Katha nek bhetichi books and stories free download online pdf in Marathi

कथा नॅक भेटीची

कथा नॅक भेटीची

महाविद्यालयाची गुणवत्ता तपासण्या करिता बेंगलोर येथून नॅक समिती येणार होती. तालुका पातळीवरचं ते महाविद्यालय. वर्ग चार ते प्राचार्या पर्यंत सर्वच गेले सहा महिण्यापासून अहोरात्र राबत होते. इमारतीला रंगरंगोटी, डागडूजी, फर्निचर दूरुस्ती किंवा नवीन खरेदी असे कार्य युध्द्पातळीवर चालू होते. महाविद्यालय जणूकाही दिवाळी साजरी करत आहे असेच त्या गावातील लोकांना वाटू लागले. प्राचार्यानी संस्थेच्या सचीवासोबत, प्राध्यापकांच्या सहा, सात बैठ्का घेतल्या होत्या. त्या समितीला काय अपेक्षित आहे, नॅकची नियमावली काय आहे. या सर्वाची उजळ्णी वारंवार करुन घेतल्या जात होती. या सर्व धावपळी कडे विद्यार्थी आता आपल्याला कहिंतरी चांगले दिवस येणार आहेत अशा आशेवर, तासिका झाल्या नाहीत तरी चालतील अशी प्राध्यापकांची समजूत काढ्त होते. प्राध्यापक स्वतःच्या व त्याच्या संबंधीत विभागाच्या प्रोफाईल ला ‘पावडर’ लावून ती कशी चांगली दिसेल या प्रयत्नात होते. प्राचार्य तर एक महिन्या पासून व्ह्रराड्यांत टेबल खुर्ची टाकुन बसले होते. कारण त्यांच्या केबिनची सजावट रंगात आली होती. खिडक्यांना पड्दे, सोफा, रेवोल्विंग चेअर, मॅट, एसी अशी त्यांच्या केबीनची तयारी होत होती. त्यांनी ओएस ला सुचना केली माझ्या खुर्ची वर पांढरा शुभ्र टॉवेल पाहीजे बर का . वाट्ल्यास विद्यापीठाच्या अमुक अमुक अधिकार्याच्या खुर्चीवर कसा टॉवेल आहे तो पाहून या. प्राचार्याच्या गटाचे प्राध्यापक हळूच प्राच्यार्याच्या कानात सांगायचे, जे पाहिजे ते आताच मागवूनघ्या बरका हीच वेळ आहे. नंतर कोणीही विचारत नाही. प्राचार्य हसायचे मान हलवायचे. प्राध्यापक सुद्धा आपण कांही तरी मह्त्वाचे सांगितले अशा थाटात ते त्यांच्या कामाला निघायचे. सुविचार, शिक्षण विषयक विचारांच्या पाट्या महाविद्यालयात सर्वत्र लावल्या जात होत्या. महाविद्यालयाला येणारा ओबड धाबड रस्ता मुरूम टाकून चांगला केला गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडांची माळ सजवून त्यावर चूना टाकण्यात आला होता. इतके दिवस रुक्ष दिसणारा रस्ता आता महाविद्यालयाकडे पाहून हसत होता. महाविद्यालयाच्या व्हरांड्यात,प्रत्येक विभागात झाडाच्या कुंड्या होमगार्डला ला उभे करावे तश्या ठेवल्या होत्या. झूलॉजी लॅबच्या बाहेर रोज आराम करणार्या कुत्र्याला सुध्दा आता परिसरात प्रवेश बंद झाला होता. संस्थेच्या अध्यक्षांच्या घरी काम कणार्या सेवकाला अध्यक्षांनी समिती येवून जाई पर्यंत महाविद्यालयात पाठवले होते. सदैव ईन, बूटाला पॉलिश, केसांचा कोंबडा पाडणारा सेवक, पांढर्याशुभ्र वेषात टोपी परिधान करून आल्याने,प्राचार्यानी त्याला प्रथमतः ओळ्खलेच नाही. गेल्या महिण्याभराच्या त्याच्या सह्या मस्टर वर झाल्या नंतर प्राचार्य साहेबानी त्याला विचारले, अध्यक्ष साहेबानी पाठ्वले का ? थोड्याश्या नाराजीनेच होकार देत तो केबीनच्या बाहेर पड्ला.

