Being a girl is not easy - 3 books and stories free download online pdf in Marathi

मुलगी होणं सोपं नाही - 3 - शिक्षणासाठी धडपड

आज आजी.. कामाचा पहिला दिवस असल्यामुळे लवकर घरी आली होती. आजची संध्याकाळ जणु आजी आणि नातींसाठीच होती. रात्रीचे जेवण ही आजी आणि ताईने चमचमीतच बनवले होते. मला मात्र माई तिच्या हाताने भरवत होती. मामालाही चमचमीत जेवण खुप आवडले. आई, 'आज जेवणाचा बेत भारी चमचमीत आखला आहेस बघ,... मी तर तुझ्या हातचं असं जेवण खुप दिवसांनी जेवतोय'. मामा, रुमालाला हात पुसतच म्हणाला..
'हो रे, आज मला काम मिळाले ना, मग आता तुझा त्रास पण कमी होईल आणि माझ्या नाती पण आनंदात राहतील, म्हणुन मला इतका आनंद झाला बघ..'
"आजी.. मामा... आता बस झाल्या तुमच्या गप्पा, आराम करा आता, मी पण भांडी घासुन घेते.'"
" गप्प गं ताई.. तु तर आता आम्हांला शिकवायला लागलीस, मला माझ्या चिऊला तर घेऊ दे.. बघ कशी आजीकडे बघुन हसते.."
आजी ने मला माईकडुन तिच्या मांडीवर घेतली, माझ्यासोबत आजी गप्पा मारत होती. आजी माझ्यासोबत गप्पा मारतावेळी लहानच होऊन जायची. तिच्या गप्पा गोष्टी ऐकता ऐकता मी झोपुन गेली.
माई.. इकडे ये गं.. चिऊ झोपली बघ.. इथे अंथरुन कर ये..
"हो आली आली ..आजी..." माई ने माझ्यासाठी अंथरुन केला आणि आजीने मला त्यावर झोपवली. ताईही तिची कामे उरकुन माई सोबत झोपली.
सकाळ झाली आणि आजी नेहमीप्रमाणे भाकरी आणि भाजी बनवायला उठली. आजीला ताई पण मदत करायची. वर्ष दिड वर्ष आमचा जीवनक्रम असाच सुरुच होता. आता मला ही तीन वर्ष होत आले होते. ताई आणि माई पण मोठ्या होत होत्या. पण आजीचे मात्र वय सत्तरी पर्यंत आले होते. तिला काही आता कामे जमत नव्हती तरीही ती आमच्यासाठी आणि मामासाठी करत होती.
एकदा आजीला कामावर जात असताना, रस्त्यात मामा एका मुलीसोबत दिसला. मामाने आजीला बघुन न बघितल्यासारखे केले. संध्याकाळी आजी.. मामा घरी आल्यानंतर.. "काय रे दुपारी तुझ्यासोबत ती मुलगी कोण होती?"
"कोण गं आई?" .."तु नक्की मलाच बघितल ना की दुसरा कोणितरी होता?"
"प्रशांत, अरे तुच तर होतास मला बघुन तु चेहरा लपवलास, मला आठवतंय बरोबर,"माझे वय जरी झाले असले तरी, माझ्या डोळ्यांनी मला व्यवस्थित दिसतं.." आजी मामाच्या बाजुला जाऊन म्हणाली...
मामा कसंतरी आजीला बोलण्यात अडकवुन, मी तो नव्हतो म्हणून निघुन गेला. आजीला मामासोबत कोणितरी मुलगी असल्याची अडचण नव्हतीच, पण त्या मुलीसोबत जर मामानी लग्न केले तर ती आजीच्या नातींना सांभाळेल का? हाच प्रश्न आजीच्या मनात होता.. आजीला विचारांनी झोप पण लागत नव्हती पण ताई मात्र आजीला आधार द्यायची.
अगं आजी.."तु का त्रास करुन घेतेस, आमची चिंता तुला आहे तशी मामाला पण असेलच ना.."
" मामा तुला आणि आम्हांला सांभाळणारीच मामी आणेल.. बघ"
असं म्हणत ताईने, आजीचे पाय दाबुन आजीला झोपवले. ताई कोणाला काही बोलत नव्हती, पण तीच्या मनात पण विचारांची गर्दी झाली होती. दुस-या दिवशी आजी आणि मामा कामावर गेले. इकडे आता ताईला वाटत होते की ताई स्वतः तर शिकु शकली नाही पण माईने तरी शिकावे. म्हणुन तिने पुर्ण दिवस खुप विचार करुन आजी कामावरुन आल्यानंतर..
आजी ऐक ना.. "आपण माई ला शाळेत घालु या का..?"
आजी जरा विचार करुन .. "हो घालुयात ना.."
"अगं ...आजी तु नको चिंता करु, मी माझे काम उरकल्यानंतर गजरे बनवुन गावामध्ये विकत जाईल, जे पैसे मिळतील त्यातुन माईला जे जे लागेल ते घेईल."
आजीची.. ताईने गजरे विकावे, अशी इच्छा नसतानाही... आजीने फक्त ताईला माईच्या शिक्षणासाठी परवानगी दिली. ताईने आजीची परवानगी मिळाल्यानंतर क्षणाचाही विचार न करता, गावात जाऊन गावातल्या शाळेत जाणा-या मुलांसोबत बोलुन, शाळेतल्या बाईंची.. शाळेत येण्याच्या वेळेबाबत चौकशी केली. दुस-या दिवशी सकाळीच दहा वाजता ताई शाळेत गेली...
