Ramniy - 1 books and stories free download online pdf in Marathi

रमणीय - 1

नुकतेच दोन दिवस झाले होते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून आणि परत रियाला पुण्याला जावे लागणार होते. तिला तर खूप राग आला होता फक्त उन्हाळ्याची सुट्टी मिळते आणि या वर्षी ती पण नव्हती मिळणार पूर्ण दीड महिना तिला पुण्याला जावे लागणार होते ट्रेनिंगसाठी.
दोन दिवस तिचे घरी मजेत गेले
नंतर तिने पॅकिंग केली
तिला एकटीलाच जावे लागणार होते पुण्याला कारण
घरी खूप मोठा समारंभ होता आणि तो खूप मिस करणार होती शेवटी निघायचं ठरलं शेवटी काका आला तिला सोडायला मध्येच तिची मैत्रीण माधवी तिला जॉइन झाली. काका ड्राईव्ह करत असल्यामुळे आमच्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. शेवटी खूप वेळानंतर आम्ही पुण्याला पोहचलो.


पुढचा प्रश्न होता हॉस्टेल चा आम्ही हॉस्टेलच्या मालकीण ला सांगून अगोदरच खोल्या बूक करून ठेवल्या होत्या . किती तरी वेळ आम्ही हॉस्टेल शोधत होतो सापडले एकदाचे खोलीमध्ये सामान नेवून ठेवले सगळ्यांची ओळख झाली त्यानंतर काका जायला निघाला त्याला बाहेर पर्यंत सोडून आम्ही खोली मध्ये आलो

कोण कोठे राहणार हे निश्चित झाले आम्ही सगळे फ्रेश झालो.

घरी फोन करून पोहचल्या चे कळवले मग सगळ्या मिळून गप्पा मारत बसलो. लवकर झोपी गेलो कारण उद्या सकाळी लवकर उठायचे होते आमचा पहिला च दिवस होता म्हणुन आम्हाला उद्या लवकर जावे लागणार होते. शेवटी एकदा मी व्हॉट्स ऍप मॅसेज चेक करून घेतले आणि झोपली गेले.

सकाळी सगळ्यांच्या आवाजाने मल जाग आली पाहते तर काय

सगळे रेडी झाले होते. मग मी पटकन तयार झाले

सगळे जायला निघालो अगोदर ती कंपनी आम्ही कोणी पहिली नव्हती.

गूगल मॅप वर त्या कंपनीचा पत्ता टाकला आणि दिशा पहिल्या व त्या कंपनी मध्ये आम्ही पोहचलो. सगळे आल्यानंतर सगळ्यांशी परिचय झाला.सगळ्यांना टीम मध्ये विभाजित केले गेले सगळ्या मिळून ५ गट तयार झाले. गटाचे प्रमुख निवडण्यात आले. मी सुध्दा एका गटाची प्रमुख होते. आमच्या ग्रूप चे नाव आम्ही फॅब 5 ठेवले कारण आम्ही ५ मेंबर्स होतो. सगळ्यांनी खूप छान छान नावे आपापल्या ग्रूप्स ना ठेवली या सगळ्या मध्ये आम्ही खूप मज्जा केली नंतर सरांनी आम्हाला वेग वेगळे टास्क दिले आम्ही ते पूर्ण करत बसलो.

थोड्या वेळाने सरांनी आमच्या कामाची पाहणी केली सगळ्यांनी खूपच कमी वेळात छान काम केले होते. आता सगळ्यांना खूप भूक लागली होती सगळ्यांसाठी सरांनी खायला मागवले खाऊन झाल्या नंतर आम्ही गेम्स खेळत बसलो असा आमचा पहिला दिवस गेला. रूम जाऊन सगळे फ्रेश झाले जेवण झाले. पुण्याला येण्याच्या आधीच मी मैत्रिणीच्या फोर्स ने इंस्टा ग्राम चे अकाउंट ओपन केले होते. आज मी ते पाहत बसले कोणाच्या रिक्वेस्ट आल्या आहेत , कोण ओळखीचे आहे पाहून झाल्यानतर झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार झाले. आज आम्ही काहीतरी नवीन शिकणार होतो याची पूर्व सूचना देण्यात आल्या होत्या कंपनी मध्ये आम्ही पोहचलो तेव्हा सरांनी टीम २ आणि ३ मध्ये विभाजित केल्या वरच्या मजल्यावर २ टीम आणि राहिलेल्या खालच्या मजल्यावर.

माझ्यासाठी सगळेच नवीन होते. काय करायचे ते सांगण्यात आले आणि आम्ही कामाला सुरुवात केली पहिल्यांदा खूप अडचणी येत होत्या खूप प्रश्न होते पण सगळ्यांची उत्तरे सर आम्हाला वेळोवेळी देत होते. एका दिवसाच्या requirements आम्ही वेळेत पूर्ण करत होतो.

रोज आपण काय करणार आहोत आणि आपण काल काय केले याची सर उजळणी करून घेत ५ मिनीटे. माझा ग्रूप खूप छान काम करत होता आणि वेग ही छान होता त्यामुळे सरांनी आमचा ग्रुप २ आणि ३ मध्ये विभाजित केला आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्ही सगळे ग्रुप एकत्र यायचो आणि काही अडचणी असतील तर त्या सगळ्यांसोबत शेअर करायचो , आमच्या ग्रूप छा progress report अडचणी पण द्यायला लागायचा नंतर अशा गेम्स खेळायचे की त्यातून नवीन काही तरी वेगळे शिकायला मिळेल.

क्रमशः

इतर रसदार पर्याय