एस्टी प्रवासाची कथा Dharmapurikar Ranjeet द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

एस्टी प्रवासाची कथा

नांदेड- मुखेड अशी पाटी छातीवर लावून नांदेड आगारातून एसटी महामंडळाची गाडी नांदेड बसस्थानक फलाटावर उलट्या दिशेने लागली. मुखेडला जाणारी ती पहिलीच म्हणजे सकाळची आठ वाजताची गाडी होती. या बसला रोजच गर्दी असायची. आजही होती. गाडी खचाखच भरायला थोडाही वेळ लागला नाही. मिळेल त्या जागेतून प्रवाशी बस मधे घूसत होती. ड्रायव्हरच्या केबीनचे दार उघडून प्रवाशी आत शिरत होते. ड्रायव्हरचे केबीन सुध्दा गच्च भरले. ड्रायव्हरच्या सिट मागे कांहीं प्रवासी उभे राहिले. वाहक तोंडामध्ये 'गोवा' भरुन बस जवळ 'मुखेड...मुखेड...' असे ओरडू लागला होता. बसमध्ये आता पाऊल ठेवायला सुध्दा जागा नव्हती. तरीही त्याचे प्रवाशांना बोलावणं चालूच होतं. एका, दोघा प्रवाशांनी त्याला सूचना सुध्दा केली, पण त्याचे ओरडणे चालूच होते. बस सुटायची वेळ होऊन गेली. बसमधील प्रवासी दाटीवाटी मुळे त्रस्त झाले होते. चालकाचे अजून आगमन झाले नव्हते. वाहकाने दुसरा 'गोवा' आभाळाकडे तोंड करत भरला. बसच्या प्रवेशद्वाराच्या पहिल्या पायरीवर एका पायावर उभा राहून उभ्या प्रवाशांना त्याने आत मागे व्हा असा हुकूम सोडला. प्रवासी उभ्या उभ्या मागे सरकत होती. साहेब, मामा,काका, पाव्हणं,मावशी,माय, हिरो,दादा या नावाने सर्वांना विनंती करत मागे सरकण्याचे आवाहन केले. बस खाली उभ्या असलेल्या अजून दहा प्रवाशांना त्याने बसमध्ये घुसवले. तिकीट पंच करायच्या चिमट्याने बसच्या दांड्यावर आवाज करत तो तिकीट तिकीट म्हणत गर्दीतून वाट काढत सराईतपणे, कोणाच्याही पायावर पाय न देता तिकीटाची पेटी , हातातले पैसे व डोक्यात हिशोबाचा तोल सांभाळत इंच इंच पुढे सरकत होता.

