संमातर प्रियेशी - 2 Prshuram Sondge द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संमातर प्रियेशी - 2

प्रेम बिल्लोरी-भाग 2

अनघाला तो मॉल मधला प्रसंग आठवू लागला. जसाची तसा.

त्या दिवशी सांयकाळ झाली होती.कधी नाही त्या अनघा व सई दोघीचं पेठेत होत्या.असं एकटया त्या कधी फिरल्या ही नव्हत्या. क्लास संपला नि तश्याचं मार्केटमध्ये गेल्या.नेहाचा बर्थ डे होता.त्यांचा नेहाला सरप्राईजचा करायचा प्लॅन होता. दोघी असं छान गिप्टं घेऊन तिला सरप्राईजच करणार होत्या.सा-या मुली गेल्या नि या दोघीचं मॉल मध्ये शिरल्या.त्या मॉलमध्ये आल्या पासून दोन मुलं त्यांच्या मागावरचं होते.आता मुलांनी असं त्यांच्याकडं पहाणं, मागे फिरणं हे काही त्यांना ही नवीन नव्हतं.त्या मुली आहेत आणि ते मुलं आहेत.असं तर होणारचं. इटस्‍ कॉमन सारख सारखच एक टक पहात होते ते. त्या दोघींच्या ही हे लक्षात आलं होतं.त्या दोघी ही कुजबूजल्या.आपल्या ओळखीचं तर नाहीत ना? त्यांना नीट पहावं म्हणून एक दोनदा त्यांच्याकडं रोखून ही पाहीलं.तसं कुणी आपल्याकडे पहात असताना त्यांच्याकडं कसं पहायचं? त्यातं ती मुलं भयंकरच होती.

या अगोदर त्यांना पाहीलेलं ही होतं. अनेकदा त्यांच्या शाळेच्या कोप-यावर जी टपरी आहे. त्या टपरीवर सदाकदा बसलेलं असतात. असे अनेक मुलं बसलेले असतात. त्यात हे पण असतात. एवढीचं त्यांची ओळख.ते आज इथ कसं आले? क्लास कडे कधीचं ते दिसले नव्हते.त्यांनी क्लास पासून तर आपला पिच्छा केला नाही ना? अनघानं आपली नजर त्यांच्याकडं पाहिली.वाढलेली केस… झिंजाळेच होते ते. तशी त्यांची हेअर स्टाईलचं होती. तोंडात मावा..पुडया.. त्याच लालसर व पांढरट द्रवं ओठावर येऊन वाळलेलं.. बरबटीत झालेलं दातं, दाढी वाढलेली.गळयात भगवे रूमाल.हातात कडं.बांधलेलं रंगी बेरंगी दोरे. आंबट नि आसुसलेली नजर.अनघा इतकं सूक्ष्म त्यांच्याकडं पाहू शकली.ते जर छान कपडे घालून आले असते तर? कसे दिसले असते?तिचं मन कल्पनेच्या रिकाम्या चित्रात रंग भरत बसलं.

ती बेणी सारखं त्यांच्यकडचं पहात होते. आपल्याडकड सारखं असं पहातं हे कळल्यावर अवघडून जातं माणूस. तसचं ती ही अवघडून गेली.वरमली होती. सई कडं पहाताहेत की आपल्याकडं? त्याचा ही अंदाज तिनं एक दोनदा घेतला. तसं पहाणं फार रिस्की असतं. ती रिस्कं घेतली तिनं.नजरानजर झाली.एकदा दोनदा नजरेचा अपघात झालाचं. त्या नजर अपघातामुळे ते बेणी चेकाळली.मोठयानं बोलायाला लागली.हासायला लागली.आजूबाजूच्या ही लोकांच्या ते लक्षात आलं. त्यांचं ते अतिचं झालं होतं.लोक त्यांच्याकडं ही पहात नि यांच्याकडं ही पहात.कशाला कोण फंदयात पडतं?त्या घाबरल्या.बावरल्या.अश्या मुली बावरल्या की टारगटं पोरं चेकाळतात.त्यांना मज्जा येते.तसंच झालं.ते चेकाळले.

