एक छोटीसी लव्ह स्टोरी - 5, 6 PritiKool द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक छोटीसी लव्ह स्टोरी - 5, 6

त्या दिवसानंतर मंदार खूप बदलला. गप्प गप्प राहायचं. उगीच जास्ती कोणाच्या अध्यात मध्यात पडायचा नाही. ग्रुप मध्ये पण मोjक्या लोकांशी बोलायचा. त्यात प्रीती शी जास्ती बोलायचं प्रयत्न करायचा. पण अनुजा मुले प्रीती पण मंदार ला टाळत असायची. भेटली की थोडे फार बोलून निघून जायची. मंदार मग अजूनच उदास व्हायचा. काय होतंय आणि काय घडतय काही कळत नव्हते...अभ्यासातून लक्ष उडाले होते. अनुजा मात्र ग्रुपणपासून तुटत चालली होती. तिचा खास करून राग प्रीती वर होता. तिच्या मुळेच मंदार ने आपल्याला भाव दिला नाही असे सारखे वाटत होते तिला...सगळ्यांनी तिला खूप समजावलं पण ती कोणाचे ऐकत नव्हती. प्रितिशी तर बोलणे सोडून दिले होते आता ग्रुप मध्ये पण क्वचित यायची. प्रीतीने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला पण तिने आपला हेका सोडला नाही. एका पॉइंट नंतर प्रीती ने पण समजावणे सोडून दिले...
आता पहिली युनिट टेस्ट सुरू होणार होती. सगळेच अभ्यासाला लागले होते. प्रीती तर लायब्ररी मध्ये तळ ठोकून बसली होती.मग मंदार पण लायब्ररी मध्ये जाऊन बसायला लागला. पण लक्ष सगळे प्रीती कडे..

तिला ही जाणवायचे, मंदार आपल्या कडे बघतो ते..कशी कधी नजर भेट व्हायची...प्रीती लाजून खाली बघायची.मग मंदार ही गालात ल्या गालात हसायच..प्रेमाचा अंकुर हळू हळू रुजत होता..एक दिवस प्रिया ने लायब्ररी मध्ये प्रीती आणि मंदार चा नजरे चा खेळ बघितला. तिला मोठे आश्चर्य वाटले...हे कधी घडले...आणि कोणाच्या लक्षात कसे आले नाही...
तिने प्रीती ला गाठले आणि विचारले पण प्रीतीने आपल्या भावना सांगितल्या. मला तो फक्त मित्र म्हणून आवडतो. बस बाकी काहीं नाही.

पण प्रिया हसली आणि तिने आपला अनुभव सांगितला..ही तर सुरवात आहे. आज ना उद्या तो तुला नक्की प्रपोज करणार प्रीती.मग तुझे उत्तर काय असेल ते विचार कर. तुला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. एकीकडे अनुजा आहे ..तिने आधीच तुझ्या आणि मंदार बदल वाट्टेल ते सांगून ठेवलंय तू हो म्हणालीस तर अनुजा जे काही बोलली ते खरे होते. जर नाही म्हणालीस तर दोस्ती राहील की नाही माहिती नाही पण प्रेम गमावून बसशील. नीट विचार कर प्रीती....मंदार चांगला मुलगा आहे.मला वाटते ती त्याचा नक्की विचार करावा.....मी आणि अक्षय आम्हाला दोघांना हि तू आणि मंदर्ची जोडी आवडते...मंदार ला खरंच अनुजा सूट नाही होत...आणि ह्या मामल्यामध्ये जोर जबरदस्ती पण तर नाही ना चालत....


प्रीती मात्र हे बोलणे ऐकून अजूनच कन्फ्युज झाली ..काय चाललंय हे...आज प्रिया ला कळेल उद्या अजून कोणाला तरी कळेल. अनुजा चे काय?? ती काय म्हणेल आपल्याला. घरी काय म्हणतील? मित्रमंडळी काय म्हणतील..सगळ्यांच्या नजरेत पडू आपण. मैत्रिणीशी असे वागलो आपण...आणि मंदार आवडतो का आपल्याला. ह्या वयात आकर्षण हे असतेच म्हणून लगेच हो म्हणायचं??? काय करू कोणाला विचारू?काय चूक आहे काय बरोबर?

