Bhut Sanskruti - 1 books and stories free download online pdf in Marathi

भुत संस्कृती - 1

(नमस्कार वाचक मित्रांनो! हि माझी पहिलीच कथा आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे. कोणत्याही धर्माच्या रूढी, परंपरा इ. तसेच कोणाच्याही सामाजिक चालीरितींचा अपमान किंवा टीका करणे हा माझा हेतू नाही. हि कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे त्याच्या आपण सर्वानी आनंद घ्यावा. कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.)

प्रस्तावना


मला लहानपणा पासूनच भूतांच्या गोष्टी खूप आवडतात. मी आजपर्यंत भूतांच्या खूप गोष्टी वाचल्या आहेत. या गोष्टींमध्ये जास्त करून भूते हि भयानक आणि अतृप्त असतात असेच माझ्या वाचनात आले आहे. त्याच बरोबर या भूतांकडे अचाट राक्षसी, जादुई शक्ती असतात, भूतांमधील वेगवेगळे प्रकार हि माझ्या वाचनात आले आहेत. पण माझ्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे मला कोणत्याही भूतांच्या गोष्टींमध्ये आजतागायत मिळालेली नाहीत किंबहुना भूत कथा लिहिणाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक काना-डोळा केला असावा किंवा त्यांना सुद्धा या गोष्टी अवगत नसाव्यात अशी मला कधी कधी शंका येते. आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मला हि कथा सुचली जी मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे.

मी प्रोफेशन ने टॅक्स कंन्सल्टंट आहे. मी वेगवेगळ्या व्यवसायांची आणि व्यक्तींची टॅक्स ची कामे करतो. माझ्याबद्दलची इतकी माहित तुमच्यासाठी पुरेशी आहे. माझी गोष्ट चालू करण्यापूर्वी मला भूतांच्या बद्दल पडलेल्या प्रशांपैकी महत्वाचे १० प्रश्न मी तुमच्या समोर मांडत आहे.

१. भूतांचा जन्म कोठे होतो? भूतांच्या जाती, प्रकार इ. कोणते असतील?

२. भूतानांसुद्धा बालपण असते का? ते कसे जाते?

३. भूतांचे शिक्षण कसे आणि कोठे होते?

४. भूतांचे आजार आणि त्यावरील ईलाज व दवाखाने कसे असतील?

५. भूतांची प्रेम प्रकरणे, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, मुलगी बघायचा कार्यक्रम, इ. कसे असतील?

६. भूतांचे वाढदिवस, प्रमोशन पार्ट्या, डोहाळ जेवण, बारसे इ. कार्यक्रम कसे असतील?

७. भूतांची फॅशन कशी असेल?

८. भूतांचे दैनंदिन जीवन, नोकऱ्या, घरची कामे, बाजार, अडचणी, क्लब, ट्रिप, सण इ. कसे असतील?

९. भूतांची निवृत्ती (रिटायरमेंट)

१०. भूतांची मुक्ती

वरील प्रश्नांची गमतीशीर उत्तरे मी माझ्या कल्पनेतून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सुद्धा ती उत्तरे नक्कीच आवडतील.

भाग १

तुम्हाला सर्वांनां माहित आहेच कि भूतांचा जन्म हा मनुष्याच्या मृत्यू नंतर होतो. ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत किंवा ज्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे, ते सर्व भूत म्हणून जन्माला येतात असे मी सगळ्याच भूतांच्या कथांमध्ये वाचले आहे आणि कदाचित ते खरे देखील असेल. पण फक्त अशाच पद्धतीने भुतांचा जन्म होत असेल असे मला वाटत नाही. त्याच्या कडेसुद्धा आपल्या सारखी कुटुंब व्यवस्था असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


असे म्हणतात कि भूतांची राहिलेली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय भूतांना मुक्ती मिळत नाही. मग अशी जी भूते आहेत, ती इच्छा पूर्ण होईपर्यंत अनेक वर्षे एकलकोंडी कशी राहतील? त्याची सुद्धा प्रेम प्रकरणे, संसार असतील ना? त्यांना हि त्यांच्या भूत समाजातील मुलींशी प्रेम होत असेल, ती सुद्धा लग्न करीत असतील, त्यांना सुद्धा मुले होत असतील ना? मग त्या मुलांचे बालपण, संगोपन, शिक्षण, नोकरी इ. होत असणारच ना? त्यामुळे मला आता असे वाटायला लागले कि मी कोणत्या तरी भुताचा लाईव्ह इंटरव्हियू घ्यावा किंवा कोणत्या तरी भुताने मला या सर्वांची सर्वोतोपरी आणि इतंभूत माहिती द्यावी. हा सगळा विचार करता करता मी कधी झोपेच्या आधीन झालो हे कळलेच नाही.