त्यांना कुणीचं काही बोलणारं नव्हतं.त्यांच धाडस वाढलं होतं.अनघाची नि सईची तर तक्रार करायची हिम्मतचं नव्हती. तक्रार करायचं म्हटलं तर कशी करायची? कुणाकडं करायची? हे तरी कुठं त्यांना कळतं होतं? लोक बघतं आणि जात. अगदी सहज पिक्चर मधलं दृश्य पहावं. इतकं इझीली घेतं लोक. कुणी त्याचं शुटींग केलं नाही आपल्या मोबाईलमध्ये हे काय कमी नव्हते? हल्ली लोक अश्या गोष्टी सहज एन्जॉय करतात. शुट करून शेअर पण करतात.

थेडया वेळात त्यांनी हददचं सोडली. ते जवळ येऊन बोलू लागले.हासू लागले.अनेकदा लोक मुलीनांच तसलं समजतात.तसल्याचं अँगल नि पहातात.मुलं मागं लागणं यात मुलींचा दोष काय असतो? मुलीचं तसल्या असतात तेव्हाचं मुलं मागे लागतात. आई बापाचं लक्ष नसतं अश्या पारीवर. एकटयाचं कसं आल्यात? सैराटचं असतील. आता लोक काय काय म्हणू शकतात याचा अंदाज आपण नाही काढू शकतं. त्या दोघीत ही सई पेक्षा ते अनघाकडं जास्तं पहात होते. असं का ?

सई नि अनघा एकाचं वयाच्या होत्या. एकाचं वर्गात शिकतं होत्या. दिसायाला दोघी ही सुंदर होत्या.सईने तर जीन्सं नि शॉर्ट टॉप घातला होता.तिचा तो टॉप बराचसा शॉर्टं होता. अशी मुलींचे कपडे मुलांना आकृष्टं करत असतात. तो शॉर्टं टॉप वर तरंगल्यासारखा वाटतं होता. त्यामुळे अंग झाकण्यासाठी तिला अनेकदा खाली ओढावा लागे.तिच्या एका हाताला ते कामच लागलं होतं. पाहणाराला ती स्टाईल वाटत होती.अनघानं टाऊजर व कुर्ता घातला होता. तो पुरेसा सैल पण होता.अंग भर ओढणी ही लपेटून घेतली होती. तुमच्या ड्रेस पेक्षा असं काही तरी मुली मध्ये असतं जे की पुरूषांना खेचून घेत असावं. नेमकं ते काय असू शकते याचा अंदाज अनघाला हे काढता येत नव्हता.शाळेत येता जाताना ही अनेकदा तिच्या मागेच जास्तं मुलं असतात. असं का होते ? हा प्रश्न अनेकदा तिला पडला होता.‍ तिनं एकदा सईला पण विचारलं होतं. असं मुलं माझ्याचं का मागे लागतात? सई नुसतीचं हासली नि म्हणाली.”कदाचित तू माझ्यापेक्षा जास्तं सेक्सी दिसत असशील? सुंदर नि सेक्सी ? यातला फरक अजून तरी कुठं तिला उगला होता?

तसल्या ही सच्यूऐशनं मध्ये ती सईची नि तिची तुलना करू लागली.असं काय आपल्यात वेगळे आहे सईत नि आपल्यात.असं आपल्याकडचं इतकं त्यांनी का आकृष्टं व्हावं?मनात चालेलं विचार तिनं झटकले. असा का विचार करतो आपण? मूर्खं नि बावळटं पोरं आहेत ते.बावळटं फार विचार करू नाही शकतं. जास्तीचा विचारचं ते करू शकत नाहीत म्हणून तर बावळटं असतात ना? ते बावळट आणि मूर्खं मुलं आहेत यावरतिनं शिक्का मोर्तब केल. त्यांना आवडत असू आपण? सई ही कुणाला आवडावी तशीचं आहे. सई पेक्षा ही आपण जास्त आवडते असू त्यांना.असे अनेक प्रश्न तरंग मनात उमटू लागले व लगेच विरून ही जावू लागले.ते विरून जात असले तरी मन ढवळून निघतचं की. अख्खं मन तिच ढवळून निघालं होतं.

