गोष्ट पावसाळ्यातील आहे, जिथे एक व्यक्ती पुण्याहून सोलापूरकडे जात असतो. त्याच्या गाडीला उशीर झालेला असतो कारण कन्याकुमारी एक्स्प्रेस खूप उशिरा येते. रात्रीच्या अंधारात गाडी चालवत असताना रस्त्यावरची परिस्थिती निसरडी आणि रहदारी कमी होत जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल्सच्या लाईट्स बंद झालेल्या असतात, काही ठिकाणी ढाबे चालू असतात. अचानक, एका ठिकाणी एक पांढरी स्कोडा गाडी उभी दिसते, ज्याच्या बाजूला एक जोडपं उभं असतं. ते गाडी थांबवण्यासाठी अंगठ्याची खुण करत आहेत. या दृश्यामुळे त्याला थोडा गोंधळ निर्माण होतो, कारण त्याला घरात उशीर झालेला असतो आणि तो लवकरात लवकर घरी पोहोचण्याची इच्छा बाळगतो. मोक्ष एक रहस्य Vaibhav Karande द्वारा मराठी सामाजिक कथा 22 2.4k Downloads 8.8k Views Writen by Vaibhav Karande Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बोचरी थंडी अंगात शिरून अंगभर गारवा मुरवत होती. सुंसुं आवाज करत वारे कानाशी लगट करत होते. सोलापूर मागे पडून आता बराच वेळ झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील लाईटस बंद झाले होते, काही ठिकाणी बाहेरचे दिवेही मालवलेले होते. एखाद दुसरा ढाबा फिकट पिवळसर उजेडात जाग असल्याची साक्ष पटवून देत होता. लॉंग ड्राईव्हवरील मोठाले ट्रक्स छोट्याशा विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वा अशा ढाब्यात थोड्या वेळासाठी थांबत असल्याने तिथे तुरळक गर्दी दिसत होती. एखाद्या छोट्याशा टपरीवजा चहाच्या ठेल्यावरील भरारा आवाज काढणारा निळ्या पिवळ्या ज्योतीचा स्टोव्ह आणि त्यावर ठेवलेली जर्मनची चहाची किटली उगाच लक्ष वेधून घेत होती. अवती भोवती तोंडाला मफलर गुंडाळून पेंगुळलेल्या झोपेला दूर सारण्याच्या अनिच्छेने दोन चार माणसं हाताची घडी घालून उभी होती. More Likes This तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Swati क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा श्रीराम विनायक काळे कोरोनाची तिसरी लाट द्वारा श्रीराम विनायक काळे अत्रंग द्वारा श्रीराम विनायक काळे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा