्या सार्‍या वाचकभगिनी एकदम थबकतील, आणि मला स्वयंपाकघरातून हाकलून लावण्याचा ठराव करू लागतील! माझ्या भगिनीवर्गाने आपल्या या गरीब भावंडावर अशी आग पाखडण्यापूर्वी पुढील चार शब्द वाचून पाहण्याची कृपा करावी. माझ्या ...अजून वाचा

या जगतीतलावर अखिल मानवजातीच्या सुखसमाधानाची जी जी साधने आहेत, त्या सर्वात काव्याला सर्व राष्ट्रांनी, सर्व धर्मांनी आणि सर्व जातींनी एकमताने अग्रस्थान दिलेले आहे. काव्यात राष्ट्राचे बुध्दिवैभव आणि कर्तृत्वशक्ती इतिहास आणि संस्कृती, विकारोत्कर्ष आणि नीतिमत्ता, अशी जोडपी एकाच वेळी विहरत ...अजून वाचा

नाटकाच्या धंद्यात मोरावळयाप्रमाणे मुरलेल्या माझ्या एका सन्मान्य मित्राने मराठी नाटयविदृक्षु लोकांस 'नाटक कसे पाहावे?' हे सांगण्याचा यत्न केला आहे. हेच गृहस्थ भावी मराठी लेखकांना 'नाटक कसे लिहावे?' याविषयी काही धडे देणार आहेत असे माझ्या कानावर आले आहे. त्यावरून सदरहू ...अजून वाचा

ईशस्तुतीला सुरुवात करण्यापूर्वी वास्तविक पाहता नाटयकथानक (Plot) वगैरे काही गोष्टींचा विचार करावयास पाहिजे होता पण मागील खेपेस वचन देऊन चुकल्यामुळे 'ईशस्तुती'पासूनच सुरुवात करणे भाग पडत आहे. म्हणून कथानक वगैरेंचा विचार मागाहून होईल.

प्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजू जिल्हानिहाय गौरकाय अधिकारी, जिल्ह्यांच्या विस्तृत पटांगणात कलेक्टर, मॅजिस्ट्रेट व प्रसंगी पोलिटिकल एजंट या तीन निरनिराळया रूपांनी वावरत असतो त्याचप्रमाणे बार्शी लाइट रेल्वेचा अर्धगौर गार्ड, गाडी चालत असेपर्यंत गार्ड, स्टेशनवर उभी राहावयाचे ...अजून वाचा

छोट्या जगूचा 'रिपोर्ट' धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीतच होता. एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्नसमारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या समवयस्क मित्रांना खाली लिहिल्याप्रमाणे 'रिपोर्ट' दिला- खेळ मुद्दाम बांधिलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचेच केले होते आणि फारच लहान होते. 'सीन' जंगलाचा ...अजून वाचा

पूर्वार्ध काही वर्षांपूर्वी 'केसरी' पत्रात एका पुस्तकाबद्दल विनोदात्मक, परंतु मनन करण्यासारखा अभिप्राय आला होता. त्या पुस्तकाचे नाव 'जेवावे कसे' हे होते. केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या बरेवाईटपणाकडे फारसे लक्ष न देता त्याच्या अकालदर्शनाबद्दल मात्र अभिप्राय दिला होता. सध्या लोकांपुढे 'जेवावे कसे' हा ...अजून वाचा

(स्थळ : विक्रांताच्या घरातील माजघर. पात्रे: ठमाबाई, उमाबाई, भामाबाई, चिमाबाई वगैरे बायका व आवडी, बगडी वगैरे परकर्‍या पोरी, बाळंतपदर घेतलेली व पिवळीफिक्कट अशी विक्रांताची आई, मध्यंतरी टांगलेला पाळणा पाळण्यात बारा दिवसांचा विक्रांत.) सर्व बायका : पद - (चाल- हजारो वर्षे ...अजून वाचा

(स्थळ: घरासमोरील अंगण. वेळ- चांदण्या रात्रीचा पहिला प्रहर. पात्रे: भोकाड पसरून रडणारा आठ-दहा महिन्यांचा बाबू. बाबूची समजूत घालीत असलेले त्याचे वडील- तर्कालंकारचूडामणी प्रोफेसर कोटिबुध्दे.) प्रा. कोटिबुध्दे : (गंभीर वाणीने) बाबू, रडू नकोस! रडण्याने स्वत: रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून, आसमंतात्भागी वास्तव्य ...अजून वाचा

(दामू कोशांतून शब्द काढीत आहे एका बाजूला दिनू भूगोल घोकीत आहे प्रत्येकाजवळ पुस्तके व वह्या पडल्या आहेत जवळच कपडे पडले आहेत.) दामू : (डिक्शनरीत पाहतो) एफ ए बी एल ई, एफ ए- दिनू : (मोठयाने) खानदेश जिल्ह्यातील तालुके- (तीनदा घोकतो.) ...अजून वाचा

मनुष्याचे मन सदासर्वदा उत्सवप्रिय असते. यद्यपि, कैक नाटक-कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांचा आरंभ या वाक्याने झाला असला, पुराणाभिमानी लोकांनाही हे मत मान्य असले, 'दक्षिणा प्राइज कमिटीने' बक्षिसास पात्र ठरविलेल्या पुस्तकांतही जरी हे वाक्य एखादे वेळी दिसून आले, फार कशाला हे वचन शाळाखात्याने ...अजून वाचा

मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चिंतयेत्। - संस्कृत सुभाषित. परमेश्वराच्या या विविधविषय विश्वविद्यालयात प्राणिमात्राला आजन्म अनुभवाच्या शिक्षणक्रमांतून पसार व्हावे लागत असते. आणि या आयर्ुव्यापी अभ्यासात प्रत्येकाला त्रिकालबाधित सत्यापैकी कोठल्या तरी प्रमेयाचा कृत्य सिध्दान्त स्वरूपाने यथाबुद्ध्या प्रत्यय येत असतो. कोणाला 'सत्यमेव जयते ...अजून वाचा