एका गावात एक मनुष्य होता ज्याला दोन बायका होत्या - एक आवडती आणि एक नावडती. नावडती बाई दिसायला चांगली नव्हती आणि तिला खूप कामे करावी लागायची. ती दिवसभर कष्ट करत असे, पण तिच्या कष्टांचे कौतुक होत नव्हते, उलट तिला अपमान सहन करावा लागे. तिच्या जीवनात प्रेम आणि सहानुभूतीचा अभाव होता, ज्यामुळे ती अत्यंत दु:खी झाली. एक दिवस, तिला तिच्या दु:खातून सुटका करून घेण्याची इच्छा झाली आणि ती गावातून बाहेर पडली. तिच्या सोबत तिचे दु:ख आणि अश्रू होते. ती रस्त्यावर चालताना काटे आणि दगडांची चिरफाड सहन करत होती, परंतु तिच्या सवतीच्या शिव्यांपेक्षा ते अधिक दु:खदायी नसले तरी तिचे मन उदास होते. या गोष्टीत नावडतीच्या दु:खाची आणि तिच्या कष्टांची कथा आहे, ज्यामुळे तिच्या जीवनात प्रेमाची आणि आदराची किती गरज आहे, हे स्पष्ट होते.
खरा मित्र - 1
Sane Guruji
द्वारा
मराठी कथा
23.8k Downloads
48.2k Views
वर्णन
एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा