बंदिनी.. - 7 प्रीत द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

बंदिनी.. - 7

... त्याने ठरवलंच आहे ना.. मग मी पण बघते किती दिवस दूर राहतो ते...

पुढे..

हा पूर्ण आठवडा अनय नाईट शिफ्ट ला होता.. शिवाय त्यापुढचा आठवडा ही त्याने नाईट शिफ्ट च घेतली होती... मला तर त्याच्याशिवाय करमतंच नव्हतं?...कशातच लक्ष लागत नव्हतं.. ऑफिस मध्ये यायची आवड ही वाटेनाशी झाली होती... कारण ना अनय ला मी बघू शकत होते.. ना त्याच्याशी बोलणं होत होतं.. ☹️ पण मी ठरवलेलं.. स्वतःहून त्याला कॉल करायचा नाही.. बघूया त्याला माझी आठवण येते की नाही ते ?..

बरेच दिवस झाले.. मी अनय ला बघितलं नव्हतं.. सलग तिसरा आठवडाही त्याने नाईट शिफ्ट घेतली होती.. मी इथे तरसत होते त्याच्यासाठी.. आणि तो... तो ठिणगी टाकून दूर झाला होता.. आणि त्याच्या प्रेमाचा वणवा मात्र माझ्या हृदयामध्ये पेटला होता... त्याची झळ मी सोसत होते.. खूप त्रास होत होता त्याच्यापासून दूर राहून... ?

एके दिवशी अचानक माझ्या मोबाईल वर त्याचं नाव फ्लॅश होत असलेलं मी पाहिलं...! अनय चा कॉल होता... एवढी खुष झाले म्हणून सांगू... ?? मी कॉल रिसीव्ह केला..

"Hi.." - अनय

"Hi..(?) " - मी

"कशी आहेस? "

"ठीक आहे.. (तुझ्याशिवाय अपूर्ण ?) आणि तू? "

"मी पण ठीक.. नाश्ता केलास का? काय होतं आज नाश्त्याला?" - अनय

"हो केला आत्ताच.. मेंदूवडा!"

"अगं वेडे त्याला मेदूवडा म्हणतात ???" - तो हसतच म्हणाला

"तेच ते.. मेंदू काय नि मेदू काय.. वडे खाल्ले एवढं खरं?"- मी

" ऐकणार नाहीस तू ह्म्म.. "

"हा हा... नाईट शिफ्ट का घेतलीस? " मी शेवटी विचारलंच..

" हुह्ह् .. Peace... शांती मिळते नाइट शिफ्ट ला.. कोणीच नसतं.. मी एकटाच.. कटकट नाही कसलीच..जाऊ दे सोड.. तुला आठवण नाही येत ना माझी...फोन पण नाही केलास एक.. Neways.. चल.. मार्केट ला आलो होतो.. घरी जातोय... बाय! " - अनय

" ओके.. बाय.. टेक केअर.."

फायनली ... त्याने कॉल केला होता?... त्याला माझी आठवण आली होती?... आणि मी त्याला कॉल केला नाही त्यामुळे तो थोडा नाराज ही झाला होता... पण बर्‍याच दिवसांनी त्याच्यासोबत बोलले... खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं.. ??..
थोड्या वेळाने तन्वी माझ्या केबिन मधे आली.. म्हणाली...

"अगं.. अनय चा कॉल आला होता का तुला?"

"हो.. आला होता" - मी

"मला पण केला होता ?" - तन्वी

(अनय... आर यू प्लेयिंग विथ बोथ ऑफ़ अस?? तू तन्वी ला सुद्धा कॉल केला होतास?... नाही पण तू असा नाहीयेस.. आय नो.. यू रिस्पेक्ट वुमन..!.. तू आमच्या फिलिंग्स सोबत असा खेळणार नाहीस...आय ट्रस्ट यू.. मग स्पष्ट बोलत का नाहीस तुझ्या मनात काय आहे ते... विचार करून करून थकलेय रे मी.. सांग एकदाच तुझ्या मनात काय आहे ते... ?).. माझ्याच मनाशी माझं द्वंद्व चालू होतं.. तन्वी एव्हाना पाणी पिऊन निघून गेली होती...

