Avyakt - 2 books and stories free download online pdf in Marathi

अव्यक्त - भाग-2

आरव आणि तन्वी अगदी लहानपाणापासून चे मित्र खर तर दोघांचेही आई वडील कॉलेजचे चांगले friends होतेआणि सध्याचे बिझनेस पार्टनर त्यामुळे अगदी लहानपणासूनच हे सोबत असायचे kg पासून ते कॉलेज पर्यंत सगळ्या ठिकाणी सोबत, tom न Jerry सारखे भांडणार मग पुन्हा एकत्र.त्या मुळे त्यांचा भांडणाकडे सुद्धा कुणी फारस लक्ष देत नव्हत. पण सहा महिन्यांपूर्वी असच त्यांच भांडण झालं पण हे भांडण अजूनही मिटलेलं नव्हतं.
संध्याकाळी पार्टी ला सगळे आले पण आरव चा कौतुक सोहळा एकदम जोरात चालू होता. पण तरीही तो फक्त आणि फक्त तन्वी ची च वाट पाहत होता.तन्वी च्या घरचे पण आले सगळे मग हिला न यायला काय झालं मुद्दामून उशिरा येईल भाव खाण्यासाठी. सगळ्यांसोबत हसत खेळत त्याचा वेळ जात होता पण तो आतुर होता फक्त तिला पाहण्यासाठी. शेवटी एकदाची तन्वी आली. आणि आरव ची प्रतीक्षा संपली एकदाची. छानसा one peace त्यावर उठून दिसतील असे earrings, मोकळे केस आणि हलकासा makeup खूप आरव चा तर तिला पाहून सगळा प्रवासाचा क्षीण कुठच्या कुठे पळून गेला त्याला तर तिला जाऊन चिमटा काढावा वाटला इतक्या उशिरा आल्याबद्दल पण तो गेला नाही.इतक्यात तिनेही त्याच्या कडे बघितलं दोघांचीही नजरा नजर झाली. संवादासाठी फक्त शब्दच हवे असतात? नात्यांची वीण जर घट्ट असली की शब्दांपेक्षा मन जास्त बोलतात ह्याचीच ते अनुभूती घेत होते. ती अगदी त्याचा समोर येऊन उभी राहिली. 'congratulations' ! ती म्हणाली. तो हसला, 'काय झालं हसायला'? ती म्हणाली. 'अग इतकं फॉर्मल वागताना बघायची सवय नाही ना म्हणून. 'उभ्या आयुष्यात माझ्या कुठल्या success नंतर congrats केलेलं कधी आठवलं नाही, म्हणून बाकी काही नाही'. 'न केलेल्या गोष्टी कधी करायच्याच नाही का मग'? ती चा प्रतिप्रश्न. 'कराव्यात जरूर कराव्यात बदल नेहमी चांगलाच असतो'. तो म्हणाला.'मग आनंदी असशील ना आता' ?म्हणजे तुझ्या डोक्याला कटकट नाही न माझी. तन्वी म्हणाली. 'हे बघ तन्वी तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे तू सरळ निर्णय घेऊन मोकळी होते समोरच्याच ऐकतच नाही'. तुला ना समजूनच घेता येत नाही मुळात. तुझ्या मनाप्रमाणे च सगळ्यांनी वागावं असाच अट्टाहास असतो तुझा. तो म्हणाला.'ठीक आहे आहे माझा प्रॉब्लेम तू काही फार वेगळा नाही','तू बोलतच नाही म्हंटल्यावर समोरचा अंदाजच लावणार अरे प्रत्येक वेळेस तुझ्या मनातलं कस कळणार'. ती म्हणाली. 'का पण'? माझ्या प्रत्येक निर्णयात तुला दखल द्यायलाच हवी का? 'मी काय घालावं, कुठली गाडी वापरावी,कुठे investment करावी,even माझी girlfriend कोण असावी हे सगळं तुलाच ठरवायचं असत. मला नाही आवडत अस control केलेल'. तो चिडून म्हणाला. "चुकलं माझं बस" ! 'आणि तो control करण्याचा प्रयत्न नव्हता','इतकाच माझा त्रास होत होता तर ही मनात खदखद ठेवण्यापेक्षा आधीच हे बोलला असता तर'! 'त्या मागे फक्त आणि फक्त काळजी होती'. 'पण तुला नाही कळणार सोड'.ती पण रागातच म्हणाली. 'तू मला कधीच समजू नाही शकणार'! तू कशीही वागली न तरी मी नाही बदलु नाही शकणार, मला वाटलं होतं मी जातोय म्हंटल्यावर तू आनंदी होणार माझं स्वप्न होत ते तन्वी! आणि माझ्या पेक्षा तुला ते पूर्ण व्हावं अस वाटत होतं. आणि जेव्हा पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा मात्र तू मला सोडून गेली!. मला वाटलं ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद तुला होईन पण उलटंच झालं,आरव म्हणाला.' काय रे एरवी साधा कुठला शर्ट घ्यावा हे ही मला विचारतो आणि आयुष्याला इतका मोठा निर्णय घेताना मला साधं सांगितलं पण नाही'. 