आटोपतच घेतलं त्यांनी.त्या भेदरल्या होत्या.असाचं पाठलाग केला तर? ते जवळ आले तर? ते काही करणार तर नाहीत ना? पाय लटपटत होते.छात्या धडधडत्या होत्या. कांऊंटरवर गेल्या.बिल पेड करून निघाल्या.त्यांना आता पटकनं जायचं होतं.झरझर चालत आल्या.दोघीचे ही हात गुंतलेले होते.दोन्ही हातात बॅग्ज होत्या नि पाठीवर सॅक होत्या.पाय-या खाली उतरू लागल्या.ती मुलं त्यांच्या मागचं आली होती.अनघानं नजर पुन्हा त्यांच्याकडं पाठवली.जे घडू नाही तेच घडलं. पुन्हा नजरा नजर.ते मोठयाने ओरडले.अशी नजरेत नजर मिसळणं लाईन क्लेअर होणं समजलं जात. चुकून झालं पण तसचं झालं. ते हर्षोल्हासित झाले.त्यांनी जाग्यावर उडया मारल्या नाहीत हे काही कमी नव्हतं. ते आंनदाने गोड चित्कारले. ते चित्कारणं.. या दोघीच्या ही जीवाचा थरकाप उतरणारं होतं.हासणं ही इतकं भयंकर असू शकत याचा त्या अनुभव घेत होत्या.

पाय-या उतरतानी अनघाची ओढणी थोडी खाली घसरली असावी.अनघा ओढणी सावरायाला गेली.तेवढयात एकानं पाय ओढणीवर ठेवला. अख्खीचं ओढणी खाली खेचली गेली. अनघा ही मागे खेचली गेली.हातातली बॅग खाली पडली.पडली कसली?तिनं त्या टाकुन दिली कारण तिला छाती भोवती हात कवटाळायचे होते.तिच्या छातीचं उभार झाकण्यासाठी हात पुरेसं नव्हतं ,पण ती दुसर काय करू शकत होती? तिची ती केविलवाणी धडपङ पाहून त्यांना अजून चेव आला.ते बेणी खो खो हासतं होती.अनघाला भंयकर राग आला.डोक्यात संतापाच्या लाटा उसळू लागल्या.ओढणी उचलण्यासाठी ती खाली वाकली.

“हाय.. हाय…“घाणेरडे उदगार त्यांनी काढले.ओढणी उचलताना अनघा रागात पुटपुटली,”मूर्खं… नालयाक. दिसतं नाही का?”

“दिसतं की.” त्यांच्या नजरा तिच्या छातीवर खिळल्या होत्या. चेह-यावर क्रूर हसू होतं.ती भितीनं व लाजेनं थरथर कापत होती.

“मूर्खं,नॉनसेन्सं.. नालायक…”अनघानं पचा पचा थुंकाव तसं बोलली.दोन्ही तिन्ही भाषा वापरून ही इतक्याचं सपक शिव्या देऊ शकली.

“सॉरी.. मॅडम. चुकून झाल.” एक मिश्किलं हसू त्यांच्या चेह-यावर होतं. आसुरी आनंदानं त्यांचा चेहरा फुलून आला होता. सईनं तिला अंगाभेवती ओढणी लपटायला मदत केली.

