टाईम - १० १० Jaaved Kulkarni द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

टाईम - १० १०

प्रस्तावना

मित्रांनो तुम्ही कधी घड्याळं निरखून पाहिले आहे का? तुम्ही म्हणाल, हा वेडा असला काय प्रश्न विचारतो आहे? मी हे विचारण्या पाठीमागच कारण अस आहे कि, आपण फक्त घड्याळ पाहिलं पण समजून घेतलं नाही. तुम्ही म्हणणार त्यात काय समजायचं? वेळ पाहण्यासाठीच काय तो त्याचा वापर. पण मित्रांनो घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्यासाठी नाही.

मित्रांनो गोंधळात का? गोंधळून जाऊ नका चला मी समजावून सांगतो. तुम्ही पाहिलंच असेल घड्याळमध्ये १ ते १२ अंक असतात, ३ काटे आणि गजर हे सगळं असते. जसे माणसाकडे दिवस आणि रात्र मिळून २४ तास आहेत तसेच घड्याळात सुद्धा १२ तास दिवसाचे आणि १२ तास रात्रीचे असे एकूण २४ तास असतात बरोबर ना? आता पाहूयात तीन काट्यांबद्दल, पहिला छोटा काटा ज्याला आपण तासाचा काटा (hours hand) म्हणतो, जो आपल्याला किती तास झालेत हे सांगतो. दुसरा मोठा काटा ज्याला आपण मिनिट काटा (minutes hand) म्हणतो , जो आपल्याला किती मिनिट्स झालेत हे सांगतो. आणि तिसरा काटा ज्याला आपण सेकंद काटा (second hand) म्हणतो जो आपल्याला किती सेकंद झालेत हे सांगतो. हा असा काटा आहे जो छोटा आणि मोठ्या काट्याला दर १ मिनिटाने म्हणजेच दर ६० सेकंदाने भेटत असतो. म्हणजे आपण या काट्याला या दोन्ही काट्यांमधील सम्भाषक किंवा माहिती पोहचवणारा असे म्हणू शकतो. त्यानंतर येतात ते घड्याळातील प्रत्येक अंकामध्ये येणारे प्रत्येकी ५ मिनिटांचे टप्पे. घड्याळामध्ये असणाऱ्या १ ते १२ या अंकामध्ये एकूण १२ टप्पे येतात आणि या १२ टप्प्यांमध्ये आपण आपले १००% जीवन कसे जगतो. आपल्याला सर्वांना हे टप्पे व्यवस्थित समजावेत म्हणून मी या टप्प्यांना पुढील प्रमाणे काही नावे दिली आहेत. पहिला टप्पा 'गर्भ', दुसरा टप्पा 'जन्म', तिसरा टप्पा 'बालपण', चौथा टप्पा 'तारुण्य', पाचवा टप्पा 'तडजोड', सहावा टप्पा 'गरजा', सातवा टप्पा 'कर्तव्ये', आठवा टप्पा 'सुख', नऊवा टप्पा 'दुःखे', दहावा टप्पा 'अडचणी', अकरावा टप्पा 'म्हातारपणं' आणि बारावा टप्पा 'चिरनिद्रा'.

चला तर हे सगळं सुरु होत घड्याळं विकत घेण्यापासून, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण घड्याळं घेण्यासाठी सर्व प्रथम एखाद्या घड्याळाच्या दुकानात जातो. घड्याळाच्या दुकानात वेगवेगळ्या डिजाईन, साईझ आणि रंगांची घड्याळे असतात. कोणत्याही घड्याळामध्ये १ ते १२ अंक आणि ३ काटे सेमच असतात पण त्याबरोबर एका गोष्टीच तुम्ही निरीक्षण केलाय का? प्रत्येक घड्याळामध्ये किंवा त्याच्या बॉक्स वर किंवा अगदी घड्याळाच्या जाहिरातीमध्ये सुद्धा कायम १० वाजून १० मिनिटेच वेळ घड्याळामध्ये दाखवलेली असते. तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? कि तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक घड्याळामध्ये, १० वाजून १० मिनिटेच वेळ का दाखवलेली असते? आहे ना हि एकदम मजेदार गोष्ट, पण आपण हा विचार कधी केला नसेल. आणि तुमच बरोबरच आहे ना, प्रत्येक घड्याळामध्ये १० वाजून १० मिनिटेच वेळ दाखविलेली असते हा इतका खोलवर जाऊन आपण हा विचार कशाला करू? आपण घड्याळ खरेदी करतो आणि वेळ सेट करून वापरायला चालू करतो बरोबर ना?

