सोलाह बरस की बाली उमर को सलाम...?? (भाग-1) शमिका द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोलाह बरस की बाली उमर को सलाम...?? (भाग-1)

भाग 1


नेहमीप्रमाणे आजही अर्पिता दहा वाजता ताडकन उठली, ब्लँकेटमध्ये हात घालत इकडे तिकडे आपला मोबाईल शोधू लागली..
"हुश्श दहा वाजले तर... अरे यार मला आज लवकर उठायचं होतं, हा अलार्म पण ना, एवढी मोबाईलला चार्जिंग करते तरी वाजत नाही.." असं बोलत अर्पिता आपले अंथरूण उचलत म्हणाली आणि आईला पाहून थोडी घाई करू लागली.

आई तिची घाई पाहत म्हणाली, "काय एवढी घाई करते आता?? झालं सकाळी सहा वाजल्यापासून उठवते तू उठेल तर...नुसता तो अलार्म लावते, अख्खं घर जागं होतं पण तू काय या कुशीवरून त्या कुशीवर पण हालत नाही.." , आई थोडी वैतागून बोलली.

"अगं मग तू उठवायचं ना..," (अर्पिता डोळे चोळत आई कडे पाहून बोलत होती.)


"हा... मी उठवायचं.. झाले तीन तास तुला आवाज देते..तू मोठी कुंभकर्ण बाई.. तुला कोण कधी उठवणार..रात्रीच्या बड्ड्या बड्या बाता माराती..आणि सकाळी आहे तेच..." आई काम करता करताच भुवया उंचावात उत्तरली.

"हे बघ आई मला ऑलरेडी उशीर झालाय... मला पटकन आवरून निघाव लागेल.." ( अर्पिता खूपच टेन्शन मध्ये बोलली.)


"बर घे उरकून लवकर अंघोळ अन् ये नाश्ता करायला.." आई थोडी शांत होत म्हणाली.

"नाही अंघोळ वगैरे राहू दे आता.. बघू नंतर..." असं बोलून अर्पिताने कसेबसे आपले तोंड धुतले, केस विंचाराले..आणि पटकन आवरून गाडीची चावी घेऊन निघाली.

आई स्वतःशीच कुजबुजत पण ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाली, "अरे अशी काय ही पोर, नाष्टा नाही काय नाही... हे असंय दहा वाजेपर्यंत झोपायच आणि नंतर अशी घाई करायची... "
लवकर ये ग घरी, आणि दुपारी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये खा काहीतरी.. ( असं बोलून आई पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली )

अर्पिता गाडी काढत स्वतःशीच बडबडत बोलली.. "अरे देवा आता ही गाडी लवकर चालू झाली पाहिजे,... अंकुश चे 65 मिस कॉल... मेले मी आता..."

असं बोलत ती घाई घाईत गाडीला स्टार्टर मारून निघाली.

तर या कथेतली अर्पिता ही कशी आहे हे थोडक्यात आपल्याला लक्षात आले असेल. एकदम धांदरट, वेंधळी, आणि आयुष्यात भरपूर स्ट्रेस असलेली ही मुलगी...


लहानपणापासून वेंधळी असलेली ही मुलगी प्रत्येक कामं ऑन द स्पॉट करत असत... म्हणजे जर सकाळी नऊला पेपर असेल तर चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये ही पावणे नऊला घरातून निघणार आणि थेट परीक्षेच्या बेल ला ती वर्गाच्या दारापाशी 'सर आत येऊ' अशी धापा खात विचारणारी मुलगी... सरांचा आरडा ओरडा खाऊन पेपर लिहिणारी आणि सर्वांच्या आधी वर्गा बाहेर पडणारी... म्हणजे प्रत्येकच गोष्टीत घाई, तिचं कोणतंही काम शांतपणे होत नाही पण असं असेल तरीही आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेत पहिल्या तीन नंबर मध्ये येणारी, कितीही झाले तरी कुणी ओरडत असताना शांत राहणारी....

अशा या अर्पिताने नेहमीप्रमाणे आजही अंकुशला भेटायला थोडा नाही तर फारच उशीर केलेला होता, ती साठ सत्तर च्या स्पीड ने गाडी चालवत ठरलेल्या जागी पोहचली...अंकुश त्याच्या गाडीवर कानाला फोन लावत, कट करत परत इकडे तिकडे बघत पुन्हा फोन लावत बसलेला होता , येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत कुठे लाल हेल्मेटवाली आपली अर्पिता दिसतीये का हे पाहत त्याचा जीव पूर्ण कासावीस झालेला होता..
अर्पिताने हे सारं लांबूनच पाहिलं.. तिने थोडी अलीकडेच गाडी पार्क केली आणि त्याला एखादं गुलाब घेऊन जावं असा विचार करत तिने इकडे तिकडे फुलांच दुकान शोधले, जवळ जवळ पंधरा मिनिटांनी तिला दुकान सापडले आणि ती धावत पळत जाऊन गुलाब विकत घेऊन पाठीमागे गुलाब लपवत त्याच्या दिशेने आली..

इकडे कासावीस झालेल्या अंकुशने तिला आलेल पाहिले, तिने एवढा उशीर केला तरी थोडाही राग किंवा वैतागलेपणा त्याच्या चेहऱ्यावर न दाखवता त्याने तिला विचारले,

"काय ग आज गाडी नाही आणली का??आणि एवढी धावत पळत का आली...??"

अर्पिता काही बोलणारच तेवढ्यात तो तिला म्हणाला, "बस गाडीवर मी पाणी बॉटल आणतो..." आणि पाण्याची बॉटल आणायला जवळच्या दुकानात गेला, अर्पिता त्याच्या गाडीवर बसली हातातलं गुलाब डोळ्यासमोर धरत ती एकटीच हसू लागली..आणि लाजत ते गुलाब तिच्या बॅगेत ठेवले आणि त्याच्या आकृतीकडे नुसती एकटक पाहत बसली, मनात विचार केला मी जवळ जवळ एक दीड तास उशिरा आले, एवढा वेळ इथं वाट पाहत तो बसला आणि मी उशिरा येऊन तो मलाच पाणी आणायला गेला... मी का एवढी वेंधळी आहे... तो माझी किती काळजी घेतोय, मला बाकी काही नाही पण तो मला समजून घेतोय... आत्तापर्यंत कधीही मी लवकर आले नाही तरी मला एवढं का समजून घेत असेल हा.... नवीन प्रेम आहे म्हणून का, नाही असं म्हणतात की नव्याचे नऊ दिवस...
ती स्वतःच्याच डोक्यात मारत स्वतः वरच हसली ... "तीन वर्ष झाले की आता" .. अशी म्हणाली, आणि तेवढ्यात अंकुश आला, तोपर्यंत तिचा दम ही गेलेला होता .. तो म्हणाला "पी पाणी पी आधी..."
अंकुश तिला बॉटल चे झाकण उघडून बॉटल देत म्हणाला.

तिने पटकन दोन तीन घोट पाणी पिले त्यालाही दिले...

अंकुश पाण्याची बाटली बॅगेत ठेवत म्हणाला, "आज नाष्टा नाही केलेला दिसते... चल चहा बिस्कीट खाऊया..."

अर्पिता थोडीच खट्याळ हसली कारण तिने खरंच नाष्टा केलेला नव्हता आणि तिला सकाळी चहा बिस्कीट खाल्ल्या शिवाय चैन पडत नसत... तरी ती खट्याळ पणेच बोलली..

"नाही मी नाष्टा करून आले, अरे नाष्टा करत होते म्हणूनच एवढा लेट झाला..."

अंकुश मोठ्या मोठ्या ने हसू लागला... "अग पारूशे तू अंघोळ तरी केली का..? आणि नाष्टा करायला वेळ लागला म्हणती... " अंकुश हिनवल्या प्रमाणे तिला बोलला.

त्याने हसतच तिचा हात पकडला आणि दोघे जवळच्या त्यांच्या नेहमीच्या हॉटेल मध्ये गेले.

नेहमी प्रमाणे तिथला वेटरने पण चहा आणि बिस्कीट आणून दिले..


"आज मला खारी खाऊ वाटते..." अर्पिता एकदम खट्याळ बोलत होती आणि कदाचित तिच्या याच निरागसतेवर अंकुश फिदा होता..

अंकुशने वेटरल सांगून जवळच्या बेकरीतून खारी आणायला सांगितले.

दोघेही रोज फॅमिलीरूम मध्ये बसायचे कारण त्यांना तिथे एकांत मिळत आणि जे काही बोलायचं ते मन मोकळे पणाने बोलता यायचं.. जवळ जवळ ते तीन वर्ष त्या हॉटेल मधले फिक्स कस्टमर... त्यामुळे त्या हॉटेल च्या मालकाला ही काही प्रोब्लेम नव्हता...

फॅमिली रूम असल्यामुळे तिथे कुणी फारसं फिरकत नसत म्हणून ती रूम त्या दोघांचीच असल्याचे ते मानत..