पण अनय सोबत बोलून आज माझ्या हृदयातली आग काही प्रमाणात शांत झाली होती.. ?

- - - - - - - XOX - - - - - - - -

बघता बघता ऑगस्ट महिना उजाडला होता.. अनय चा वाढदिवस जवळ आला होता..! त्याच्या fb च्या प्रोफाईल मधून मला त्याची बर्थ डेट मिळाली होती.. ☺️.. मी तन्वी ला विचारलं, "आपण त्याचा बर्थ डे सेलिब्रेट करूया का? ?.."
"हो करूया!.. पण कसं..?" - तन्वी

"अगं एक केक आणूया आपण.. आणि एक छानसं गिफ्ट घेऊया त्याच्यासाठी.. ?"

"अगं पण केक आणला तर बाकीचे काय विचार करतील.. आपण या आधी सरांशिवाय कोणाचाच बर्थडे celabrate नाही केला ऑफिस मध्ये.. "

" नको काळजी करू.. तसंही कधीतरी पेस्ट्री आणायला सांगतोच ना आपण जयेश ला .. जेव्हा तो सरांच्या कामासाठी बाहेर जातो.. आता आपण त्याला केक आणायला सांगू.. आपल्याला नक्की आणून देईल तो.. आणि तसंही आपण असं काही त्याला बाहेरून खायला आणायला सांगितलं की तो आणि पाटील मामा पण असतातच ना आपल्यासोबत.. त्यांनाही बोलावू आपण केक खायला.. आणि बाकी सर्वांचं म्हणशील तर त्यांना माहीत आहे आपण दोघीही इतर कोणापेक्षा अनय च्या जास्त क्लोज आहोत "- मी

" ओके चालेल.. आणि गिफ्ट च काय.. "

" शर्ट घेऊया का त्याच्यासाठी..? "

" नको गं.. त्याला काय वाटेल.. आपण का करतोय त्याच्यासाठी एवढं.. केक तर आणणार आहोतच ना.. मग एखादं शो पीस वगैरे बघुया.. "

" ठीक आहे.. मी तुझ्याकडे पैसे देते.. तू जा मार्केट ला.. आणि तुला आवडेल ते घेऊन ये.. शक्यतो काहीतरी युजफूल वस्तू बघ.. मला तर नाही जमणार यायला.. नाहीतर आले असते तुझ्यासोबत.. "- मी

" ठीक आहे " म्हणून तन्वी निघून गेली..

खरं तर अनय साठी गिफ्ट मलाच सिलेक्ट करायचं होतं.. त्याला आवडायची माझी चॉईस... मी घातलेले ड्रेसेस पण त्याला आवडायचे... एकदा तो म्हणालाही होता.. तुझी चॉईस छान आहे.. नाईस ड्रेसिंग सेन्स !.. 'मला पण माझ्या बहिणीसाठी घेऊन देशील तुझ्यासारखे ड्रेस? '.. मी हसले आणि म्हणाले.. 'हो नक्की..' ?

पण आईने मला नसतं जाऊ दिलं मार्केट ला... ?मुख्य मार्केट आमच्या कॉलनी पासून गाडीने 20-25 मिनिटे दूर होतं.. आणि आमच्या घरचं वातावरण ही काही बाबतीत जरा स्ट्रीक्ट होतं..जर आईने विचारलं असतं की कशासाठी जायचंय.. तर काय सांगितलं असतं तिला.. तिच्यासमोर खोटं बोलणं खूप कठीण होतं.. तिला लगेच कळायचं.. त्यामुळे आई कडून होकाराची अपेक्षा करणंही चुकीचं होतं... म्हणुनच आईला विचारण्याचीही तसदी मी घेतली नाही.. ? सरळ तन्वी कडे पैसे देऊन मोकळी झाले...