मला सांगा प्रत्येक घड्याळामध्ये १० वाजून १० मिनिटेच वेळ दाखवण्यामागे नक्की काय कारण असेल हो? त्या मागे सुद्धा एक विचार आहे असं मला वाटतय. मी सांगतो पटतंय का बघा. पण त्याआधी आपण थोडं घड्याळ समजावून घेवूयात, तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक घड्याळामध्ये १ ते १२ अंक असतात आणि या प्रत्येक अंकांच्या मध्ये म्हणजेच एका अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत जाण्यासाठी ५ मिनिटांचा टप्पा असतो. आपण वेळ सांगताना, समजून घेताना किंवा वाचताना, छोटा काटा म्हणजे तासाचा काटा ज्या अंकावर असेल तेवढे तास आणि मोठा काटा म्हणजेच मिनिट काटा ज्या ठिकाणी किंवा ज्या अंकावर असेल तेवढे मिनिट्स असे वाचतो, बरोबर ना? चला आपण एक उदाहरण घायच झालं तर, छोटा काटा म्हणजे तासाचा काटा १ या अंकावर आणि मोठा काटा म्हणजेच मिनिट काटा ३ या अंकावर असेल तर आपण १ वाजून १५ मिनिटे झाली असे म्हणतो. म्हणजेच आपण मोठा काटा ज्या अंकावर आहे त्याला ५ ने गुणाकार करतो बरोबर ना?

आता आपण येऊया माझ्या मागच्या प्रश्नावर म्हणजेच प्रत्येक घड्याळामध्ये १० वाजून १० मिनिटेच वेळ का दाखवलेली असते? तर घड्याळामध्ये दोनच वेळा अशा आहेत ज्या वेळी लहान आणि मोठा काटा एखाद्या अंकावर असताना तास आणि मिनिटे एक्झॅक्ट सेम असतात. त्या वेळा म्हणजे १० वाजून १० मिनिटे आणि ५ वाजून ५ मिनिटे. मग तुम्ही म्हणाल ५ वाजून ५ मिनिटे का दाखवलेले नसतात? १० वाजून १० मिनिटेच का दाखवलेले असतात? तर त्याचा संबंध आपल्या जीवनाशी जोडला गेलेला आहे अस मी समजतो. कसे ते पहा, आपला जन्म झाल्यापासून, आपलं बालपण, शाळा, कॉलेज जीवन हे सगळं जे आपण जगतो यामध्ये आपला जो वेळ वापरला जातो हा वेळ आपण नाही तर आपले पालक ठरवितात. यामधला कोणताच वेळ ठरवायचं आपल्या हातामध्ये नसते. पहा शाळा, क्लासेस, कॉलेज इ. वेळाच काय, तर अगदी अभ्यासाचा, खेळाचा, बाहेर फिरायचा वेळ सुद्धा आपले पालक, शिक्षक हे सर्वजण ठरवतात. म्हणजेच आपलया वेळचे योग्य नियोजन त्यांच्या पद्धतीने ते करीत असतात. आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या पायावर उभे राहण्याकरिता, शाळा, कॉलेज, पदवी शिक्षण पूर्ण करेपर्यंत आपल्या आयुष्यातील जवळपास २० एक वर्षे लागतात. म्हणजेच आप जर आपलं आयुष्य १००% गृहीत धरले तर आपल्या आयुष्यातील २० वर्षे म्हणजे जवळपास २०% वेळ आपल्यासाठी आपल्या पालक, शिक्षकांनी ठरवून दिला तसा आपण वापरला किंवा त्या पद्धतीने आपण जगलो आसे म्हणता येईल. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यातील २०% वेळ आपल्या पालकांनी, शिक्षकांनी ठरवून दिल्याप्रमाणे आधीच वापरून संपवलेली आहे बरोबर ना?

आता हे जर आपण घड्याळातील १० वाजून १० मिनिटे याबरोबर जोडले तर आपल्याला असे लक्षात येईल कि घड्याळामध्ये १० वाजून १० मिनिटांच्या मधील जो २० मिनिटांचा वेळ म्हणजे २०% आहे जो आपण आधीच वापरला आहे आणि जो आपल्याला कधीच परत वापरता येणार नाही. पण त्या नंतरची वेळ म्हणजे पदविका पूर्ण केल्यानंतरची वेळ ही आपण आपल्या पद्धतीने म्हणेजच आपले उर्वरित ८०% जीवन आपल्यापद्धतीने जगण्यासाठी वापरू शकतो असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. म्हणून घड्याळामध्ये, आपल्या कडील २०% वेळ संपलेली आहे आणि आपल्या वेळेची सुरवात त्यानंतर होते हे आठवण करून देण्यासाठी तर प्रत्येक घड्याळामध्ये १० वाजून १० मिनिटे वेळ दर्शविली असेल असे नाही वाटत का तुम्हाला?

पण अजून एक वेळ अशीच आहे असे मी मगाशी सांगितलं होत, ती वेळ म्हणजे ५ वाजून ५ मिनिटे. मग आता तुम्ही म्हणाल ही वेळ का दाखवलेली नसते घड्याळामध्ये? हो अगदी बरोबर तर मग चला मित्रांनो आता आपण हे समजावून घेऊ. ५ वाजून ५ मिनिटांच्या वेळेमध्ये तास काटा हा ५ या अंकावर आणि मिनिट काटा हा १ या अंकावर आहे. म्हणजे ५ वाजून ५ मिनिटांच्या मधील वेळ सुद्धा २० मिनिटांचाच आहे पण तो वेळ अजून आपण वापरलेला नाही. कारण १ या अंकावरील मिनिट काटा व ५ या अंकावरील तास काटा एकाच दिशेकडे तोंड करून आहेत व १ या अंकावरील मिनिट काटा हा ५ या अंकावरील तास काट्याकडे जात आहे आणि या दोन्ही काट्यांमधील वेळ २० मिनिटे दर्शवित आहे. म्हणजेच मिनिट काट्याला तास काट्यापर्यंत येण्यासाठी २० मिनिटे लागतील मग तेवढी २० मिनिटेच आपले जीवन आहे का? घड्याळामध्ये मिनिट काटा जोपर्यंत घड्याळाचे पूर्ण चक्र फिरत नाही तोपर्यंत वेळेचे चक्र पूर्ण नाही होत. त्याउलट १० वाजून १० मिनिटे या वेळेमध्ये मिनिट काटा पूर्ण चक्र पूर्ण करतो. तसेच १० वरील काटा आणि २ या अंगावरील काटे हे विरोधी दिशेकडे तोंड करून आहेत. म्हणून प्रत्येक घड्याळामध्ये १० वाजून १० मिनिटेच वेळ दर्शविली आहे असे माझे मत आहे.

तर मित्रांनो आता या १० वाजून १० मिनिट या प्रश्नाचे उत्तर शोधल्यांनंतर, आपण पाहणार आहोत, मी वर सांगितलेल्या घड्याळातील १ ते १२ अंकामध्ये येणाऱ्या प्रत्येकी ५ मिनिटांचे टप्पे आणि या १२ टप्प्यांप्रमाणे आपण आपले १००% जीवन कसे जगतो याबद्दल. आता आपण प्रत्येक टप्पा समजावून घेऊया.