वेटर गेलेला पाहत त्याने तिला विचारले... "काय मग खरंच तू अंघोळ केली नाही ना...खर बोल .. पारुशी..."
अर्पिता - मग काय करू... लेट झाला असता... ( अर्पिता तिने अंघोळ केली नाही याचं समर्थन देत बोलली )

अंकुश - त्यात काय एवढं वेट केला असता..आणखी पंधरा मिनिटे थांबलो असतो, पण अशी पारूषी यायचं नव्हतं... ( अंकुश चिडवल्या गत बोलला. )

अर्पिता - का..? ( अंकुश कडे प्रश्नार्थक पाहत म्हणाली )

अंकुश हसत म्हणाला, "अग तो वेटर घाबरला ना मगाशी..."

अर्पिता क्युटपणे हसली आणि बोलली "डोन्ट वरी तू घाबरला नाही ना..."

अंकुश - "मी कसा घाबरु... मला सवय झालिये..."

अर्पिता पटकन "हं" बोलली....

अंकुश ला अजूनच हसू आलं आणि तिलाही जोक समजलं आणि ती त्याला मस्ती मध्ये मारू लागली.

इकडे तिकडे कुणी नाही हे पाहत अंकुश ने तिचा हात पकडला..

"सोड हात...." अस ती लाजून बोलली...

"नाही तू बोल आधी तू पारूशी आहे .." अंकुश मुद्दाम तिची खेचायला म्हणून तिला तंगवू लागला...

"नाही बोलणार ..." अर्पिता रागात पण खट्याळ पणे स्वतः वरच हसत बोलली..

अंकुश पण तिचा हात घट्ट पकडत बोलला "मग मी पण हात नाही सोडणार...."

अर्पिता हात सोडण्याचा प्रयत्न करत म्हणाली "सोड...."

"नाही सोडणार.." अंकुश तेवढ्याच ताकदीने बोलला..

अर्पिता शेवटी कळवळून लाजून बोलली "सोड ना...."

असच त्या दोघांचं चालू असताना वेटर खारीचं पाकीट घेऊन आला आणि ते दोघे सावरले....

वेटर पाकीट देऊन निघुन गेला.

ते खोलत त्याने तिला दिले आणि बोलला "धर खा पारुशे..."

"तूच .." अर्पिता तोंड वाकडं करत खट्याळपणे बोलली.

"नाही बाबा मी तर सकाळी सहालाच अंघोळ करतो तुझ्या सारखं नाही दहाला उठत..." अंकुश पुन्हा तिला चिडवत बोलला.

"ए मी दहाला नाही उठले ..." अर्पिता चहा खारी खात खात म्हणाली.

"मग कितीला उठली...?" अंकुश एक चहाचा घोट पीत म्हणाला.

"पावणे दहाला..." जीभ बाहेर काढत बोलली.

"हा हा हा... तू अजून ही येडीच आहे..." अंकुश तिच्याकडे निरागस पाहत बोलला.

"हो तू खूप शहाणा आहेस ना .."

(कॉलर पकडत) "हो मग आहेच..."

"ह्म्म राहुद्या..."

असंच त्या दोघांच्या गप्पा, मस्ती एक तास चालली...

साडे अकराला अर्पिता म्हणाली "चला निघुया.."

अंकुश केविलवाणं तोंड करून म्हणाला "नको ना...थोडा वेळ अजून..."

"गप बस, गप चल.. कॉलेज जॉब ला जायचं नाही का?" अर्पिता आपली बॅग मोबाईल आवरत म्हणाली.

"जायचं पण पाच मिनिट थांब ना." अंकुश तिच्याजवळ येऊ लागला.

तशी ती त्याला दूर सारत म्हणाली "पाच मिनिटांनी काय होणारे??"

"मी तुला थोड आणखी पाहून घेईन..." अंकुश प्रेमाने बोलला.

अर्पिताने हसत हसत त्याच्या पुढे तोंड केले आणि म्हणाली "हे घे बघ..."

अंकुश उत्साहाने एक स्मित देत म्हणाला "परत कर कसं केलं.."

अर्पिता आखडत म्हणाली "नाही एकदाच..."

"नाही एकदा परत..." अंकुश तिला विनवणी करू लागला.

आणि अर्पिताने त्याच्याकडे तोंड केले आणि अंकुशने पटकन तिची ओठांची किस घेतली आणि छोटंसं स्माईल देऊन रूमच्या बाहेर पडला, तशी अर्पिता शांत झाली.

ती पूर्ण गोंधळून गेलेली होती.. तीन वर्षांच्या त्यांच्या रीलेशनमध्ये त्याने पहिल्यांदा अशी नकळत किस घेतलेली होती...
अर्पिता तिथेच पाच मिनिटे स्वतःला सावरत बसली...

क्रमशः...

************ ************ ********
© Bhartie "शमिका❣️"