असेच काही दिवस गेले, मला हि क्लाईंटस ची टॅक्स रिटर्नची कामे असल्याने मी हा विषय थोडा बाजूला ठेऊन माझ्या दैनंदिन कामात व्यस्त झालो. माझ्या या कामात महिना कसा गेला कळलेच नाही. आज २० तारीख, रिटर्न ची शेवटी तारीख असल्यामुळे सर्व रिटर्न ची कामे संपवता संपवता रात्रीचे १२ वाजून गेले आहेत हे ऑफिस बंद करून बाहेर पडताना माझ्या लक्षात आले. पण हे काय खुप विशेष नव्हते. रिटर्न चे काम करताना कधी कधी मला असे १२ वाजून जायचे. हे २-३ महिन्यातून होत असल्यामुळे मी निवांतपणे माझी होंडा एव्हिएटर चालू करून घरचा रस्ता पकडला. साधारण ३०-३५ च्या स्पीड ने घराच्या दिशेने मार्गक्रमण करीत निघालो. पण आज रस्ता जरा जास्तच सामसूम वाटत होता, आकाशात चंद्र नसल्याने जरा जास्तच काळोख वाटत होता. एरवी तुफान गर्दी असणाऱ्या रस्त्यावर एक चिटपाखरू सुद्धा नव्हते. माझे घर यायला अजून २५ मिनिटे असल्याने आणि रास्ता पूर्ण मोकळा असल्याने मी रमतगमत गाडी चालवत होतो. माझ्या घराकडे जाणाऱ्या उजवीकडील वळणावर वळल्यावर मला दूर एक माणूस उभा असलेला दिसला तो बहुदा एखाद्या गाडीची वाट पाहत उभा असावा. मी जसा त्याच्या दृष्टीक्षेपात आलो तसा त्याने मला थांबण्यासाठी हात केला. मी माझी गाडी त्याच्या जवळ घेत थांबविली. त्याचे वय अंदाजे ३०-३५ वर्षे असावे. त्याने अगदी माझ्या सारखे फॉर्मल कपडे घातले होते. चेहऱ्यावरून दिसायला चांगल्या घराचा आणि सुशिक्षित वाटत होता.

मी: रात्र खूप झाली आहे इथे काय करताय?

तो हसला आणि म्हणाला

अनोळखी: बरं झालं तुम्ही थांबला, मला आज ऑफिस वरून यायला वेळ झाला. मी खूप वेळेपासून वाट पाहतोय पण कोणीही इकडून जात नव्हतं आणि तुम्ही दिसला म्हणून मी हात केला. तुम्ही थांबला त्या बद्दल आभारी आहे.

मी: आभार कसले मानताय, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर आपणच एकमेकांची मदत केली पाहिजे ना?

त्यावर त्याने गालातल्या गालात स्माईल दिली.

अनोळखी: मला वेताळ चौकात सोडाल का प्लिज ?

माझे घर त्या चौकाच्या थोडंसं पुढे असल्याने मी हो म्हणालो. तो खूष झाला आणि गाडी वर बसता बसता म्हणाला तुम्ही अगदी दूता सारखे मला भेटला.

मी गाडी चालू केली आणि वेताळ चौकाच्या दिशेने निघालो. चौक यायला अजून १० मिनिटे असल्याने मी त्याच्या बरोबर गप्पा मारू लागलो.


मी: काय नाव तुमचं? कुठे जॉब करता?


अनोळखी: माझं नाव बाबुराव कदम, मी कोल्हापूरला एम.आय.डि.सी. मधील कंपनीमध्ये मॅनेजर आहे.


मी: रोज इतकाच उशीर होतो का घरी यायला ?


बाबुराव: नाही. आज साहेबांच्या बरोबर बाहेर गेलो होतो म्हणून यायला उशीर झाला.


त्यांनी सुद्धा माझी चौकशी केली. मी टॅक्स कंन्सल्टंट आहे आणि मी वेगवेगळ्या व्यवसायांची आणि व्यक्तींची टॅक्स ची कामे करतो असे मी त्यांना माझ्या बद्दल सांगितले. इतक्या वेळात आम्ही वेताळ चौकात पोहोचलो. समोर रस्त्याकडेच्या वडाच्या झाडाकडे हात करून बाबुरावांनी मला तिथे गाडी थांबविण्यास सांगितले.


मी: रात्रीचे १२ वाजून गेले आहेत इथे रस्त्यावर कुठे उतरता? चला तुम्हाला तुमच्या घरा पर्यंत सोडतो.


बाबुराव: नको नको कशासाठी तुम्हाला कशासाठी त्रास. माझे घर अगदी जवळ आहे मी चालत जाईन. तसा पण माझ्या मुळे तुम्हाला आधीच उशीर झाला आहे.


मी: त्रास कसला आलाय ?


मी पुढे बोलण्याआधीच बाबुरावांनी परत एकदा माझे आभार मानले आणि गालातल्या गालात स्माईल देऊन ते त्यांच्या घरी जाण्यासाठी वळले. मी सुद्धा त्याचा निरोप घेऊन माझ्या घरी निघालो. ५-१० मिनिटांमध्ये मी सुद्धा घरी पोहोचलो. बाहेर वातावरणात गारवा असल्याने गरम पाण्याने शॉवर घेवून फ्रेश झालो आणि जेवून झोपलो.

इतर रसदार पर्याय