नॅक समिती येण्यास आता थोडेच दिवस शिल्लक राहिले होते. गावातील लोकं थोडेसे अचंबीत होते. इतकी वर्ष जुणं असलेल्या या महाविद्यालयाला अचानक कशी काय जाग आली. गावातले लोक आपसात बोलायचे, अहो आता कॉलेजला सुट्या लागतात. सुट्यात अधक्षाच्या नातेवाईका पैकी कोणाचे तरी लग्न असेल, असे म्हणाल्यावर ती चर्चा तिथेच थांबायची.

समितीच्या भेटीची तारिख दहा दिवसावर आली असतांना प्राचार्यानी संस्थेच्या अध्यक्षते खाली शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या सभा घेतल्या. प्राध्यापक व विभाग प्रमुखांना सुचना दिल्या. त्यानी सांगितले की समितीच्या सभासदांना जास्त काही बोलायचे नाही. विचारलेल्या प्रश्नांना फक्त मान हलवायची. प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तरच द्यायचे. विभाग प्रमुखाव्यतिरिक्त कोणीही समितीच्या पुढे पुढे करायचे नाही. आपण जेवढी माहिती नॅकला पाठवली आहे, तेवढ्याच माहितीचे कागद पत्र, जे तुम्ही गेल्या दोन महिण्यात तयार केली आहेत तेच त्यांना दाखवायची आहेत. त्यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर द्या. प्रत्येक विभागानी संगनका द्वारे सादरीकरण करायचे आहे. पीपीटी कशा करायच्या ते शिकून घ्या. नॅक समितीचे सर्व सदस्य हे ईतर राज्यातील असल्याने इंग्रजी भाषेत सादरीकरण करणे सक्तीचे आहे. प्राध्यापकात चुळ्बूळ सुरू झाली. एक विभाग प्रमुख खाजगीत जवळ बसलेल्या प्राध्यापकाच्या कानात कुजबूजला आणि म्हणाला, मला माहित होते म्हणूण मी दोन महीण्या पासून इंग्लीश स्पीकींग कोर्स जॉइन केला आहे. प्राचार्य पुढे बोलत होते. समिती आदल्या दिवशी येईल. ज़िल्ह्याच्या ठीकाणी त्यांची रहायची सोय केली आहे. प्राचार्या सहीत कोणीही त्या दिवशी आपल्या घरी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे नाही. सर्वानी आपल्या बायोडेटात स्वतःच्या निवासाचा पत्ता या गावातलाच द्यायचा. प्रत्येक प्राध्यापकाने किमान दहा ते पंधरा विद्यार्थ्याना गावात फिरूण गोळा करायचे व समिती भेटीच्या दरम्यान महाविद्यालयात थांबयाची विनंती वजा सक्ती करायची. या बद्द्ल नंतर प्रत्येकाला प्रशस्ती पत्र दिल्या जाईल.

नॅक समिती भेटीच्या दरम्यान सर्वांनी आपआपले ओळ्खपत्र गळ्यात घालायचे. प्राचार्यानी स्वतःचे ओळखपत्र टेबलच्या ड्रावर मधे आहे याची खात्री करुन घेतली. सर्व सुचानांचे पालन करावे असे फर्मान अध्यक्षांनी शेवटी काढ्ले व सर्वांना कामाला लागन्याचे आवाहन केले. शिक्षकेत्तर कर्मचार्यांना त्यांनी या प्रसंगी सुचाना दिल्या, नॅक समिती महाविद्यालयातील प्रत्येक विभागांना भेट देणार आहे. ऑफीस, लेखा, ग्रंथालय, खेळाचे मैदान, कॅन्टीन, तेंव्हा कोणीही जागे वरून हलायचे नाही. सर्व विभागांनी आपल्या विभागाचे सादरिकरण पीपीटी द्वारे करायचे आहे. मिटींग संपली आहे, कोणाला कांही शंका आहे का ? प्राचार्यांनी विचारले. एक सेवक उठ्ला व म्हणाला सर, ही कमेटी सांगून सवरून का भेट देते, अचानक का येत नाही. तु बस खाली,. आपण कमेटीलाच आल्यावर विचारूयात असे सांगून मिटींग संपवली. मिटींग संपल्या नंतर काहीं कर्मचारी चहा करिता उपहारगृहात गेली, त्यातील एका कर्मचार्याने उपहारगृह वाल्याला कमेटी येणार असल्याचे सांगीतले व स्व्छ्ता, शुध्दपाण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. त्यातील एक कर्मचारी दुसर्या कर्मचार्याला म्हणाला या कॅन्टीनवाल्याला जर पीपीटी करायला सांगीतली तर हा पहिली पीपीटी किती कर्मचारी उधारीची चहा पितात हेच दाखवेल नाही का ?. सर्वजण हसले, कॅन्टीनवाल्याला कांहीच समजले नाही.

