तो सहवास - (भाग _३) Samrudhi30 द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तो सहवास - (भाग _३)

सोहळा छान पार पडला होता आणि कॉलेज सुरू होवून एक आठवडा झाला होता.कॉलेज मध्ये मराठी साहित्य संमेलन याची तयारी सुरू झाली होती आणि मला मराठी साहित्यात खूप रस होता त्यामुळे मी खुश होते कारण आमच्या कॉलेज मध्ये खूप मोठे साहित्यिक लेखक तसंच वेगवेगळे नवीन उदयास आलेले लेखक येणार होते त्यामुळे खूप काही छान नवीन साहित्य कला याबाबतीत मला नवीन काही शिकायला भेटणार होत.त्यामुळे मी जाम खुश होते आणि खूप सारे नवनवीन पुस्तक वाचायला मिळणार होते बापरे !किती छान असा झालं होतं माझा आणि पाहुणे मंडळी यांचे स्वागत करण्याचा मला मान भेटला होता .त्यामुळे मी खूप छान तयार होणार होते आणि प्रत्येक मुलीला तयार होयाला खूप आवडतं तसा माझा ही आहे आणि सगळी तयारी करण्यात दिवस गेला माझा उद्या लवकर उठायचं होत त्यामुळे मी लवकर झोपले आणि उद्याचा दिवस उजाडला मी घाईघाईने सगळ नीट करत होते आई ने साडी घालायला मदत करत होती आई ची ती साडी आवडती होती लाल साडी खूप सुंदर दिसत होती ती माझ्यावर त्यावर लगेच आई म्हणली ", बाई किती नक्षत्रसरखी दिसत आहे माझी पोर.मी लगेच आई ल म्हणलं काय ग आई तू पण आणि मी छान तयार होवून १०पर्यंत कॉलेज मध्ये गेले. कॉलेज मध्ये मराठी साहित्य संमेलन याची तयारी पूर्ण झाली होती खूप भारी जय्यत तयारी झाली होती.आणि हळूहळू पुस्तकांचे स्टॉल लागले जात होते आणि मीपण पाहुण्याचा स्वागत करण्यासाठी तयारी करत होते .तेवढ्यात आमच्या मराठी च्या मॅडम आल्या आणि त्यांनी मला बोलवलं अग कीर्ती लवकर चल आले पाहूनेमंडली मी आणि माझी मैत्रीण शुभा लगेच गेलो आणि आम्ही स्वागत केले .खूप सारे वेगवेगळ्या कॉलेज चे प्राध्यापक सुद्धा आले होते आमच्या कॉलेज मध्ये आणि एक चेहेरा समोर आला आणि मी थबकलेच अरे सागर इथे कसकाय मी आश्चर्य चकित झाले .त्यांनी मला आवाज दिला अग कीर्ती मी मग जरा भानावर आले .आणि शुभा मला इकडे चिडवत होती हमम कोण आले आहे बाबा !मी तिला शांत बस ना ग बाई का माझी खिल्ली उडवत आहेस आणि ते आले ना समोर आणि त्यांनी मला विचारला कशी आहेस कीर्ती मला यावर काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हतं पण मनात मात्र काहीतरी वेगळचं सुरू होत.त्यांनी अजून एकदा विचारला अग कीर्ती कशी आहेस मी गडबडून उत्तरं दिला हो मी छान आहे पण तुम्ही इथे कसकाय?अग साहित्य संमेलन आहे ना मग माझा ही एक पुस्तक आज प्रकाशित करण्यात येत आहे त्यामुळे मी आलो आहे .आणि मला खूप भारी वाटला .त्यांनी माझी विचारपूस केली आणि मग ते म्हणाले मी जातो तिथे माझे प्राध्यापक मित्र बोलवत आहे .मी हो म्हणाले आणि मला शुभा चिडवत होती .वा आजचा दिवस तर खूप भारी आहे किर्तीसाठी मग मी लगेच म्हणाले काय ग तू पण चल आपल्याला ते भाषण ऐकायला जायचं आहे चल लवकर .आणि आम्ही तिथे गेलो ते पुढे बसले होते सगळ्या प्राध्यापक मंडळी बरोबर पण त्यांची नजर कोणाला तरी शोधत आहे असा वाटत होत आणि त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांना मी दिसले आणि एक स्मितहास्य माझ्याकडे पाहून दिलं तशी मी लाजले .आणि भाषण झाला आणि सागर यांचं पुस्तक प्रकाशन करण्यात आले .आणि त्यांनी मला बोलवलं अग कीर्ती इकडे ये आणि त्यांनी मला एक रंगबिरगी पेपर मधे कायतरी दिला .मी ते घेतला आणि ते म्हणाले चहा ल जायचं का?त्यावर मी जरा गडबडले आणि हो म्हणाले.