आपली माणस - 2 Dhanshri Kaje द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आपली माणस - 2

जोशी काकूंच्या घरात लग्नाची तयारी सुरू असते. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र असतात. जोशी काकुंची मोठी सुन प्रज्ञा स्वयंपाक घरात चहा आणि भाज्यांची तयारी करत असते. घरात नुसती लगबग सुरू असते. तेवढ्यात शालु जोशी काकुंना भेटायला येते. आणि काकुंना विचारते. "काकु आता सांगा मी काय करू आज माझा सगळा दिवस तुमचाच आहे." लगबगीने जोशी काकु शालुला म्हणतात. "हो का? चला हे छान झालं. बरं बेटा आधी किचनमध्ये तुझ्या प्रज्ञा वहिनीला काय हवंय काय नकोय बघतेस का जरा? ती आत मध्ये चहा पाण्याचं बघतीये" हे ऐकल्यावर लगेच शालु किचनमध्ये जाते आणि प्रज्ञाची विचारपुस करू लागते. "वहिनी(थोडस थांबत)मला पण चहा. आणि मस्त गरमागरम भजी." प्रज्ञा मजा घेत बोलते. "या मॅडम. तुम्ही तर चहा घ्यायलाच येणार आमची थोडी मदत करणार?" थोडस चिडक्या स्वरात शालु बोलते. "अस काय ग म्हणतेस? मी तुला मदतच तर करायला आलीये न. मी तुझी बस थोडी गम्मत केली." हसत प्रज्ञा बोलते. "अग वेडाबाई मी पण तुझी मजाच घेतली. बरं जा आणि समोरच्या खोलीत त्या बायका बसल्या आहेत न त्यांना चहा आणि भजी देउन ये जा." शालु प्रज्ञाच्या हातातला ट्रे घेते आणि बायकांना व्यवस्थित चहा आणि भजी सर्व करते. कॉलनीतल्या बायका आहेराच काम करत बसलेल्या असतात. त्यांना शालु चहा भजी नेऊन देते. बाकीचे पाहुणेही कुणी बाहेरच काम करत असतात तर कुणी किचनकडे लक्ष देत असतात.
आता दोन दिवसा नंतर...
आशिर्वाद मंगलकार्यालय...
पाहुणे यायला सुरुवात झालेली असते दारात रांगोळी सजलेली असते रांगोळीत दोघांची नावही सजलेली असतात. 'दिया आणि शार्दुल' एक छानसा शुभ संदेश ही रांगोळीत लिहिलेला असतो.
सीमंतिनीची रात्र...
कार्यालयात सगळे जमायला सुरवात झालेली असते इकडे मुलीकडचे आलेल्या पाहुण्यांच स्वागत करण्यात व्यस्त असतात. कुणाला काय हवय काय नकोय अगदी जातीने बघत असतात. हळूहळू सगळे जमायला लागतात गर्दी वाढु लागते. कार्यालयातील एका खोलीत दिया तयार होत असते तर दुसऱ्या खोलीत शार्दुल तयार होत असतो.
इकडे गुरुजी सीमंतिनीच्या विधीची तयारी करू लागतात.
काही वेळानंतर..
गुरुजी शार्दुलला विधीसाठी बोलावतात आणि शार्दुलचे विधी सुरू होतात. दियाकडचे शार्दुलचे पाय धुतात. सगळे विधी बघण्यात मग्न होतात कुणी शार्दुलचे फोटो काढत असत तर कुणी स्वतःचेच फोटो काढत असत तर कुणी गप्पा मारत असत.
आशिर्वाद मंगलकार्यालयात...
शार्दुलचे सगळे विधी होतात. आणि त्याला ड्रेस बदलायला सांगतात. शार्दुल ड्रेस बदलायला आपल्या खोलीत निघुन जातो. आणि इकडे पुजारी दियाला विधीसाठी बोलावतात. दिया सुंदर साडी नेसुन मांडवात येते आणि तिचे विधी सुरू होतात.
