घर भूतांचे - 3 Ajay Shelke द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घर भूतांचे - 3

"साहेब कसं आहे मला इथे येऊन झाले १३ वर्ष पण आपल्याला अस काही कधी दिसल नाही जे बोलतात इथेले स्थानिक लोक" ड्रायव्हर सांगू लागला होता. "अरे पण बोलतात काय? कशा बद्दल? नक्की प्रकरण काय आहे?" मी त्याला खोलून विचारू लागलो. "अहो इथे shevti बंगल्या पुढे जणू ८० वर्षापूर्वी एक बंगला होता कोणाचा होता ते माहीत नाही पण त्या बंगल्यात नवरा बायको आणि त्याची मुलगी राहत होती. त्या मुलीचं लग्न जुळल होत पण तो होणारा तिचा नवरा अमेरिकेला गेला आणि तिथे कोणी तरी त्याला गोळी मारून ठार केलं. पण त्या मुलीला कधीच हे माहीत झालं नाही आणि तिला वाटल की आई बापाने प्रेम विवाह असल्यामुळे त्या पोराला भमकवल आणि तो तिला सोडून गेला. त्याचा राग मनात घेऊन तिने एका रात्री आई बापाला जिवंत जाळलं आणि अख्खं घर पेटून दिलं आणि स्वतः पण जीव दिला. अस म्हणतात". ड्रायव्हर ने सांगितल आणि माझी भीतीने गाळण उडाली. "अरे मग आत्ता त्याच काय लोक आत्ता का घाबरतात एवढे झालं ते ८० वर्षापूर्वी". "अस नाही साहेब त्या नंतर प्रेमाच्या विरहामुळे त्या पोरीची आत्मा इथे तिथं भटकू लागली ना तिच्या मुळे इथल्या ४ पोरांचा जीव गेला एक काळी गाडी आहे तिच्या कडे तीच्या बापाची ती घेऊन फिरते आणि जो कोण त्या गाडीत तिच्या सोबत बसतो ती त्याच्या मागे येते अस बोलतात. वर ती प्रेमासाठी विचार ते आणि नाही बोला कोणी तर मग खेळ संपवते अस बोलतात". हे ड्रायव्हर ने सांगताच मला सकाळची गोष्ट आठवली आणि माझे पाय कापू लागले. "बर साहेब कधी कोणाकडून लिफ्ट मागू नका इथे तसे इथे जास्त कोणी राहत पण नाही पण तरी सांगतो आहे" ड्रायव्हर बोलत होता तोच त्याने काचून ब्रेक मारला.
"Hey you a** **le you can't see the coming car? don't do sucide next to my car go somewhere else you ba*****d" ड्रायव्हर चांगलाच भडकलेला आणि गाडीच्या बाहेर डोकं काढून बोलत होता तोच माझे डोळे चमकले कारण गाडीच्या समोर जी व्यक्ती होती तिला मी ओळखत होतो आणि ती कोणी दुसरी तिसरी नसून सकाळची ती गाडीवाली मुलगी होती. "Can you please drop me? Wait you!" ती माझ्याकडे बघून बोलली आणि ड्रायव्हर आमच्याकडे बघत होता जस आत्ता आम्ही दोघे मिळून त्याचा खून करणार आहोत. "You! What are you doing here?" मी तिला भीतभीतच विचारलं. "Ohh Here is my friend's house inside. I came there. My car is in the garage. So I was waiting for the car here. How are you here?" ती सांगत असताना ड्रायव्हर मध्येच बोलला. "You know each other and then why do you want to hit someone in front of the car".
"No man I am just trying to stop car because nobody stops here I am looking for a lift so can u please drop me ? Please don't say no ?". ती ड्रायव्हर सोबत बोलतं असताना मी बघितले की तिचे कोपर दात थोडे वेगळे वाटत आहे आणि तिच्या बोलण्यात सुध्दा सकाळच्या आणि आत्ताच्या बोलण्यात फरक जाणवत होता. "Ask to my passanger I can't say anything about it" ड्रायव्हर ने तिला उत्तर दिले आणि मी माझ्या तंद्रितून बाहेर आलो. " Hey buddy please drop me man please ". " Yeah sure come in". मी तिला हो बोलतच ती गाडीत येऊंन बाजूलाच बसली आणि आमचा प्रवास सुरु झाला. अजून घर बरच लांब होत पाऊण तासाचा रस्ता होता आणि अंधार झालं होता. रस्त्यावर घनघोर अंधार होता आणि कसल चिटपाखरू सुध्दा नव्हत ना ही आल्यापासून कोणी काही बोलत नव्हत म्हणूनच शेवटी मी तोंड उघडलं आणि ड्रायव्हरला विचारलं " अरे तू काय बोलत होतास मगाशी त्या मुली बद्दल पुढे सांग मला". "तेच ओ की थांबत जाऊ नका इथे बघा आत्ता ही लोकल ची असून हिला कोणी घेतल नाही बस हेच सांगत होतो. So where should we drop you madum?". ड्रायव्हर ने तिला विचारलं आणि तशी ती बोलली "first tell me what u guys talking about what you are telling to him to not stop over this road it is so rude if anybody needs help then what will happen? Will you go as of tell me?". ती थोडी रागात आणि आवेशात येऊन बोलली आणि ड्रायव्हर ने तिला सर्व कथा सांगितली तसा तिचा कायापालट झाला आणि मी तर बघतच राहिलो तिचे केस सुटले तिची सुंदरता आत्ता वेदृप्तेत बदलली आणि तिने मागून त्या ड्रायव्हर च्या मानेवर चावा घेत बोलू लागली " so you are that guy who tell's everyone I am here don't stop. you rat I am gona kill you". बघता बघता ड्रायव्हर रक्ताने माखला आणि गाडीचा ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यावरून खाली उतरली आणि बाजूच्या गर्द झाडीत थोडी आत जाऊन झाडाला ठोकली बसं आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा डोळ्यावर प्रचंड उजेड येत होता आणि मी डोळे मिटले जेव्हा परत जाग आली तेव्हा बघीतले की अंगावर पांघरून आहे, थंड एसी चालू आणि मधाळ इंग्रजी गाणी कमी आवाजात चालू आहेत आणि बाजूच्या सोफ्यावर एक परिचित व्यक्ती बसली आहे आणि मला जाग येताना पाहून जवळ येत आहे ........




क्रमशः