बंदिनी.. - 19 - अंतिम भाग प्रीत द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

बंदिनी.. - 19 - अंतिम भाग

दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू बरसत होते.. एखाद्या लहान मुलासारखा तोही रडत होता... 😭😭...


थोड्या वेळाने दोघेही शांत झालो.. मिठी सैलावली.. त्याने त्याच्या हातात माझा चेहरा धरला आणि माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवले.. आणि दोन्ही हातांनी माझे गाल ओढले.. 'googly woogly whoosh!!'... तशाही स्थितीत आम्ही दोघेही हसलो 😃.. आज अनय च्या मिठीत माझं मन सर्वार्थाने तृप्त झालं होतं..!

दोघेही वॉशरूम मध्ये जाऊन तोंड धुवून आलो.. अनय ने काऊंटर वर कॉल करुन वॉचमन ला गाडी काढायला सांगितले.. आणि आम्ही खाली उतरलो.. अनय मला बस स्थानकावर सोडायला आला.. पोहोचेपर्यंत कार मध्ये शांतता होती.. ना तो बोलला.. ना मी...! 😑फक्त आमचे डोळेच काय ते बोलत होते..!! एकमेकांच्या डोळ्यांसोबत हितगुज करत होते....अनय ने बस स्थानकाबाहेर कार पार्क केली.. दोघेही कार मधून उतरलो.. तसा अनय माझ्याजवळ येत म्हणाला..

"मीरा.. तुझी इच्छा असेल तर यानंतर ही भेटू.. निदान वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा ....😐"

"मला नाही वाटत अनय आपण परत भेटू शकू..😒 आणि सारखं सारखं भेटणंही योग्य वाटणार नाही 😑.. विक्रांत चा ही विचार करायला हवा.. "

"ह्म्म्म....😞 निदान कॉल तरी?..😓"

"बघुया... 😔...... चल... बस आली.... मी निघते... "

हृदय आतून ओरडत होतं... 😭
🎶🎶

ये रूह भी मेरी..
ये जिस्म भी मेरा..
उतना मेरा नहीं..
जितना हुआ तेरा..
तूने दिया है जो
वो दर्द ही सही..
तुझसे मिला है तो
इनाम है मेरा..

मेरा आसमान ढूंढें तेरी ज़मीं..
मेरी हर कमी को है तू लाज़मी..

ज़मीं पे ना सही
तो आसमां में आ मिल
तेरे बिना गुज़ारा
ऐ दिल है मुश्किल.....!

🎶🎶

अनय अनिमिष नजरेने माझ्याकडे बघतच होता... मी त्याच्याकडे बघायचं टाळलं.. खाली मान घालून बस पर्यंत गेले.. एकदा मागे वळून बघितलं... अनय अजूनही माझ्याचकडे बघत होता... मी त्याला बाय केलं.. त्यानेही हात हलवून मला निरोप दिला... त्याचा चेहरा खूप काही बोलत होता.. मी जाऊ नये असंच त्याला वाटत होतं.. मी जास्त वेळ तिथे न थांबता बस मध्ये खिडकीजवळच्या एका सीट वर जाऊन बसले.. तो अजूनही तिथेच उभा होता.. थोड्याच वेळात बस सुरू झाली..मी त्याला परत बाय केलं... बस त्याच्या पुढ्यातून निघून गेली.. मी अजूनही खिडकीतून मागे वळून बघत त्याला बाय करत होते... तो पूर्ण नजरेआड होईपर्यंत आम्ही एकमेकांकडे बघत होतो.. अखेर बस ने एक वळण घेतलं आणि तो दिसेनासा झाला...! मी एक सुस्कारा सोडून मागे सीट ला टेकून डोळे मिटून बसले.. आज दिवसभरात जे जे झाले ते परत परत आठवत होते....☺️डोळयांत अश्रू होते पण.. आज मन कसं एखाद्या पिसासारखं हलकं झालं होतं...! अनय च्या विरहाच्या दुःखाचं कितीतरी ओझं आत्तापर्यंत माझ्या मनावर होतं... जे मी कोणाजवळच बोलून दाखवू शकत नव्हते... पण आज अनय ला भेटले आणि सर्व भार उतरल्यासारखं वाटलं...!!