एखादा जादूगर स्टेजवर यावा तसा चालकाने बसच्या केबीन मध्ये प्रवेश केला. डोक्यावरच्या उरलेल्या तूरळक केसांना टाळू भरल्या वाणी तेल चोपले होते. तोंडामध्ये मसाला पाणाचा मुडूप, गळ्याभोवती गुंडाळलेला गमचा होता. त्याचा लोंबणारा एक पदर बसच्या वाईपर सारखा पाच पाच मिनीटाला तोंडावरून फिरवत होता. शर्टच्या कॉलर खाली एक रूमाल होता. घरुन घालून आलेल्या शर्टवर खाकी शर्ट बटन न लावता घातला होता . चालकाच्या सिटवर बसत सिटच्या मागे उभ्या प्रवाशांना तो म्हणाला, " आं आता काय माझ्या खांद्यावर बसता कां रं ? ! सगळे हसले. तो सुद्धा हसण्यात सामील झाला. त्यांचे हसणं पाहून केबीनचे प्रवासी थोडे सुखावले. नाही तर चालक येण्यापूर्वी प्रवाशांना, चालक कुठे आपल्याला हाकलून लावतो की यांची भीती होती. वातावरणातील ताण हसण्यात निवळला. एक प्रवासी त्याचा फायदा घेत म्हणाला, "तुमच्या खांद्यावर बसून तुमच्या डोक्याचे तेल कुठे अंगाला फासून घ्यावं बाबा "! पुन्हा सगळे हसले. चालकाने प्रवाशाच्या या टिप्पनीवर डोळा मारत कोपऱ्यात पानाची पिंक टाकली.
केबीन मधील प्रवासी चालकाचे दोस्त झाले. गच्च भरून वाहणाऱ्या बसमध्ये नजर टाकत चालकाने गाडी चालू केली. गाडीचे इंजिन चालू झालेलं ऐकून वाहकाने डबल बेल मारली. गाडी वळसा घालुन स्टेशनच्या बाहेर पडणार तोच पिवळ्या साडीतील एक स्त्री पर्स सांभाळत हात वर करत बस थांबवण्यासाठी विनंती करत होती. केबीनच्या प्रवाशांनी चालकाच्या लक्षात ही बाब आणून देताच चालकाने कचकन ब्रेक लावला. एक प्रवासी म्हणाला, " काय राव या ठिकाणी जर एखादा पुरुष असता तर तुम्ही गाडी जोरात दामटवली असती". चालक हसत म्हणाला,"अहो महिलांचे प्रश्न आपणच नाही का सोडवायचे ? "शिवाय आमचे ब्रिदच आहे बहूजन हिताय बहूजन सुखाय.
ड्रायव्हर पुढे म्हणाला,"ती कोणाचीतरी बहू असेलच की" केबिनमध्ये हशा पिकला. वाहक चालकावर खेकसला, म्हणाला, "आं ! गाडी कशाला थांबवली, गाडीत वारा शिरायला जागा नाही, आणि तिला कुठे उरावर घेणार आहेत? ती स्त्री बस जवळ आली. दाराजवळच्या प्रवाशांनी दरवाजा उघडला. पिवळ्या साडीतील गोरी, ऊंच सडपातळ स्त्री पर्स सांभाळत व स्वतःला सांभाळत कशीबशी बसमध्ये चढली. चालकाने केबीन मधील आडव्या सीटवर बसलेल्या एका प्रवासीला म्हणाला आपल्या 'बहू' ला जागा द्या. तो प्रवासी हसत चटकन उठला व त्या स्त्रीला त्याने जागा दिली. ती स्वतःला सांभाळत, अंग चोरुन तिथे बसली. चालकाच्या बाजूला उभ्या प्रवाशाच्या सोबत गप्पा, हसी मजाक चालू हाते. बसचा वेग हळू हळू वाढत होता. चालक त्या स्त्री कडे कटाक्ष टाकत, तोंडातले पाण चघळत होता. एखादा विनोद करायचा व तीच्या कडे पहायचा असे त्याचे चालू होते. बसने जोर धरला होता. चालकाची बस चालवण्याची सफाई दाखवण्याचे प्रयत्न चालू होते. त्या स्त्रीचे लक्ष मात्र कधी रस्त्यावर तर कधी बसमधील गर्दी कडे होते. मधेच तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसायची. वाहकाचे तिकीट देण्याचे काम संपले होते. तो समोरच्या त्याच्या सिटवर बसून तिकीट विक्रीचा तपशील एस आर वर नोंदवत होता. मधेच छोटे स्टेशन लागले की सरावाने डबल बेल वाजवून परत तोंडाने चलो sss असे ओरडू सांगत होता. चालकाचे 'कटाक्षाचे' चाळे चालू होतेच. नायगाव येथे थोडावेळ गाडी थांबवली, पण गर्दी कांहीं कमी झाली नाही. चालक, वाहक दोघे उतरुन खीचडी, भजे, चहा, गोवा, पाण घेऊन क्रिकेटची ओपनर जोडी मैदानावर यावी तसे आले. चालक म्हणाला,"आरं अजून तुम्ही मला घेरुनच उभा हाव का ! ?." सगळे हसले. चालकाने परत त्या स्त्री कडे नजर टाकली. बस गुरगुरली व रस्त्यावर लागली. आता चालकाने गाडीला चांगलाच वेग दिला. त्याचे त्या बाईकडे पाहने थांबले नाही. बस स्टेशन पासून थोडी पुढे गेल्यावर एकदम ती स्त्री उभी ठाकली व जोराने ओरडली वीज कडाडली तशी ...
"बस थांबवा !"
सगळे प्रवासी त्या खचाखच भरलेल्या बसमधून त्या स्त्रीकडे आश्चर्याने पाहू लागले.
ती स्त्री पुन्हा म्हणाली...
"मी बस थांबवा म्हणते ना..!"
चालक, वाहकाला कांहीच समजले नाही. त्याने ताबडतोब बस साइडला घेतली. बस थांबल्यावर तीने चालकाला फर्मावले...
"आता तुला मला काय पाहायचे ते पाहून घे एकदा ! पुन्हा जर माझ्या कडे थोबाड केलास तर पहा !"
दुसऱ्या प्रवाशांकडे पाहात ती सांगू लागली.
" इतके प्रवासी गाडीत आहेत हा बिनधास्त माझ्याकडे मधे मधे पाहात बेशिस्तीत गाडी चालवतोय. अपघात झाला तर हकनाक सर्वांना जिवाला मुकावं लागेल. मी कांहीं हौसेने इथं बसले नाही. तुम्हाला माहितीये. !"
चालक एकदमच बिथरला . त्याच्या भोवतालचे प्रवासी चालकाला सुनाऊ लागले. वातावरण एकदम गरम झाले. गंभीर झाले. तेवढ्यात मागच्या बुजूर्ग व्यक्तीने त्या महिलेला जागा दिली व स्वतः महिलेच्या जागी बसून चालकाला म्हणाला, " चला साहेब, आता पुढे असे करू नका"
वाहकाने डबल बेल मारत चलो चा गजर केला.