काही वेळाने...
विधी संपल्यावर शार्दुल आणि दिया सगळ्यांना नमस्कार करतात. दोघही खुप गोड दिसत असतात. त्यांचं फोटोसेशन सुरू होतं. इकडे शालुही खुप गोड दिसत असते. ति सगळ्यांना मदत करण्यात मग्न असते. तेवढ्यात नकुलची तिच्यावर नजर पडते. नकुल तिच्याकडे बघतच राहतो. पण काही क्षणातच भानावर येत तिला मदत करू लागतो. सगळ्यांचे फोटो काढुन झाल्यावर सगळे जेवणाच्या हॉलकडे जातात.
जेवणानंतर...
रात्री 12 वाजता...
दियाच्या घरचे रुखवताची तयारी करू लागतात. तेवढ्यात शालु रसिकाजवळ येते आणि तिला विचारते. "हॅलो तुम्ही काय करताय? मी तुम्हाला काही मदत करू का?" दियाची बहीण रुखवत सजवत असते तिची नजर शालुवर पडते ति शालुला बोलते. "अग ठीक आहे. आम्ही करून घेऊत. मी बघितलं आहे तु आज खुप मदत केली आहे सगळ्यांना. तुझं नाव काय आहे? तुला बघितल्या सारख वाटत." शालु सांगते. "माझं नाव शाल्मली आहे. शाल्मली सहस्त्रबुद्धे. तु दिया वहिनीची बहीण आहेस न. आपण भेटलोय एकदा." थोडस आठवत रसिका बोलते. "अं.. आपण.. कधी ग? मला तर आठवत नाही." शालु आठवण करून देत. "अग, अस काय करतेस दादा बरोबर मीही वहिनीला बघायला आले होते न. आपण एकमेकींशी खुप गप्पा ही मारल्या आहेत. मी जोशी काकुंसमोर राहाते आठवलं." लगेच रसिकाला आठवत ति म्हणते. "अरे.. हो..हो..आठवलं मला. तुमच्याकडे मांजरीच पिल्लु आहे न. तु दाखवलं होतस मला." स्माईल करत शालु बोलते. "हं, मी तिचं आहे शालु. चल मी पण करते तुम्हाला मदत." रसिका म्हणते. "तु नाही ऐकणार ठीक आहे. गप्पा मारता मारता होईल तरी सगळं ये." रसिकाच्या मैत्रिणी, रसिका, आणि शालु सगळ्या मिळुन रुखवत मांडु लागतात.
काही वेळानंतर...
शालुची आई वेदिका बोलवायला येते. (आवाज देत) "शालु... ए शालु.. घ्या इथे आहेस का तु? अग सांगुन तरी यायचं न. नुसती फिरत असतेसमाहीत आहे न सकाळी लवकर विधी आहेत म्हणून लवकर उठायचं आहे. चल आता." शालु म्हणते. "आई अग बघ तरी समोर कोण उभं आहे ते. ही रसिका आहे. आपल्याकडे आली होती न. मी मदत करत होते तिला वहिनीची बहीण आहे ही." वेदिका जरा घाईतच असते ती म्हणते. "कशी आहेस बाळ तु? झालं का तुमचं रुखवत मांडुन छान मांडलं आहे हं रुखवत." रसिका सांगते. "हो. काकु ऑलमोस्ट झालय. शालु होती म्हणून पटकन होऊ शकलं सगळं. मी बघत होते न. आमच्याकडचे असो तुमच्याकडचे असो शालु सगळ्यांना मदत करत होती. तुमची अजुन ही काम बाकी असतील न." दोघी हसतात. "नाही अग आजची जेवढी काम होती ती झाली आहेत आता उद्या महत्वाचा दिवस म्हणल्यावर आणि विधी लवकर आहेत म्हणल्यावर उद्याची काम लवकर करावी लागतील. चल आम्ही येतो सकाळी लवकर उठायचं आहे न गुड नाईट." रसिका म्हणते. "गुड नाईट."