“सॉरी म्हणायला लाजा नाही वाटतं का?” अनघा डोळं मोठे करून बोलली. डोळं वटारून शब्दा बरोबर राग ही बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला तिनं.

“विरू..?? चुकलं तर सॉरी म्हणायचं असत ना रे?”

“हो. इंग्लीशमध्ये सॉरीचं म्हणतात.”

“मग हया मॅडमला सॉरी म्हटल्यावर का राग येतोय?”

“फक्त सॉरीच म्हणलास का?”

“मग अजून काय म्हणावं? आय लव्हं यु म्हणू का?” आपले गुटक्यानं बरबटलेले दात विचेकत ते बोलले.

“शांत बसा. नाहीतर मी ओरडेन मोठयानं.” अनघानं त्यांना दम टाकला. अर्थात इतका सपक दमानं त्यांना काही होणारं नव्हतं.

“ओरडेन?मग ओरड ना.का थांबलीस?” तिच्या डोळयात नजर घुसवत त्यातलं एक जण म्हणालं.तो अजून त्यांच्या जवळ गेला.

“अरे, ओरडतील ना त्या?तू बावळट आहेस का? असं गर्दीत कुठं प्रपोज मारत आसतेत का?” दुसरं पोरगं बोललं.ते अजून ही हासतं होते.आसल्या मोकार नि टुकार पोरांच्या नादी कशाला कोण लागेल?या जास्त बोलल्या आसत्या तर ते अजून चेकाळले असते.त्या गप झाल्या.अनघा आता एकचं करू शकली. ती ओरडू नाही पण रडू शकली.अनघाला रडू फुटलं. ते रडणं इतकं मोठं होतं की आजूबाजूच सारी माणसं जाग्यावर थांबली. त्याची बरीचशी गर्दी जमा झाली.

गर्दी जमा झाली असली तरी कुणीचं त्यांना काहीचं बोलत नव्हतं.तेवढया गर्दीतून प्रौढ गृहस्थ आले.ते सुटा बुटात होते.कुणी अधिकारी असावेत.वय चाळीस-पचेचाळीसच्या दरम्यानं असावं. पायात किमती शूज होता. महागडा गॉगल होता. तो डोळया ऐवजी केसावरच आवलेला होता. हातात मोबाईल होता.अश्या पॉश राहणा-या माणसाचं वयाचा अंदाज जास्त वस्तुनिष्ठ काढता येत नाही.ते आले की त्यांच्याकडं सारेच पहातचं राहीले.पुढं काय होईल?याचा अंदाज कुणालाचं नव्हता.त्यानं तिच्या पाठीवर हात फिरवला.ओढणी नीट केली.सा-या लोकाकडं आपली नजर फिरवली.नजरेत प्रंचड करारीपणा होता.प्रचंड निषेध होता सा-यांचा.ते दोंन्ही पोरं जाग्यावरचं थबकले. नेमकं त्यांना ही कळेना काय करावं?जाग्यावर थांबावा का?धूम पळावा? हा माणसू कोण?ते जाग्यावरच थांबले.त्या माणसाच्या डोळयात डोळा घालून ते बोलू शकले नाहीत तसचं ते पळू पण शकत नव्हते.सारं गर्दीचं कडं त्यांच्या भोवती जमा झालं होतं.

“लाजा नाही वाटतं का सा-यांना?तमाशा चालू की पिक्चरं? असचं आपल्या लेकी बहीणीच्या बाबतीत झालं तर? असचं गप बसणारं का?”गर्दीचं कडचं झालं होतं.ते दोन्ही बेणं आता मात्रं घाबरले होते.पुढं काय होऊ शकते याचा अंदाज त्यांना येत नव्हता.त्यानाच काय? गर्दीत कुणालाचं शक्याता सांगता येत नव्हत्या.