प्रीति आपल्याच विचारात घरी पोचली. खरेच किती कठीण आहे असे निर्णय घेणे.मंदार कधी प्रपोज करेल आपल्याला मग आपण काय उतर द्यायचे...आधी आपल्या मनाची तयारी आहे का?आपल्याला तो आवडतो का? आपल्याला तर त्याची फारशी माहिती नाही...मग कसे काय आयुष्याचे निर्णय घ्यावा. काहीच कळत नव्हते. बराच वेळ ती उलट सुलट विचार करत होती. जाऊंदे विचार करण्यात काही अर्थ नाही ....जेव्हा होईल तेव्हा बघू असे विचार करत शेवटी ती ने मंदार चा विषय मनातून काढून टाकला. अभ्यासाला बसायचा प्रयत्न केला पण मंदार डोक्यातून जाईना....

इकडे मंदार ची हालत पण प्रीती सारखीच. प्रीती आवडते हे खरे पण मग आपले नाते पुढे न्यावे का? तिला मी आवडतो का? हे असे अनेक प्रश्न होते मनात. उगीच पुढे काही करायला गेलो तर जे काही बोलते ना माझ्याशी ते पण नाही बोलणार ...तशी मानी आहे प्रीती. नकोच ते जे चाललय ते चालू दे...बघू तरी तिच्या मनात काय आहे...आपण ही थोडा वेळ घेऊ आणि तिला पण देऊ..कमाल आहे बाबा ह्या अक्षय प्रिया ची इतक्या लहान वयात ह्यांना कसे कळेले...आपण परफेक्ट आहोत एकमेकांना ते...

दिवस मागून दिवस जात होते..मंदार आणि प्रीती एकमेकांनाशी जास्ती काही बोलायचे नाहीत पण नजरेचे खेळ सुरू होते...आधी फक्त प्रियाला कळेले होते आता हळू हळू सगळ्या ग्रुपला समजले होते. निनाद आणि अनुजा मात्र ह्या सगळ्यापासून लांबच होते. अनुजा अजून दुखावलेली होती आणि निनाद ला आपण कोणाची बाजू घायची हे कळत नव्हते. मंदार मात्र प्रीतीकडे बघून नजरेने आश्र्वस्त करायचा पण बोलत काहीच नव्हता.अश्यातच परीक्षा झाल्या. प्रत्येक पेपर ला मंदार रोज प्रीतीला बेस्ट लक करायचा आणि जायचा.प्रीती ला मग पेपर छान जायचे....परीक्षा झाल्यावर सगळ्यांनी पिकनिक ला जायचे प्लॅनिंग सुरू केले. खरे तर मस्त श्रावण सरी सुरू होत्या.सगळीकडे हिरवाई पसरली होती ..पिकनिक तर बनत होती ना...सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून परवानगी मिळवली. म्हाळशेज घाटात जायचा प्लान होता. सकाळी लवकर उठून सगळे भेटले. मंदार आणि त्याचे दोन एनसीसी वाले मित्र पण येणार होते.

सकाळी लवकर उठून गाडी घेऊन निघाले.प्रत्येककाकडे बाईक होतीच. मुली मग पिल्लियन रायडर बनल्या. प्रीतीला निनाद ने बोलावले तू माझ्याबरोबर चल...असाच होता निनाद सगळ्यांची काळजी करणारा. सगळा ग्रुप निघाला...सकाळी ७.३० ला मंदार आणि त्याचे दोन मित्र हायवेला भेटले. नेहमीचा फॉर्मल कपड्यामध्ये असणाऱ्या मुली आज जीन्स आणि टीशर्ट मध्ये खुलून दिसत होत्या. त्यात प्रीती तर सुंदरच दिसत होती.जीन्स आणि मस्त टॉप त्यात केस मोकळे आणि फक्त काजळ...ती खूपच खुलून दिसत होती. नेहमी फॉर्मल मध्ये असणारा मंदार आज जीन्स आणि टीशर्ट मध्ये छान दिसत होता...प्रीती ने त्याला नजरेनेच दाद दिली मग मंदार ही लाजला...

बाईक रेस करत सगळे हायवे वर आले. आता चांगलेच उजाडले होते. नुकतीच मोठी सर येऊन गेली होती.हवेत चांगलाच गारठा जाणवत होता.मग एका ठिकाणी चहा आणि नाष्टा साठी थांबले..ज्योतीने सगळ्यांसाठी समोसे आणले होते कोणी चॉकलेट कोणी ब्रेड बेटर... सगळ्यांनी फराळावर ताव मारला , गरम गरम चहा पास केला. भरपेट नाष्टा झाला.....पोटाबा फुलं झाला.मग फोटो काढले.सेल्फी झाल्या...मंदार ने आपल्या मोबाईल वर प्रितीच्या नकळत भरपूर फोटो काढले.ना जाणो पुढे तिचे फोटो मिळतील नाही मिळतील....

सगळे निघाले. ज्योती ने निनादच्या बाईक वर बसली. आता आली ना पंचाईत...प्रीती कुठे बसणार. मग शेवटी निनाद म्हणाला जा ना मंदार आहेच तिथे बस. चांगला चालवतो तो पण...सांभाळून नेईल तुला..

निनाद माहिती आहे ना..तुला तरी पण असे करतोयस...शहाणा कुठला ..प्रीतीने चिडून हळूच निनादला म्हटले...

मला काहीच माहिती नाही प्रीती..काय बोलतेय तू??

काहीं नाही जा...बघ येते का तुझ्या बरोबर नंतर कधी...निनाद...वाटले नव्हते तू असे करशील..

मूड खराब करू नकोस प्रीती.. जा ना...लवकर सगळे गेले पण पुढे...

नाईलाजाने शेवटी मग मंदारचा बाईक कडे निघाली. हा सगळ्यांचा मिळून प्लॅन होता नक्कीच हा विचार नक्की प्रितीच्या मनात आला. म्हणजे मंदार ही यात सामील होता की काय....!!!तरीच सकाळ पासून गालातल्या गालात हसतोय शहाणं कुठला.....

any problem???

नाही काही नाही..असाच ..चल निघू या..

प्रीती त्याच्या बाईक वर चढून बसली. खरे तर तिला जाम लाज वाटत होती...पण करणार काय.त्याचे मित्र एक बाईक वर आणि दुसऱ्या बाईक वर निनाद ज्योती..काय बोलणार !!!

निघू या?? चालेल..नीट पकडून बस मागे.

हम्म चाल..नीट चालावं प्लीज. निनाद'च्या बाईक ची सवय आहे..पण तुझ्या बरोबर कधी बसली नाही ना...म्हणून...

घाबरु नकोस...नीट चालवतो मी बाइक...पडणार नाहीस तू...म्हणत त्याने बाईक स्टार्ट केली..त्या आधी आरश्यात प्रीतीला नीट बघून घेतले. कसली सुंदर दिसतेय... नशीब खुलले आज...आरसा साफ करायचा निमित्ताने त्याने तिच्या प्रतिबिंब गालावरून हात फिरवून घेतला...लय भारी!!!!!

निनाद पुढे, नंतर मंदार चे मित्र आणि मग मंदार प्रीती...असे निघाले. लाईन मध्ये चालेल होते. आजूबाजूला घाट सुरू होत होता...सगळी कडे हिरवी चादर पसरली होती. मधून मधून धबधबे पडत होते...वातावरण एकदम आलाहदयक झाले होते आणि त्यात मंदार आणि प्रीती एक बाईक वर...
खरे तर ती मनातून खूप घाबरली होती..पण दाखवत नव्हती..थोडे लांबच बसली होती....

आज बोलायचे नाही असे ठरवले आहेस का ?? मंदार ने ना राहून विचारले..

नाही असे काही नाही...बाहेर बघते आहे...मस्त आहे ना ...कित्ती छान दिसतेय....

हो..छान दिसत आहे ...तुला फोटो काढून हवा असेल तर थांबतो..

थांब ना..तिकडे..मस्त बॅकग्राऊंड येईल..प्लीज थांब ना..

थोडे पुढे गेल्यावर प्रीतीने सांगितल्या ठिकाणी दोघे थांबले...बाकीचे थोडे पुढे होतेच. प्रीती ने एक दोन फोटो काढले आपल्या मोबाईल मध्ये आणी सेल्फी घ्यायचा प्रयत्न करत होती..तिचे ते वेडेवाकडे फोटो काढणे तो बघत होता मग म्हणाला...मी काढतो थांब..तू छान पोज दे ...
तिचे एक दोन फोटो काढले तिच्या मोबाईलधे आणि दोंघाचा एक सेल्फी काढला... चल निघू या??? बाकी मंडळी गेली पुढे???

सॉरी ... चल जाऊ या...

ह्या वेळेस ती ना लाजता बाईक वर ...थोड्यावेळाने म्हणाली...तुला बाईक फास्ट नाही चालवता येत काय??? चालावं ना...असा काय तू???

ये ले..चोराच्या उलट्या बोंबा...माझ्या बाईक वर बसायला कोण घाबरत होते...म्हणून हळू चालवतोय...तर मलाच विचारते बाईक फास्ट येत नाही का म्हणून ..शाहणी आहेस...प्रीती तू...

चालावं आता...सगळे गेले खूप पुढे...गाठले पाहिजे त्यांना. ...

त्याने आपला वेग वाढवला...तशी प्रीती थोडी टेन्शन मध्ये आली..जरा जास्तच फास्ट केली ह्याने..मग तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.. तो मात्र हसला...आलीस ना बरोबर लाईन वर. घबराट कुठली!!!.....एक एक करत सगळ्यांना टाकत शेवटी ते पुढे आले..मग मंदार ने वेग कमी केला...

छान चालवतोय बाईक तू..सगळे हरले...!!!

तिची निरागसता पाहून हो हसला...म्हणाला

येऊ देत त्यांना मागून...आपण चहा घेऊ तो पर्यंत ..चालेल तुला???

हो चालेल ना... चल...

थोड्या पुढे गेल्यावर त्याने बाईक एका छोट्या टपरीवजा हॉटेल वर थांबवली...दोघे चहा घेत बाहेर चा नजारा बघत उभे होते...तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली...दोघे मग पावसाकडे बघत होते...म्हणजे प्रीती बाहेर पावसाकडे आणि तो तिच्या कडे अनिमिष नेत्रांनी बघत होता...कसली रमली आहे पावसात....लक्षातच येत नाही ही सुंदर आहे की तो पाऊस...कित्ती तरी वेळ तो तिच्या कडे बघत बसला होता..वेळ जणू थांबला होता...बरेच वेळाने प्रितीच्या लक्षात आले कि तो काही बोलत नाही..म्हणून मागे वळली तर मंदार तिच्याकडे बघत असाल्याचे तिने बघितले...त्याने मात्र घाईगडबडीत आपली नजर वळवली...ना जाणो तिला कळेले तर...आणि नाही आवडले तर... तिला मात्र त्याची ती धडपड बघून हसायला आले..

असा काय बघतोस...??

काही नाही..असाच तुला बघत होतो...पाऊस असा लांबून आवडतो ना तुला...भिजायला नाही आवडत राईट???

आरे वाह..हुशार आहेस ...पाऊस आवडतो ..पण भिजायला नाही आवडत जास्ती...थंडी वाजते मला मग...सगळे हसत बसतात मला मग...

हम्म्म.. if you don't mind ek photo kadhu tuzha paus baghtana..please...

काढ ना ...त्यात काय...!!एकदम natural आला पाहिजे पण...चालेल...!!

हाहा प्रयत्न करतो.....असे म्हणत त्याने तिचे खूप फोटो काढले....त्यातले दोन तीन तिला खूप आवडले...दोघे असाच गप्पारत फोटो काढत होते...तर एक टवाळ ग्रुप दोघांकडे बघून टिंगल करत होता....मंदार चा ते लक्षात आले पण त्याने थोडा वेळ दुर्लक्ष केलं..पण आता मात्र त्याने जास्ती चेव चढला होता..एकटा मंदार आणि प्रीती ...आणि ते चौघे.....त्यातला एक काळासा मुलगा प्रितीकडे बघून म्हणाला....जानेमन...मी पण काढतो तुझे फोटो ये...आणि ते चौघे हसायला लागले...प्रीती घाबरली..आणि मंदारच्या मागे लपली ...चाल ना इथून..प्लीज...तिने घाबरून म्हटले.

प्रीती तू बाहेर जा...आणि तिचा हात धरुन तिला बाहेर ढकलले...मंदारचा तो आवेग बघून प्रीती अजूनच घाबरली...मंदार नको ना प्लीज चल ना इथून...
तो खूप चिडला होता...चांगलाच लाल झाला होता....त्याला असे बघून तर ती रडायची बाकी होती .....

ती चौघे मंदारचा मागे आले..प्रीती बाहेरच होती पण लक्ष सगळे आत मध्ये...मंदार ने त्या चौघांना बरोबर बाचाबाची चालू होती. मध्येच एकाने मंदार ला ढकलले..मग मंदार अजून चिडला आणि एकेक करत सगळ्यांना धुवून काढायला सरूवात केली... तेवढयात प्रिती ला सगळे एके एक करत येताना दिसले...तिला असे बघून सगळेच घाबरले...तिने रडतच काय झाले ते सागितले...सगळे धावत त्या टपरी कडे आले....सगळ्यांना बघून ते चौघे मात्र पळून गेले.....मंदार ने त्यांना चांगलेच चोपले होते...

