"संपूर्ण बाळकराम" हा राम गणेश गडकरी यांच्या विपुल विनोदी लिखाणाचा एक भाग आहे. या लिखाणात 'बाळकराम' या टोपण नावाने अनेक विषयांवर चर्चा केली आहे, जसे की लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी, लग्न मोडण्याची कारणे, स्वयंपाक घरातील गोष्टी, नाटक लेखन, आणि इतर विविध गोष्टी. गडकरी यांच्या लेखनात विनोदी दृष्टिकोन आणि जीवनातील विविध पैलूंचा समावेश आहे, जे वाचकांना मनोरंजक ठरते.
संपूर्ण बाळकराम - 1
Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा
7.2k Downloads
14.2k Views
वर्णन
वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येतात, ठिकठिकाणच्या वक्त्यांना शब्द फुटतात, पांढर्या सशांना पोरे होतात, मेंढयावरची लोकर कातरतात, कोकिळेला कंठ फुटतो, छत्र्यांवर नवे अभे्र चढतात, शहरबाजारांतून खेडेगांवच्या पाहुण्यांना ऊत येतो, मोराला नवा पिसारा फुटतो, कुत्र्यांना लूत लागते, तोरणा-करवंदांचे पेव फुटते, कलिंगडे विकावयास येतात, वगैरे हजारो घडामोडींनी चराचरसृष्टी अगदी गजबजून जाते. या चमत्कारसृष्टीतच आणखी एका चमत्कारमय फेरफाराची गणना करावयास पाहिजे. वसंतोत्सवाच्या सुमारास अनेक फेरफारांप्रमाणेच नवर्या मुलांची व त्यांच्या आईबापांची माथी फिरत असतात! पिसाळलेले कुत्रे चावलेला मनुष्य ज्याप्रमाणे आंगोठीच्या मेघांचा गडगडाट ऐकताच पुन्हा पिसाळतो, त्याप्रमाणेच मुंजीच्या वाजंत्र्यांचा कडकडाट कानी पडताच 'उपवधू' मुलांच्या व त्यांच्या वाडवडिलांच्या अंगी भिनलेले अहंपणाचे विषही तडाक्यासरशी उचल खात असते. क्षणार्धात त्यांना आपल्या स्थितीचा, आपल्या किमतीचा, आपल्या योग्यतेचा, किंबहुना आपल्या स्वत:चाही विसर पडून ते अंकगणिताचे पुस्तक रचणार्या संख्या-पंडिताप्रमाणे सरसहा मोठमोठाल्या रकमा बडबडू लागतात, आणि बिचार्या मुलीच्या बापांना ही अवघड उदाहरणे सोडवावी लागतात. ईश्वराच्या दयेने मला स्वत:ला मुलगी नाही! परंतु काही स्नेह्यासोबत्यांबरोबर करमणुकीखातर खेटे घालून या बाबतीत मी जो अनुभव मिळविला आहे, त्याचा फायदा मी उदार बुध्दीने वाचकांना देण्याचे योजिले आहे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा