लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग १ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग १

स्वराज्यावर राहू केतू चालून आले होते ...त्यातला सिद्दी जौहरला राजांनी पन्हाळा गडाखाली ४ महिने झुलत ठेवले होते आणि संधी मिळताच...त्याच्या पोलादी वेढयातून राजे सुखरूप निसटले होते..पण शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे अशी नररत्ने कामी आली होती.. पुन्हा ताज्या दमाच्या विशाळगडाला चार पाच महिने वेढा घालण्याची ताकत आता सिद्दी जौहर मध्ये नव्हती आणि वेढा घातलाच तरी..राजे पुन्हा पळून गेले असते तर काय.. सिद्दी जौहरचा आत पुरता बिमोड झाला होता..

पण राहू गेला तरी अजून केतू आपला विषारी वेढा घालून लाल महालात गेली तीन वर्षे बसला होता..आणि त्याच्या बरोबर होते जवळ जवळ एक लाख मोगली सैन्य, तोफा,हत्ती,घोडे..कोणी साधा सुधी असामी नव्हती...त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून बंगाल प्रांत मोगल साम्राज्याला जोडला होता..आणि तो आलमगीर औरंगजेबाचा सख्खा मामा होता..शाहिस्तेखान मूळ नाव अबू तालिब..मोठा कावेबाज आणि धूर्त होता.. अफझलखान आणि सिद्दी जौहर ला तहा च्या निमित्ताने राजांनी काय भोगायला लावले होते याची त्याला पूर्णपणे कल्पना होती..त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तह करायचा नाही येवढे त्याने पक्के केले होते...त्याचा दिमतीला औरंगजेबाने अनेक सरदार दिले होते..शिवाय लाखोंचा खजिना...पुण्याचा वेशीवर अगदी कडक पहारा होता.. कोणालाही पुण्यात सहजासहजी प्रवेश मिळत नव्हता...तीन वर्षे स्वराज्याची दशा झाली होती... किती दिवस अफझलखान, कारतलबखान,रायबाघन,सिद्धी जौहर अशा सरदारांशी झुंजत राहायचे..

राजगडावर ढग खाली उतरत होते..दुपार झाली होती पण दाट धुक्यामुळे..सूर्यकिरणे हि खाली उतरायला दिरंगाई करीत होते राजे राजगडावर आपल्या महाली विचार करत बसले होते...बैचेन होते ते एकसारखे वर्दी अजून कशी येत नाही याचीच चिंता त्यांना लागुन राहिली होती.. तेवढ्यात बहिर्जी नाईक आल्याची वर्दी आली...राजे लगोलग बहिर्जी नाईकांना भेटायला आले बोला बहिर्जी काय खबर आहे लाल महालाची??..राजांनी प्रश्न केला..बहिर्जी नाईक बोलते झाले " राजे त्यो खान लाल महालात थांबला आहे..महालाच्या भोवती..पहिल्या कड्यात त्याचे अंगरक्षक पहारा देत असतात अंदाजे हजार असावेत.. दुसऱ्या कड्यात मोगली सरदार आणि त्यांचे सैन्य.. तिसऱ्या कड्यात राजपूत आणि चौथ्या कड्यात अनेक मराठा सरदार गस्त घालत असतात...आणि पाचव्या कडयात अनेक तोफा आ वासुन उभ्या आहेत".. आणि छबिन्याचा फेरा पण चालू असतो ( छावणी वर हल्ला होऊ नये म्हणून छावणी पासून एक ते दीड कोस लांब गस्त ठेवायची ) .राजे शांतपणे ऐकत होते..हवी ती माहिती बहिर्जी नाईकानी आणली होती.

राजांनी लगोलग सदर बोलावली नेतोजी,चिमणाजी,बाबाजी,सर्जेराव बहिर्जी अशी खाशी मंडळी बोलावली..

राजांनी एक मोठा डाव आखला होता...शाहिस्तेखानास जन्माची अद्दल घडावायची होती..त्याने किंवा इतर कोणी पुन्हा ह्या स्वराज्याकडे नजर वाकडी करून पाहता कामा नये.. डाव मोठा होता..जिवाशी गाठ होती..

डाव काय होता??? साधा सोपा डाव होता.. मध्यरात्री शाहिस्तेखानावर तलवार टाकायची?? काययययच?? म्हणजे स्वतःहून मृत्यूच्या दाढेत आपली गर्दन पुन्हा द्यायची..आता तर कुठे सिद्दी जौहरच्या वेढ्यातुन सहीसलामत बाहेर पडलो होतो?? आणि आता हे पुन्हा...शाहिस्तेखान लाल महालात लपला आहे..तो वाडा पण दणकट..फक्त समोरच्या दरवाजशिवाय आत ज्याला जागा नाही ?? आणि त्या महालाच्या भोवती एक लाखाचे खडे सैन्य.. पकडले तर साधे नखं हि परत मिळाले नसते...त्याने मुंडकी छाटून नाचवली असती.. आणि महाराज स्वतः जाणार होते..छे निव्वळ वेडेपणा होता..

ठरलं आज रात्री डाव टाकायचा..कोणी कुठं उभं रहायचं??कुठून हल्ला करायचा ?? कुठे घोडे तय्यार ठेवायचे सर्व काही ठरले ?? त्याच मध्यरात्री
राजे ,नेतोजी,चिमणाजी,बाबाजी,सर्जेराव बहिर्जी आणि दोन हजार मावळे पद्मावती माची वर जमले...राजांनी ४०० खासे मावळे आपल्या सोबत घेतले आणो बाकी राहिलेल्या सैन्याचे दोन भाग केले ..सर्जेरावांकडे एक तुकडी सोपवून त्यांना सिंहगडाच्या वाटेवर तयार राहायला सांगिंतले.. एका तुकडीने इशारा मिळताच आपली उर्मट हत्यारांची भूक भागवुन घ्यायची..आणि राजांनी बहिर्जीकड पाहिले...बहिर्जी नि सांगितले तयारी पूर्ण झाली आहे..आपले अजून १०० ते १५० सोबती "कात्रज घाटाजवळ" उभे आहेत...इशारत झाली कि माझा पट्ठ्या महादेव पुढे सर्व बिनभोबाटपणे पार पाडेल..

क्रमश :