आता नॅकची इतकी तयारी झाली की सर्वांना त्या तयारीचा कंटाळा येवू लागला. एकदाचा तो नॅक समिती भेटीचा दिवस उजाडला. सकाळी दहा वाजता समितीच्या सद्स्यांना घेवून धूरळा उड्वत कार महाविद्यालया समोर थांबली. नॅक समितीचे दोन सद्स्य व प्राचार्य गाडीतून उतरली. एका सदस्याला बी पी चा त्रास असल्याने ते लॉजवरच आराम करत होते. ते एका विद्यापीठाचे निवृत्त कुलगूरू आहेत असे समजले. ते उद्या पासून समीतीच्या कामकाजात सामिल होणार आहेत असे प्राचार्यांनी सांगीतले. प्राचार्याच्या दालनात चहापान झाल्या नंतर, प्राचार्यांचे महाविद्यालयाच्या एकंदर कामकाजावर सादरीकरण झाले. नंतर कांही शैक्षणिक संकुलांना भेटी दिल्या. आणि दुपारी तीन वाजताच शहराकडे प्रस्थान केले.

दुसरे दिवशी परत नॅक समितीचे ते दोन सदस्य व माजी कुलगुरूची तब्येत थोडी सुधारल्याने ते आज कामकाजात सामील झाले होते. तरीही प्राचर्यांनी आल्या आल्या सेवकाला बोलावून एक चिठ्ठी त्याच्या हातात ठेवून मेडीकल च्या गोळ्या आणावयास सांगीतल्या. दुसर्या सदस्याचे पोट बिघडल्यामुळे त्या सेवकाला गोळ्या आणावयास सांगीतल्या होत्या.

दिवसभर सर्व संकुलाना भेटी झाल्या. सर्वांच्या पीपीटी पाहून समिती कंटाळलेली दिसत होती. आता शेवटी क्रिडा विभाग आणि ग्रंथालय पहायचे बाकी राहीले होते. एक सद्स्य म्हणाला चलो स्पोर्ट और लायब्ररी देखलेते है. सगळे सदस्य स्पोर्टस च्या मैदानात गेली. आणि नंतर स्पोर्ट्स च्या संकुलात गेली. नही हमें पीपीटी मत बताओ कहो क्या किया है आपने. विभाग प्रमुख हिम्मत करून म्हणाला सर बहोत मेहनतसे हमने ये पीपीटी बनायी है आप एक बार देखलो. हा चलो ठीक है जल्दी दिखाओ. एक सदस्य बोलला. निर्विकार चेहेर्यानी त्यानी त्या पीपीटी बघीतल्या. काही जुजबी प्रश्न विचारले, आणि त्यांचा मोर्चा वळला ग्रंथालयाकडे. ग्रंथालयात जागा फारच कमी असल्याने एक एक सदस्य आत मधे जाऊन ग्रंथालय पाहून येत होते. तीथे पीपीटी पहाणे त्यांनी निक्शून टाळले. एक सेवक खाजगीत तेथील सेवकाला म्हणाला अरे, आज दिवसभर त्यांनी एवढ्या पीपीटी पाहील्यात की त्यांना आता पीपीटीच्या उलट्या व्हायल्यात.

कमेटीने महाविद्यालयाची भेट आटोपली. रात्री महाविद्यालयाने समिती सद्स्या करिता सास्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात लावण्या जास्त असल्याने समिती सदस्या व्यतिरीक्त इतरांनीच कार्यक्रमाची मजा घेतली. तिसरे दिवशी समिती सदस्यांनी स्थानिक व जवळपासच्या मंदिरांचे दर्शन घेतले. दुपारी तीन वाजता एक्जीट मीटीग व इतर काम काज आवरून निघायला रात्रीचे नऊ वाजले. प्राचार्य कर्मचारी कामात असताना नॅक समीतीचा एक सदस्य सह्ज महाविद्यालयाच्या बाहेर गेट जवळ आला असता त्याला एक ट्र्क उभा दिसला. त्याने सह्जच त्या ट्र्क ड्रायव्हरला प्रश्न केला, ट्र्क किसलीये यहा खडा किया है. तो म्हणाला यहा पर कुर्सीया टेबल्स और कुछ फर्णीचर किरायेसे लायेथे वो वापस लेने आये है.

रणजीत धर्मापुरीकर,

इतर रसदार पर्याय