“सर,तुम्ही…” अनघा त्यांच्या बगलात शिरली. त्या माणसांनी तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेतला व तिच्या डोळयात पहात राहिले.तिच्या डोळयात असं काय पाहिले त्यांनी? त्यांच्या डोक्यात क्रोधाच्या लाटा उसळू लागल्या.त्यांच्या मुठी आवळल्या गेल्या.दात करकर खाऊ लागले.अनघाला तसल्या ही रागात अलगद मागे सारले.एखादया भक्ष्यावर तुटून पडावं तसं त्या दोघावर झेपावले.तटातटा.. त्यांच्या गालात मारल्या. ते रटटं इतकं जबरदस्तं होते एका एका रटटयानं ते लटपटले.गर्दी ही त्यांच्यावर तुटून पडली.त्याचीं गालफाड सडकून निघाली.गर्दीत कोण किती मारील? का मारील? हे काहीचं सांगता येत नसतं. त्याचं कपडे ही फाटले होते.त्या दोघीच्या पुढं उभे केले.त्या गृहस्थाचा अजून ही पारा वरचं होता.पुन्हा एक एक थोबाडीत मारली. काही मिनिटातचं पोलीस तिथे आले.

पोलीसांनी आल्या बरोबर त्यांना नमस्कार केला.बहूतेक त्यांनी फोन केला असावा.ते दोन्ही पोरं ताब्यात घेतलं.पोलीसाला बाजूला घेऊन ते काही तरी बोलले.हळूहळू कुजबुजत गर्दी पांगू लागली.तसं ते अनघाच्या जवळ गेले.ती त्यांच्या कुशीत शिरली.त्यांचा हात पाठीवर फिरतं होता. ते तिला थोपटू लागले.ते थोपटणं नव्हतं.अधाराचं रसायनं तिच्या देहात ओतत होते.अनघा सावरली होती.

“घाबरायचं नाही.बेटा. लढयायचं.”अनघा काहीच बोलू शकली नाही.

ती फक्त रडू शकली.ओक्सी बोक्सी रडत होती.हुंदके तिला अनावर झाले होते.त्यांच्या बॅगज त्यांनी उचलल्या.त्यांच्या मागे एक माणूस होता.त्यानं त्या पटकन घेतल्या.तो त्यांचा ड्रायव्हरं होता. ते हळूहळू चालत मॉलच्या बाहेर आले.अनघा नि सई अजून ही घाबरलेल्याचं होत्या.

“सर,ते..!!” अनघा पुढचं बरचं काही बोलू शकली नाही.

“सर,आम्हला भिती वाटतेय.” सई बोलली.

“असं घाबरायचं नाही.भिडायचं.लढयाचं.” अनघाचं हात हातात घेतं त्यांनी दंड ताणतं म्हटलं. त्यांच्या हातानं मुठी आवळल्या तिच्या. ते फार प्रेरक हासले.त्या हासण्यातून धैर्यं सईव व अनघाच्या नसानसात मिसळत गेलं असावं. त्या दोघीचे ही चेहरे फुलले.

“सर,तुम्ही नसता तर?”अनघा काहीचं बोलली नाही.आलेला हुंदका गिळला.डोळयातलं आसवं पुसले. बळबळचं हसू ओठात आणलं.

“मला ओळखलं ना तू?” शेदारकर अनघाच्या डोळयात पहात बोलले.

“तुम्हाला कोण नाही ओळखणारं,सर?” अनघा

“आता ठीक आहेस ना?”

“हो…“ मान हालवत व कपाळावर आलेलं केस झटक्यानं मागे सारत अनघा बोलली.

“घरी फोन करू.”

“नको सर.प्लीज.प्लीज…”ती प्लीज बरचसच दीर्घं होतं.

“का?” शेंदारकरांनी त्यांच्या डोळयात पहात विचारलं. या मुली इतक्या घाबरल्या तरी असं घरी का नको म्हणतात फोन करायचा.

“मम्मी फार रागवेल.तिला न सांगताच आलोत आम्ही बाहेर.तिला नको हे कळयाला? फक्त तिलाचं नाही. सर हे कुणालाचं नको कळयाला.”