निनाद ने त्याला जाऊन मिठी मारली आणि शांत केले...ठीक आहे मंदार गेले ते....शांत हो.प्लीज लागलं तुला काही????

नाही ठीक आहे मी..मला काहीच नाही झाले...प्रीती ठीक आहे??? खूप घाबरली होती ती !!! त्याने काळजीने विचारले...

हो ठीक आहे...चल बघून येऊ आपण..तुला नक्की कुठे लागला नाही ना....एकटा होतास आणि ते चार...

नाही लागलं रे.. कराटे ब्लॅक बेल्ट आहे मी ...त्या मुळे सेल्फ डिफेन्स येते...

हम्म्म मग ठीक आहे बाबा...कमाल च आहे तू !!!!

दोघे बोलत बोलत बाहेर येतात...प्रीती आणि बाकीच्या मैत्रिणी तिच्या बाजूला उभ्या राहून तिला शांत केले असते...मंदार तिकडे येताच सगळे त्याची चौकशी करतात....मंदार सगळ्यांना आश्वासन देतो की तो ठीक आहे...आणि प्रीती शी एकट्याने बोलायचे म्हणून सांगतो.

तू ठीक आहेस???

हम्म्म...ठीक आहे... I am really really sorry Priti...मला कळायला हवे होते..एकटे आपण इथे थांबलो ते चुकले...त्यात तुझी काहीच चूक नव्हती...रिअली सॉरी ...मला माफ कर ......पुन्हा असे होणार नाही....

ती मात्र अजून भितीनी थरथर कापत होती. केले माफ...पण इतका चिडायला काय झाले...गेलो असतो निघून आपण... भांडायची काही गरज होती का?? काही झाले असते म्हणजे?? प्यायलेले वाटत होते ...उगीच कशाला नादी लागलास??? प्रीती ने चिडून बोलली..

अरे असे काय बोलतेय..छेडत होते तुला ते। मग काय गप्प बसु तुच सांग।

काही झाले असते मग ??? काय केले असते मी ह्याचा विचार केलास ...लागला सरळ मारामारी करायला..विचार न करता !!

काही झाले नाही ना.. मी कशाला टेन्शन .मला कराटे येते...सेल्फ डिफेन्स येतो उगीच रिस्क घेत नाही मी...चिडतो मान्य आहे...पण तुझ्या जागी अजून कोणी असते तरी हेच केले असते ...मला वाटले प्रीती तू समजुन घेशील....कोणालाही हक्क नाही स्त्रीला त्रास द्यायचा...त्याने रागावून म्हटले...आणि निघून गेला....

असा काय हा !!!ह्याच्या काळजी ने बोललो तरी रागावला...चिडका आहे नुसता.....

निनाद ने त्यांचे सगळे बोलणे ऐकले ..तो मंदारला समजवायला गेला .. मित्रा रागावलास का?? प्रीतीला काळजी वाटली तुझी म्हणून बोलली ती. तू मनावर घेऊ नकोस ना एवढे ना....झाले ते झाले...चला मूड नको खराब करू या...निघू या का..???

हम्म्म ५ मिनिटं दे..मग निघू या..


थोड्यावेळाने सगळे परत पुढे जायला निघाले..आता नो रेसिंग सगळे एकत्रच राहायचे...
निनाद म्हणाला प्रीती तुला हवे तर माझ्या बाईक वर ये..दुसरे कोण तरी जाईल त्याच्या बरोबर....

नको मी जाते...त्याच्या बरोबर...प्रीती ने म्हटले..
खरेतर मंदार ला वाटत होते ही काही येणार नाही आपल्याबरोबर ...आश्चर्य आहे..तयार झाली आपल्याला बरोबर यायला...कमाल आहे..काय आहे मनात तुह्या प्रीती सांग ना..त्याने मनातल्या मनात विचारले आणि हसला..तिला थोडी ऐकायला येईल आपल्या मनातला संवाद....

सगळे निघाले.. आधी दोन मिनिट दोघंही एकमेकांशी काही बोलले नाही....पण जसे पुढे गेले...तसा प्रीती ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला...चला म्हणजे रागावली नाही आहे तर...चिडून बोलली फक्त....उगीच आपण पण रागावलो तिच्यावर त्याला वाटले....