आता अनय अधून मधून डे शिफ्ट ला यायला लागला होता आणि पुढचा पूर्ण आठवडा ही तो जनरल शिफ्ट लाच असणार होता.. त्यामुळेच त्याचा बर्थडे सेलिब्रेट करता येणं शक्य होतं....

- - - - - - - - XOX - - - - - - - -

"मीरा.. ऐक.. येत्या मंगळवारी तुझ्या आत्याकडे जायचंय आपल्याला.. शिवानी च्या लग्नासाठी... आत्या ने चांगलं आठ दिवस बोलावलंय आपल्या सर्वांना.. पण मी म्हणाले फोन वर की मीरा च्या जॉब मुळे आठ दिवस नाही जमणार पण चार दिवस तरी नक्की येऊ ☺️.. सुट्टीचं तेवढं बघ.." - आई

आई ने जणू अणुबॉम्ब च टाकला होता माझ्या अंगावर!!? ?

" हे काय आई..तू आणि पप्पा जाणार होतात ना लग्नाला..? तुम्ही जा.. मी आणि ऋतू राहू इथेच "- मी जरा नाराजीनेच म्हणाले..

" हे बघ मीरा.. आत्याने खूपच आग्रह केलाय की मुलींना घेऊन या म्हणून.. शिवानी ने ही बोलावलंय तुम्हा दोघींना..☺️ शिवाय एक दिवसाचा नाही तर चार दिवसांचा प्रश्न आहे.. एवढे दिवस तुम्हाला कसं टाकून जाणार मी... माझं लक्ष तरी लागेल का... ?गुरुवारी लग्न झालं की शुक्रवारी निघू लगेच हवं तर... "- आई

" अगं आई.. एवढे चार दिवस कोण गं सुट्टी देईल मला... कामे आहेत ऑफिस मध्ये खूप.. सर ओरडतील ?"- मी आईला मनवायचा प्रयत्न करत होते.. कारण मला लग्नाला जायचं नव्हतं.. आईच्या म्हणण्यानुसार मंगळवारी निघायचं होतं आणि बुधवारी अनय चा वाढदिवस होता... आणि तो माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा होता.. ?

" असे कसे ओरडतील सर... तुझ्या हक्काच्या सुट्ट्या ही तू घेऊ शकत नाही का... एरव्ही कधी सुट्टी घेतेस गं तू.. मला फोन लावून दे.. मी बोलते त्यांच्याशी.." - आई हट्टालाच पेटली होती..

माझा नाईलाज झाला... मी तीचं ऐकलं नसतं तर पप्पांची ही बोलणी खावी लागली असती... माझा एकदम मूड ऑफ़ च झाला.. ? मी आईला म्हणाले ठीक आहे मी उद्या बोलते सरांसोबत.. आणि आतल्या रूम मध्ये निघून गेले.. खूप रडावसं वाटत होतं...'श्शीट्...काय यार... ह्या शिवानी ला पण नेमकं आत्ताच लग्न करायचं होतं का.. ?.. कित्ती प्लॅनिंग केली होती मी अनय च्या बर्थडे साठी.. देवा का असा निष्ठुर होतोस' .... माझं मन चरफडत होतं.. ऋतूलाही माझ्यासाठी वाईट वाटत होतं.. पण आता नाईलाज होता..
काहीही झालं तरी मला आता लग्नाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.. ??
दुसर्‍या दिवशी ऑफिस ला गेल्यावर मी सुट्टीचा अर्ज दिला.. सरांनीही सुट्टी मंजूर केली... तन्वी ला ही सांगून टाकलं की मी मंगळवार पासून सुट्टीवर आहे.. ?