“इतकं सारं लपून ठेवायचं घरच्यापासून?”

“मम्मीला नाही आवडत सर असं.ती माझा क्लासचं बंद करेल.”

“पण यात तुझी काय चूक?ती मुलचं तसली होती.नालायक. घाबरू नका मी आहे ना?”

“आम्ही बाहेर आलो असं एकटं.ही चूकच की आमची.” इतका वेळ नुसतं शांत असलेली सई बोलली.

“बाहेर येणं पण चूक असू शकते?” ऐटीत खंदे उडवले त्यांनी. ती स्टाईल त्यांची फारचं आकर्षंक होती. दोघी त्यांच्याकडचं पहात राहील्या.

“बाहेर येणं चूक नाही पण न सांगता एकटं येंणं ही चूकच की.”

“मी बोलू तुमच्या मम्मींना पप्पांना?”

“प्लीज सर….!!!”चेहरे विनंतीनं त्यांनी फारचं अंकुचून घेतले होते.

“बरं.. नाही.” त्यांनी दोघीना ही विश्वास दिला. त्यासाठी फक्त विश्वासानं ओथबंलेलं हसले.

“प्रॉमीस?” आपला हात पुढं करत अनघा बोलली. ते चालत चालत शेजारच्या हॉटेलात पोहचले. असं हॉटेलात येण त्याचं ठरवून नव्हतं. हॉटेलमध्ये बसल्यानंतर चहा..बिस्कटाबरोबर गप्पा ही रंगल्या. आता उशीर झाला होता. त्यांना रिक्षात बसून ‍दिलं त्यांनी.अनघानं व सईनं त्यांना बाय केल.

“घाबरायचं नाही.भिडायचं.” ते हासले. त्या ही हासल्या. असल्या कोवळया वयात पोरी हासल्या नंतर फारचं मोहक दिसतात. ते त्यांना पहातचं बसले. रिक्षा हालली तरी शेंदारकर सर तिथचं उभा होते.ते अजून ही तसचं उभे आहेत.हे अनघानं सईला दाखवले.

“ते अजून जात का नाहीत?” सईनं एक निरागस प्रश्न विचारला.

“काय माहीत?” अनघानं खांदे उडवीले.चालू रिक्षातून बाहेर उभ्या राहून डोकावत त्यांना पुन्हा हात हालवून बाय केल.

“पडायचं का?” रिक्षावाला वसकला.त्याच्या मठठ चेह-याकंड पहात त्या नुसत्या हासल्या.घरी पोहचल्या. त्यानी कुणाला सांगितलं ही नाही. तसं ठरवलचं होतं.शेंदाकर सर कडून तर त्यांनी प्रॉमीसचं घेतलं होतं. पोलिस घर आले. त्यांना सारचं घरी सांगावा लागलं.अनघाचे मम्मी पप्पा तर फार घाबरून गेले होते. मम्मी तरतिच्या अंगाच सूक्ष्म निरिक्षीण करू लागली होती. अनघेपक्षा मम्मीच घाबरली होती.शेवटी शेंदारकर साहेबांना फोन वरून आभार मानले. पप्पा तर किती इमोशनल झाले होते. इतकं इमोशनल होणं साहजिकचं.पुढचं सारचं महाभारततिला आठवायला लागल.

“ अनघा, तुझं लक्षं कुठं?” मम्मीचा आवाज कानावर आदळला.तशी ती भानावर आली. अनघाला ही कळतं नव्हतं. जसचं तसचं सारचं आपल्याला का आठवलं? शेंदाकर सरांचा हासरा चेहरा तिच्या डोळया समोरून हालतं नव्हता. कसली तरी अनोखी स्फुर्तीचं द्रव तिच्या मनात पाझरू लागलं.

( पुढील भाग लवकरचं)