प्रीतीने त्याच्या कानाजवळ जाऊन म्हटले...सॉरी मंदार..मला समजायला हवे होते..तुझी काळजी वाटली,जे काही झाले त्याने घाबरली होती म्हणून बोलली...बस बाकी काही नाही...

तिचा तो..आवाज अगदी कानाजवळ. जणू कोणी मधुर बासरी वाजवत होते. इतका गॉड आणि ऐकत राहावे असा... तिचा तो स्पर्श त्याने ने आधीच वेडे केलेलं...त्यात ती इक्तक्या जवळ आलेली ..तिचे केस उडून त्याला गुदगुल्या करत होते आणि प्रीती माफी मागत होती...अश्या गोष्टी साठी ज्यात त्याच्या बदल फक्त काळजी होती.. खरंच काही असेल का हिच्या मनात आपल्या बदल की फक्त मैत्री?? काही कळत नाही...कधी वाटते हिला सगळे कळते कधी वाटते हिला काहीच कळत नाही.फक्त मित्र म्हणून वागते अशी ही..त आपल्याच विचारत दंग झाला. ..

बोल ना..अजून रागावला आहेस??? प्रीतीने विचारले.त्याची तंद्री भंगली ..नाही रागावलो नाही.. Iam sorry too...उगीच चिडलो तुझ्यावर... घाबरली ना तू त्या मुलांना.????

हो घाबरली..कधी माझ्या बरोबर झाले नाही आज पर्यंत...म्हणून असेल कदाचित. आता पर्यंत फक्त फिल्म्स मध्ये बघितले होते हे सगळे....तू मात्र एकटा लढलास ..कसे काय?? ते चार होते आणि तू एकटा....भीती नाही वाटली???

नाही वाटली...स्वसंरक्षण येते मला.. कराटे ब्लॅक बेल्ट आहे ...त्या मुळे लढता आले...नाही तर काय खरे नव्हते...तसे पण एनसीसी करतो, फुटबॉल खेळतो वैगरे करतो ..भांडू शकलो असतो.....तुम्हा मुलीनं सारखे नाही ...स्वसंरक्षण इम्पोर्टटं आहे प्रीती.. कधी तरी असे उपयोगी पडते.. ...

हम्म्म....माहिती आहे ..त्या पेक्षा डोके शांत ठेवायला शिक ना.. किती डोके गरम आहे तुझे...कधी तरी तुझा हा तापट स्वभाव भोवणार आहे तुला...मंदार...उगीच त्रागा करतोस छोटी गोष्टी चा....ती ने समजावण्याचा स्वरात म्हटले...

प्रयत्न करेन..प्रीती डोके शांत ठेवायचा... दुसऱ्यांदा सांगते आहेस हे.... तेवढं पण नाही हा चिडत मी...

ते तुझ्या नाक आणि कानाला विचार लगेच कळते...हे हसत म्हणाली....तिला असे मनमोकळे हसताना पाहून तो ही मग छान हसला...नंतर dदोघांनाही अवांतर खूप गप्पा मारल्या...

एक छानसा धबधबा पाहून सगळे थांबले... मनसोक्त पाण्यात मस्ती करायला म्हणून सगळे उतरले...प्रीती बाहेरच बसून राहिली....अशी काय ही?? पाण्यात नाही यायचे तर आली कशाला??त्याने निनादला विचारले....

अरे तू टेन्शन नको घेऊ...ती नाही येणार पाण्यात...ती येते आपल्याबरोबर आपली बॅग आणि चप्पल सांभाळायला... हो हसत म्हणाला. . .

म्हणजे. .?

अरे लहानपणी एका पिकनिक मध्ये खूप भिजलो आम्ही मग ही खूप आजारी पडली. पार हॉस्पिटल मध्ये न्यावे लागले तिथं पण जवळ जवळ सगळ्यांनी आशाच सोडली होती हिची. . तेव्हांपासून जास्ती भिजत नाही. जपून असते स्वतःला. जाऊंदे असेल मूड तर येईल. आम्हीपण जास्ती आग्रह करत नाही तिला. ति येते तेच खुप आहे सगळ्यांसाठी....

ओह्ह, थांब आणतो तिला मी .. .बघतो कशी येत नाही. .. निनाद मात्र डोक्यावर हाथ मारून घेतो........


Dont forget to follow me and comment on the story..