naant - 1 books and stories free download online pdf in Marathi

नातं - 1

भर पावसात मी खिडकि बाहेर पडणार धो-धो पाउस बघत होतो. सर्वत्र अंधार पसरलेला सोसाट्याचा वारा सुटलेला .मी पावसाला न्हहाळत गरमा गरम चहा घेत होतो . तेवढ्यात दाराची बेल वाजलि .
आता कोन आलंं! असं म्हणत मी दरवाजा उघडण्यासाठी जिना उतरून निघालो . तेवढ्यात लाईट गेली . मी दरवाजा उघडला पण माणसाचा चेहरा दिसला नाही.त्याने मला एक पुस्तक दिले . तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला . प्रकाशामुळे मी डोळे मिटले.
पुन्ह पाहतो तर तो व्यक्ती दिसेनासा झाला.मी कमाल आहे या माणसाची असं म्हणतं दरवाजा लावला .
पुस्तक टेबलावर ठेवले आणि मी मिटर कडे जाणार तेवढ्यात लाईट आलि. त्य दिवसांपासून मला घरात माझ्या शिवाय कोणाचे तरी अस्तित्व जाणवत होते.मी झोपल्यावर कोणी तरी माझ्याकडे टक लावून पाहत आहे असे अनेकवेळा मला भास झाले .कोण आहे हे मला माहीत नाही पण कोणीतरी होतं ....
एकदा माझा मित्र रमेश उर्भ रम्या मला भेटायला घरी आला त्याने थोड्याच वेळात काही तरी बिनसलंय हे ओळखल . मी ही विशय न मानता त्याला सर्व सांगितले . हे सर्व आयकुन तो ही कोड्यत पडला.
त्याने‌ विचार केला केला आणि मला म्हनाला कि एकातरीत ती जी कोणी आहे ? ते तूला कसलाही त्रास देत नाही पण तूझा सहवास त्याला आवडतो . मी म्हणालो की --अरे पण मला मात्र या सगळ्याची फार भिंती वाटत आहे .तू एक काम कर तूं माझ्या सोबत इथे-
च रहा आणि तूला काय शोधायचे आहे ते शोध ...
असेच आनखि काही दिवस गेले त्यालाही आता कोनाचेतरी सस्तित्व जाणवू लागले होते.
एके दिवशी मी सकाळी त्याला म्हनालो की आज माझ्या स्वप्नात तो म्हणाला पुन्हा आल्या आणि मी एक गाव ही पाहिले रम्या म्हणाला आणखि काय काय पाहिलेस हि त्याला गावाचे नावही पाहिले म्हणून सांगितले .रम्या म्हणाला काय नाव आहे गावाचं
मी सांगितलं "सागर खेडे" तो म्हणाला आपण लगेचच
तीथे जाऊ आणि शोध घेऊ .आम्हि खूप शोधलं पण सागर खेडे काही सापडले नाही.मग एका दिवशी मी आणि रम्या आमच्या घरी गावाला गेलो आई ,बाबा, दिदि सगळ्यान सोबत गप्पा मारल्या आणि बोलत-बोलता सागर खेडे गावाचा विषय निघाला तेवढ्यात आई म्हणाली की तुझा जन्म त्याच गावात झाला मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी रम्या कडे पाहिले त्याने
आश्चर्याने माझ्याकडे पाहीले त्याच्यही चेहर्यावर मला प्रश्र्नांचीन्ह दिसत होते . आम्ही म्हणालो की आम्हि शोधले पण मग आम्हाला का सापडले नाही ?..
त्यावर आई म्हणाली कसं सापडेल ते गाव आता अस्तित्वातच नाही ...रम्या : म्हणजे ?...
आई:अरे त्या गावात पुर येऊन गेल्या पासून त्या गावाचे नाव बदलले आहे ते गाव सध्या सानवे या नावाने ओळखले जाते . आम्हा दोघांना प्रश्न मिटला म्हणून खूप आनंद झाला होता पण त्याच बरोबर नविन प्रश्न समोर येत होते . आई म्हणाली पण तूमचं तीथेच काय काम ?..
रम्याने खोटे कारण सांगून वेळ मारली ..
आता आम्ही पुढच्या प्रश्र्नांची उत्तरे शोधायला निघालो.
रम्या आणि मी सानवे गावात पोहोचलो पण तेवढ्यात संध्याकाळ झाली होती. म्हणून आम्ही एका मानसाला राहण्यासाठी जागा कोठे मिळेल असे विचारल्यावर त्याने एका घराकडे बोट केले . आम्ही घराकडे पाहून पुन्हा त्यांच्याकडे पाहतो तवढ्यात तो माणूस अदृश्य झाला .रम्या म्हणाला: आता आपल्याला जास्त सावध राहायला हवे. आम्ही दोघे घराचा दरवाजा उघडला आणि आत गेलो तर घर अगदी टापटीप आम्हि विचार पूस केल्यावर कळले की घर कित्येक वर्षे बंद होते.
यावर रम्या म्हणाला आपण येणार आहोत हे ओळखलं होतं वाटतं त्या भुताने ... आम्ही जेवायला काही आहे का नाही याचा शोध घेतला तर घरात गरमागरम जेवण
तयार होते यावर रम्या म्हणाला भुत तुझा चांगलाच
चहाचा दिसतोय .यानंतर मी एका सोफ्यावर झोपलो आणि रम्या त्याच्या ल्यपट्यापवर काम करत बसल पाहता--पाहता माझी झोप लागली .एक म्हातारा घरात बसला स्वताचे शेवटचे श्र्वास घेत होता . आपला मुलगा आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहत आपले दिवस ढकलत होता आणि त्याचां धीर संपला त्याने शेवटचे
श्र्वास सोडला . आणि मी तचकन उठलो . माझ्या आवाजाने रम्या पण घाबरला.
रम्या: काय झालं?...
भयंकर स्वप्न पाहिलेस का ?...
तेवढ्यात सोसाट्याच्या वारा सुटला खिडक्यांची दारं एका मेकावर आपटु लागली .लाईट ये जा करु लागली आणि सर्वत्र अंधार पसरला .रम्या ने घरात मेणबत्ती शोधली .
तेवढ्यात तो म्हातारा माणूस आमच्या शेजारी येऊन बसला . आम्हाला त्याची फारशी भीती वाटत नव्हती कारण त्याने आम्हाला कधिच हानी केली नव्हती .
तो म्हणाला :मला माहीत आहे की तूम्हाला माझ्याविषयी अनेक प्रश्न पडले असतिल ...
मी तूम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नची उत्तरे देतो पण त्या आधी मी जे काही सांगणार आहे ते तूम्ही ऐकावे त्यातूनच तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नची उत्तरे तूम्हाला मिळतील ....
क्रमश

इतर रसदार पर्याय