सगळे एकमेकांना गुड नाईट विश करून आपापल्या रस्त्याने निघुन जातात.
आशिर्वाद मंगलकार्यालयात...
वेळ सकाळी 7ची...
जोशी काकुंची लगबग सुरू होते. "अरे.. किती उशीर करता रे तुम्ही. चला लवकर. शालु अग बहीण आहेस न शार्दुलची. मग लक्ष दे न जरा. कुठं आहे शार्दुल विधी सुरू करायचे आहेत नकुल कुठे आहे. शी बाई.. ही आताची मुल म्हणजे न. मी लक्ष दिलं नाही न तर काहीच होणार नाही यांच. जा बाई आता बघुन ये लवकर." शालु आवरत असते. "हो.. हो.. काकु तुम्ही काळजी करू नका झालय माझं मी बघुन येते." मनाशीच पुटपुटत शालु नकुल आणि शार्दुलला रूमकडे शोधायला जाते.
काही वेळानंतर..
शोधता शोधता नकुल आणि शार्दुल शालुला समोरुन येताना दिसतात. शालु दोघांवर खुप चिडते. "दादा आज पण उशीर? तुच उशीर केलास तर पुढचे विधी कसे होणार? आणि तु भाऊ म्हणवतोस न स्वतःला दादाचा? आणता येत नाही दादाला लवकर. चला आता सगळे वाट बघताएत तुमच्या दोघांची." दोघ एकमेकांकडे बघून हसतात. नकुल तिला शांत करत बोलतो. "येतोय न आम्ही. एवढं पॅनिक का होतेस? आता उशीर होत नाही. चला आता." तिघ विधीच्या ठिकाणी पोहोचतात. जोशी काकु लगेच हळदीच्या विधीची तयारी करतात. काही वेळातच शार्दुलच्या हळदीचा विधी सुरू होतो. एक एक करत शार्दुलच्या सगळ्या मावश्या, आत्या, काकु, शेजारच्या काकु असे एक एक करत हळद लावतात. सुरवात शार्दुलच्या आई आणि वहिनी पासुन होते. विधीच्या वेळी कुणी गाणी म्हणत असत तर कुणी फोटो काढत असत.
काही वेळानंतर...
शार्दुलकडील पाच सुवासिनी दियाकडे उष्टी हळद घेऊन जातात आणि तिथेही असाच विधी पार पाडतो. मग सुवासिनी दियाची ओटी भरतात. अशा रीतीने हळदीचा विधी संपन्न होतो.
काही वेळानंतर...
सगळं आवरून गुरुजी दोघांना मंडपात बोलावतात. आणि मंडपात मंडपातील विधी सुरू होतात. गुरुजी एक एक करत सगळे विधी पूर्ण करतात. लग्नातील विधी आणि मंगलाष्टक पूर्ण व्हायला दुपारचे 12 वाजतात.
दुपारी 12 वाजता..
विधी झाल्यावर सगळे वधु वरास आशिर्वाद द्यायला स्टेजवर जमु लागतात. त्याच बरोबर प्रत्येकजण त्यांना काही न काही भेटवस्तु देऊन शुभेच्छा देत असत आणि त्यांच्या बरोबर फोटोज ही काढत असतात. कुणी कुणी जेवणाच्या हॉलकडे जात असतात.
इकडे दिया गौरीहर पुजायला घेते. काही वेळानंतर दोघांचे आणखीन फोटोज काढले जातात. मग वेळ येते ती पाठवणीची. दियाला आपलं रडु आवरत नसत ती रडता रडताच सगळ्यांना भेटते. आणि मग सगळे आपापल्या गाडीत बसतात आणि आपल्या घराकडे निघतात. एका सुंदर वैवाहिक आयुष्याची सुरवात करायला.
लग्न संपन्न झालं, विधी आले.