बस माझ्या शहराच्या जवळ येत होती.. स्थानकामध्ये पोहोचायला अजून पंधरा मिनिटे होती.. अजूनही मी अनयचाच विचार करत होते...इतक्यात माझा फोन वाजला... आईंचा फोन होता...

"हां बोला आई...."

"मीरा.. मीरा... कुठे आहेस तू आत्ता??"

"मी बस मध्ये आहे आई.. पोहोचतेच आहे... पण तुमचा आवाज का असा घाबरल्यासारखा वाटतोय..? सर्व ठीक आहे ना?😧"

"मीरा.. ते... विक्रांत......."

"hello... आई... काय झालंय विक्रांत ला😨... प्लीज नीट सांगा..."

"अगं त्याला हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केलंय... 😢 शुद्धीवर नाही आला अजून.... तू लवकर ये... आम्ही सर्व इथेच आहोत.. आपल्या फॅमिली डॉक्टर कडे...."

"हो आई.. मी... मी... तिकडेच येतेय.... प्लीज... तुम्ही रडू नका... मी आलेच...😢😖"

फोन कट केला आणि मी सुन्न पडले.. हे काय झालं अचानक..?? विक्रांत तर ठीक होता.. मग असं अचानक काय झालं त्याला.... देवा... आणखी काय वाढून ठेवलंयस माझ्या नशिबात??? 😑😥😭😭 मला तर काही सुचेनासं झालं होतं...

बस स्थानकात पोहोचली... मी घाई घाईतच उतरले.. ऑटो करून थेट हॉस्पिटल ला गेले... ऋतू खाली उभी राहून माझीच वाट बघत होती... मी ऑटो मधून उतरताच तिने माझ्या हातातली पर्स वगैरे घेतली.. तिचे डोळेही रडवेले झालेले होते... मी तिला काहीच विचारलं नाही.. सरळ आतमध्ये धाव घेतली... ऋतू मला विक्रांत ला अ‍ॅडमिट केलं होतं तिथे घेऊन आली...विक्रांत चे आई.. बाबा.. माझे आई पप्पा.. सर्वच जण तिथे हजर होते.. विक्रांत ला ICU मध्ये ठेवलं होतं... मी दरवाज्याच्या काचेतूनच त्याच्याकडे बघितलं... त्याला saline.. शिवाय कसल्या कसल्या वायर्स लावलेल्या होत्या.. मला खूप भरून आलं... मी मटकन् खाली बसले.. तसे सर्वजण माझ्याजवळ धावत आले.. मला तिथल्या एका खुर्चीवर बसवलं.. ऋतू ने पाणी दिलं प्यायला... पण अश्रू अखंड बरसतच होते... कसबसं आईंना विचारलं..
"काय झालंय विक्रांत ला?? 😧"

"अगं माहीत नाही.. 😞 तू गेलीस अन्‌ बर्‍याच वेळाने तो उठला.. आंघोळ वगैरे केली आणि तसाच परत लॅपटॉप घेऊन बसला.. आणि तुला सकाळी घाईघाईत सांगायचं विसरले की तो रात्रीही नीट जेवला नव्हता... त्याचं ताट त्याने तसंच किचन मध्ये आणून ठेवलं होतं...मी नाश्ता देत होते तर ते ही नको बोलला.. कसंतरीच होतय म्हणाला.. थोड्या वेळाने मला त्याने हाक मारली... मी किचन मधून धावत आले.. तर तो छातीवर हात ठेऊन छातीत दुखतंय म्हणाला... त्याला जास्त त्रास होत होता.. आणि बोलता बोलता तो चक्कर येऊन पडला... म्हणून त्याच्या बाबांनी जाऊन ऑटो आणली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही त्याला इकडे घेऊन आलो 😢.. लगेचच तुला कॉल केला.. "

इतक्यात आमचे Family डॉक्टर आले... मी त्यांना विचारलं..
" डॉक्टर.. नक्की काय झालंय विक्रांत ला...??"

"टेस्ट केल्यात आपण.. Reports येतीलच इतक्यात.. टेंशन नको घेऊ... आणि खाली ऑफिस मध्ये जाऊन काही formalities तेवढ्या पूर्ण कर... "

मी आणि ऋतू खाली गेलो.. जवळ जवळ अर्धा तास गेला तिथेच.. वर आले तर बाहेर सिस्टर भेटली तिने सांगितलं.. की डॉक्टर ने तुम्हाला आत केबिन मध्ये बोलावलंय... मी आत गेले... तसं त्यांनी मला बसायला सांगितलं... आणि म्हणाले...

" हे बघ मीरा... सर्व reports नॉर्मल आहेत... घाबरायचं काही कारण नाही.. Stress मुळे आणि कालपासून पोटात काही नसल्यामुळे त्याची acidity खूप जास्त वाढली असावी... त्यामुळेच त्याच्या छातीत दुखत असावं... आणि कदाचित त्यामुळेच त्याला चक्कर आली असावी.. तो शुद्धीवर आलाय... सर्व वायर्स आणि सध्या saline देखील काढली आहे... जा बघून ये त्याला... "

माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले... मी धावतच विक्रांत असलेल्या रूम कडे गेले...सर्वजण खुश दिसत होते.. तशा आई पुढे येत म्हणाल्या..

" मीरा.. विक्रांत शुद्धीवर आलाय.. 😃.. आमच्या सोबत बोललाही... आता झोपलाय बहुतेक.. जा बघून ये.. "

मी घाईघाईत आतमध्ये गेले... विक्रांत झोपला होता... मी त्याच्याजवळ गेले... बेड जवळ च्या स्टूल वर बसले.. विक्रांत च्या चेहर्‍यावरून हात फिरवला.. आणि मला रडू आलं... तो झोपला होता तरीही मी एकटीच बोलत होते.. 'किती घाबरवलं होतंस रे 😢.. स्वत:च्या जिवापेक्षा काम महत्त्वाचं होतं का... एवढी पण काळजी नाही घेऊ शकत का स्वतःची.. 😥 तुला काय झालं असतं तर???'..

"तर काय???"

"जीव गेला असता माझा..." म्हणत मी कोण बोललं म्हणून विक्रांत कडे बघितलं..

"विक्रांत!!!.. तू जागा आहेस??!!! 😃"

"हो ना... बायकोचं भाषण ऐकत होतो.. 😁"

"तू ना... तू चल घरी... तुला बघतेच मी... किती हा निष्काळजीपणा 😡" मी मुद्दाम रागावून बोलले..

तसा तो हळूहळू उठून बसला.. मी त्याला पकडलं..तसं त्याने मला मिठीत घेतलं आणि मस्तीत म्हणाला.. " मग का गेलीस मला टाकून.. "

माझे डोळे डबडबले.. त्याला घट्ट मिठीत घेत म्हणाले..
"आता नाही जाणार 😥😥"

" ए वेडाबाई.. मस्करी केली 😂"

"ह्म्म्म्म..."

मी त्याच्या मिठीत रडतच होते....

परत एकदा नात्यांची बंधने महत्त्वाची ठरली होती.... परत एकदा ही 'बंदिनी' नात्यांच्या बंधनात बंदिस्त होत होती....! डोळ्यांसमोर कसलंतरी धुकं जाणवत होतं... त्यात अनय चा चेहरा धूसर होत गेल्याचं दिसलं.... आणि त्याच धुक्यात आता विक्रांत चा चेहरा स्पष्ट दिसू लागला होता.....!!


********* समाप्त ********

धन्यवाद 🙏 😊