कथा "नॅक भेटीची" एक महाविद्यालयाच्या गुणवत्ता तपासणीच्या तयारीवर आधारित आहे. बेंगलोर येथील नॅक समितीच्या भेटीच्या तयारीसाठी, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून मेहनत करत आहेत. इमारतीला रंगरंगोटी, फर्निचर सुधारणा आणि परिसरातील स्वच्छता यावर जोर देण्यात आला आहे, ज्यामुळे महाविद्यालय दिवाळीच्या उत्सवासारखे दिसत आहे. प्राचार्य आणि प्राध्यापकांनी समितीच्या अपेक्षा आणि नॅकच्या नियमावलीवर अनेक बैठकांमध्ये चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना समजूत घालून दिली आहे की जर तासिका झाल्या नाहीत तरी चालेल, कारण त्यांना चांगल्या दिवसांची आशा आहे. महाविद्यालयाच्या परिसरात सजावट, सुविचारांची पाट्या लावणे, आणि रस्त्याची देखभाल यांसारख्या कामांनी वातावरण सुधारले आहे. जवळजवळ समितीच्या भेटीची तारीख जवळ आली आहे आणि गावातील लोक या अचानक बदलांवर चर्चा करत आहेत. प्राचार्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांची सभा घेतली आहे, ज्यामध्ये समितीच्या सभासदांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जावीत, असा आदेश दिला आहे.
कथा नॅक भेटीची
Dharmapurikar Ranjeet द्वारा मराठी हास्य कथा
3.2k Downloads
12k Views
वर्णन
महाविद्यालयाची गुणवत्ता तपासण्या करिता बेंगलोर येथून नॅक समिती येणार होती. तालुका पातळीवरचं ते महाविद्यालय. वर्ग चार ते प्राचार्या पर्यंत सर्वच गेले सहा महिण्यापासून अहोरात्र राबत होते. इमारतीला रंगरंगोटी, डागडूजी, फर्निचर दूरुस्ती किंवा नवीन खरेदी असे कार्य युध्द्पातळीवर चालू होते. महाविद्यालय जणूकाही दिवाळी साजरी करत आहे असेच त्या गावातील लोकांना वाटू लागले. प्राचार्यानी संस्थेच्या सचीवासोबत, प्राध्यापकांच्या सहा, सात बैठ्का घेतल्या होत्या. त्या समितीला काय अपेक्षित आहे, नॅकची नियमावली काय आहे. या सर्वाची उजळ्णी वारंवार करुन घेतल्या जात होती. या सर्व धावपळी कडे विद्यार्थी आता आपल्याला कहिंतरी चांगले दिवस येणार आहेत अशा आशेवर, तासिका झाल्या नाहीत तरी चालतील अशी प्राध्यापकांची समजूत काढ्त होते. प्राध्यापक स्वतःच्या व त्याच्या संबंधीत विभागाच्या प्रोफाईल ला ‘पावडर’ लावून ती कशी चांगली दिसेल या प्रयत्नात होते. प्राचार्य तर एक महिन्या पासून व्ह्रराड्यांत टेबल खुर्ची टाकुन बसले होते. कारण त्यांच्या केबिनची सजावट रंगात आली होती. खिडक्यांना पड्दे, सोफा, रेवोल्विंग चेअर, मॅट, एसी अशी त्यांच्या केबीनची तयारी होत होती. त्यांनी ओएस ला सुचना केली माझ्या खुर्ची वर पांढरा शुभ्र टॉवेल पाहीजे बर का . वाट्ल्यास विद्यापीठाच्या अमुक अमुक अधिकार्याच्या खुर्चीवर कसा टॉवेल आहे तो पाहून या. प्राचार्याच्या गटाचे प्राध्यापक हळूच प्राच्यार्याच्या कानात सांगायचे, जे पाहिजे ते आताच मागवूनघ्या बरका हीच वेळ आहे. नंतर कोणीही विचारत नाही. प्राचार्य हसायचे मान हलवायचे. प्राध्यापक सुद्धा आपण कांही तरी मह्त्वाचे सांगितले अशा थाटात ते त्यांच्या कामाला निघायचे. सुविचार, शिक्षण विषयक विचारांच्या पाट्या महाविद्यालयात सर्वत्र लावल्या जात होत्या. महाविद्यालयाला येणारा ओबड धाबड रस्ता मुरूम टाकून चांगला केला गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडांची माळ सजवून त्यावर चूना टाकण्यात आला होता. इतके दिवस रुक्ष दिसणारा रस्ता आता महाविद्यालयाकडे पाहून हसत होता. महाविद्यालयाच्या व्हरांड्यात,प्रत्येक विभागात झाडाच्या कुंड्या होमगार्डला ला उभे करावे तश्या ठेवल्या होत्या. झूलॉजी लॅबच्या बाहेर रोज आराम करणार्या कुत्र्याला सुध्दा आता परिसरात प्रवेश बंद झाला होता. संस्थेच्या अध्यक्षांच्या घरी काम कणार्या सेवकाला अध्यक्षांनी समिती येवून जाई पर्यंत महाविद्यालयात पाठवले होते. सदैव ईन, बूटाला पॉलिश, केसांचा कोंबडा पाडणारा सेवक, पांढर्याशुभ्र वेषात टोपी परिधान करून आल्याने,प्राचार्यानी त्याला प्रथमतः ओळ्खलेच नाही. गेल्या महिण्याभराच्या त्याच्या सह्या मस्टर वर झाल्या नंतर प्राचार्य साहेबानी त्याला विचारले, अध्यक्ष साहेबानी पाठ्वले का थोड्याश्या नाराजीनेच होकार देत तो केबीनच्या बाहेर पड्ला.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा