पोरका - 1 Waghmare Prashant द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पोरका - 1

हि कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही सत्य घटनेशी संबंध नाही. हि कथा पूर्णता मनोरंजनात्मक घ्यावी.. धन्यवाद!

खुप पूर्वीची ही कथा आहे. एक पाड़े एका गावात राहत असे . पेशाने ते गिसाडिचे काम करत होते. पावसाळा ऋतूच्या वेळी ते घरी राहत असे.आणि इतर वेळी ते उदार निर्वाहनासाठी बाहेरिल गावात भटकंती करत असे. एक जोडपे आणि त्याची दोन मुले.बहिण आणि भाऊ.

प्रभुदादा नि ठर वले होते कि तो आपल्या मुला ला खुप शिक वनार आन मोठ साहेब बनवनार. कारण परिस्थिति खुप हालांकिची होती. या आधी कोणाचाही संबंध शिक्षणा बाबत आला नव्हता. कारण गरिबी पुढं माणुस झुकते. आणि लोखंडा वर पडणारे घाव तो किती तरी वर्षापासुन तो सोसतच आला होता.

आता पावसाळा संपत आला होता. आख्या गावाला पावसाने धो-धो झोडपून टाकलं होतं. अन् पुर्ण पावसात पोटाची खळगी नीट भरता आली नव्हती.
सकाळची थंडगार वेळ रामा फाटलेल्या चादरीत पाय छातीला घेऊन कुडकुडत झोपला होता. अन् आता तो थेट गावातल्या शेतात शिरला होता अन् टपोरे दाण्यानी भरलेली मक्याची कणसं न्ह्याळत होता. इकडं तिकडं बघत शेतातली कणसं तोडुन फाटक्या सदर् यात ठेवत होता. त्याचा आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता. खूप कणसं त्यानं तोडली होती. त्याच क्षणी आवाज आला 'कोण हाय रं तिकडं'. रामा पुरता घाबरला अन सैरावैरा हिकडं तिकडं पळायला लागला पण मालकाकडून धरला गेला. शेत मालकानं त्याच्या श्रिमुखात भडकावली. चक्कर येऊन तसाच तो खाली पालता पडला. अन् मालकानं जोरात त्याच्या ढुंगणावर लात घातली. खाडकन रामाची झोप उडाली. डोळे चोलत तो आई गं... आई गं.. करायला लागला. 'आरं उठ थुतरतोंड्या. गावातनं शिळंपाक कायतरी घेऊन यी. ' रामा उठला, बहिण भांडी धुत होती तर आई राखानं दात घाशित होती. अनं बापाच्या नजरा त्याला टवकारत होत्या. जर तो उठला नसता तर आईला नाहितर बहिणीला जावं लागलं असतं. त्यानं धुतलेले पातिलं घेतलं अनं तडक गावाच्या रस्त्यानं निघाला. तो घरासमोर आला कि गावकरी त्याला रात्रीचं शिळंपाक देत होते. सावकाराच्या वाड्या समोर तर मज्जाच मजा. चांगलं व जास्तीचं त्याला तिथं मिळत होतं. पातिलं गच्च भरलं. वरचे बेसन लाडू रस्त्यानं दात न घासता हानायला सुरूवात केली. घरी जसजसा येत होता तसा लोखंड लोखंडावर आदळण्याचा आवाज येत होता. अखेर घरी पोहचला कुटुंब मंडळींची नजर रामाकडंच होती. बहुतेक ती भुकेल्यांची व्याकुळता होती. सगळ्यांनी हातातली कामं टाकून शिळ्या अन्नाचा फडशा पाडला...
आंबू आबा दगड-मातिनं रचलेल्या ओलसर भितीला टेकून रामा आणि कुरनीचा लिंबावरचा पारंब्याचा खेळ काडीनं दात टोकरत पाहत;रामाची भविष्याची स्वप्न रंगवित होता. तितक्यात रामा झाडावरून पडला. कुरनी भितीनं आणि रामा वेदनेने रडत होते.
आज रामाचा आश्रम शाळेत प्रवेश घ्यायचा होता, रामा तर खुष होता पण आंबू आबा मोठ्या माणसासनी बोलायला चाचरत होता. बहुतेक ती भिती आडाणी असल्या कारणानं होती. कमला माय तर त्याच्यावर जिव ओवाळीत होती. प्राथमिक शिक्षणा आधीच ती माझा लेक मोठा आफसर होणार अन् आम्ही केलेल्या कष्टाचं चिज करणार! तेवढ्यात कुरनी ओरडली 'आन् मला पण शाळेत जायचंय' म्हणून रडायला लागली. 'येवडं तुझ्या बापाला अनं मला झेपणार नाही, बाईचं काम चुली म्होरलं'. अशी रुढमेड कमलानं ठोकली. आंबू आबा तर निरुत्तर होता. रामा आणि आबा तसाच शाळेच्या वाटानं चालत होते तर कुरनी पाय खुरडत तशीच रडत होती. कमली माय आगिला हवा देण्याच्या पंपच्या लाकडी मुठिला फिरवत होती.
ताडताड पाय आपटित रामा व आबा शाळेकडे निघाले होते. आश्रम शाळा अजून तिन कि. मी वर होती. चालता चालता रामा भरलेल्या कणसाच्या शेतात पाहत होता. मोह न आवरता तडक शेतात जाऊन कणस तोडला अन् खाऊ लागला. कारण सकाळपासून तो उपाशीच होता. आता शाळेजवळ ते येत होते, शाळेपासून अर्धा कि. मी. च्या आत एक ओसाड शेतातला ओसाड भलामोठा वाडा होता. गावची शिवार संपली होती. आता आबा बजावत होता, 'अजिबात या वाड्याकड जायचं नाय, अख्ख्या गावाची भुताटकी हितं फिरतात....' जपून येत जारं बाबा! . ...

.. क्रमशः