'हे बघ तन्वी, खरच मी फक्त आणि फक्त तुला surprise देण्यासाठीच नव्हतं सांगितलं', 'तू विश्वास ठेवणार नाही पण हेच खरं आहे'. असा एकही दिवस गेला नसेल की मी तुझी आठवण नाही काढली. प्रत्येक दिवस कसा काढला माझा मला माहिती आहे. पण तुला काय तू राहा आपली मजेत,तो पुढे म्हणाला.'हो,आहे मी मजेतच आहे सध्या कारण आला होता मला तुझा'. तुझी चिडचिड, सतत मला टाळणं म्हणून मला नाही थांबवाव वाटलं तुला. तन्वी तुला खरच कळत नाही का ग !माझी चिडचिड का होतीये ?कारण मला तुझी सवय झाली होती!. तुझं सतत सोबत असण तुझ्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊच शकत नाही. आणि मी नाही राहू शकत दुसऱ्या कुठल्याच मुलींसोबत मी प्रत्येक मुलीमध्ये जिला शोधत असतो ती तूच आहेस तन्वी! आणि हे जर तुला सांगितलं तर तू मला हसण्यासावरी नेलं असत काय करणार मी ?तू मला समजून च नाही घेऊ शकली. आरव म्हणाला. 'अरे एकदा तर बोलून बघायचं कदाचित हो म्हणाले असते मी', माझीही तीच अवस्था होती म्हणून मी पळून नाही ना गेली. मला तुझं वागणं कळत नव्हतं पण वाटलं कधीतरी बोलशील तू पण नाही तू पळवाट काढलीस! तन्वी म्हणाली.' काय! तुला पण same feelings होत्या मग बोलली का नाही एरवी इतकी बडबड करत असते मग हे बोलायला काय जात होतं ग'! त्याच्या बोलण्यातुन आनंद,प्रेम राग सगळं एकदाच व्यक्त होत होतं. 'मीच का तू कधी बोलणार' ? 'तू खरच वेडा आहे अरे आता तरी react हो'. ती लटक्या रागानेच म्हणाली. wait! मग त्याने तिचा हात पकडला आणि तिला सगळ्यांसमोर घेऊन आला. आरव काय चाललंय तुझं! ती म्हणाली. just wait dear! Hey guys...
May I have your attention please!!
Today is the special day of my life as I came back after such long time to my home & to add more sugar to this happiness I want to announce something in front of all of you which I was hiding or may be I realised now..
Here's my soo called bachpan ki dost Tanvi..
'अरे काय करतोस तू आरव?'
आरव गुडघ्यावर बसतो आणि बोलायला सुरुवात करतो
'Shh, let me talk now.. Tanvi "I love u"
अग लहानपणापासुन एकच best friend आहे माझी .. जिला माझ्या बद्दल सगळंच माहिती आहे... तुझ्या वरच प्रेम मला तुझ्या पासून दूर गेल्यावर जाणवलं..... बघ ना कस असत .. आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीची किंमत ती व्यक्ती दूर गेल्यावरच कळते.... I love u Tanvi for what you are, for always supporting me, for always being there in my highs & lows. You are my guide, support system, my friend, my critisizer, my helping hand yaar.. U kno आज माझ्या कडे शब्द नाही आहे तू माझ्या साठी काय आहे हे सांगायला.. यार ...फक्त इतकंच म्हणू शकतो की 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तू आहेस आणि मला तू हवी आहेस माझ्या सोबत कायमची'.. As my better half.. Tanvi, will u marry me???
हे सगळं चालू असताना मधेच अंकित म्हणतो. 'भाई ,'तू उसको propose कर रहा हे कुछ missing नही लग रहा '? त्याने लगेच बाजूच्या bouquet मधून एक red rose काढून आरव च्या हातात दिला... 'भाई, ऐ ले.'
आणि आरव मग तो तन्वी ला देतो.
तन्वी च्या डोळयात पाणीच आलं. तीने फक्त मानेनेच होकार दिला. "खुश "!!तो म्हणाला. तो म्हणाला. हेच आधी बोलला असता तर ? ती म्हणाली. मग मला विरहातल प्रेम नसत कळाल न! तो हसून म्हणाला. खूप filmy dialogue होता हा! ती म्हणाली. आणि ती ही हसली. सगळ्यांनी त्यांच अभिनंदन केलं. finally दोस्ती रिश्तेदारी मे बद्दलनेका टाइम आ गया हे। तन्वी चे बाबा आरव च्या वडिलांना म्हणाले. काय हो बाबा तुम्ही पण काय ह्याच्या सारख filmy बोलताय तन्वी लाजून म्हणाली. मग त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या जुन्याच नात्याची नव्याने सुरवात केली.

..............समाप्त............

इतर रसदार पर्याय