जीवन जगण्याची कला - भाग 2 Maroti Donge द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जीवन जगण्याची कला - भाग 2

जीवन जगण्याची कला आहे आपण अंगीकारली पाहिजे. कारण आपल्यात असे प्रसंग येतात. त्यांचा आपण विचारही करू शकत नाही.
आजच्या जीवनात अनेक संकटे दिसतात. त्यांचा आपण विचार करायला हवा. कारण जे जीवन आपल्या भोवती फिरत आहे. ते फक्त एका मोबाईलच्या विळख्यात आपण गुलाम बनत चाललो आहोत. त्याच आज आपण दुसर्‍या भागात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
मोबाईल ही एक अशी वस्तू आहे. त्यांचा अविष्कार आपल्याला कशासाठी झाला आणि त्यांचा दुरुपयोग कशा तऱ्हेने होत आहे. त्या बाजूने विचार होणे आवश्यक आहे.
आज प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. कित्येक जण तासनतास त्या मोबाईलवर फेविकॉल सारखे चिकटून असतात. पण ती आपल्या जीवनाची कला आहे. का ? की आपल्या जीवनाला अधोगतीकडे नेण्याचा मार्ग. कारण असे की, आज लहान मुलांच्या हातात खेळणे असायला पाहिजे. पण त्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. आपण ज्या वेळेस लहान होतो, त्या वेळेस माती पासुन बनवलेली खेळणी, लाकडापासून बनवलेल्या खेळण्यांचा वापर होत होता. त्यावेळेस ते आपल्या जीवनाचा एक अंग होता.
पण तो अंग आज आपल्याला दिसत नाही. ती तेव्हा आपल्या जीवनात आनंद देत होती. कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हिरीरीने तशा वस्तू बनवून त्या मुलांच्या समोर ठेवत होते. कारण त्यात मुलांच्या शरीराला कशाही प्रकारची इजा होत नव्हती.
पण आजच्या मोबाईल पायी मुले आत्महत्या करत आहे. त्याला टेक्नॉलॉजी जबाबदार आहे की, पाल्यांना न पेलणारी जबाबदारी. जीवनच अशा स्वरूपाचे बनले आहे की, विनाशाकडे नेण्याचा प्रयत्न आज मोबाईल करत आहे. कारण मोबाईलचा आविष्कार फक्त देवाण-घेवाण यासाठी होता. इकडची माहिती दुसरीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न मोबाईल करत होता.
पण आज जीवन कशाप्रकारे जगावे हे मोबाईल शिकवू शकत नाही. यातच आपले दुर्भाग्य आहे. जीवनात अशी वेळ आली आहे की, आपण कसे जगावे हे कुणालाच कळत नाही. आजची परिस्थिती ही हाता बाहेर जाताना दिसत आहे.
आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी जे प्रयत्न करतो. ते आज अपुरे पडताना दिसत आहे. माणसांना आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्या जीवनात अशी कित्येक अनुचित घटना घडताना दिसत आहे. पण त्याला रोखू शकणारे कुणीच नाही.
पैसा कमविण्यासाठी आपण जो मार्ग स्वीकारतो तो शेवटपर्यंत योग्य आहे की, अयोग्य आहे. तो ठामपणे सांगू शकत नाही. त्याला आपण काय म्हणायचे. कारण जीवनात निर्णय घेण्याची क्षमता आपल्या अंगी उतरणार नाही. तोपर्यंत आपण एक कमकुवतच म्हणून गणला जाईल, कारण जीवनही असेच आहे. आपण चांगल्या गोष्टीचा स्वीकार करताना वाईट गोष्टीला आपल्या शरीरात प्रवेश करू द्यायचा नाही. आपण जोपर्यंत चांगल्या गोष्टीचा स्वीकार हृदयापासून करत नाही, तो पर्यंत आपल्या मनात वाईट गोष्टी उत्पन्न होतच असते.
आपले जीवनच अशा बंधनाने बांधले आहे की, आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर वाईट व्यक्तीच्या नजर असतेच असते. कारण दुसऱ्याची प्रगती कुठेतरी खपत असते. आणि त्या प्रगतीत अडथळा निर्माण करणे म्हणजेच. जीवन जगण्याच्या कलेत दुर्जनांचा आपल्या प्रती असलेला भेद कळणे. दुर्जन जोपर्यंत आपल्यावर वार करणार नाही. तोपर्यंत आपल्याला आपल्या सोबत कोण आहे. व कोण नाही. हे कळणार नाही.
जीवनात आपल्याला अनेक वेळा वाईट घटनांचा सिलसिला चालूच असतो. पण आपण म्हणायचं कुणाला म्हणून हिम्मत करत नाही. ते छुपे वार आपल्यावर सतत होत असतात. पण समोर कोणीच दिसत नाही. त्यावेळेस आपल्याकडे एकच पर्याय असतो. तो म्हणजे शांत बसणे. पण ते वार कालांतराने आपल्याला कळतात. तेव्हा आपल्या जीवनात एक वेगळी भावना निर्माण होते. ती म्हणजे एकदा नाव माहीत झाले की, आपण त्याच काय वाईट केलं होतं. पण त्यांनी केले ते चांगलं नाही केलं. ती सल मनात घर करते.
तेव्हा कुठे आपण आपला जीवन जगण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतो. कारण जो आघात झाला असतो.
त्याला आपल्या जीवनात सामील करत असतो. आणि आपण आपली जीवन जगण्याची कलेचा एक भाग म्हणून आपल्या जीवनात सामील करून घेतो. तेही आपल्या सोबत घडलं ते दुसऱ्यासोबत घडू नये म्हणून सावधानतेचा इशारा म्हणून....!
प्रत्येकाचे जीवन जगण्याची कार्य वेगवेगळे आहे. पण त्यांचे ध्येय एकच आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात एकरूप राहून एकमेकांना सहकार्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच आपण जीवनाची कल्याणकारी रूप पाहू शकतो. आणि येथेच थांबतो.
धन्यवाद.....!