- - - - - - - - XOX - - - - - - - - -

आज अनय चा वाढदिवस... माझा जीव वर खाली होत होता... कधी एकदा त्याला कॉल करतेय असं झालं होतं.. सकाळपासूनच मी मोबाईल हातात घेऊन इथून तिथे नाचत होते... कारण मोबाईल ला नेटवर्क च मिळत नव्हतं.. खूप ट्राय करून बघितलं पण छे! माझ्या सिम चा हल्ली असाच नेटवर्क प्रॉब्लेम व्हायचा... घरात असल्यावर नेटवर्क च पकडायचं नाही.. बाहेर गेल्यावरच काय ते खुष होऊन फुल्ल नेटवर्क द्यायचं... ?

दुपारी आईने मला मोबाईल हातात घेऊन इकडे तिकडे फिरताना बघितलं.. तशी माझ्याजवळ येऊन बोलली... " काय तो मोबाईल घेऊन नाचतेयस सारखी...थोडी मदत कर चल कामामध्ये... जा आधी तो मोबाईल ठेऊन ये आणि हा माझा मोबाईल पण चार्जिंग ला लाव जरा.."

मला आयती संधी मिळाली होती.. मी खूप खुश झाले.. पण चेहर्‍यावर दाखवलं नाही.. सकाळपासून मी या संधीची वाट बघत होते... आईला 'येते ' म्हणून मी आणि ऋतू पळतंच आतल्या खोलीत निघून गेलो?..
आईच्या मोबाईल वरून अनय चा नंबर डायल केला.. 'एव्हाना ठरल्याप्रमाणे तन्वी ने त्याचा बर्थडे celebrate ही केला असेल... कसं ना... प्लॅन माझा आणि मीच तिथे नाहिये ?".. माझ्या मनात आलं... तितक्यात पलीकडून अनय चा आवाज आला..

" हॅलो .. "

" हाय .. ओळखलंस का? "- मी

" मीरा तूss?.. कुठे आहेस.. आज आली का नाहीस ऑफिस ला?.. सर्व ठीक आहे ना.. आणि हा कोणाचा नंबर आहे? ".. त्याने प्रश्नांचा भडिमार केला माझ्यावर!

" अरे हो.. ऐकशील का... मी एका लग्नासाठी बाहेरगावी आलेय.. दोन -तीन दिवस रजेवर आहे.. म्हणून येऊ शकले नाही... ?आणि हा आईचा नंबर आहे... बाय द वे...विश यू अ व्हेरी व्हेरी हॅप्पी बर्थडे डिअर!!?"

" थँक यू व्हेरी मच! सरप्राईज खूप छान होतं.. तन्वी ने सांगितलं तुम्ही दोघींनी मिळून प्लॅन केलं सर्व... आवडलं मला.. पण तू पाहिजे होतीस... आय मिस्ड यू .. आम्ही इथेच बसलोय तुझ्या केबिन मध्ये "

" हो का.. तन्वी आहे का तिथे? "

" हो आहे ना... थांब बोल तिच्याशी "

"अगं झालं का सेलिब्रेशन ? ☺️"

" हो आत्ताच केक कट केला.. थांब मी बाहेर येऊन बोलते " आणि तन्वी केबिन बाहेर आली.." हां बोल.. अगं तू पण पाहिजे होतीस.. मजा आली.. "

" ह्म्म्म.. असू दे तू केलंस ना सर्व ठरल्याप्रमाणे... गिफ्ट काय आणलेलंस?? "- मी

" अगं मला काही मनातच भरत नव्हतं.. सो मी एक शो पीस आणलं.. छान आहे पण.. ☺️ "

" ह्म्म्म ओके.. चल नंतर बोलूयात... ठेवते.. बाय "

" बाय "

पटकन डायल्ड नंबर डिलीट केला आणि आईचा मोबाईल चार्जिंग ला लावून आम्ही दोघी बाहेर पळालो..!!

To be continued..
?
#प्रीत ?