प्रेम की मैत्री? भाग-1 मनवेधी द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम की मैत्री? भाग-1

आज तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. का कुणा जाणे, छातीचे ठोके खूप वाढले होते. मन रमवावे म्हणून ती लॅपटॉप उघडून काहीतरी search करत होती. इतक्यात तिला कॉलेज फोटोज असा फोल्डर दिसला. अन उघडून ती काही फोटोज पाहू लागली. आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागला.. आणि आठवला तो.......

कॉलेज चा तो पहिला दिवस... सगळे नवीन चेहरे.. म्हणायला तसे एक दोन मित्र मैत्रिणी होत्या. तरीही ह्या नवीन लोकांमध्ये पुढचे तिन वर्षे कसे काढावे हा प्रश्न... तशी ती खूप प्रेमळ आणि फ्रेंडली होती... तीच ती जुनी श्रेया.. खूप सारे फ्रेंड्स असणारी... जाईल तिथं मित्र मंडळ बनवणारी.. हसतमुख आणि लाईफ enjyoy करणारी.. तिच्या लाईफ चा फंडा च निराळा... थोडीशी tomboy.. पण आतमधून पक्की मराठी मुलगी....

अश्या ह्या श्रेया चा पहिला दिवस सुरू झाला... पहिल्याच दिवसात तिने खूप सारे फ्रेंड्स केले सुद्धा... कोण कोणत्या कॉलेजमधून आलंय, कुठून आलाय, कोल्हापूर किती सुंदर आहे.. ते तुम्हाला कस सामावून घेईल तुमच्यात ह्या सर्व गोष्टी नविन फ्रेंड्स ना तिने समजून सांगितल्या... बघता बघता कॉलेज सुरू होऊन आठवडा निघून गेला... श्रेया आणि तिच्या वर्गातल्या सर्वांनी मिळून वर्गाचा एक व्हाट्स अँप वर ग्रुप पण केला... त्या ग्रुप वर रोजचे नोट्स, काही meme आणि एकमेकांची खिल्ली हे सगळं चालायचं... ह्यात आपली श्रेया कशी काय कमी असेल.. ती नेहमी च अक्टिव्ह असायची...

वर्गांमध्ये खूप सारे मूल असल्यामुळे सगळ्यांची ओळख पटायला थोडा वेळ जात होता... अश्यातच श्रेया ने टाकलेल्या एका पोस्ट वर त्यानें "काय फालतुगिरी ही" अशी कॉमेंट केली... तिने त्याच नाव बघितले तर the hero असे होते.. नंबर सेव नसल्याने तिने त्याचे नाव विचारले... कारण अर्थातच तिला राग आला होता.. तर त्याने त्याचे नाव सांगितले... सार्थक.... श्रेया ला हा नेमका कोण हा माहीत नव्हते.. म्हणून तिने रिप्लाय केला "कोण सार्थक?" त्याला थोडे अपमानित झाल्यासारखे वाटले... ग्रुप वरचे सगळे मग सार्थक ची खिल्ली उडवायला लागले होते.. सार्थक ने सोयीस्कर रित्या ग्रुप वर चॅट करणे बंद केले...

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी श्रेया चे प्रॅक्टिकल होते.. आणि तिची मैत्रीण दुसऱ्या batch मध्ये असल्या मुले ती तिच्या लॅब मध्ये नोट्स मागायला आली... ती मैत्रिणीची वाट बघत असताना एक मुलगा तिच्याकडे आला.. आणि त्याने विचारले "तू श्रेया ना? " ती मानेने च हो बोलली आणि विचारली "तुझं नाव काय?" तो हसला आणि म्हणाला "the hero सार्थक".... आणि तो निघून गेला... श्रेया ला त्याच्याकडे पाहुन हसायलाच आले... एकंदरीत त्याच्याकडे पाहताना तो कोणत्याही बाजूने हिरो दिसत नव्हता.... बारीक अंगयष्टी, सावळा, दिसायला ही जेमतेम... "हा आणि हिरो" अस म्हणत आणि हसत श्रेया तिथून निघून गेली..

सगळ्यांचे प्रॅक्टिकल संपले.. आणि लंच ब्रेक झाला... श्रेया नेहमी घरातून टिफिन घेऊन येत असे पण आज थोडी गडबड झाली म्हणून ती टिफिन विसरून आली होती.. म्हणून ती कॅन्टीन ला काहीतरी खाण्यासाठी गेली.. तिथं तिला तिचा जुना मित्र वेदांत भेटला..तो त्याच्या काही नवीन मित्रांसोबत बसला होता. . ती त्याच्या टेबलावर गेली आणि गप्पा मारू लागली.. इतक्यात तिथं सार्थक आला... वेदांत आणि सार्थक नुकतेच मित्र झाले होते.. ते एकमेकांच्या घराजवळ राहत होते... वेदांत ने श्रेया आणि सार्थक ची भेट घालून देत श्रेया ला म्हणाला. "श्रेया हा सार्थक तुझा the हिरो.. आणि सार्थक ही श्रेया... जपून रहा रे बाबा खूप danger आहे ही".. अस म्हणताच सगळे हसले..श्रेया आणि सार्थक ने एकमेकांना hii केले.. कारण ह्या सगळ्यात ते राहून च गेले होते..

आणि ते सगळे एकत्र जेवायलाया बसले...

क्रमशः