बाई... 'मी आतमध्ये येऊ का??'
हो बाळा ये ना... तु कोण ? मी ओळखलं नाही तुला.. बाईंनी ताईला विचारले.
"बाई मी इथेच गावात राहते, माझ्या बहिणीने नाव शाळेत टाकायचे आहे" ताई वर्गात पाऊल टाकत म्हणाली.
"किती वय आहेत बाळा तुझ्या बहिणीचे?"
बाई, "तीचे वय पाच वर्षे आहेत... सहावा वर्ष लागला आहे तीला.. गेल्या महिन्यातच."
"चालेल नाव सांग तिचे.. करुयात तिचे ॲडमिशन पहिल्या वर्गात."
ताईने, बाईंना माईबद्दल सर्व माहिती सांगितली आणि तीचे नाव पहिल्या वर्गात टाकले... बाईंने ताईला थांबवुन विचारले, "बाळा तु का नाही शाळेत येत?"
अहो, "बाई.. मी आता मोठी झाले, माझ्या दोन बहिणींची जबाबदारी माझ्यावर आहे."
"आता त्यांना मी शिकवणार आणि त्यांना शिकुन मोठ्या बनवणार". बाईंनाही ताईने दिलेल्या उत्तरावर काय बोलावे सुचले नाही.. बाई निशब्द होऊन ताईला बघत बसल्या..
ताई शाळेतुन लगेचच घरी आली आणि घरातली सर्व काम आवरली. "माई.. इकडे ये गं .. चिऊला घेऊन.."
"हो गं.. आली ताई.."
ताई खाली बसली आणि माझ्याकडे बघुन म्हणाली.. "चिऊ... आता आपली माई शाळेत जाणार आणि आपल्याला घरी येऊन शिकवणार.."
माईला हे ऐकुन खुप आनंद झाला... माईने ताईला घट्ट मिठी मारली.. "चला.. आता बस्स झालं.." माई ऐक ना.. तु आणि चिऊ घरात बसा, मी सगळी कामे उरकली आहेत. तुम्ही दरवाजा बंद करुन घरातच बसा, मी गावात जाऊन गजरे बनवण्यासाठी मोग-याची आणि अबोलीची फुले आणते.."
ताई टोपली घेत मला आणि माईला म्हणाली.
"हो ताई ..चालेल, जा तु आणि लवकर ये, आपण दोघी मिळून गजरे बनवु .." माई ताईला उत्तर देत म्हणाली..
ताई पुर्ण गावात फिरुन फुले गोळा करत होती. भर दुपारी दोन वाजले असताना त्या ऊन्हात गावातील गल्ल्यांमध्ये फिरत होती आणि फुले गोळा करत होती. इकडे माई आणि मी.. ताईची वाट बघत खिडकीतून बाहेर बघत बसलो होतो. तीन वाजेपर्यंत फुले गोळा करुन ताई घरी आली.
ताई.. काय गं किती उशिर.. किती घाम आला आहे बघ तुला, दमली पण असशील तु.. माई दरवाजा उघडत म्हणाली.
"अगं नाही दमले फुले शोधता शोधता कधी तीन वाजले कळलेच नाही.." ताई चप्पल काढत म्हणाली.
आजी ..घरी आल्यानंतर आजीला मी ताईचा नावच सांगेल.. मी माईच्या मागे लपुन ताईला चिडवत होती..
अरे कुठे गेली माझी लाडाची बहिण इकडे ये बघु तु आता माझे नाव आजीला सांगणार का??
ताईने मला गुदगुल्या करत जवळ घेतले.. "ताई उठ जा, हात पाय धुवुन ये आणि जेवायला बसु आपण.. " असे बोलुन, माई जेवणाची ताट वाढायला गेली.
आम्ही तिघींनीही जेवुन घेतले, ताई आणि माई लगेचच गजरे बनवायला बसल्या. ताईने माईलाही गजरे ओवायला शिकवले, मी मात्र दोघींनाही फुले देण्याचे काम करत होती. आज पहिला दिवस होता आणि फुले पण कमीच होती, म्हणुन कमीच गजरे ओवले होते..
"माई...मी गावात गजरे विकायला जाते, तु लक्ष दे चिऊकडे मी येतेच लगेच.."
हो.. जा. मी पण तोपर्यंत आपण जेवलेली भांडी घासते..
गजरा.. गजरा.. गजरा.. घ्या.. गजरा...
काकु घ्या गजरा बघा ताजे आहेत गजरे, आत्ताच ओवलेत..
"बस गं इथे.. दाखव .. बघु दे गजरे.. कितीला देतेस गजरा एक.."
अहो.. काकु.. "तुम्ही घ्या तर ..आपल्याच गावातली आहे मी, हा छोटा गजरा दहा रुपायाला आणि मोठा आहे विस रुपायाला.."
"मोठाच गजरा दे मला.. पण, मी विस रुपये नाही देणार हा.. पंधरा रुपायाला देणार असशील तर दे ..नाहीतर नको..."
"घ्या घ्या काकु .. हा घ्या गजरा, द्या पंधरा रुपये.."
"हो घे..बाळा.. पंधरा रुपये...
"काकु केसांमध्ये लावुन बघा तुमच्या केसांमध्ये छान दिसेल गजरा..."
गजरा गजरा घ्या... ताजा ताजा गजरा म्हणत, ताई पुढच्या गल्लीत गेली..
ताई.. अगं ताई, थांब मला येऊ दे...
आजी ने एका घरातुन ताईला आवाज दिला...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED